नशीब :भाग -१

Old School Story


"अरे अंकित उठ ....अरे... किती झोपतोस ?आता दोन महिन्यापासून झोपाच काढतोस.... दहावीची परीक्षा झाली जणू तुझा तर शिक्षणच संपला ना... उठ अरे...तुला लक्षात पण आहे का आज काय आहे ते ... ..

मागच्या १० मिनिटांपासून अंकित ची आई अंकित ला उठवत होती...पण अंकित एवढा गाढ झोपला होता...की आवाज ऐकायला आला तर वरचे देव खाली येणार...!

           अखेरीस अंकित च्या भावाने येऊनच अंकित ला उठवलं....पण अंकित उठून त्याच्यावरच चिडचिड करत होता....काय तर म्हणे ...".स्वप्नं होता एवढं भारी स्वप्नं होता... तोडल..काही कळत का तुल!!!"

आता दादा ला सुद्धा कळेना....नेमका चालू काय ...??

पण सगळं बाजूला सारून त्याचा दादा त्याला बोला .. "अरे उठ ....काय आहे बघ आज..."! कालनिर्णयवरची तारीख बघून एकदम अंकित ची भीती वाढली.....

 .... एकदम अंकित जरा चलबीचल झाला.....थोड़ा अस्वस्थ झाला....... शरीर घामाने लथपथ झाले..... आणि.....हृदयाची धड़धड़ ती तर विचारुच नका.... एवढी की.. बाजूला उभी असलेली त्याची आई पण बोली ""अरे अंकित बास किती ती धड़धड़ " मला माहित आहे यावर्षी सुध्दा तू उत्तम मार्क घेउन पास होशील... हो.. ही भीती निकालाची होती.....

कारण आज 10 वी चा निकाल होता... किती गोष्टी या एका निकाला वर अवलंबुन होत्या.. शाळेचं ते अखेरचं पर्व.... आणि बरोबर १ वाजता निकाल लागला ....सर्व काही थांबल अर्थात अंकित शांत झाला ... कारण संगणकाच्या पडद्यावर ४७५/५०० अर्थात ९५ टक्के झळकले होते....अंकित च्या जीवात जीव आला...आनंदाला जणू भान च नव्हते...पुन्हा एकदा सन्मान घेण्यासाठी अंकित खूप खुश होता..पण आज त्याचा आनंद थोडा जास्तच होता..कारण ९५ टक्के घेऊन परत एकदा शाळेत त्याने नंबर तर पटकावलाच होता.... पण आज दोन महिन्यानंतर तो शाळेत जाणार होता...

ती शाळा ज्या शाळेत त्याच्या खूप आठवणी होत्या...खूप असे क्षण तो जगला होता...जे परत कधीच येणार नव्हते... आणि कित्येक मित्र ज्यांना परत तो कधीच भेटणार नव्हता...

.........सकाळ पासून विराज चे कित्येक वेळा कॉल आले होते...अखेरीस न राहून विराज घरीच आला...

बघतो तर काय अंकित तयारीच करत होता...पण आज अंकित जरा जास्तच गुंग होता स्वतःला त्या आरशामध्ये बघण्यात... जणू आज पूर्ण शाळा त्याला बघणार होती.. एवढ्यात अंकित च्या दादाने त्याला सांगितलं..."अरे अंकित आवर विराज कधीचा येऊन बसला"....

निकाल घेण्यासाठी जायचा ना...

आवर पटकन....

अखेरीस खूप वाट बघितल्यावर अंकित तयार झाला आणि विराज सोबत शाळेत जाण्यास निघाला...

                अंकित ठाकरे... विद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांमधील मधील एक हुशार.. शिस्तप्रिय... शांत... आणि शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे नक्कीच ... सर्वोच्च...

अंकित ने आज पुन्हा एकदा त्याच्या शिक्षकांचे नाव.. शाळेचे नाव.... आई वडिलांचे नाव गर्वाने उंच केले होते....

आणि पुन्हा एकदा शेवटचा सन्मान घेण्यासाठी अंकित शाळेत उपस्थित झाला... नेहमीप्रमाणे.... अंकित चा सन्मान झाला... आणि मित्रांमध्ये अंकित व्यस्त झाला....आज शाळेचा शेवटचा दिवस होता ... परत कधीच ही वाट तो चुकणार नव्हता...पण आज कुणास ठाऊक त्याला बैचेनी होत होती... आज अंकित नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्याची हि तळमळ त्याच्या मित्राला काही कळेना ...

