मितवा part twenty three

Love story of a young couple

मितवा भाग तेवीस

मागील भागात आपण पाहिले कि आर्यनचे वडील सुद्धा आता मेघना आणि आर्यनच्या लग्नाला विरोध करतात. त्यांच्यासाठी घराची आणि आर्यनची सुरक्षितता जास्त महत्वाची असते. आता पाहू पुढे...

मेघना "पुढे काय करायचे? राजला लग्नाला नकार द्यायला सांगू का?" या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी आर्यनला बरेच फोन करते. आर्यन मात्र एकही फोन उचलत नाही. तो फोन उचलून काय सांगणार होता मेघनाला..?तिला नेहमी धीर देणारा आर्यन आज खचला होता. त्याच्या घरातून मेघना आणि त्याच्या नात्याला विरोध होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं त्याला. या गोष्टीचा फारच धक्का बसला होता त्याला. त्याच्या मॉमच बुटीक बंद पडलं, फॅक्टरीमध्ये तणाव सुरु आहे... आणि यासाठी त्याचं मेघनासोबत असणारं नातं जबाबदार आहे या गोष्टीच त्याला वाईट वाटत होतं.
"मेघना... में नही रह सकता तुम्हारे सिवाय.. आय लव्ह यू सो मच.. पर हमारे साथ ये सब क्या हो रहा है..?? में फोन उठाके क्या जवाब दू...??पर मुझे कुछ ना कुछ सोचना पडेगा.. में मेघना को किसी और से शादी नही करने दूंगा.. पर अभी कोल्हापूरभी नही जा सकता.. डॅड को क्या बोलू?? कैसे भी करके अगर मेघना यहा आ सके तो अच्छा रहेगा.. हम लोग फिर यहा शादी कर लेंगे.. क्या करू कुछ समझ नही आ रहा है... घर पे भी इतने प्रॉब्लम चल रहे है.. मेघना आय मिस यू सो मच.. पण आत्ता मी तुझा फोन नाही उचलणार.. माझ्याकडे काही उत्तर नाहीये.. माझ्यामुळे तू प्रॉब्लेम मध्ये नको पडायला..." आर्यनचा विचार चालू होता....

इथे मेघनाला सुद्धा काय करू ते सुचत नव्हतं आर्यनला वारंवार फोन करूनही त्याने फोन उचलला नव्हता. मेघना बेचैन झाली. "काय झालं आहे? आर्यन फोन का उचलत नाहीये?? काय करू आता?? हे तर पक्क आहे कि मी पुण्याला पळून जाणार आहे.. पण मग राजला नकार द्यायला सांगू का?? पण या नकारामुळे पप्पांना माझ्यावर संशय आला तर?? त्या पेक्षा राजला लग्न पुढे ढकलायला सांगते.. म्हणजे माझ्यावर कोणाला संशय येणार नाही आणि मला जरा वेळ सुद्धा मिळेल.. हा.. असचं करते.. पण.. पण आर्यनच्या फॅमिलीच्या सेफ्टीच काय??? आर्यनच्या जीवाला धोका निर्माण झाला तर? तो खरचं ठीक आहे ना?? माझा फोन का उचलत नाहीये पण तो? माझ्या स्वार्था साठी मी त्याच्या फॅमिलीचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे??? ओह गॉड.. मला तर काहीच सुचत नाहीये...
पण लग्न पुढे ढकललं तर माझ्यावर कशाला कोणाला संशय येतोय? पप्पांना खात्री पण पटेल कि मी आर्यनशी बोलत नाहीये.. मग त्याच्या फॅमिलीला कशाला कोण काय करेल?? हा.. हेच करेक्ट आहे.. राजला फोन करून सगळं सांगून टाकते.. आणि मग पुण्याला जायचा प्लॅन करते... पण एकदा आर्यनशी बोलणं झालं असतं ना तर खूप बरं झालं असतं.. पण उगाच उशीर नको करायला.. राजने हे लग्न पुढे ढकलण पण जास्त महत्वाचं आहे... त्याला फोन करून सांगतेच.." मेघनाचे मनोमन विचार चालू होते..

