मागे वळून बघता - १

Vimal is feeling nostalgic.. remembering her old days and how she lived them..

#जलद_ब्लाॅग_लेखन

भूतकाळात डोकावताना...

भाग -1

मागे वळून बघता

स्वगत ः

भूतकाळात डोकावताना आज मला नव्याने काही गोष्टींची जाणीव झाली. आपण काय मिळवले. काय गमवले. दुसर्‍या मुलींचे बाबा बघितल्यावर बाबा पाहीजे म्हणून रडणारी मी. स्वतःचे अश्रू लपवत माझे लक्ष विचलीत करण्यासाठी आईने केलेल्या गमती जमती. स्वतःबाबांनी मणभर वजनाचा छातीवर ठेवलेला दगड.....आज सगळे आठवत होते. बाबांना पाठमोरे बघताना.

मी बाबांच्या मेहनतीला, पुस्तकरुपाने सर्वांच्या समोर आणणार...आताच ठरवले...!

माझे नाव विमल. वडीलांचे नाव श्री. विनायक पेठे राहणार बेला. वडीलांचे आयुष्य संघर्षात गेले. लहान वयातच आई सोबत लग्न झाले. बाबा त्यांच्या आईवडीलांपुढे बोलू शकत नव्हते. त्यामुळे शिक्षणाची आवड असल्यावरही मन मारुन शेतात काम करु लागले. मन शेतीत रमत नव्हते. म्हणून त्यांनी मनोमन ठरवले. काहीही करून इथून बाहेर पडायचे. सुंदरश्या बायकोला राणी सारखे ठेवायचे. कारण, त्यांची आई सतत सुनेला कामाला जुंपायची एवढेच नाहीतर, भरपेट खायला सुद्धा देत नव्हती. त्यांना स्वतःचे काही वाटत नव्हते. बायकोसाठी वाईट वाटायचे. पण बोलू शकत नव्हते. मग त्यांनी प्लानींग केले. इकडून तिकडून काही पैसे वडीलांच्या नकळत जमा केले. पोस्टकार्डवर आईची तब्येत बरी नाही. हा बहाणा सांगून रमाला तुमच्या घरी घेऊन जा. तिला फार त्रास आहे. तेव्हढाच थोडा आराम होईल. असा संदेश लिहून सासरी पत्र पाठवले. पत्र मिळताच रमाचे वडील लगेच रमाच्या सासरी दाखल झाले. रमाची आई अंथरुणाला खिळली आहे. ती रमाची आठवण काढते. म्हणून काही दिवसांसाठी रमाला आमच्या कडे रहायला पाठवा. म्हणून व्याहींना गळ घातली. त्यांना नाही म्हणता आले नाही. आणि रमा आपली लहानगी मुलगी घेऊन वडीलांसोबत माहेरी निघून आली. 

इकडे रमाला माहेरी पाठवून. सिनेमा बघायच्या बहाण्याने. घराबाहेर पडलेले माझे वडील. थेट आईला भेटायला माहेरी गेले. सगळ्यांशी बोलून मग, मामा सुभान त्यांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवायला गेला. गाडीत बसता बसता बाबांनी मामाच्या हातात एक कागद ठेवला. आणि म्हणाले, 'मी कलकत्याला चाललो. तिकडे माझा मित्र असतो. शेतीत माझे मन रमत नाही. रमाची हालत गावात खराब होईल. सासर्‍यांना म्हणावे, आता गावात रमाला पाठवू नका. मी लवकरच काम शोधतो. आणि रमाला, विमलला घ्यायला येतो. तो पर्यंत तुम्ही सांभाळा त्यांना..!' सुभानमामा तर चकीतच झाला. पण तेव्हढ्यात गाडी निघाली. घरी येऊन मामाने झालेले बोलणे वडीलांना सांगितले.

घरात तर रडारडी सुरु झाली. पण आजोबांनी सगळ्यांना म्हंटले, 'मला माझ्या जावयावर विश्वास आहे. त्यांना पळूनच जायचे असते तर ह्या दोघींचा विचार केला नसता त्यांनी. ते येतील परत...रमा बेटा नवर्‍यावर विश्वास ठेव...!' रमानेही मान डोलावली.

माझे बाबा कलकत्ताला गेले. मित्राच्या सहाय्याने, पडेल आणि मिळेल ती कामे केलीत. दोघेही दुकानांच्या समोर रात्री झोपायचे. एखाद्या पोलीसांनी हाकलले की, मिळेल त्याजागी जावून झोपायचे. शेतात तयार झालेले शरीर होते. दणकट बांधा होता. कामही भरपूर करायचे बाबा. जिथे एखादा टेम्पो रिकामा करायला दोन तीन मजूर असायचे. तिथे बाबा एकटेच पुर्ण टेंम्पों रिकामा करायचे. लोकही चकीत व्हायचे. बोलण्याचा मात्र प्राॅब्लेम होता. बंगाली भाषा त्यांना कळत नव्हती. हिंदीपण मोडकी तोडकीच बोलता येत होती. तरिसुद्धा कसेबसे ते निभावून नेत होते.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

12/12/22

🎭 Series Post

View all