Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नशीब भाग -२

Read Later
नशीब भाग -२आज शाळेतून परत जाताना..... जणू... अंकित खूप आठवणींमध्ये रमला होता.....एकदम " ९वी ग.... साळुंके क्लास.." .सर्व काही त्याला आज आठवत होतं ....आणि आठवताना हसू तर येतच होतं पण पण सोबतच एक खंत पण होती ....
की... वैशाली आता परत कधीच दिसणार नाही .... बरोबर... वैशाली....अंकित च्या अस्वथपणाचे कारण.... अंकित च्या बैचेनीचे कारण... .. अंकित च्या तळमळीचे कारण..."वैशाली पाटील"... जणू हे नाव त्याच्या मस्तकात कोरले होते.....हो ....आज सुद्धा अंकित ला वैशाली तशीच आठवते जशी... अगदी पहिल्या वेळी दिसली होती ... अगदी हुबेहूब.... झऱ्या सारखा नितळ चेहरा...त्यावर...सूर्यासारखे सतेज तेज... आणि जागोजागी...दवबिंदू सारखे घामाचे ठिपके...पाणीदार डोळे.... टोकदार नाक...आणि त्याखाली तिचे गुलाबाच्या कळी सारखे बंद..ओठ... मोरासारखी ताठ मान... .. आणि अशातच तिच्या त्या काळया भोर केसांमधील...त्या मानेवरून फिरणाऱ्या तिच्या घट्ट वेण्यांमधील लटा...आणि कुणालाही लाजवेल असा ताठ कणा... जणू हजारांच्या गर्दीत सुद्धा... अंकित तिला पहिल्या नजरेत ओळखेल .... अशी अंकित च्या डोळ्यांन समोरची वैशाली.....
आजही अंकित ला तो दिवस अगदी नीट आठवत होता... "साळुंके क्लास मध्ये... .. सकाळचे ७:१५ मिनिट झाले होते...आणि बरोबर.... ७:३० मिनिटाला...दरवाजावर....
" मी आत येऊ का मॅडम" असा विचारणारी...वैशाली... सायकल वरून.... घाईत...कशीबशी आली होती...बहुदा क्लास ला थोडा उशीर झाला असावा..... अंदाजे पूर्ण १५ मिनिट .... "वैशाली....क्लास ला उशिरा आली होती".....आणि मॅडम सोबत..वर्गात बसू देण्यासाठी विनवणी करत होती....
नेहमीप्रमाणे मॅडम तिला विचारत होत्या
काय !... वैशाली पाटील... आज का ...उशीर???
आज कुठे अडकली होतीस...??
आणि नेहमीप्रमाणे आज हि वैशाली बोलली... मॅडम... उठायला उशीर झाला.... सॉरी... मॅडम....
असा बोलून..मॅडम ने वैशालीला वर्गात बसू दिले...पण आज वैशालीला मॅडम ने पहिल्या बेंच वर बसवलं होतं... अर्थातच वैशाली नाराज होती....पण कुणी तरी आज खूप खुश होता....कुणीतरी आज गणिताच्या वजा बाकी सोडून... निरीक्षणामध्ये व्यस्त होत... कुणाला तरी आज पहिल्यांदा गणितं सोडून कुठे तरी दुसरीकडे डोकं लावायचे होते.... आणि एवढ्यात..मॅडम ने अंकित ला उत्तर विचारले......अंकित सांग बघू या प्रश्नाचं उत्तर....!!!
अर्थात लक्ष नसल्यामुळे अंकित ला काही सुचेना...पण तास संपला आणि मॅडम वर्गातून निघून गेल्या आणि... अंकित स्वतःशीच हसू लागला.....
अरे.... अंकित... चल घर आल कोणाला बघून हसतो...की एकटाच हसतो आहेस ...!!
अंकित चा दादा एकदम आश्चर्य चकित होऊन बोलला...
पण वेळ मारून अंकित... काही नाही  बोलला असच....विनोद आठवला.... म्हणून टाळून दिले 
आणि दोघे.. घरात...निघून गेले....
वैशु... ए.... वैशु...अग ए बाई......जाऊदे आता. ...झाले पेपर....आता परत देते का? परीक्षा ..अग तुला जेवढे मार्क भेटले ना दोन मुलं पास होतील ग त्यात... जाऊदे आता....
मागच्या दोन महिन्यांपासून वैशू ची आई तिला समजावत होती ....पण वैशु ला मुळात हे पटतच नव्हत की तिला एवढे कमी गुण मिळाले....तसे ८५ टक्के होते पण कमीच होते तिच्या हिशोबाने....
पण जाऊद्या आता काय करणार...अखेरीस हा विचार करून ..... वैशु... आई ला बोलली....
ए आई मी आलेच ग... बाहेर जाऊन.....असा म्हणून बाहेर पाऊल ठेवणार.. इतक्यात आईचा आवाज... आला..
वैशु...अग साळुंके क्लास च्या मॅडम चा फोन आला आहे... बघ काय म्हणता त्या....म्हणून परत माघेरी फिरून ...मॅडम सोबत काय तो संवाद साधून ... वैशु... तिच्या खोलीत गेली...