आणि एवढ्यात....

विराज त्याला मस्करित बोलला..."काय अंकित कुठे हरवला आहेस?" ... त्याच्या उत्तराला प्रतिउत्तर देत अंकित बोलला..." काही नाही मित्राला शोधत होतो"... शाळेचा शेवटचा दिवस ना... आता कुठे कोण भेटेल....? म्हंटल भेटून घ्याव... असा म्हणत अंकित अचानक तिथून निघून गेला आणि त्याच्या वर्गाजवळून चक्कर मारू लागला....

आता अंकित चा वर्ग होता १०वी फ पण कुणास ठाऊक आज तो १०वी ग जवळ उभा होता अगदी शांत... त्याच्याच विचारात गुंग...

 एवढ्यात विराज परत तिथे आला आणि बोला...काय म भेटून झाल असेल तर निघायचं का....पण आज अंकित च लक्षच नव्हतं.... इतक्यात विराज ला कुणी तरी आवाज दिला आणि तो गेला ...पण अंकित.. अंकित ला आज शाळा सोडायचीच नव्हती...आज तो पहिल्यांदा कुणाची तरी वाट बघत होता...आज पहिल्यांदा अंकित ची नजर कोणाला शोधत होती... जणू कोणासाठी तरी तो अतुरला होता...

जणू त्याची नजर कुणाला तरी चहूबाजूने शोधत होती...त्या असंख्य मुलांमध्ये त्याची नजर कोणाची तरी शेवटची झलक बघण्यासाठी आसुसली होती...कारण कदाचित ही नजर परत अशी कधीच कुणासाठी वर होणार नाही याचा अंदाज बहुदा अंकित ला आला होता...

                 एवढ्यात अंकित चे डोळे चमकले .... चेहऱ्यावरचे स्मितहास्य लाजेने मोठे झाले...आणि एकदम त्याची तळमळ... त्याची ती बैचेनी गायब झाली.... जणू आज शाळेत येण्याची त्याची मनशा पूर्ण झाली होती...खूप धीराने पाऊल पुढे उचलणार ... एवढ्यात अंकितच्या दादाचा निरोप आला ...आणि अंकित अतिशय उदास मनाने मागे फिरला.....आज त्याच्या मनात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तरे त्याच्याकडे सुद्धा नव्हती... आज कुणास ठाऊक अंकित खूप उदास होता ...

जणु कोणी कायमचा त्याच्यापासुन दूर जात होत.... याच विचारांमध्ये तो एक एक पाऊल उचलत शाळेच्या बाहेर चालला होता... बराच वेळ झाला विराज त्याला बोलावत होता पण अंकित चे काही लक्ष नव्हते....

खूप मुलांनी खूप शिक्षकांनी अंकित ला आज महाविद्यालयाच्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या...पण अंकित आज काही खुश नव्हता... आणि याच विचारात तो विराज सोबत शाळेच्या बाहेर वाट बघत होता.... बराच वेळ झाला दादा काही येईना म्हणून सहज मान वळवून त्याने मागे पाहिले आणि .... एवढ्यात अचानक अंकित पाहिले घाबरला आणि नंतर मात्र त्याच्या आनंदाला सीमा च नव्हती... जणू काखेत कळसा नी गावाला वळसा सारखी स्थिती झाली होती...

आणि परत एकदा अंकित स्मितहास्य देऊन गेट जवळ आलेल्या दादा सोबत घरी निघाला....

क्रमशः 

(आता मी थांबते...आपण पुढच्या भागात बघू  ...की निकाला व्यतिरिक्त अशी कोणती गोष्ट होती की ज्या साठी अंकित इतका अस्वस्थ होता....काय कारण होतं त्याच्या क्षणिक  आनंदासाठी....  क्षणिक उदासिसाठी ....काय कारण होते की एक नजरेने त्याची पूर्ण बैचेनी नाहीशी झाली.....!!!)

कथा कशी वाटली.. नक्की कळवा....

लेखिका: वर्षा गिते

इरा टीम: नाशिक

विषय: प्रेमकथा

कथेचे नाव: नशीब.  

स्पर्था: इरा राज्यस्तरीय करंडक

भाग: १









🎭 Series Post

View all