Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नशीब भाग -४

Read Later
नशीब भाग -४
आज बराच वेळ झाला होता पण ती अजूनही आलीच नव्हती.
"वैशालीचा काही फोन नाही ग..! मीनाक्षी, तुझं काही बोलणं झालं सकाळपासून? कुठं आहे, आली कि नाही, काही कल्पना आहे का तुला! " वैदेही अतिशय विचलित होऊन काळजीने मीनाक्षीला विचारलं.
"अग हो, मी तुला सांगायचंच विसरली बघ..! तिला आज उशीर होईल थोडं, मला बोलली होती सकाळी." मीनाक्षी उत्तरली.
"अच्छा! मग येईलच आता." असच गप्पा मारत मीनाक्षी आणि वैदेही गप्पा मारत तिथून निघून गेल्या.
इकडे... आज बराच वेळ झाला...होता  
वैशालीला आज जरा जास्तच उशीर झाला होता.
कशीबशी धावत पळत ती अखेरीस पोहचली..
घाईतच तिने तिचा फोन पहिला....आणि घाई घाई तीने नेहमीच्या जागी धाव घेतली.....
(कारण वैदेहीचे ६ कॉल आणि तीन मेसेज होते)
कशीबशी वैशाली पोहचली,पण वैदेही आणि मीनाक्षी काही बोलल्या नाही...बहुदा त्यांनी समजून घेतले, की व्यस्त होती...
यानंतर त्यांच असच आज बाहेर जायचं ठरलं... कदाचित वैदेहीला काही पुस्तक घ्यायची होती.
पुस्तके घेऊन झाल्यावर खूप भूक लागली होती आणि थकवा पण जाणवत होता म्हणून त्या जवळच्याच कॅफे मध्ये गेल्या... आणि त्यांच्या न संपणाऱ्या गप्पा चालू झाल्या ....
आज खूप वेळ तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या आणि आजचा विषय होता "सोशल नेटवर्क".
आता , खरे पाहता तिघी पण सोशल नेटवर्क वर ॲक्टिव असाव्या... पण
अग वैशाली, "ये ना सोशल मीडिया वर..अग खूप जुने मित्र - मैत्रिणी.. परत एकदा जवळ येतात...खूप माहिती पण भेटते "
असा बऱ्याच वेळा पासून वैदेही आणि मीनाक्षी वैशालीला समजावत होत्या.. कारण वैशाली कशावरच नव्हती!! पण वैशाली ने कोणाचं ऐकल तर खर ना.
"नाही ग...मला नाही आवडत ते...तुम्ही आहे ना बस..."
आणि प्रत्यक्ष मनुष्य तुमच्या समोर आहे आणि काय त्याला तुम्ही सोशल मीडिया वर शोधता... काय ते फेसबुक...काय ते इंस्टाग्राम काय काय असतं ते कोण बघेल एवढं...आणि काय करायचं जुन्या लोकांना भेटून...जाऊदे गडे.. मी बरी अशीच,अस म्हणत वैशाली तिच्या फोन कडे बघत बसली.
घड्याळाचे काटे तर जणू धावतच होते... इतक्यात 3 वाजले आणि तिघी पण केफे मधून घराकडे मार्गस्थ झाल्या.
कालपासून , अंकित जरा जास्तच खुश होता.आज परत एवढ्या वर्षांनंतर तो परत शाळेच्या आठवणींत गेला होता... आणि अशातच त्याच्या ध्यानात आलं..."अरे, वैशाली दिसली खरी पण बोलणार कस ती तर कुठेच नाही...!"
असा विचार करून अंकितने परत एकदा वैशालीचे विचार सोडून दिले...
 वैशाली घरी परतली...
आज खूप दिवसांनी वैशाली सोशल मीडियाचा विचार करत होती...की "का ती या सर्वांपासून लांब राहते..?".का स्वतः चे आयुष्य इतके वैयक्तिक करतेे ती ? अशातच वैदेहीने तिला एक मेसेज केला...
पण वैशालीला मेसेज काही बघता येईना... कारण त्यासाठी सोशल मीडिया वर खात असणं गरजेचं होतं....म्हणून 
"अग..काही काय पाठवतात.. मला दिसत नाही ना ते."..या स्वरात ती स्वतः शीच बोलली ...
आणि असाच मेसेज तिने वैदेही ला सुद्धा केला.
यावर वैदेही पण बोलली... अग," बाई उघडुन घे ना एक खात...किती वेळ दुर राहते आता!"
 वैदेहीचे स्वर ऐकून वैशालीला खूप राग आला..आणि रागातच अखेरीस तिनं खात उघडलं...
अखेरीस खूप  वर्षांनंतर वैशाली सोशल मीडिया वर आली होती....
खूप जुने मित्र - मैत्रिणी तिला खूप लवकर जोडले गेले...त्या सर्वांना बघून वैशालीच्या एकदम डोळ्यातच पाणी आले... कारण खूप वर्षांनी...आज वैशाली जुन्या आठवणींमध्ये रमणार होती....
