Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग १

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग १


         हे बंध रेशमाचे भाग 1
( नमस्कार वाचक मंडळी, ही माझी पहिलीच प्रेमकथा. ही कथा आहे नील , प्रेरणा आणि  राधा यांची. ही फक्त प्रेमकथा नाही,  तर या तिघांच्या मैत्रीचा एक  unconditional bond आहे... कथा सुरू करण्याआधी थोडी पात्रांची ओळख करून घेऊयात...

नील शहा - नाशिक मधील  शहा textile industry चे  सर्वेसर्वा  मुकुंद आणि नलिनी शहा यांचे एकुलते एक सुपुत्र....

प्रेरणा पटेल- मोहन आणि सीमा पटेल यांची एकुलती एक लेक.... आणि नील ची  लहानपणापासूनची मैत्रीण... वडील बँकेत अधिकारी आणि आई निवृत्त शिक्षिका. एकाच गल्लीत दोघं लहानाचे मोठे झाले... शालेय शिक्षण आणि आता कॉलेजला ही दोघं एकत्रच होते.

राधा - अजित आणि वैशाली देशमुख यांची धाकटी लेक. एक मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. वडील एक सरकारी अधिकारी, आई हाऊस वाईफ आणि मोठा भाऊ- वहिनी बेंगलोरला  IT company  मध्ये नोकरी करत होते.)

        नोव्हेंबर महिन्यातली एक प्रसन्न सकाळ...

राधा- (घरातल्या देवघरासमोर उभं राहून)
बाप्पा... आजच्या ऑडिशनमध्ये कुठल्याही परिस्थितीत माझं selection होऊ दे. तुला २१ मोदक ?? नको नको  ११?? हम्म.. ११ च ठीक आहे...११ मोदकांचा नैवेद्य दाखविन या चतुर्थीला... चालेल ना?? सारखं सारखं गोड खाणं पण चांगलं नाही रे !!! नैवेद्य काय फक्त नावाला तुझा असतो खातो तर आम्हीच ना??  प्लिज तेवढं ऑडिशनचं  लक्षात ठेव हं विसरू नकोस .... असे म्हणून देवाला दोन-तीन वेळा नमस्कार करते...???

राधाची आई: (गालातल्या गालात हसत) काय ग झालं का बाप्पाशी हितगुज करुन?? काय लाच दिलीस त्याला???

राधा- ए,काय ग आई... असं म्हणतेस? एकतर मला ऑडिशनचं  solid  tension आलयं...

राधाची आई:  नको tension घेऊस ... तू काय पहिल्यांदा स्टेजवर गाणार आहेस का??

राधा: तसं नाही गं... पण गेल्यावर्षी मला जमलं नाही निदान या वर्षी तरी....

राधाची आई: होईल.. नक्की होईल तुझं सिलेक्शन... ऑल द बेस्ट??
असं म्हणल्यावर राधा आईला नमस्कार करते आणि कॉलेजला जायला आईला निघते...


***

   ११ वाजत आले होते... राधा
S.M. college  sybsc ला शिकत होती. inter collegiate singing competition साठी College मधून कोणाला पाठवायचं यासाठी आज तिच्या कॉलेजमध्ये auditions  होणार होत्या.  गाणं म्हणजे तिचा जीव की प्राण... त्यासाठीच कॉलेजच्या  कल्चरल ग्रुपमध्येही तिला एन्ट्री हवी होती. झपझप पावले टाकत ती कॉलेज गाठायच्या प्रयत्नात होती. कॉलेजच्या गेट जवळ आल्यावर गाडीचा करकचून ब्रेक मारल्याचा आवाज आला, व्हॅगनार समोर एक आजी पडल्या होत्या. ती धावत गेली बघते तर काय, त्या  राणे आजी होत्या. त्या तिच्याच गल्लीत बाजूच्या सोसायटीमध्ये राहायच्या. तिने पटकन sack मधून पाण्याची बाटली काढली, आणि त्यांच्या तोंडावर पाणी मारु लागली... पण त्या बेशुद्धच झाल्या होत्या. आणि तो गाडीतून उतरला. सॉरी सॉरी लागला का आजींना असं विचारताच राधाने फणकार्‍याने त्याच्याकडे बघितलं.

राधा: काय हो बघून चालवता येत नाही गाडी?? एवढी मोठी बाई दिसली नाही तुम्हाला??  की लक्ष दुसरीकडे होतं??


तो:   अहो ते नाही माझी चूक नाही हो मी पण.. 


बिचारा बोलायचा प्रयत्न करत होता, पण ती कुठली ऐकायला?? उलट अजूनच चिडली.


राधा: श्रीमंत घरातले दिसतात? आई-वडीलांच्या जीवावर गाड्या फिरवायच्या... जबाबदारीचं मात्र भान नाही.

तो निमूटपणे सगळं ऐकून घेत होता.

राधा: आता आज्जींना  दवाखान्यात न्यायला तरी मदत करा आणि जरा माणुसकी दाखवा.


