Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग २

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग २     हे बंध रेशमाचे भाग २

     Hospital मधून घरी आल्यावरही ती त्याच्याच विचारात होती. सरिता वहिनीला तिच्याबरोबर आलेला पाहून राधाच्या आईला जरा आश्चर्यच वाटलं.‌.. सरिता वहिनीने हॉस्पिटलचा सगळा वृत्तांत आईला सांगतला... राधा  तिथे होती त्यामुळे वेळेवर ट्रीटमेंट मिळाली म्हणून तिचं कौतुक केलं आणि ती घरी गेली. लेकीचं कौतुक ऐकल्यावर, आईलाही खूप भरून आलं... कशी गुणाची ग माझी  बाय ती असं म्हणत मायेनं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला... पण राधाचा चेहरा मात्र खूप निराश दिसत होता... आईने विचारल्यावर आपण कसे त्याच्याशी उद्धटा सारखे वागलो, त्याची काहीही चूक नसताना त्याला नाही नाही ते बोललो... असं सगळं सांगितलं...

राधा: ...आणि जेव्हा ही चूक लक्षात आली तेव्हा मला त्याला sorry  पण म्हणता आलं नाही...परत कधी भेट होईल का आमची? निदान त्याची माफी मागायची संधी तरी मिळायलाच हवी. खूप अपराधी वाटतंय ग त्यामुळे...   ती अगदी रडवेली झाली होती...

राधाची आई:  ए  वेडाबाई...अगं रडतेस काय?? तुझी खूप मनापासून इच्छा आहे ना माफी मागायची?? 
तिचे डोळे पुसत तिची आई म्हणाली...
राधाने मानेनेच होकार दिला...

राधाची आई: मग तुमची भेट नक्की होईल..  आणि तुला इतकच वाईट वाटत असेल, तर तुझ्या बाप्पाला सांग की,  तो नक्कीच तुमची भेट घडवून आणेल.. हवं तर अजून थोडीशी लाच दे त्याला... काय?
असं म्हणल्यावर राधा लहान मुलीसारखं खुदकन हसली...??

राधाची आई:  हसलं गं माझं लेकरु....आता हात पाय धुऊन घे मी जेवायला वाढते...

असे म्हटल्यावर राधा आत जायला लागली, तेवढ्यात तिच्या आईने तिला परत आवाज दिला...

राधाची आई:  राधे, अगं म्हणजे आज तू कॉलेजला गेलीच नाहीस???? पण  मग गाण्याच्या ऑडिशन चं काय ?? असं विचारल्यावर राधाच्या डोक्यात ट्यूब पेटली...

  या सगळ्या गडबडीत ती ऑडिशन्सच पार विसरूनच गेली होती.

राधा: shit yaar...मी तर पूर्ण विसरूनच गेले गं ??? थांब मी विचारते कुणालातरी... आणि जर ऑडिशन झाल्या  असतील तर यावेळेसही माझी संधी हुकली...
पुन्हा ती एवढसं तोंड करून बसली.... ?
राधाची आई: अगं आधी विचार तरी.... लगेच तोंड पाडून बसू नकोस....

लगेच तिने कॉलेजमधल्या मैत्रिणीला फोन लावला. आणि ओरडतच किचनमध्ये आली....

राधा: आऊऽऽऽ,(ती खूश असली किंवा लाडात आलेली असली की, आईला या नावाने हाक मारायची.) ? ?

राधाची आई: अगं केवढ्यानेओरडतेस???? काय झालं ????

राधा: अग्गं....गाण्याच्या auditions झाल्याच नाहीत. पुढच्या आठवड्यात होणार आहेत.  अजून आठवडाभर तयारीला वेळ मिळाला आहे...

राधाची आई: बरं झालं बाई...   खूष का आता मग?? जा तुझ्या बाप्पाला थँक्यू म्हण आधी...

राधा: होऽऽ... असं म्हणून ती  पळाली....

                ********
     ऑडिशन चा दिवस उजाडला. ऑडिशन साठी हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी झाली होती.  Cultural कमिटीच्या हेड जोशी मॅडम पण ऑडिशन घेण्यासाठी आल्या होत्या. पण अजून Cultural Secretary काही आला नव्हता. राधाने त्याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं.  खूप हुशार आहे तो, गेल्या दोन वर्षापासून कॉलेजला सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये त्याने पहिलं बक्षीस मिळवून दिलयं. त्याला भेटायची तिला खूप उत्सुकता लागली होती. आणि तितक्यात तो आला...