राजसुद्धा  मेघनाच्या विचारात हरवलेला होता. त्याला या दोन तीन दिवसात मेघना फारच आवडायला लागली होती. तिचं हसणं, बोलणं, रडणं, चिडणं... सगळंच खूप छान वाटत होतं त्याला. खरंतर मेघनाशी लग्न करण्याची त्याला फार इच्छा होती. आता फक्त मेघनाने नकार द्यायला लावू नये एवढीच देवाकडे तो प्रार्थना करत होता.मेघनाचे आणि त्याचे लहानपणीचे तो फोटो बघत होता..
"मेघना तुम्ही लहानपणी सुद्धा आम्हाला खूप त्रास द्यायचा.. सतत आमच्याशी भांडत असायच्या.. आणि आता इतक्या वर्षांनी सुद्धा तुम्ही तेच करत आहात.. आम्हाला त्रास देणं तुम्ही सोडलं नाही.. मेघना एकदा तुमच्याशी लग्न होऊद्या.. मग तुम्ही आम्हाला जाणून घ्या.. आमच्याशी पुन्हा मैत्री करा.. आम्हाला खात्री आहे कधी ना कधी तुम्हाला आमच्या डोळ्यातील प्रेम दिसेल.. मेघना का तुम्ही आमच्यावर इतक्या चिडता?? एकदा सुद्धा तुम्ही आमच्याशी नीट बोलल्या नाहीत.. काय आहे त्या आर्यनमध्ये एवढं जे आमच्यात नाही..? आम्ही सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करतो.. प्लीज लग्नाला नकार द्यायला नका लावू.. आम्ही तुटून जाऊ... खूप अवघड होईल आम्हाला हें..." राज फोटो पाहून स्वगत बोलत होता. तितक्यात माई त्याच्या खोलीत आल्या..

माई : अरे वा.. आमच्या सुनेने तर चांगलीच जादू केली आहे तुमच्यावर.. भेटून आला तरी मन भरलं नाही वाटतं... आता फोटो बघत बसले आहात ते..

राज : आई अगं... असं काही नाहीये.. सहजच लहानपणीचे फोटो बघत होतो..

माई : असू दे रे बाळा.. हेच तर दिवस असतात सोनेरी.. जगून घ्या.. नंतर पुन्हा जबाबदाऱ्या मागे लागल्या कि एकमेकांना वेळ देणं कठीण होतं..

राज : आई.. एक विचारू का??

माई: बोला कि..

राज : माझी अजिबात इच्छा नाहीये मेघनाने सतत इथे साडीत वावरावे.. किंवा सतत स्वयंपाकघरात काम करावे.. आम्हाला वाटतं त्यांनी बाहेर पडून स्वतःच अस्तित्व सिद्ध करावं.. कर्तृत्व गजवावं..

माई : हो मग.. वावगं काय आहे त्यात?

राज : नाही अगं.. सारिका वाहिनी साडी नेसते.. आपले सगळे रितिरिवाज मानते.. तिने तर करिअर वर पाणीच सोडलंय आणि अशात मेघनाला सगळं स्वातंत्र्य मिळाल्यावर वहिनीला वाईट नाही वाटणार का??

माई : का वाईट वाटेल?? या आयुष्याचा स्वीकार त्यांनी केला आहे.. तुम्हाला काय वाटतं आम्ही सांगितलं आहे तिला साडी नेसायला?? पण तुझ्या दादाला त्याची बायको साडीत आवडते.. आणि सारिकाला तिच्या नवऱ्याच्या मर्जीत राहायला त्याला मी काय करू? हो तुझ्या पप्पांचे नीती नियम आहेत कडक.. पण आम्ही आहोत कि इथे.. मेघनाची साथ द्यायला..तुम्ही  काळजी करू नका.. त्यांच्या सगळ्या इच्छा इथे पूर्ण होतील...

राज : थँक यू आई.. मनावरच दडपण गेलं..

माई : आम्हाला पण वाटतं मेघना इथे कशी निभावेल.. जरा अल्लड आहेत त्या.. पण लई गुणांची आहे पोर ती.. डोळ्यादेखत लहानाची मोठी झालीये.. म्हणून आम्हाला चिंता नाहीये. आम्ही तर त्यांच्या गृहप्रवेशाची वाट बघतोय.. उद्या मंगळसूत्र आणि इतर दागिने आणायला जायचं आहे.. तुम्ही सुद्धा चला..

राज : हो हो..

माई : झोपा आता.. नाहीतर बसाल सुनबाईसोबत गप्पा मारत..

माई खोलीतून बाहेर पडल्या आणि राजचा फोन वाजला. मेघनाचा फोन पाहून राजच्या मनावर दडपण आलं. आता ती काय म्हणेल.. नकार द्यायला सांगेल का या विचारातच राजने फोन उचलला...