शाळा.... विद्यालय.. महाविद्यालय.... खूप गोष्टी..खूप आठवणी...खूप लोक.... आणि असंख्य क्षण......
आज खूप दिवसांनी विराज आणि अंकित पण परत एकदा भेटले होते. आपापल्या वैयक्तिक आयुष्यातून वेळ काढून दोघं निवांत बसले होते....
दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि त्यातच अंकितने विराजला वैशाली विषयी सांगितले...
की, अरे, विराज .. वैशाली माझ्या घराजवळ राहते..
कुणास ठाऊक पण विराज खूप रहस्यमयी हसला, अंकितला काही कळले नाही पण त्याने सुध्दा काही विचारले नाही कुणास ठाऊक त्यांची मैत्री इतकी जुनी होती की काही बोलायची गरजच नाही पडायची...खूप जुनी आणि निर्मळ मैत्री होती ती...
असो...
सोशल मीडिया वर आता वैशालीचा वेळ चांगला जात होता. जुने खूप मित्र - मैत्रिणी तिला भेटल्या होत्या. शाळेच्या..क्लासच्या... सर्व...काही सुरळीत चालले होते ...
आणि नशीबाने परत एकदा दार ठोठावले....
हो....
अंकितच्या... मित्रांच्या संदर्भामध्ये... ती आली
"वैशाली पाटील"
अंकितच्या आयुष्यातली पहिली मुलगी
नकळतपणे बोलण्यासाठी जणू नशीब परत एकदा साथ देत होते.... आणि अंकित ने क्षणात तिला रिक्वेस्ट पाठवली... आणि विराजला सुद्धा तो हे बोलला.. खरेतर यावर दोघेही चकित होते कारण अचानक ती आता सोशल मीडिया वर पण आली होती...
यापूर्वी अनेक वेळा अंकितने तिला शोधलं होतं पण कुणास ठाऊक कधी सापडलीच नाही ती..
पण अखेरीस आज तिच्या एक पाऊल जवळ जाण्याची संधी होती ही.
आता रिक्वेस्ट पाठवली तर वैशाली पर्यंत सुद्धा येणारच ती... आणि वैशालीला रिक्वेस्ट दिसली...
घराच्या अंगणात वैशाली अशीच चक्कर मारत होती.. आणि जशी तिने अंकित ठाकरेची रिक्वेस्ट पहिली... थोडी घाबरलीच ती...
कारण तिने कधी हा विचार केलाच नव्हता...की एवढ्या वर्षानंतर सुद्धा अंकितला ती लक्षात असेल, अर्थात खूप वर्ष झाली होती आता आणि आज वैशाली खऱ्या अर्थाने अंकितचा विचार करत होती..
आज ती पहिल्यांदा तिच्या भावनांचा विचार करत होती.....त्या भावना... त्या चुका ज्या ती कधीच कुणालाच बोलली नव्हती...ज्या फक्तं तिच्या मनात होत्या...
अंकित ठाकरे...तिच्या शाळेतला सर्वात हुशार मुलगा...... कृष्णसारखा सावळा रंग... उंच बांधा ....सर्व शिक्षकांचा आवडता... शांतप्रिय.... तिच्यासारखं बडबड करणारा नव्हता तो... तिच्यासारखं वायफळ गोष्टींमध्ये वेळ घालवणारा तर मुळीच नव्हता... आणि मुलींमध्ये तो कधी रमलाच नाही...जणू अभ्यासच त्याचे पहिले प्रेम होते .... नजर वरती करून सुद्धा तो कधी कुण्या मुलीकडे बघायचा नाही.... मित्रांमध्ये सुद्धा तो वायफळ वेळ नाही घालवायचा... अभ्यासात सर्वात पुढे....शाळेच्या असंख्य मुलांमध्ये त्याने स्वतः च्या हुषारीवर वेगळे स्थान निर्मित केले होते... आणि फक्त विराज सोबत वैैशालीने अंकीतला पाहििले होते...
विराज पण खरतर वैशालीचा लहानपणीचा मित्र होता..पण काळानुसार त्यांचा संबंध खूप कमी झाला होता..पण लक्षात होता. अंकित आणि त्याचा जवळचा मित्र विराज...
आता अर्थातच सर्व एकाच विद्यालयात होते..तर ओळख असणे साहजिक होते....
असो...
वैशालीला अंकितचा कधी राग नव्हता..पण कदाचित काही चूक तिने केली होती नकळतपणे ज्यासाठी ती आजही अंकित सोबत बोलायला घाबरायची... मुळात अंकित चांगला तर वाटायचा पण तिला भीती वाटायची त्याची....
क्रमशः
(वैशाली का घाबरायची अंकितला...... अंकितची रिक्वेस्ट ती या भीतीपोटी मान्य करेल का....की यावेळी सुद्धा नशिबाला हे दोघं पण दूर करणार का...का यावेळी काही चमत्कार होईल... बघू पुढच्या भागात)

लेखिका: वर्षा गिते
इरा टीम: नाशिक
कथेचे नाव: नशीब
स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक
भाग - ४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//