       त्याच्याकडे बघताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद असे दोन्ही भाव आले... world is so small...finally भेटलाच तो मला आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली. होय.. तोच होता तो .... नील शहा  tall and handsome....mba first year चा विद्यार्थी, tybba चा University topper आणि आता कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी... तो  स्टेज वर आला तेव्हा राधाने खरं तर नीट बघितलं त्याला. कसला हँडसम दिसत होता तो... ब्लॅक जीन्स, व्हाईट शर्ट, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या  हातात चांदीचं कडं. गोरापान, कुरळे केस, घारे डोळे, नकटं नाक (म्हशीने पाय दिल्यासारखं,), पण तेही त्याला अगदी शोभून दिसत होतं.

राधा (मनातल्या मनात): कसला हँडसम आहे यार हा... त्या दिवशी मी बघितलंच नाही याला ... केवढी चिडले होते मी त्यादिवशी... ते ही त्याची काही चूक नसतांना...

राधा त्याच्या विचारात हरवली होती....
        ऑडिशनला सुरुवात झाली,दोन-तीन गाणी झाल्यावर  राधाचं नाव घेतलं गेलं. ती स्टेज वर आली, स्वतःची ओळख करून दिली. तिला बघून तोही तिच्याकडे बघतच राहिला...गव्हाळ रंग, अगदी लांब सडक नसले तरीही  छोटीशी क्लीप  लावून मोकळे सोडलेले घनदाट केस, काळेभोर  डोळे...व्हाईट लेगिन्स  आणि गुलाबी कुर्त्यामध्ये तर ती खूपच गोड दिसत होती.. ? ?

नील: (मनातल्या मनात )  हिला गाता पण येतं वाटतं? त्या दिवशी केवढी  वसावसा ओरडत होती? असा विचारही त्याच्या मनात आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं..

तिने गाणं म्हणायला सुरुवात केली.

ही गुलाबी हवा वेड लावी जीवा....
हाय श्वासातही ऐकु ये मारवा...

तिचं गाणं सुरू झालं तसं नील तर एकटक तिच्याचकडे बघत होता... सुर, ताल, लय ह्या कशाकडेच त्याचं लक्ष नव्हतं... अर्थात ते परफेक्ट होतंच...   पण तिचा गोड आवाज, तल्लीन होऊन  गातांना तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव  मधूनच त्या दोघांची होणारी नजरानजर .... एवढ्या गोष्टी वेड लावायला पुरेशा होत्या.... आणि खरोखरच तिच्या गोड  आवाजाने सर्व वातावरण  जणू रोमॅण्टिक आणि गुलाबी गुलाबी झालं होतं....
 
गाणं संपलं आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने नील भानावर आला... सगळ्या ऑडिशन्स संपल्या आता उत्सुकता होती ती निकालाची....

      सगळ्यांचे लक्ष जोशी मॅडम काय बोलतात याकडे लागून राहिले होते. आणि madam ने बोलायला सुरुवात केली.  दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही college ने competition साठी registration  केलं आहे. पण यावेळेस कॉलेज कडून कॉम्पिटिशन साठी एक solo performance आणि एक duet performance  असे दोन्ही category साठी registration केलेलं आहे.  आणि म्हणूनच आपल्या college कडून  तीन जणांचे selection  झालेलं आहे. आणि ती तीन नावं आहेत... प्रेरणा पटेल, आपला लाडका  cultural secretary  नील शहा आणि... राधा देशमुख...नावं घोषित झाली, तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
     आता hall  बर्‍यापैकी रिकामा झाला होता.  cultural group मधले काहीजण नील, राधा आणि प्रेरणा एवढेच तिथे थांबले होते. नील कुणाशीतरी बोलत होता, त्यामुळे त्याचं बोलणं संपायची राधा वाट बघत होती... तेवढ्यात प्रेरणा तिच्याशी आपणहून ओळख करून घ्यायला आली...
प्रेरणा: हाय राधा मी प्रेरणा पटेल. मी sybba ला आहे

राधा: हाय मी राधा देशमुख. मी sybsc ला आहे.

असं म्हणून त्यांच्या थोड्याफार गप्पा सुरू झाल्या.

नील अधून मधून चोरट्या नजरेने तिच्याकडे बघत होता. असचं बघता बघता अचानक त्यांची नजरानजर झाली... आणि राधा त्याच्याकडे बघून खूप गोऽड हसली...
आणि हाऽऽय !!! त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला .... तिच्या गालावरच्या खळ्या बघून.....

सगळे एकमेकांशी बोलण्यात गुंग असतांना सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नील ने सगळ्यांना त्याच्यासमोर बोलवलं आणि बोलायला सुरुवात केली...
    
