नशीब भाग -८

Luck
आज एवढ्या दिवसातून वैशालीला भेटल्यावर अंकितला खूप छान वाटत होते. त्याचे मन असे भरून आले होते. पण हो अंकित खूप व्यावहारिक होता, त्यामुळे त्याने या गोष्टीला जास्त खेचले नाही.
इकडे वैशाली मात्र खूप विचारांमध्ये मग्न झाली होती. का कुणास ठाऊक एकदम कुणीतरी पुढे चालत असताना नकळत मागे ढकलून द्यावे आणि तोल जाऊन धपकन डोक्यावर पडणे अशी भावना तिच्या मनात येत होती.
कारण अंकितच्या त्या एका प्रश्नाने ती हादरली होती.
"सिंगल, कमिटेड?"
तसा प्रश्न खूप साधा होता, पण कुणीतरी भूतकाळात वैशालीला एकटीला सोडून निघून आला होता असच तिला वाटत होतं.
पण सर्व प्रश्नांना सर्व भावनांना पूर्णविराम देत ती तिच्या अभ्यासात रमली.
आता अंकित सुद्धा इकडे आल्यापासून खूप रमला होता.
आणि परत एकदा भेटण्याचा योग जुळून आला.
आज अंकित आणि वैशाली परत भेटणार होते.
भेटल्यावर परत एकदा दोघं खूप गप्पांमध्ये रंगले.
आणि आज अंकितने तिला एक प्रश्न विचारला.
"वैशाली मला सांग, काय गुण बघते तू तुझ्या भावी सोबती मध्ये?"
"मला काही जास्त नको फक्त काही गोष्टी हव्या.. जसा की उंच बांधा असावा, शांतप्रिय हवा, हुशार हवा, खुल्या विचारांचा हवा, माझा आदर करणारा हवा, माझे मत घेणारा हवा, ज्याचा माझ्यावर विश्वास असावा, माझ्या बाबतीत असुरक्षितता नसावी, समजदार हवा आणि हो स्थायिक तर असावाच, माझी मदत करणारा असावा, मला भविष्यासाठी उत्तेजीत करणारा हवा." आणि एवढ्यात अंकित तिला थांबवून बोलला,
"अगं पोरी, थांब. सुंदर दिसते मग काय काहीही अपेक्षा ठेवशील का? अगं एकाच सोबतीचे गुण विचारले. तू तर दहा सोबतींचे गुण एकात बघते."
आणि हसतच तो वैशाली कडे बघत होता.
त्याच्या उत्तराला प्रतिउत्तर देत वैशाली बोलली,
"अंकित सोबती एकदाच निवडतो आपण आणि एवढ्या मोठ्या विश्वात एक तर असेल ज्यात सर्व गुण असतील."
वैशाली गंभीर होऊन बोलली.
"असो, चांगलं आहे देव करो तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो." असं बोलत अंकित फोन कडे बघू लागला.
इतक्यात वैशाली उत्तरली,
"अंकित मी सिंगल आहे. म्हणजे अगदी असं नाही की भूतकाळात कोणी नव्हतं. साहजिकच होतं. जसं शाळेत प्रत्येकाच्या मनात कुणीतरी असतं त्याचप्रमाणे भूतकाळ सुद्धा प्रत्येकाचा असतो आणि मुळात त्यामुळेच कदाचित मी एवढया अपेक्षा बघते.
तूझ्याविषयी सांग आता!"

"वैशाली मला कधी कुणी आवडलीच नाही लवकर.. म्हणजे आवडली तर परत तिच्यासोबत संबंध नाही आला आणि मुळात माझ्या अभ्यासात इतका व्यस्त होतो की कधी गंभीरतेने विचार नाही केला! पण आता करतो विचार की, थोडा शोध घ्यावा स्वतः चा. थोडी संधी द्यावी स्वतःला. बघू नशिबात असेल तर होईल काहीतरी!" एवढंच अंकित बोलला.
त्याने तिच्या स्पष्टीकरणावर काही सुद्धा आक्षेप नाही घेतला.
"वैशाली परत एकदा संधी घ्यायला आवडेल तुला? की आता एकदम लग्नच करणार आहेस!"
अंकित परत एकदा विचलित होऊन बोलला,
"नाही! एक पण क्षणाचा विचार न करता वैशाली बोलली."
"योग्य आहे वैशाली." अंकित उत्तरला.
एवढ्यात अंकितचा फोन वाजला आणि अंकित बोलण्यासाठी निघून गेला.
कदाचित त्याचा दादाचा फोन होता.
"वैशाली, चल निघायचं का? मला थोडं काम आलं आहे. काही हरकत नसेल तर निघायचं का?"
अंकित घाईतच बोलत होता.
"हो हो ! चल बराच वेळ झाला निघू आता."
एकमेकांचा निरोप घेऊन दोघे मार्गस्थ झाले.
आज वैशालीने अखेरीस हे सर्व प्रकरण विराजला सांगितलं
पण विराज काही खूप चकित नाही वाटला. जणू विरजला माहित होते की हे सर्व होणार होते.
"काय वैशाली सगळं उत्तम चालू दिसते, काही विचार करतेस की नाही माझ्या मित्राचा? म्हणजे एखादी संधी?"
"नाही!" वैशाली एकदम दृढतेने उच्चारली.
"विराज, ती वेळ वेगळी असते रे तेव्हा संधी घ्यायला काही वाटत नाही पण आता वेळ खूप गेली आहे. आता संधी देणे योग्य वाटत नाही. कारण बघ आता परिवार, भविष्य, अभ्यास, स्वावलंबी होणं जास्त महत्वाचे वाटते. आता संधी घेणे म्हणजे थोडी रिस्क घेणं वाटतं रे."

विराज अगदी सरळ बोलला ,
"वैशाली, तुझं अगदी बरोबर आहे. पण संधी तर दिलीच पाहिजे ना! शेवटी वेळेसोबत पण काही गोष्टी कळतात ना! बाकी तुझी इच्छा."
"हो चल आलेच मी, महत्त्वाचा फोन आला." असं बोलून वैशाली आणि विराज चे संभाषण समाप्त झाले.
थोड्यावेळाने वैशाली चक्कर मारण्यास बाहेर निघते पण तिच्या मनात अतिशय अमाप विचारांचं वादळ उठलेलं असतं.
"की संधी द्यावी की नाही? वेळेनुसार तर कळेलच ना कुठे जाते हे?"
आणि अचानक तिला अंकितचा हा प्रश्न आठवला.
"वैशाली, हरकत काय आहे ना? तू एक समजदार मुलगी स्वतः ला असं बांधून नको ठेवू!"
असे असंख्य प्रश्न तिच्या मनात होते आणि अचानक एक विचार तिने केला.
"वैशाली, फक्त एक कारण शोध! जे नकारासाठी पुरेसे आहे."
आणि ती खूप विचार करू लागली.
अखेरीस पूर्ण एक दिवस घेऊन सुद्धा तिला एक पण कारण सापडले नाही.
आणि "ही वेळ योग्य नाही." असा मेसेज तिने अंकितला पाठवला.
खरे बघता वैशालीला कारण तर नाही पण एक शंका आली होती.

(काय असेल ती शंका? शंका योग्य आहे का? तिने योग्य केले का, बघू पुढच्या भागात.)
लेखिका: वर्षा गिते
ईरा टीम: नाशिक
कथेचे नाव: नशीब - भाग - ८
स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक

🎭 Series Post

View all