राज : हॅलो.. बोला मेघना.. काय झालं इतक्या रात्री फोन केलात तुम्ही..

मेघना : मी काही निर्णय घेतला आहे.. तो तुला कळवायचा होता..

राज : बोला ना.. काय ठरवलं तुम्ही..?

मेघना : मला हे लग्न मान्य नाही.. मी हे लग्न करणार नाही..

राज :(मेघनाचं उत्तर ऐकून राजचे डोळे भरून आले.. पण त्याने स्वतःला सावरलं...)बरं.. मग काय विचार केला आहे तुम्ही?? आम्ही काय कारण देऊन नकार कळवू?

मेघना : नाही.. नकार नको कळवू.. तू सांग आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला अजून वेळ पाहिजे.. लग्नाला फार घाई होत आहे.. आपण लग्न पुढे ढकलू.. कळलं?

राज : कशाला?? तुम्हाला लग्न करायचं नाही तर स्पष्ट नकार देतो आम्ही.. लग्न पुढे ढकलून काय होणार आहे?

मेघना : लग्न पुढे ढकलून मला इथून निघून जायला वेळ मिळेल आणि लग्न पुढे ढकल्याने कोणाला काही संशय येणार नाही..

राज : आम्हाला हे मान्य नाही.. आम्ही नकार कळवू.. लग्न पुढे ढकलणार नाही.. आमच्या घरच्यांच्या फार आशा आहेत या लग्नाकडून.. आम्ही त्यांना उगाच अंधारात नाही ठेवणार..  त्यापेक्षा लग्न मोडून आम्ही सगळा विषय संपवून टाकतो..

मेघना : तुझा प्रॉब्लेम काय आहे रे? तू प्रत्येक गोष्टीत मला त्रास का देतोस?? तुला कोणी सांगितलं होतं मला लग्नाची मागणी घालायला?? तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे.. आणि तूच ठीक करून दे..

राज : (चिडून ) हो हो.. चुकलं आमचं.. तुम्ही त्या गायकवाड घरण्यातच जायला पाहिजे होत्या.. उगाच तुमच्या काळजीपोटी हा निर्णय घेतला.. पण आता आमच्या अंगाशी आलं हे सगळं.. तुम्हाला जरा सुद्धा कल्पना आहे इथे घरी माई, वाहिनी किती जय्यत तयारी करत आहेत तुमच्या स्वागताची... नाही कदाचित नाही.. कारण तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं प्रेम दिसतं.. आर्यन दिसतो... त्याच्या पलीकडे बाकी कोणी नाही..

मेघना : राज स्टॉप इट.. हो दिसतो फक्त मला आर्यन.. कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम नाही.. आणि जगाला माझी काळजी नाही.. माझ्या भावानांची किंमत नाही तर मग मी का दुसऱ्याचा विचार करू??

राज : दुसऱ्याचा नाही तर निदान त्या आर्यनचा तरी विचार करा.. त्यांच्या जीवाला धोका आहे हे कळत नाहीये का तुम्हाला???काय विचार केला आहे तुम्ही त्या बद्दल???

मेघना : मी इथून पळून जाणार आहे.. एकदा आर्यन कडे गेले कि कोण काही करू शकत नाही त्याला...

राज : मेघना अहो स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या.. काय बोलत आहात तुम्ही?? एका पॉलिटिशनची मुलगी पळून गेली म्हणून जगभर चर्चा होईल.. हे सगळं वाटतय तितकं सोपं नाहीये...

मेघना : पण मला नाही करायचं तुझ्याशी लग्न.. मला नाही आवडत तू.. माझं काय करायचं ते मी बघेन..

राज : तुम्ही तुमचा हट्टी पणा काही सोडणार नाही.. मग ठीक आहे.. आम्ही  लग्न पुढे ढकलणार नाही.. तुम्हाला आम्ही आवडत नाही ना? नाही करायचं ना हे लग्न?? मग उद्या सकाळी आम्ही तुमच्या पप्पांना फोन करून नकार कळवतो..

   असं म्हणून राज चिडून फोन ठेवून देतो...

क्रमश :

आता पुढे काय होईल? राज नकार कळवेल? त्यावरुन मेघनाच्या पप्पांना मेघनावर संशय येईल?? का खरचं मेघना पळून जाईल??? पाहूया पुढच्या भागात..

वाचकहो हा भाग कसा वाटला?? मला नक्की सांगा.. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®



 

🎭 Series Post

View all