Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नशीब भाग-७

Read Later
नशीब भाग-७


"अंकित आवर अरे वेळ होतोय."
अंकितचा मित्र अंकितला बोलवत होता.
"चला रे येतो मी. भेटू आता सुट्टीनंतर." असे म्हणत अंकित निघाला.
"अंकित, आला तू! बरं झालं रे खूप आठवण येत होती तुझी, तुला तर आमची आठवणच नाही येत ना!"
अंकितची आई अंकितला मुद्दाम बोलत होती. कारण यावेळी अंकित खूप दिवसांनी घरी आला होता.
"अगं, आई विसर आता याला; आता काय महाविद्यालय संपल याचं, आता काय नोकरी साठी मोकळा हा, आता काही याला आठवण येणार आपली."
अंकितचा भाऊ पण त्याला आज चिडवत होता.
पण अगदी शांतपणे हसून अंकित म्हणाला,
"आई खूप भूक लागली ग. काही खायला करतेस का?"

एवढं बोलून अंकित खोलीत निघून गेला.
(ठिक दोन दिवसांनी अंकित आणि वैशाली भेटणार होते.)
"अरे, अंकित. काय चाललं तुझं, कुठे बाहेर चालला का? खूपच तयारी चालली आहे. खरं सांग बघू कुठे चालला आहेस?"
"अंकितचा दादा अंकितला हसून विचारत होता."
"अरे, कुठे नाही मित्रांना भेटायला, चल आलोच जाऊन."
असं बोलून अंकित तिथून पसार झाला.

अखेरीस आज अंकित आणि वैशाली प्रत्यक्षात भेटणार होते.
ठरल्याप्रमाणे अंकित ठरलेल्या वेळेत कॅफे मध्ये पोहचला.
आणि वैशालीला पण त्याने कळवून दिले की मी पोहचलो आहे.
५ मिनिटे झाली, १० मिनिटे, १५ मिनिटे झाली पण, वैशाली काही येईना.
म्हणून परत एकदा अंकितने वैशालीला फोन केला.
"अजून किती वेळ लागेल?"
यावर वैशालीचे उत्तर ऐकून अंकितला थोडा हसूच आलं.
"अरे, अंकित काय तू पण विसरलास? आज एक एप्रिल नाही का!" मी मस्करी केली रे. मी नाही येत."
आणि एवढं बोलून ती हसू लागली .
"हो का! मला कळालेच नाही ग, बर चल येतो मी."
असं बोलून अंकितने फोन ठेऊन दिला.
आणि उठून फक्त पुढे बघणार तर तो बघतच राहिला.
वैशाली. शाळेतली वैशाली पाटील, त्याच्या समोर उभी होती पण, ती खूप बदलली होती. अंकितची धडधड अचानक वाढली! अचानक तो थोडा कवरा बावरा झाला. काय करावं त्याला सुचेना. अर्थात एवढ्या वर्षानंतर ती समोर उभी होती.
तिचा तो शांत नितळ चेहरा जणू खूप काही बोलत होता.
तिचे ते पाणीदार डोळे, त्या डोळ्यांभोवती आता काजळाच्या रेखोट्या होत्या.
तिचे ते टोकदार नाक. हा ते तसेच होते.
पण तिचे ते गुलाबाच्या कळी सारखे बंद ओठ.
ते तर जणू इंद्रधनुष्यासारखे खुलले होते.
आणि तिचे ते केस त्या दोन वेण्यांमध्ये बांधील नव्हते ते वाऱ्यासारखे लहरत होते.
वैशाली पहीलेपेक्षा खूप सुंदर आणि आत्मविश्वासी दिसत होती.
निळ्या रंगाच्या टॉप मध्ये त्यावर काळया रंगाची जीन्स एका हातात घड्याळ आणि एका हातात फोन घेऊन आजही वैशाली उशिरा आली होती.
अगदी पूर्वीसारखी कशीतरी घाई गडबडीत. आणि आजही अंकितला नेहमीप्रमाणे हसू येत होते.
किती विरुद्ध होते दोघं.
"अरे, मला माफ कर. म्हंटल थोडी मजा घ्यावी."
असं बोलून वैशाली अंकित कडे बघत राहिली.
हा आजही तसाच. अगदी साधा सरळ. कदाचित काही मुलं बदलतच नाही. (एवढाच विचार तिच्या मनी आला.)
झालं आता. खूप गप्पा रंगल्या खूप. गप्पा, खूप आठवणी, खूप घटना, खूप कोडे, खूप उत्तर आणि त्याची चकित करणारी स्पष्टीकरणही.
आणि आज पहिल्यांदा खूप प्रश्न विचारायचे होते.
आणि तिची सुरवात झाली.
सुरवात होती भूतकाळापासून
पहिला एक प्रश्न होता,
"अंकित, एक विचारू का? तसं खूप काही विचारायचं आहे."
हसतच वैशाली उद्गारली.
"हो विचार ना!"
"तू मला शाळेत का नाही विचारलं? म्हणजे तू शाळेत का नाही बोलला माझ्याशी कधी?"
"वैशाली खरं सांगू, मी ना खरं तर घाबरायचो तुला."
"काय! वैशाली एकदम चकित होऊन बोलली. का पण? मी काय घाबरण्यासारखी होती का? का मला मोठे मोठे दात होते, की लाल डोळे? मोठे शिंग होते का? की मी खूप भयानक होती!"
हसतच वैशाली वर्णन करत होती.
"अगं तसं नाही! म्हणजे मला भीती वाटायची की तुला राग आला तर? आणि तू कोणाला तक्रार केली तर. साहजिक अगं मला शाळेत ओळखत होते. आणि असं काही केलं असतं तर खूप नाव खराब झालं असतं माझं."
विचलित होऊन अंकित उत्तरला.
"अरे, काय तू पण अंकित एकदा विचारायचं तर. कशी सर्वांची ठासली असती बघ, अरे एकदम हवा!"
एकदम वेगळ्याच कटाक्षाने वैशाली बोलली.
तिचे उत्तर ऐकून अंकित एकदम जोरात हसायला लागला.
(नकळत आज पहिल्यांदा त्याला जाणवले की काही गोष्टीमध्ये रिस्क घेतली पाहिजे.)
"हो ना. जाऊदे पण आता गेली ती वेळ." स्मितहास्य करून वैशाली बोलली.
इतक्यात वेटर आला आणि दोघांना ऑर्डर भेटली.
परत, अचानक वैशाली ने प्रश्न केला,
"काय अंकित ठाकरे, कसं वाटतं एवढ्या वर्षांनी जुन्या लोकांना भेटून?"
आणि परत अंकित पूर्वीसारखाच बोलला.
"खर सांगू, मी आज येताना काय विचार करत होतो?"
"हो सांग ना." असं बोलत वैशाली अंकितकडे एकटक बघत होती.
"वैशाली मी आज हा विचार करत होतो की, किती अनिश्चित आहे आयुष्य. मी कधीच विचार नव्हता केला ग की तू माझ्याशी बोलशील. तू मला कधी भेटशील पण, मी हा विचार करत होतो की मी आज त्या मुलीला भेटायला जातो, जिला मी फक्त दुरून बघून खुश होत होतो. जिच्या एक झळकेचा विचार कधीतरी माझ्या मनात येई ग. कधीतरी ती आठवायची की, वैशाली पाटील मस्त होती, जिला मी वर्गात बघून सुद्धा कधी काही कल्पना नाही लागू दिली, जी एकमेव मुलगी होती जिला, अंकित ठाकरे घाबरायचा. पण आज ती प्रत्यक्षात समोर बसली आणि ती मला भेटायला आली; तिने माझ्यासाठी वेळ काढला. एखाद्या स्वप्ना पेक्षा कमी नाही ग माझ्यासाठी. तुला माहित आहे मी खूप शांत समजत होतो तुला, की किती शांत आहे. जास्त बडबड नाही, कुणाचं नाव नाही घेत, एकदम शांत सोज्वळ.
पण तू तर रेडिओ आहेस नुसती. किती ती बडबड, अग तुझं तोंड नाही दुखत का? हसतच अंकित बोलला.)
आणि तुला माहित आहे आपण जेव्हा मेसेज वर बोलायचो ना खर सांगू , तू खूप पटपट टाइप करतेस. मला खूप वेळ लागून जातो एवढं भरभर बोलायला. थोडी हळू हळू चाल की."