  नील: सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन!!!  स्पर्धा बरोबर एक महिन्याने आहे त्यामुळे duet कोणतं म्हणायचं, solo कोणतं म्हणायचं हे सगळं आपण लवकरच ठरवूयात. music arrangement आणि back stage  साठी पण खूप मदत लागणार आहे... आपला whatsapp group बनवलेला आहेच... जे कोणी त्या group मध्ये नसतील त्यांना प्रेरणा add करेलच. तुम्ही फक्त तुमचा नंबर तिच्याकडे द्यायला विसरू नका. मी / प्रेरणा practise च्या updates group वर  कळवू.चला तर मग भेटू लवकरच... till then bye ...
असं म्हणून नील जायला निघाला.

राधा त्याच्या मागेमागे गेली आणि तिने त्याला आवाज दिला...

राधा:  Excuse me... मला जरा तुमच्याशी बोलायचयं...

नील : राधा ? बोल ना!(नक्की बोलणारच आहे ना ही? नाही तर त्या दिवशी सारखं भांडायची ? मनातल्या मनात त्याचा विचार चालू होता. )खरंतर त्यालाही तिच्याशी बोलायचं होतंच... पण आपण होऊन बोलायला गेल्यावर ही कशी react होईल कुणास ठाऊक म्हणून तो काही बोलायला गेला नव्हता.

राधा: अं.. ते म्हणजे मला खरं तर त्यादिवशी साठी तुम्हाला sorry  म्हणायचं होतं.

नील: Sorry?

राधा : म्हणजे Thank you  म्हणायचं होतं...

नील: thank you?

राधा:  म्हणजे आधी sorry मग thank you.
(बाप्पा, अरे काय होतय मला? स्वतःशीच बडबडत तिने स्वतःच्याच  डोक्यात टपली मारली.)

तिची अशी त-त-प-प बघून नीलला हसू आवरेना... त्याला हसताना बघून तिला अजूनच कसनुसं झालं...

राधा: मला खरंच माफी मागायची  आहे हो तुमची... पण कसं बोलू कळतच नाहीये.. (ती अगदी रडवेला चेहरा करून म्हणाली.)??

नील: It\"s ok... होतं असं, तुझा गैरसमज झाला होता आणि तो  दूरही झालाय. आणि तुला मनापासून मला सॉरी म्हणायचंय हे कळलयं मला...प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नसते... काही गोष्टी या आपण होऊन समजून घ्यायच्या असतात... So chill... आणि हो मला अहो वगैरे म्हणू नकोस... नील च म्हण...

राधा: हो पण तुम्ही आधी म्हणा तरी...

नील: काय? ? ( आता काय गाणं म्हणू की काय हीच्या साठी ?) मनातल्या मनात तो म्हणाला...

राधा: \"माफ केलं\" असं.... आई म्हणते जोपर्यंत  समोरचा माफ केलं असं म्हणत नाही तोपर्यंत माफी मागायची...

ती एकदम cute चेहरा करून म्हणाली...

नील:( मनातल्या मनात किती निरागस आणि क्युट आहे ही...वेडूच आहे) नील  तिच्या त्या cute चेहऱ्याकडे बघतच राहिला....
तसं तिने त्याला आवाज दिला...
राधा: नीऽऽल...
तसा तो एकदम भानावर आला...

नील:( मनातल्या मनात) हाऽऽय कसलं छान वाटतंय हिच्या तोंडून माझं नाव ऐकताना??

तो काही बोलत नाही म्हटल्यावर तिने परत त्याला आवाज दिला...
राधा: नील, केलस ना तु मला माफ??

नील: हो... केलं मी माफ आता खुश?? आता हसणार आहेस???   कि असा चेहरा पाडून घरी जाणारेस?

राधा: असं म्हणल्यावर ती लहान मुली सारखी खुदकन हसली... ???

आणि पुन्हा एकदा त्याच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या गालावरची खळी बघून...

राधा: थँक यु सो मच... मला खूप अपराधी वाटत होतं जेव्हा मला  आज्जींनी सगळं खरं सांगितलं तेव्हा.... तेव्हापासून मला तुला भेटायचं होतं...

नील: अं??? मला भेटायचं??

राधा: म्हणजे.. सॉरी म्हणण्यासाठी....
पुन्हा एकदा राधाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून नीलला हसू आलं...

नील: ठीक आहे राधा, जे झालं ते झालं... एवढं मनाला लावून नाही घ्यायचा... चल भेटू लवकरच प्रॅक्टिस साठी... bye...

राधा: हो....bye...

    राधाला तर खूपच आनंद झाला होता. पण  Selection पेक्षाही तो भेटल्याचाच आनंद जास्त होता कदाचित....
आता कधी एकदा प्रॅक्टीस सुरू होते असं तिला झालं होतं...


    क्रमशः

©® केतकी


   
   

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now