Oct 29, 2020
स्पर्धा

माझ विश्व

Read Later
माझ विश्व

माझे विश्व 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  आज मोबाईलमध्ये  न्यूज वाचल्यानंतर तिला अगदीच विचार आला. का बरं ? सुशांत ने अस केल असाव. तो खरच आत्महत्या करू शकतो का ? कि कोणी हत्या केली असावी? चांगल सुसज्ज घर , स्वतःची एक ओळख , एक हसत मुख चेहरा कोण जाणे या हसऱ्या मुखवट्या मागे काय काय गुढ लपली असतील? 
 ( हा विचार बाजूला सारून सफिया आपल्या कामाला लागली . दुपार पर्यंत सगळी काम आवरून ; ती व्हॉट्स अँप ओपन करून स्टेट्स बघत होती).

RIP Sushant !, RIP Sushant!

 सगळ्यांचे तेच स्टेटस . मग परत ती त्याच विचारांच्या भोवऱ्यात अडकली. सफिया चा बाळ देखील झोपी गेल होत, म्हणून तिला त्या विचारांत जायची , गुंथायची जणू अजून मोकळीक मिळाली. 
( विचार करत करत......) स्टेटस , न्यूज , सोशल मिडीया यावरील चर्चेला आलेले उधाण या सर्वांतुन सफिया च्या डोक्यात खुप सारे प्रश्न आपल डोक वर काढत होते. तो निराश होता हे कळाल , तो एकटा पडला हे देखील कळाल , काम मिळत नव्हती ..... अशी अनेक कारण सफिया ला प्रसारमाध्यमांद्वारे कळाली तो उच्चशिक्षित होता हे देखील. हे चित्र डोळयांसमोर फिरत असताना डोक्यात मात्र प्रश्नोत्तरांची लपाछपी सुरूच होती. विचार करता करता ती वर्तमान ते भूतकाळ कशी गेली तिलाच कळाले नाही. I
  सफिया ......... अगदी मनमिळाऊ तितकीच कठोर ; तिचे  जे जातीय आयुष्य आहे त्या करिता. कट्टरपंथी नाही पण आपल्या धर्माशी प्रामाणिक , दैवी शक्ती वर दृढ विश्वास ठेवणारी. दहवीत क्रिकेट प्रेमामुळे एक विषय राहिला, पण अपयश ही यशाची पहिली पायरी !थोड वाईट वाटल तरीही परत मी पुन्हा देईन , मी पुन्हा देईन परीक्षा करत दोन वेळा यशाच्या अजून दोन पायऱ्या चढते. जिद्दी होती स्वभावाची आणि मग सोडला नाद दहावीचा हा प्रण करुन कि मरण्याआधी दहावी पास करून मरेन. आध्यात्मिक शिक्षणावर तो फावला वेळ  देते, मास्टर शेफ च्या नादात चांगल जेवण बनविणे शिकते. वयाच्या २० व्या वर्षी वसीम सोबत लग्न होत सफिया च, मुलगा सुशिक्षित,  नोकरदार अगदी ऐखाद्याला हेवा वाटावा अस स्थळ. आजवर बालपण जगणारी   अचानक मोठ व्हाव लागत . तस ती बालिश नसते फक्त प्रत्येक क्षण जगण्याची एक आगळीच कला होती, जिद्द, चिकाटी. सर्व काही सुखरूप राजा राणीचा संसार थाटलेला असतो. ती लग्नानंतर शिक्षण पूर्ण करते . सर्व नेटक्या संसारात सुखाची भर पडते ते एका पाहुण्याच्या येण्याच्या चाहुलीने. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे. 
  सफिया च्या मनात मात्र भीती होती आणि असणे साहाजिक होते. तिला लग्नाआधी पासून पिरीयड्स च्या वेळी खूप त्रास होत असायचा, एका वेळीस सोनोग्राफी ला गेल्या वर कळाले होते पिशवी नाजूक आहे. याच गोष्टीची भिती होती मात्र जस जसे रिपोर्ट नॉर्मल येत होते तिची भीती पूर्णतः संपली होती. वसीम ला नोकरीच्या ठिकाणी राहावे लागत असे या कारणास्तव सफिया आणि वसीम दोघेच रहात होते. या वेळेस घरातील मंडळीकडून चूक झाली , ज्याची खापर सर्वजण सफिया च्या डोकी   फोडणार याची तिला जाणीव देखील नव्हती. वसीम त्याच्या परीने सर्व काळजी करत होता , घरात मात्र कोणी मोठी सांगणारी नव्हती काय ते सर्व जण फोनवरची बोलकी काळजी. एव्हना सफिया सर्व काही शांततेने सर्व समजून गप्प होती ती स्वतःची काळजी व्यवस्थित पणे घेत होती. तिचे मित्र मैत्रीणी जे मुंबईत होते ते तिला वेळोवेळी दूरून का होईना मार्गदर्शन करून तिची  विचारपूस करत होते ( जे माझ्या मते सासर- माहेर यांची प्राथमिक जबाबदारी होती). साफिया नाजूक जरी असली तरी मनाने धीट होती. दिवस सरत होते हिच मात्र एक सुर होत डिलीव्हरी करिता माहेरी जाणार नाही, सर्व इथे होईल नंतर जाईन. सासरी मात्र वसीम ठिक आहे जशी तुझी इच्छा म्हणत त्याने दिवस पुढे ढकलले. जसे दिवस जवळ येत होते तसे सासरच्यांनी कधी जातेस माहेरी ?हा वेगळा राग धरला यांत भर पडली जेव्हा या राग ला वसीम ने ताल धरली कि माहेरी जा! सफिया मात्र तयार नव्हती मग ती अचानकच तयारी करते , मात्र वाईट स्वप्न तिला परत तिला तिच्या निर्णयावर ठाम राहा याचेच संकेत देत होते , वसीम ला सर्व काही माहित असून देखील तो हतबल होता मी असेन तिथेच तुझ्या सोबत म्हणून तो देखील तयारी करतो . एके दिवशी वसीमच्या ताईचा फोन येतो आणि चूकुन का होईना साफिया च्या कानी पडते ताईचे बोलणे" अरे वसीम, साफिया को कब भेजेगा मायके कब लेने आयेगे उसके घर के लोग? भेज दे उसे सब तु ही करेगा क्या ?" हे ऐकताच साफिया माहेरी जाव्याकरिता तयार होते. कारण;इथे सातवा  महिना लागला तरी कोणी नसत . खुप काही खाटाटोप होतो शेवटी माहेरी येते. 
