"वैशाली पाटील सेंट यू मेसेज."
असा मेसेज विराजच्या फोन वर झळकला. खरे बघता एवढ्या वर्षानंतर वैशाली पाटीलचा मेसेज बघून विराज थोडा विचलित झाला.
पण काही विचार न करता त्याने सुद्धा तिला "हाय" असा मेसेज पाठवला.
आणि काही क्षणातच वैशालीला आणि विराज दोघांना जाणवले की ही मैत्री आजही तशीच आहे. आजही या मैत्रीत तसूभर सुद्धा फरक नाही पडला.
बराच वेळ आज त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. आणि खूप जुने विषय, जुने मित्र, जुन्या मैत्रिणी, जुने शिक्षक, आणि पूर्वीच्या आठवणींमध्ये दोघं रमून गेले.
शाळेच्या आठवणी, महाविद्यालयाच्या आठवणी, सध्या काय चालू? सध्या कुठे असता? वगैरे खूप गप्पा आज त्यांच्या चालल्या होत्या.
आणि अचानक विराजने अंकितचे नाव घेतले.
पण यावेळी अंकितचे फक्तं नावच नाही घेतले तर कुठे ना कुठेतरी विराजने वैशालीला अंकित सोबत बोलण्यासाठी प्रवृत्त केले होते. आज खूप दिवसांनी विराजने वैशालीला सांगितले.
"अग, वैशाली अंकित पण तुमच्या घराजवळच राहतो."
हे ऐकून वैशालीला थोडा धक्काच बसला आणि थोडी विचलित होऊनच ती म्हणाली."
"अच्छा, मला नव्हतं माहीत!"
बराच वेळ गप्पा मारल्यानंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
पण वैशाली आता वेगळ्याच विचारात गेली होती. कुणास ठाऊक तिला हे जाणवत होते की,
नकळपणे विराजने तिला अंकितला मेसेज करण्यास भाग पाडले.
(काय मनशा असावी विराजची. काय विचार होते त्याचे. का वाटलं त्याला की मी त्याच ऐकेल. का त्याने अस केलं.)
अशा अनेक प्रश्नांचे वादळ वैशालीच्या मनात उठले होते. पण सर्व काही बाजूला सारून ती कामाला लागली.
पण अंकितला मेसेज करावा की नाही हा विचार काही तिच्या मनातून जाईना, आणि यातच तिच्याकडून चुकीने त्याला मेसेज सेंट झाला.
"अरे देवा. वैशाली, अग किती ग वेंधली तू. काय करत असतेस नुसती आणि हे अरे वेळ तर बघायची. असा स्वतःला कोसत तिने घाईने मेसेज डिलीट केला.
परंतु धन्य तो सोशल मीडिया आणि धन्य ते तंत्रज्ञान.
"अंकित अरे अंकित. चल लवकर उशीर होतोय. काय त्या फोन मध्ये बघत बसला. अरे, कुणी अभिनेत्रीने जणू तुला मेसेज पाठवावा एवढा तू त्या फोन मध्ये घुसला आहेस.
अंकित! अरे काय चालवलं तू. ठेव बरे तो फोन."
अंकितचा मित्र त्याला बराच वेळापासून आवाज देत होता. पण अंकितचं काही लक्षच नव्हतं.
कसं असणार आज 'वैशाली पाटील' चा मेसेज त्याच्या फोन वर झळकत होता.
त्याच्या आठवणीतली वैशाली.
ती मुलगी जिला तो आतापर्यंत फक्त दुरून बघत होता.
मनातल्या मनात अंकित खूपच आनंदी झाला.
की अखेरीस आजपासून कदाचित एक नवीन प्रकरण माझ्या आयुष्यात येऊ बघत आहे.
पण आता मेसेज करून नीट बोलता येणार नाही म्हणून जाऊद्या रूम वर जाऊन निवांत बोलेल असा विचार करून त्याने फोन ठेऊन दिला आणि तो चालता झाला.
