Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नशीब भाग -५

Read Later
नशीब भाग -५
"वैशाली, आवर बरे खूप वेळ झाला आता."
तुझ्या मैत्रिणी कधीच्या येऊन थांबल्या. अग, किती तो उशीर. "जाते की येऊ मी तिकडे" वैशाली
वैशालीची आई मागच्या दहा मिनिटांपासून वैशालीला ओरडत होती, कारण वैशाली आज सुद्धा क्लास साठी उशीर करत होती.
"अग, हो ग चालली आहे, हे बघ. अस बोलत अखेरीस वैशाली निघाली...
येते ग आई !
हो सावकाश जा, अस म्हणत वैशालीच्या आईने निरोप घेतला.
(नेहमीप्रमाणे आजही वैशाली उशिरा क्लासला आली होती. आणि अगदी रोजप्रमाने आजही मॅडम सोबत तिचा वार्तालाभ चालू होता.)
काहीच वेळात क्लास सुटला आणि आज शाळेत पेपर असल्यामुळे वैशाली आणि तिच्या मैत्रिणी लवकरच निघाल्या होत्या.
आता सायकल काही तिची नेहमीच्या जागी नव्हती आणि साहजिकच शाळेला उशीर होत असल्यामुळे तिची चिडचिड होत होती. यातच तिने मैत्रीणीना पण सांगितले, "तुम्ही व्हा पुढे आलेच मी" असं म्हणत तिच्या मैत्रिणी सुद्धा पुढे निघाल्या.
आता सायकल काही दिसेना म्हणून वैशाली वॉचमनकडे विचारायला गेली.
"ओ, दादा माझी सायकल बघितली का तुम्ही? इथेच होती निळ्या रंगाची."
"ती त्या बाजूला बघ ताई." असे म्हणत वॉचमन दादाने पूर्वे कडे बोट दाखवले.
आणि बघते तर काय. अंकितने तिची सायकल जोरात ढकलून दिली होती ज्यामुळे तिची सायकल थोडी अडगळीत पडली होती.
घाईतच वैशाली सायकल जवळ पोहचली आणि अंकित सुद्धा तिथून निघालाच होता.
(काळया रंगाची, आणि त्यावर जागजागी हिरवे पट्टे असलेली सायकल घेऊन.)
वैशालीला हे बघून खूप राग आला. "आधीच उशीर. त्यात सायकल पण पाडली आणि मदत तर सोडा, माफी सुद्धा मागितली नाही. किती अहंकारी आहे हा. काय एवढा गर्व आहे याला. काय समजतो हा स्वतः ला!"
असं मनात पुटपुटतच तिने घाईने सायकल काढली..
आणि एकदम जवळ जाऊन "अहंकारी कुठला!" असं बोलत ती त्याच्यापुढे चालती झाली.
(पण मुळात त्याने सायकल पाडली नव्हती आणि चुकीने त्याचा धक्का लागून ती सायकल पडली होती. आणि शाळेच्या पेपर मुळे त्यालाही उशीर होत असणार, हे मात्र तिला दुसऱ्यादिवशी वॉचमन कडून कळले.
आणि मनातल्या मनातच तिला वाईट वाटले; की *आपण किती चुकीचा समज करून घेतला.*
इतक्यात फोनची रिंग वाजली आणि वैशाली महाविद्यालयासाठी निघाली.
आणि अचानक ती या क्लासच्या प्रसंगातून बाहेर पडली. (कदाचित हाच तो प्रसंग होता की ज्यामुळे तिला अंकितची भीती वाटत असणार, कारण तो आता काय बोलेल मला. हीच भीती तिच्या मनी ध्यानी होती. पण असे काही झाले नाही. असो.)
अचानक आलेली त्याची रिक्वेस्ट पाहून तिला हा प्रसंग आठवला. परंतु सर्व बाजूला सारून. जुन्या गोष्टींना पूर्ण विराम देत तिने त्याची रिक्वेस्ट अखेरीस स्वीकारली.
आज महाविद्यालयात गेल्यावर मीनाक्षी आणि वैदेही सोबत एक नवीन चेहरा वैशालीला दिसत होता.
कदाचित त्यांचा जुना मित्र असावा. ध्रुव.
ध्रुव सोबत बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या पण वैशाली सोबत अजून काही वार्तालाभ झाला नव्हता. आणि एवढ्यात वैदेहीने वैशालीची ओळख करून दिली.
यावर ध्रुवने तिला एकच प्रश्न विचारला. "तू कुठल्या शाळेत होती?"
आणि उत्तर ऐकून जणू वैदेही मीनाक्षी आणि ध्रुव तिघेही चकित झाले.
कारण ध्रुव ज्या महाविद्यालयात शिकत होता त्या महाविद्यालयात वैशालीच्या दहावीच्या वर्गातील खूप मुले होते. आणि ही गोष्ट जेव्हा समोर आली जणू असे वाटत होते की ध्रुव आणि वैशाली खूप काळापासून एकमेकांना ओळखत असावे!
काही क्षणांपूर्वी ज्याचे नाव सुद्धा माहीत नव्हते त्याच्यासोबत वैशालीच्या गप्पा, मीनाक्षी आणि वैदेही पेक्षा जास्त रंगल्या होत्या.
आणि अशातच ध्रुवने त्याच्या जिवलग मित्राचे नाव घेतले.
विराज.