   काही कारणास्तव पोटातील पाणी कमी होते, दवाखान्यात दाखविण्याकरिता उशीर  होतो.८ दिवस अँडमीट करतात पाणी वाढविण्याकरिता, नंतर डिस्चार्ज होते घरी येताच ताप भरतो . या काळात पोटात वाढणार ते लहान जीव आपल शेवटच श्वास पोटातच सोडतो. सफिया  ला हे कळत ती मात्र या परिस्थितीत खंबीर पणे उभी असते. नमाज अदा करून अल्लाह कडे मागणी करते " मेरे रब , तु जिंदगी और मौत देने वाला है, बहुत खुशीया दि है तुने आज भी शिकायत नही करुंगी मुझे हिम्मत देना सबर करने कि ताकद भी दे "आमिन !
    डिलिव्हरी करुन मुल काढतात , मुलगी असते हे कळताच अश्रुंचा बांध फुटतो . प्रेग्नेट असताना सासू बोलत असते जेव्हा केव्हा येईल तेव्हा मुलगा असावा आधी वारंवार हे ऐकून तिला त्रास होतो. एके दिवशी सासूला म्हणते " लडका नही हुआ तो क्या मार  डालोगे ?" खंबीरपणे उभी राहणारी सफिया आपल्या मुलीच्या जाण्याने कोलमडते . यानंतर चे प्रसंग तिला अधिक कठोर बनवत जातात. प्रत्येक जण काही तरी टोमण जे प्रत्यक्षात कळू नये असे. सासू हिच्याकडे आली कि " घर मे बच्चे रहे तो दिल लगता " असे अनेक सारे बोलण्याला सफियाला सामोरे जावे लागत होते . वसीम ला सांगितले तर तो " छोड दो यार इन बातों को" असे म्हणून टाळत होता. त्याची साथ होती पण तिला जशी गरज होती तशी नाही. या सर्वात ती इतकी निराश होत गेली मग चिडचिड , सतत मी मरायची होती, त्या बाळाची गरज होती सर्वांना ! अस म्हणून तिच हसण बोलण शांत होत गेल. 
  तिला आधार होता तो आध्यात्मिक अभ्यासाचा ती परत सावरली, पण बदलत गेली स्वतःला. नमाज पठण, जाप यांत  आपला वेळ जास्त देऊ लागली. आतुन कोलमडली होती तशीच धीर देत होती स्वतःला, नंतर नंतर वसीम च्या स्वभावात तिला बदल जाणवू लागला सासरी तिच्या समोर कोणी बोलत नसेल तरी घरी बोलविल्यास तुझी बायको पटवून घेत नाही रे म्हणून येत नाही आम्ही. ती रागीट आहे, काही बोलण्याचा भाग  नाही तिला. आजवर बोलकी, चांगली वाटणारी सफिया त्यांना वाईट वाटू लागली, तिला एकट राहायच आहे म्हणत सर्वांनी एकटी पाडल तीला. सफिया मुंबई मध्ये राहिली असल्याने तिला जास्त वर्दळ आवडत होती. एकटेपणा तिला खात होता, यापूर्वी देखील ती एकटी राहत होती ; हा एकटेपणा तिला नवीन होता. वसीम नाईट शिफ्ट ला असताना रात्री अपरात्री  उठून घरात फिरणे खूपच भिती वाटली तर कुरान वाचणे हे सर्व आता तिच्यासाठी रोजचे होते. रात्री उशिरापर्यंत फेसबुक , व्हॉट्स अँप वापरण हा खटाटोप वाईट स्वप्नांपासून बचाव करण्या साठी ती करत होती. स्वप्नामध्ये लहान मुल, बाळाच रडण तर कधी कधी कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पणे मारलेली टोमणी तिच्या धीराला तडा देत होते. वसीम ला या सर्व गोष्टींची कल्पना ती देत होती पण तो वारंवार सफियाच्या बोलण्याने तो देखील चिडचिड करू लागला मग तिने बोलणे सोडले. आता जे काही बोलायचे असेल ते ती प्रार्थनेच्या वेळी बोलु लागली, मनसोक्त रडायची ती तेथे. 
   एके दिवशी सहज ती यूट्यूब वर पेंटींग चे विडियो पाहते. पेंटींग मध्ये सफियाला एकेकाळी सिल्वर मेडल मिळालेला असतो. सफिया परत आपल सर्व चित्रकलेच सामान गोळा करते आणि पेंट करून व्हॉट्स अँप वर ग्रुप मध्ये सेंड करते, सर्वजण तिला पेंटींग विकण्याचा सल्ला देतात पण ती सेल करत  नाही. खुप अशा कला तिला अंगीकृत असतात एक चांगली वक्ता,टीचिंग , दागिने बनविणे, जेवण बनविणे , सजावट, रोप लावणे सफिया रोज नवनवीन काही प्रयोग सुरू करते. तीला ही बर वाटू लागते. रोज प्रार्थना करते, आता रोजची सकाळ तिच्याकरीता नवीन उमेद घेऊन येत होती. जगण्याची ईच्छा संपलेली तिची पण ती जगू लागली . तिच्या अंगी असलेल्या कला तिला प्रकाशमय भविष्याकडे खुणावू लागल्या होत्या. 
   या कलांच्या जोरावर सफियाने तिचे एक वेगळे विश्व जणू निर्माण केले. अरबी भाषा साफियाला वाचता येत होती जी कुरान वाचण्याकरिता उपयोगी येत होती, ती लहान मुल तसेच स्त्रियाना ही भाषा शिकवणी घेऊ लागली . चित्रकला अजून कशी चांगली होईल याकरिता सराव सुरू केले . एका कंपनी सोबत मिळून लोकांना व्यवसाय उभारण्यास ट्रेनिग सेंटर सुरू केले , या कंपनीची तो जिल्हा प्रतिनीधी झाली. 
  हे सर्व काही होण्यास ४ वर्ष लोटली , पण प्रत्येक दिवस ती योग्य नियोजने करून जगत होती. दरम्यान खुप सारे चढ उतार आले यातून न खचता ती यातून शिकू लागली. पुन्हा स्वतःवर पूर्वी सारख प्रेम करत होती. एका चांगल्या डॉक्टरकडे योग्य ती ट्रीटमेंट सुरू केली, वर्षभरात गोंडस मुलगा झाला. आज सफिया जवळ स्वतःची ओळख होती सोबत लेखन कला देखील असल्याने  "स्वरा" (बदललेले नाव) साठी ती लिहीत होती. स्वतःला मांडत होती लेखणी द्वारे.
( हे सर्व विचारांत पुन्हा जगताना  डोअर बेल वाजल्याने सफिया भानावर येते.) तिच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये स्किल डेव्हलप केलेल्या एका महिला गटाने काही भेटवस्तु  पाठविलेली असते कारण त्या महिलांना व्यवसाय करुन त्यांची ओळख निर्माण करण्यात या ताईचे हातभार असते.

