मितवा part twenty two

Love story of a young couple

मितवा भाग बावीस

मागील भागात आपण पाहिले कि गोड बोलून राजला सांगून मेघना तिचा मोबाईल पप्पांकडून परत मिळवते. त्यामुळे पप्पांना आपण मात देऊ शकतो हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण होतो..राजकडून नकार काढून घेऊन ती इथून पुण्याला पळून जायचा विचार करते. आता पाहू पुढे...

    आर्यनच्या घरी सुद्धा तणावाचं वातावरण होतं. त्याच्या मॉमच बुटीक बंद पाडलं गेलं होतं, फॅक्टरीतील कामगारांनी संप पुकारला होता. अचानक एका मागून एक त्यांना आघात सहन करावे लागत होते. कुठलीच ओळख.. काहीच कामी येत नव्हतं. त्यात आर्यन सुद्धा मेघनाच्या विरहाने दुःखी रहात होता. त्याला कॉलेजला जावंसं वाटतं नव्हतं, तो कोणाला भेटत नव्हता, बाहेर पडत नव्हता, मित्र मैत्रिणी तर विसरूनच गेला होता. सतत एकटाच त्याच्या रूम मध्ये असायचा. ना नीट खायचा, प्यायचा.. शांत शांत राहायचा. त्याला एकांत आता बरा वाटत होता. आर्यनच्या घरच्यांना त्याची ही अवस्था बघवत नव्हती. आधीच घरावर एका मागून एक संकट येतं होती आणि त्यात आर्यनची ही अवस्था बघून त्याच्या आई वडिलांचा जीव तुटत होता.

एकदा त्याच्या डॅडने त्याच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचे ठरवले. ते त्याच्या रूम मध्ये गेले. काळोख आणि फक्त काळोख.. वह्या, पुस्तकं इकडे तिकडे पडलेली... आणि हा शांतपणे कानाला हेडसेट लावून स्वस्थ पडून होता. त्यांनी जाऊन खिडकीचे पडदे उघडले. अचानक डोळ्यावर उजेड आल्याने आर्यन उठून बसला. बघतो तर सामोर त्याचे डॅड उभे होते.

आर्यन : डॅड.. आप कब आये??

डॅड : बेटा.. आजकल आपको तो होश ही नही रहता.. आप कोयी अलग दुनिया में रहते हो.. वी निड टू स्पीक..
दस मिनिट में अपना हुलिया ठीक करके नीचे आ जाव..

आणि ते रूम मधून निघून जातात. आर्यन पटपट आवरून खाली येतो. खाली सगळेच त्याची वाट बघत बसलेले होते. मॉम, दादी तर त्याला आज आवरलेलं बघून खुश होतात.

मॉम : बेटा.. आज आपको देख के अच्छा लगा.. कितने दिन हो गये आप कमरे से बाहर निकले नही.. खाना, पिना सब वहा पे.. बेटा क्या बात है?? क्यू कर रहे हो ये सब??

दादी : मेरा सोना मुंडा.. क्या हुआ बेटाजी आपको?? मेरे मुंडे को किसी कि नजर लग गयी..

  या सगळ्यात आर्यनचे वडील खूप शांत बसले होते. आई आणि आजीची वेडी माया बोलत होती. पण आर्यनच्या विचित्र वागण्याचा त्याच्या वडिलांना जाब विचारायचा होता.

डॅड :(मॉम आणि दादीला उद्देशून ) जी हो गया आपका? आप लोग ऐसे तारीफ कर रहे हो उसके जैसे उसने बहोत बहादुरी का काम किया है...
(आर्यन मान खाली घालतो )

आर्यन : डॅड.. वो.. आजकल.. मेरा मूड कुछ ठीक नही रहता..

डॅड : जी बेटाजी.. और ये दुनिया तो आपके मूड के हिसाबसे चलने वाली है... कैसे चल रहा है कॉलेज?? कब है एक्साम??

आर्यन : पता नही... बहोत दिन से कॉलेज गया नही..

डॅड : आपको जरा सी भी शर्म नही आ रही क्या??ये क्या तारिका है बात करने का??कॉलेज नही गये.. मतलब क्या? घर पे बैठके क्या करना है?? आपकी पढाई.. फ्युचर के बारे में क्या सोचा है..?
(आर्यनकडे काही उत्तर नसल्याने तो शांत बसतो )
घर पे क्या चल रहा है आपको मालूम है??

आर्यन : आय नो.. कुछ प्रॉब्लेम चल रही है..

डॅड : क्या प्रॉब्लेम चल रही है?? जरा हमे भी बता दो..

आर्यन : वो.. डॅड.. फॅक्टरी पे स्ट्राईक चल रही है..

डॅड : फिर.. क्या सोचा है आपने इसके बारे में..? कैसे सॉल्व करेंगे ये प्रॉब्लेम?? कब आप रिस्पॉन्सीबल बनोगे?

मॉम : बच्चा है वो अभि... फॅक्टरी कि प्रॉब्लेम कैसे सॉल्व कर पायेगा?