थोड्यावेळात आई आली आणि बोलली..."काय ग बया आता काय झाल.."तोंड पडायला...."काय बोलल्या मॅडम
..... ??नजर वरती करून वैशु एवढंच बोलली मॅडम ने उद्या सर्व मुलांना क्लास ला शेवटचं बोलावलं....
अग जाकी भेटून ये सर्वाँना...असा बोलून आई किचन मध्ये गेली.....
पण वैशु थोडी नाराज होती...
कारण अर्थातच क्लास मध्ये सर्वांचं कौतुक होणार होतं..आणि त्यासोबतच मॅडम त्यांच्या त्या आवडत्या अंकित च तर खूपच कौतुक करणार होत्या...
काय आहे बर या अंकित च ??..…एवढे गुण स्वतः आणतो..!!. अरे मानते ....आहे.. तू हुशार पण आम्ही पण असतो यार वर्गात तुझ्यामुळे मॅडम बघत पण नाही आमच्याकडे यार....!! शी बाई...हुशार म काही पण का...!!!असा स्वतः शीच बोलण्यात वैशु मग्न झाली.....
..... इतक्यात फोन ची रिंग वाजली.... ""विराज चा फोन आला बघ अंकित....""असे बोलत आई ने अंकित ला आवाज दिला.... अंकितने फोन वर काय ऐकले माहीत नाही पण आनंदाला भान च नव्हते... जणू.... नशीब परत एकदा संधी देत होते....हो कारण विराज ने त्याला क्लास मध्ये यायचा निरोप दिला होता...
बस.... अंकित ने ठरवले .... आज परत एकदा नशीब साथ देते... आज वैशाली सोबत मी बोलणारच....कमीत कमी अभिनंदन तरी करणार.....
आणि तो दिवस अखेरीस उजाडला...आज अंकित परत एकदा वैशू ला भेटणार होता... त्याच्या मनातल्या सर्व भावनांचे कोडे तो पहिल्यांदा वैशु समोर सोडवणार होता...आज त्याच्या मनातली ती प्रत्येक आठवण... प्रत्येक भेट ...प्रत्येक क्षण... तो वैशु ला सांगणार होता....
विराज आला... आणि..अंकित तयार होऊन क्लास कडे निघाला....
.... क्लास मध्ये आला.….. मॅडम ला भेटला.... मित्रांना भेटला... आणि परत एकदा त्याची नजर वैशु ला शोधत होती... आणि अचानक वाऱ्याचा एक स्पर्श आपल्या शरीराला भिडून जावा....तसा वैशुचा धक्का अंकित ला लागला...थोडा बीचकलाच अंकित....पण सावरतो तो पर्यंत वैशु मैत्रीणीसोबत...त्याच्या डोळ्यांसमोरून क्षणात नाहीशी झाली......
अंकित ला आज पण तो"" पहिला सहवास ""आठवत होता.... जेव्हा क्लास मध्ये मॅडम ने पेपर ठेवला होता...आणि सर्व मुले आली होती पण वैशु काही आली नव्हती अजून... अर्थात एक मुलगा आणि एक मुलगी अशी.. व्यवस्था होती...आणि नशीबाने अजून अंकित जवळ कोणी आल नव्हत....
आणि.... अचानक त्याची नजर तिच्यावर गेली... शाळेचा तो गणवेश ...त्यावर तिच्या त्या दोन घट्ट वेण्या.... आणि घामाने लथपथ...मोठे मोठे श्वास घेत ती कशीबशी घाई करत परत एकदा वर्गात आली.... कुठे बसू हा विचार ही न करता सरळ पहिल्या नंबर वर येऊन ""अय.. सरक तिकडे
.. एका बेंच वर दोन मुलांनी बसायचं....मला पण पेपर द्याचा... "सरक... मॅडम येतील परत मला ओरडतील ... "या भाषेत ती अंकित ला ओरडली....ती मात्र पूर्णवेळ गडबडीत होती पण अंकित मात्र मनातल्या मनात खूप हसत होता....!!
..... अंकित ...अरे अंकित चल निघायचं ना चला....
आवाज ऐकून अंकित क्षणात या असंख्य जुन्या आठणींमधून बाहेर आला... आणि फक्त एक नजर वैशु गेली त्या मार्गावर टाकून तो विराज सोबत चालता झाला....
आज तो बोलला नव्हता...त्याला माहित नव्हता वैशु परत भेटेल की नाही....पण आज  अंकितने सर्व नशिबावर सोडलं होतं.....
क्रमशः
(काय होणार पुढे ..... वैशु परत भेटणार का..... आणि वैशु ला या सर्वाचा कधी अंदाज लागेलं का........
हे बघू आपण पुढील भागात)

लेखिका- वर्षा गिते 

इरा टीम- नाशिक 

विषय- प्रेमकथा 

कथेचे नाव- नशीब 

स्पर्धा- इरा राज्यस्तरीय करंडक 

भाग -२


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//