तो: अहो, ऐका ना!!   मला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे ते काम झालं की मी लगेच हॉस्पिटलला येतो तुम्ही पैसे घ्या आणि आज्जींना ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा...

असं म्हणून त्याने तिला काही पैसे देऊ केले.

ते पाहिल्यावर तर तिचा संताप अनावर  झाला...

राधा:अहो मिस्टर!!! एखाद्याच्या जीवापेक्षा तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचा आहे??

ती चिडून बोलत असते पण तो मात्र सारखा कुणालातरी फोन लावत असतो...


तो वैतागत (मनातल्या मनात)- अरे काय यार नेमका फोनही लागत नाहिये....

राधा(चिडून)- अहो आता काय हॉस्पिटलला न्यायला मुहूर्त शोधणार  आहात का???

असं म्हटल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तो आजींना गाडीत बसवतो. आजींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटल मधून राधाने ताबडतोब  आजींच्या घरी फोन करून कळवलं. आज्जी तिच्याच गल्लीत राहत असल्यामुळे फोन नंबर मिळायला काही अडचण नाही आली. तिने कळवल्यावर आजींची सून सरिता वहिनी ताबडतोब हॉस्पिटलला यायला निघाली. डॉक्टरांनी सलाइन लावलं थोड्याच  वेळात त्या शुद्धीवर आल्या. तसं राधाने लगेच डॉक्टरांना बोलावलं...

डॉक्टर: कसं वाटतय आता??

राणे आज्जी: हो ठीक आहे...

डॉक्टर: ह्या काही गोळ्या आणायला लागतील आणता का  जरा??

असं म्हणल्यावर तो लगेच डॉक्टरांच्या हातातून
prescription घेतो.

तो: हो द्या ना आणतो मी...
असं म्हणून तो औषधं आणायला जातो.

तेवढ्यात सरिता वहिनी आणि सागर दादा दोघेही आले.

राधा:  एका गाडीमुळे आजींना एक्सीडेंट झाला आणि त्या बेशुद्ध झाल्या. 

राधाने घडलेला प्रसंग कथन केला.

त्यावर त्या लगेच म्हणाल्या

राणे आजी: अगं नाही गं मला लो बीपीचा त्रास आहे, त्यात आज उपवास त्यामुळे काही खाल्लं नव्हतं म्हणून चक्कर आली.
त्याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला, ते म्हणाले,

डॉक्टर: अगं उलट त्याने वेळीच गाडी कंट्रोल केली म्हणून बरं नाहीतर आजींना चांगलीच दुखापत झाली असती. आणि त्या बेशुद्ध झाल्या कारण त्यांचं बीपी लो होतं म्हणून..

हे  ऐकल्यावर  राधा चांगलीच ओशाळली.


राधा: (मनातल्या मनात) छे? किती बोललो आपण त्याला! ते ही त्याचं काहीही ऐकून न घेता..... त्याची माफी मागायला हवी...

ती रुमच्या बाहेर येऊन त्याला शोधू लागली,मग तिला आठवलं की तो डॉक्टरांनी सांगितलेली काही औषधे आणण्यासाठी  मघाशीच बाहेर गेलाय....ती त्याची वाट बघत उभी होती. तो आला तसं   ती त्याच्याशी बोलायला जाणार तेवढ्यात तिचा फोन वाजला.

तो औषधं घेऊन आज्जींच्या  खोलीत गेला.
आजींचा मुलगा आणि सून  तिथे आलेले होते.
आज्जींनी एकमेकांना ओळख करून दिली. त्यांच्याशी बोलून झाल्यावर तो तिथून निघाला...

तेवढ्यात राधाचं बोलणं झालं आणि ती आत रुम मध्ये येऊन त्याला शोधत होती....
ते आज्जींना लक्षात आलं. तसं त्या म्हणाल्या...

राणे आज्जी: अगं आत्ताच गेला तो घरी... फार गुणी मुलगा आहे हं... स्वत:ची काहीही चूक नसतांनाही इतका वेळ बिचारा थांबला...

सरीता वहिनी: हो ना... आणि औषधांचे पैसैही घेतले नाही... म्हणाला माझ्या आज्जी सारख्याच आहेत या... आणि आजीकडून कसं पैसे घेणार???


हे ऐकल्यावर तर राधाला अजूनच राग आला स्वत:चा. आपल्याला त्याला साधं sorry पण म्हणता आलं नाही....

तेवढ्यात सागरने येउन सरीताला आज्जीसाठी खिचडी करून आण म्हणून सांगितलं...

सरिता वहिनी: हो आणते... अगं राधा  आईं साठी खिचडी करून आणायची आहे, मी घरी जातेय तुही चल वाटेत तुला सोडते. आणि सागर  आहे हॉस्पिटलमध्ये.

असं म्हणून वहिनी तिला घेऊन गेली ...


राधा:(मनातल्या मनात): sorry म्हणायचं पण राहिलं त्याला... परत कधी भेट होईल आमची???
   
       क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now