डॅड : आप तो कुछ कहिये मत.. आपके बेटे को पता भी है आप के साथ क्या हुआ है??

आर्यन : क्या हुआ?? मॉम क्या हुआ??

डॅड : आप इसी घर में रहते हो ना?? आपको ये भी मालूम नही है कि आपके मॉम का बुटीक बंद करवाया गया है...

आर्यन : व्हॉट??? किसने किया ये सब?? और क्यू??

डॅड : और फॅक्टरी पे अचानक से स्ट्राईक हुई है.. उसका कारण भी आप नही जानते क्या?

आर्यन : नो डॅड.. मुझे कोई आयडिया नही है ये सब किसने और क्यू किया...

डॅड : ये सब मेघना के पिताजी कर रहे है... आपने हमे बताया नही वो ईस शादी के खिलाफ है.. और इसलिये पोलिटिकल पावर इस्तमाल करके हमे परेशान कर रहे है...

आर्यन : व्हॉट??? रिअली?? मुझे तो विश्वास ही नही हो रहा है..

डॅड : हमे बताइये मेघना और आपके बीच क्या हुआ?? क्यू ये सब हो रहा है?

आर्यन : डॅड. मेघना यहा आई थी.. उसके बाद वो कोल्हापूर चली गयी.. उसके पापा से हमारे बारे में बात करने... पर वो तो बहोत रिजिड निकले.. उन्हे ये रिश्ता मंजूर नही है.. क्यूकी हम लोग पंजाबी है.. उनकी पार्टी महाराष्ट्रीयन लोगो के हक के लढती है.. और उनकी बेटी पंजाबी लडके से शादी करेगी तो उनकी इमेज खराब हो जायेगी.. सो उन्होने मेघना कि शादी कही और फिक्स कि है... मेघना के मर्जी के खिलाफ...

मॉम : बेटा.. इतना सब हो गया.. और आपने किसी को भी बोला नही..

डॅड : तो.. आपने क्या सोचा है.. ईस रिश्ते के बारे में?

आर्यन : उसके पापा माने नही तो में वहा जाके मेघना को लेके आऊंगा..

डॅड : (चिडून ) बस..... बस हो गया.. ये कोई फिल्म चल रही है क्या?? आपका दिमाग खराब हो चुका है... उसके पापा हमारे साथ इतना कुछ कर सकते है मतलब आपके जान को भी खतरा  है.. कोई जरुरत नही है वहा जाने कि..

आर्यन : डॅड... बास... तुम्ही असं बोलत आहात?? आपली फॅमिली किती ओपन माईंडेड आहे.. तुम्हाला मेघना पसंद होती..

डॅड : एक बात समजो बेटा.. आप कितना भी मराठी बोल लो.. उसके पापा आपको महाराष्ट्रीयन नही समझएंगे... हा हमारी फॅमिली ओपन माईंडेड है.. हमे लव्ह मॅरेजसे कोई प्रॉब्लेम नही है.. मेघनासे भी कोई प्रॉब्लेम नही है.. जो कुछ भी है उसके पापा का प्रॉब्लेम है... और में हमारी फॅमिलीको, आपको खतरे में नही डाल सकता.. इसलिये आप मेघना को भूल जाओ.. ये शादी नही हो सकती ..

आर्यन : डॅड... डॅड.. प्लीज.. ये मत करो.. में मेघना के बिना नही रह सकता.. आय लव्ह हर..

डॅड : बस.. कल से कॉलेज और पढाई पे ध्यान दो.. मुझे और कुछ सुनना नही है.. अभि जाओ अपने कमरे में..

आर्यन : डॅड.. एक बार मेरी बात तो सुनो.. डॅड..

डॅड : (चिडून ) जाओ.... चुपचाप अपने कमरे में जाओ..

    आर्यन चिडून त्याच्या रूममध्ये निघून जातो. हे काय घडतंय आपल्यासोबत त्याला काही कळेनासं होतं. तिथे मेघना त्रास सहन करतीये आणि इथे मी सुद्धा अडकलो आता.. असा तो विचार करत असतो.. तितक्यात मेघनाचा त्याला फोन येतो. मेघनाचा फोन पाहून तो आश्चर्यचकित होतो. मेघनाने फोन केलाय कि तिच्या पप्पांनी.. त्याला उमगत नाही. पण मेघनाने फोन केला असेल तर तिला काय सांगू हें त्याला काही कळत नाही. म्हणून तो फोन उचलत नाही. मेघना पुण्यात पळून येण्यासाठी त्याला वारंवार फोन करते पण आर्यन एकही फोन उचलत नाही.

क्रमश :

आता पुढे काय होईल? आर्यनचे डॅड लग्नाला तयार होतील का? आर्यन आणि मेघनाचं नातं इथेच संपेल का? मेघना पुण्याला येईल का??पाहूया पुढच्या भागात...

वाचकहो हा भाग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®

 

🎭 Series Post

View all