नशीब भाग-३

Luck

शाळेचे पर्व आता संपले होते आणि महाविद्यालयाचे नवीन पर्व सुरू होणार होते ; शाळा झाली ;सुट्टी झाली ;निकाल हि घेतला ; आणि .. शेवटची वैशाली सुद्धा दिसली....

आजपासून खूप गोष्टी बदलणार होत्या....आता अंकितचे अजून महत्त्वाचे शिक्षण म्हणा किंवा अजून महत्वाची पायरी अंकित चढणार होता..... अंकित आणि वैशाली जसे आता वेगवेगळ्या वाटेनं निघाले होते तसेच विराज आणि अंकित सुद्धा वेगवेगळ्या वाटेनं निघाले होते... अर्थात आता काही कुणाचा संबंध कधी येणार नव्हता...

अंकितचे महाविद्यालयाचे पर्व सुरू झाले नियमित महाविद्यालयात जायचे , तासिका करायच्या क्लास करायचा आणि घरी येणे हा अंकितचा नियमित क्रम झाला होता... असाच एकदा अंकित महाविद्यालयातून बाहेर जात होता ...आणि बघतो तर काय.... अंकित... थांबला... त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास नव्हता...तो परत परत निरखून बघत होता.... आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर स्मिहास्य आले कारण.....

वैशाली पाटील त्याच्या समोर उभी होती....

आज परत एकदा अंकित ला सर्व काही आठवत होते.... आणि जणू परत नशीब साथ देते असा विचार त्याच्या मनात येत होता ; आणि असंख्य विचारांमध्ये तो तिच्याकडे बघतच राहिला....

वैशाली....तिने सुद्धा त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.....नजरानजर तर झाली.... तिलाही आठवले ...

अरेच्चा..".हा तर अंकित आहे"...पण 

कधी संवाद न साधल्यामुळे...ती पण खाली नजर करून निघून गेली....

आज पहिल्यांदा अंकित ला परत एकदा वैशाली खूप दिवसांनी आठवली होती आणि परत एकदा त्याला तिच्याशी बोलायची इच्छा पण झाली होती....पण कदाचित यावेळी नशिबाला... अंकितला या वाटेवर भरकटवायचे नव्हते आणि वैशाली त्यानंतर पूर्ण दोन वर्ष अंकितला दिसलीच नाही.....या गोष्टीचं नवल जितका तुम्हाला वाटतय तितकच त्यावेळी वैशाली आणि अंकित ला सुद्धा वाटला होतं ;  होय.....

अंकित नंतर आपल्या पुढच्या अभ्यासाकडे जोमाने लागला होता आणि अर्थात त्या नादात आता त्याला वैशालीचा विसर पडत होता.....

पण वैशाली तिला अंकित ला बघून आश्चर्य का वाटले.....?? ती का एवढी चकित झाली....??.हा प्रश्न स्वतः वैशालीला सुद्धा या काही वर्षात खूप वेळा पडला.... !!!!

याचे कारण बहुदा ती शेवटची बातमी असावी.....

जी तिला शेवटच्या दिवशी कळाली होती...

वैशाली एकटीच होती  त्यादिवशी ....साळुंके क्लास मध्ये...जेवण झाले आणि म्हणून क्लास बाहेर पडली... होती.आणि इतक्यात तिची एक मैत्रीण साजिरी तिथे आली  आणि तिला सांगू लागली....

"वैशाली अग वैशाली.... थांब... तुला काहीतरी सांगायचं आहे" खूप महत्वाचं आहे....

वैशाली तिला सावरत बोली....अग, थांब जरा....श्वास घे... बस इथे...घे पाणी पी......काय झाल बोल आता...

अग , वैशाली तू विश्वास नाही ठेवणार मला काय कळाले आहे ते .....

"काय कळाले"....तिचे बोलणे मध्येच तोडून वैशाली बोलली....

पण...." मला वचन दे तू चिडणार नाही आणि विचार करशील....." असा बोलत साजिरीने तिच्याकडे अगदी आशेने बघितलं.....आणि ठीक आहे... करेल विचार असा बोलत तिने तिला वचन दिले.....  

            अग...तुला माहित का ... अंकित ठाकरे.... आपल्या शाळेतला विद्यार्थी....!!!!

हो .... माहीत ना....तो अतीहुषार....काय ग त्याच..!!!...असा बोलत परत वैशाली ने तिचे बोलणे मध्येच तोडले....

आणि साजिरी सुरू झाली.....

""वैशाली चिडू नको.... मी फक्त तुला काही सांगत आहे....लक्ष देऊन ऐक....

वैशु....तो अंकित ना... अंकित ठाकरे...कसा वाटतो ग तुला.....?

म्हणजे....? एकदम आश्र्चर्य चकित होऊन वैशाली साजिरी च्या प्रश्नाचं... प्रतिउत्तर देत बोलली....

"कसा वाटतो "....!!

तसा चांगला आहे  हुशार पण आहे पण ....जाऊदे..काय करायचं तुला...काय म्हणायचं नीट सांगशील का ....!!

यावर साजिरी... तिच्याकडे एकटक बघत बोलली....हो का...!!

चांगला......मला कधी बोलली नाही यापूर्वी.....

अग...तू मुद्द्याच बोलते का.... अतिशय तीक्ष्ण कटाक्षाने.. वैशाली... साजिरी ला रोखून बोलली....

हो....तर ऐक....त्या अंकित ला ना तू .... आवडतेस....काय वाटतं तुला यावर....!!!!!