_______
" वाचकहो! हे सर्व कसे साध्य झाले तर ; १)सफियाने आत्महत्या सारख शुल्लक पाऊल न उचलता वेळीच स्वतःला सावरल. २) आत्महत्या याची दुसरी बाजू नकळत समाज किंवा एखादया वर्गाने केलेली हत्या असते ती. मात्र सफियाने स्वतःला  खोचक बोलणाऱ्या व्यक्ती, डावलणार समाज याची ना पर्वा केली ,ना कधी तीने स्वतः ला कोणाच्या अधीन जाऊ दिले."
 समाज दुतोंडी आहे हे सफियाने ओळखले होते म्हणून आज सफिया जगत आहे आणि ज्या कारणास्तव  तिला टाकले गेले जे डोळयांने दिसत नव्हते पण सफिया त्यात जगत होती  एक गोंडस मुल तिच्या पदरात देऊन अल्लाह वरील विश्वासाने ते देखील सार्थ झाले.
विनंती : कृपया आत्महत्या करू नका . तुमच्या जाण्याने प्रश्न सुटणार नाहीत उलट आयुष्यात येणारी सुखाची पहाट पाहण्यास तुम्ही नसाल. जगा मनसोक्त येणारे प्रॉब्लम क्षुल्लक आहेत पण आयुष्य हे जन्म अनमोल आहे. प्रत्येक क्षण जगा, सुंदर जन्माच आनंद लुटा. स्वतःवर खुप प्रेम करा.

 

लेखिका : सौ. शगुफ्ता मुल्ला.

Circle Image

Shagufta Noorie

Solapur District Representative at Dream India co.

Simple person with complicated mind and Hobbies.