त्याचे विचार ऐकून एकदम कुणीतरी प्रशंसा करता करता अचानक टोमणा मारावा अशीच भावना तिच्या मनात आली, आणि रागातच,
"मी नाही बोलत आता गडे." असं वैशाली बोलली.
अंकित परत तिच्याकडे बघून हसत होता. आणि दुसऱ्याच क्षणी
"हसू नको गप बस." असं बोलत वैशालीने;अंकित कडे रोखून पाहिले.
"अगं तू तर बोलणार नव्हती ना!" असा टोमणा मारत अंकित परत हसला.
बोलता बोलता अचानक अंकित अगदी गंभीर होऊन बोलला.
"वैशाली, एक विचारू शेवटच?"
"अरे, विचार ना." अगदी स्मितहास्य करून वैशाली बोलली.
"वैशाली, सध्या काय चालू आहे तुझं? म्हणजे सिंगल, डेटिंग, कमिटेड म्हणजे तुला आवडलं तर सांग हरकत नाही."
आणि अंकित खाली बघू लागला.
"अंकित!"
जणू वैशाली एकदम संभ्रमात पडली. आणि मुळात विषय बदलून ती बोलली,
"अरे, काही थंड मागवायच का?"
(अंकितला समजले वैशालीला हा प्रश्न आवडला नाही.)
म्हणून त्याने पण परत नाही विचारले,
अशा अनेक गोष्टी त्याच्या चालल्या होत्या.
भविष्याच्या गोष्टी, सध्याच्या गोष्टी, कॉलेज वगैरे.अखेरीस,
"चला निघायचं ना. असं बोलत वैशाली उठली."
"हो हो चल." आणि अंकित पण निघाला.
आणि बाहेर जाऊन एकदा फक्त वैशाली अंकित कडे बघून बोलली.
"काय वाटतं तुला, असेल का काही भूतकाळ किंवा वर्तमानकाळ? काय वाटतं तुला?"
"वैशाली, मला असा वाटतं कि, यासाठी आपण अजून एकदा भेटलं पाहिजे. काय वाटतं"
हसून च अंकित बोलला.
"बरं काही हरकत नाही, बघू योग जुळून आला तर नक्की भेटू. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर पण मी देईल. पण तोपर्यंत तू कोड्यात रहा."
मोठ्याने हसून वैशाली बोलली.
आणि दोघं ही आपापल्या वाटेने;मार्गस्थ झाले.

क्रमशः
(काय वाटतं पाहिली भेट अशी होती, पुढची भेट होणार का? काय वाटतं ही भेट पुढे जाणार का? काही वर्तमान किंवा भूतकाळ असणार का? का मुळात ही भेट एवढीच होती. अंकित काही बोलेल का? वैशाली काही बोलेल का? बघू पुढच्या भागात)

लेखिका: वर्षा गिते

ईरा टीम: नाशिक

कथेचे नाव: नशीब - भाग - ७

स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//