वैशाली एकदम जागेवरून उठून.... जोरजोरात हसायला लागली....

साजिरी ला काही कळेना.... म्हणून ती परत एकदा बोलली..."अग ... वैशाली अंकितला तू आवडतेस...एक मैत्रीण म्हणून .... मी काही विनोद केला का... एवढं का हसतेस.... वैशाली....अग मी काहीतरी बोलते...."

एवढ्यात.... कशीबशी हसू रोखून... वैशाली बोलली...

"हो" .. साजिरी मस्त सुरुवात झाली दिवसाची छान विनोद. होता... "चल मला उशीर होतोय येते मी."...असा बोलत वैशाली चालती झाली..

आणि इतक्यात तिचा हाथ मागे खेचून साजिरी तिला बोलली...."अग वैशाली...हा विनोद नाही....हे सत्य आहे"

तिच्याकडे बघत वैशाली परत हसायला लागली... आणि बोलली..."अग वेडी का तू...तो अंकित ठाकरे....त्याला पूर्ण शाळा त्याच्या गुणांमुळे ओळखते.... त्याच्या हुषारीवर ओळखते....आपल्याला कोण ओळखत..... आपल्याला त्याच्या एवढे गुण सुद्धा कधी पडले नाही... अग त्याला माहीत तरी असणार का मी..... !! आणि सर्वात मोठी गोष्ट...अग एवढा अभ्यासू मुलगा त्याला काय वेळ.. असणार या गोष्टींसाठी....काही पण ऐकून येते आणि नंतर माझा डोकं खाते...जा बघू...असा बोलत.. वैशाली हाथ झटकून...निघून गेली....

साजिरी ला सुद्धा एवढं ऐकून प्रश्न पडला खरंच असं असणार बहुतेक......

हा पूर्ण प्रसंग आज वैशालीला डोळ्यासमोर साक्षात उभा होता...जेव्हा तिची आणि अंकित ची नजरानजर झाली...

पण परत एकदा स्वतःकडे बघत तिने सर्व मागे सारून...ती पण महाविद्यालयातून बाहेर पडली....

हळू हळू महाविद्यालयाचे हे पर्व हि संपले....आता पदवित्तुर शिक्षणासाठी वैशालीने सुद्धा...पुढे प्रवेश घेतला आणि...अंकितने सुद्धा.. अखेरीस...त्याच्या असंख्य आठवणींचे शहर सोडले .....

खरे बघता.... शहर सुटल्यामुळे अंकितला वैशालीचा पूर्ण विसर पडत होता....ती काय करते..?...कुठे असेल??? याविषयी आता कुणालाच माहिती नव्हती!!!आणि याने अंकित अस्वस्थपण नाही झाला कधी....

दोघेही परस्पर आयुष्यात गुंग झाले ...अंकित पर्यंत वैशाली बाबतीत काही खास बातमी कधीच नाही आली...

परंतु.. अंकित काय करतो !! कुठे आहे !!! या सर्व बातम्या वैशाली पर्यंत वेळोवेळी येत होत्या...

कुणास ठाऊक पण वैशालीला अंकित विषयी सर्व माहिती ठाऊक राहायची....

दिवस जात गेले....वर्ष हे गेले ....शाळा संपून पूर्ण ४ वर्ष झाली होती...... दोघेही खूप निवांत चालले होते.....

जानेवारीचा महिना होता.... सायंकाळचे ६ वाजले होते.... सुट्टीसाठी अंकित... घरी आलेला होता आणि असाच... सायांकळी चक्कर मारायला बाहेर पडला होता....

आणि परत एकदा.....

तो चेहरा....ते डोळे.....ते नाक...ते ओठ....ती मान....ते मखमली सारखे केस.... आणि ती वैशाली.....

हो... आज एवढ्या वर्षानंतर.... वैशाली परत एकदा अंकित समोर आली होती.... यावेळी... अंकित खूप चकित होता.....म्हणून त्याने अगदी घाईत विराज ला फोन केला.... आणि बोलला...." अरे विराज.. ती.. वैशाली आठवते का तुला.....?

"वैशाली पाटील...." साळुंके क्लास...."

"हो .. आठवते ना काय रे काय झाल तिचा???"

विराज, त्याला बोलला....

अरे... कुठे असते ती सध्या....काय करते....? असे बोलत अंकित थोडा बैचेन होत होता.....

आता साहजिक विराज ला माहीत नव्हते पण...तो एवढंच बोलला... "अरे... अंकित...काय करते वगैरे नाही माहीत हा पण तुझ्या घराजवळ राहते वाटतं.....

हे ऐकताच..... अंकित चा आनंद गगनात मावेना...

आता तुम्हीच सांगा....आपली आवडती मुलगी.. आपल्या शाळेत... आपल्या क्लासला.... आणि आता आपल्या घराजवळ.....कोणी पण आनंदित होईल....

आज खूप दिवसांनी अंकित ला जुने दिवस आठवत होते.... शाळा.... क्लास.... सर्व काही.....आज परत अंकित रमला होता....

क्रमशः

( काय वाटतं...काय करेल अंकित पुढे...!!!आता तरी अंकित बोलेल की नाही...आता तरी.... नशीब साथ देईल की नाही.....की हा फक्त योगायोग...आहेत..)

लेखिका: वर्षा गिते

इरा टीम: नाशिक

कथेचे नाव: नशीब

स्पर्धा: इरा राज्यस्तरीय करंडक

भाग -३

🎭 Series Post

View all