आणि यावेळी पहिल्यांदा वैशाली विराज बद्दल सांगत होती. बोलत होती ओळखत होती.
जणू आज तिला आठवले होते की विराज आणि ती खूप जुने मित्र आहोत.
इतक्यात ध्रुवच्या फोनवर एक नाव चमकले आणि एक फोटो सुद्धा.
मंजिरी.
का कुणास ठाऊक ते नाव वैशालीला खूप जवळचे वाटले. आणि अचानक तिला आठवले की,
"अरेच्चा. हिला तर मी भेटली आहे. ते पण प्रत्यक्षात."
आणि तिने लगेच ध्रुवला प्रतिप्रश्न केला की, "अरे तू मंजिरीला कसा ओळखतोस?"
तिच्या या प्रश्नावर ध्रुव अतिशय जोरात हसून बोलला
"अग, वैशाली ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे. पण तुला कशी माहिती ही.?"
यावर वैशालीने तिचा आणि मंजिरीचा भेटीचा प्रसंग सांगितला.(की कशी मी तिच्या महाविद्यालयात गेली होती. आणि कशी तिने मदत केली होती वैगेरे.)
हे सर्व ऐकून ध्रुव थोडा संभ्रमात पडला. पण कदाचित त्याला उशीर होत असावा म्हणून तो तिघींचा निरोप घेऊन चालता झाला.
बोलता बोलता खूपच वेळ झाला होता म्हणून तिघींनी सुद्धा तासिकेसाठी धाव घेतली.
इकडे ध्रुव मात्र जरा जास्तच कोड्यात पडला होता कारण मुळात आजचा दिवस फक्त योगायोग होता की काही जास्त हे त्याला कळत नव्हते.
(एका अगदी अनोळखी मुलीला भेटणं. मी तिच्या मित्र - मैत्रीणीना भेटणं, तिचे मित्र मैत्रीण माझे सध्याचे मित्र आणि माझे जुने मित्र मैत्रिणी तिच्या सध्याच्या मैत्रिणी. आणि अशातच माझी सर्वात जुनी मैत्रीण तिची अगदी जवळची. अगदी काल परवाची ओळख. आणि माझा जिवलग मित्र, तिचा लहानपणीचा मित्र.)
आणि यातच त्याला अजून एक नाव आठवले. जे विराज कडून त्याने नकळत किती वेळा ऐकले होते.
अंकित ठाकरे.
विराजचा जवळचा मित्र.
क्षणाचा विलंब न करता ध्रुवने ही सर्व कथा विराजला सांगितली. विराज सुद्धा सर्व ऐकून खूप चकित झाला. आणि क्षणात विराज कडून. वैशाली आणि अंकितचे नाव घेतले गेले. आणि नाईलाजाने विराजला ध्रुवला सर्व काही सांगावे लागले.
आता ध्रुव अधिकच संभ्रमात पडला. कारण हे ऐकून तो जितका चकित होता. त्याहीपेक्षा त्याला मंजिरीचे काही बोल आठवत होते.
मंजिरीने काही दिवसांपूर्वीच ध्रुवला वैशाली बद्दल सांगितले होते. पण नाव नव्हते सांगितले. बहुदा मंजिरीच्या एका प्रोजेक्टमध्ये तिला वैशाली आणि खास करून अंकितची मदत हवी होती.
(खरंतर मंजिरी, वैशाली आणि अंकित हे तिघेही तीन टोकांना होते. पण मंजिरीला तिच्या प्रोजेक्टसाठी एक अशी मुलगी हवी होती जी तिला एखाद्या शहराविषयी खूप माहिती देईल. आणि हीच ती मुलगी वैशाली होती. कारण वैशाली तिच्या एका अशाच स्पर्धेसाठी तिच्या महाविद्यालयात गेली होती. आणि त्यावेळीच त्यांची गट्टी जमली होती. आणि राहीला अंकित तर अंकितची प्रशंसा ती ध्रुव कडून ऐकत होती. की तो असा, तो तसा, खूप हुशार आहे.
आणि नकळतच ती बोलून गेली. "अरे ध्रुव काय चालवलं तू. कधीपासून एकच गाणं ऐकवतो आहेस. बंद कर बर तुझं कौतुक. आता तर माझी पण इच्छा आहे एवढे दोन हुशार मुले ही (अंकित आणि वैशाली) एकमेकांना कसे नाही ओळखत बर? देव करो लवकर भेट व्हावी यांची."
यावर ध्रुव फक्त हसला. पण अगदी विराज सारखा रहस्यमयी.
(जणू परत एकदा नशीब सर्व काही घडून आणत होते.)
आज वैशाली घरी जाताना खूप विचार करत होती. "बोलू की नको बोलू; बोलू की नको बोलू."
आज ध्रुव सोबत बोलून जणू ध्रुव ने तिला विराज सोबत बोलण्यासाठी प्रवृत्त केलं होतं.
आणि हाच विचार ती करत होती. आणि अखेरीस,
"हाय"
असा मेसेज तिने विराजला टाकला.
किती वर्षानंतर ती आज विराज सोबत बोलत होती. पूर्ण *दहा* वर्षानंतर.

क्रमशः
(विराज वैशाली सोबत बोलणार का?
वैशाली विराज सोबत काय बोलणार?
मंजिरी, ध्रुव फक्त योगायोग होते की अजून काही?
बघू पुढच्या भागात.)

लेखिका: वर्षा गिते
ईरा टीम: नाशिक
कथेचे नाव: नशीब - भाग - ५
स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//