परंतु रूम वर गेल्यावर जसा त्याने मेसेज पहिला तो नाहीसा होता. आणि मनातल्या मनात हसून अंकित निवांत झोपून गेला.
अर्थात सकाळी वैशाली थोडी विचारात पडली कारण
'अंकित ठाकरे सेंट यू मेसेज.'
अशी सूचना तिच्या फोन वर आली होती.
वैशालीला वाटले,
"बरं झाल मला मेसेज करायची गरज पडलीच नाही. यानेच पुढाकार घेतला."
म्हणून मोठ्या मनाने एकदम साधारणपणे वैशाली अंकितला बोलली, "अरे, हाय तुझा असा अचानक मेसेज. आणि मुळात तू ओळखतोस मला?"
यावर अंकित अगदी मिश्कीलपणे बोलला,
"मी? माझा मेसेज? कदाचित तू थोडी चुकते आहेस.
तू मेसेज केला. आणि ते सुद्धा रात्री. मी नाही.
सोशल मीडया वर डिलिट केलेला मेसेज सुध्दा दिसतो बर का !"
अंकितचे उद्गार ऐकून वैशालीला एकदम कसतरीच झालं. आणि "मांजरीने कितीही डोळे बंद करून दूध पिलं तरी जगाला ते दिसतच."
एवढंच तिला स्वतः ला म्हणावसं वाटलं.
पण बाजू सांभाळून ती बोलली,
"अरे, चुकीने सेंट झाला. बाकी काय चाललं तुझं?"
"मी सध्या मुंबईला असतो." असं हसतच अंकितने उत्तर दिले.
आणि बराच वेळ दोघांच्या गप्पा, शाळेपासून ते पुढे काय ठरवलं यावर नकळतपणे चालून गेल्या.
अखेरीस दोघांनी निरोप घेतला.
आज अंकित सोबत बोलल्यावर पहिल्यांदा वैशालीला जाणवले की मी अगदी बरोबर ओळखलं होतं याला, अगदी तसाच आहे हा.(शांतप्रिय, समजदार. आणि मुळात साधा आणि राहीला अहंकार. तर अहंकारी नाही उलट अगदी व्यावहारिक.)
आता जणू अंकित आणि वैशाली रोजच बोलायला लागले होते. हळू हळू बोलणे सुद्धा वाढत होते आणि दोघांना सुध्दा भेटण्याचे वेध लागले.
पण पाहिले कोण बोलणार यातच पुन्हा एकदा सर्व काही अडकत होते.
शेवटी अंकितनेच न राहून वैशाली समोर प्रस्ताव ठेवला.
विचारताना जणू अंकितला खूप भीती होती. वैशालीला आवडेल का ती चिडणार तर नाही ना. तिला राग आला तर;
पण जाऊद्या जे होईल ते बघून घेऊ असा विचार करून अखेरीस अंकितने विचारले.
"वैशाली, तुला काही हरकत नसेल तर आपण भेटू शकतो का?"
बराच वेळ झाला पण वैशाली काही उत्तर देत नव्हती.
आणि अखेरीस.
"हो आवडेल मला, भेटू ना."
वैशाली ने होकार दर्शवला.
जणू अंकितच्या मनावरचं ओझं आता उतरल होतं.
अंतता एवढ्या वर्षानंतर अंकित आणि वैशाली एकमेकांना प्रत्यक्षात भेटणार होते.
झालं तर, ठरलं या या दिवशी, या या ठिकाणी भेटू.
आणि रात्रीच्या गडद काळोखात दोघेही आपापल्या ठिकाणी शांत झोपले.
क्रमशः
( काय होणार पुढे..अंकित आणि वैशालीची पाहिली भेट कशी असणार. काय बोलणार. बोलणार पण की नाही. नशिबाने एवढी साथ दिली. आता दोघं तरी एकमेकांची साथ देतील का? की आता ही नशीबाचा इशारा दोघं समजणार नाही.)
लेखिका: वर्षा गिते
ईरा टीम: नाशिक
कथेचे नाव: नशीब - भाग - ६
स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा