मितवा भाग सव्वीस
मागील भागात आपण पाहिले कि आर्यनच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून मेघना राजसोबत लग्नाला तयार होते... आणि आपल्या रागामुळे मेघनाला खूप त्रास झाला.. तिला बरंच काही सहन करावं लागलं याचं राजला वाईट वाटत असतं.. आता पाहू पुढे ..
आर्यन आज सकाळीच लवकर आवरून नाश्ता करायला खाली आला. घरातल्या सगळ्यांना आज त्याला बघून बरं वाटलं. सगळ्यांचा नाश्ता करून झाला.. आणि आर्यनने त्याच्या मॉमला विचारले..
आर्यन : मॉम.. आपने बुटीक के बारे मै क्या सोचा है?
मॉम : मेरी ऍडव्होकेट से बात हुई है..अभी देखते है क्या हो सकता है...
डॅड : बेटा.. आप आज कॉलेज जा रहे हो ना??
आर्यन : डॅड में सोच रहा हू ईस साल एक्सटर्नल एक्साम दू.. कॉलेज जाने का मन नही है..
डॅड : क्यू अपनी लाइफ बरबाद कर रहे हो?? अभी बच्चे हो.. पहला प्यार ये सब फिल्मी बाते है...
आर्यन : डॅड.. इट्स नॉट इजी.. मेघना को भूल जाना आसान नही है.. और में उसको भुलना भी नही चाहता..
डॅड : फिर वही बात.. आपकी जान को खतरा है ये इतनी सिम्पल बात आपके समजमे नही आती क्या??
आर्यन : क्या करू मेघना के बिना जीके??
डॅड : वो बकवास लव्ह नॉव्हेल पढना छोड दो.. थोडा प्रॅक्टिकल बनो आर्यन... आपकी और मेघना कि शादी नही हो सकती...
मॉम : बेटा मुझे भी यही लग रहा है.. भूल जाओ मेघना को.. ईस रिश्ते कि वजह से बहोत प्रॉब्लम्स हो रही है..
आर्यन : मॉम आप भी??? दादी आप तो कुछ बोलो.. आपकी कि तो उस जमाने मै लव्ह मॅरेज हुई थी..
दादी : बेटा.. यहा बात लव्ह मॅरेज कि नही है.. यहा पुरे परिवार कि सुरक्षा कि बात है..
आर्यन : मतलब आप लोग मुझे साथ नही देंगे??
डॅड : मैने कल आपको मेरा फैसला सुना दिया है.. अभी मुझे ईस बात पे बिलकुल डिस्कशन नही करना है..
आर्यन :मुझे लगा कल आपने घुस्से मै ये सब बोला..
डॅड :मैने सब सोच समजके ये डीसाईड किया है बेटा.. अभी जाओ.. पढाई करो.. ईस साल एक्सटरनल एक्साम दो.. में बात करता हू कॉलेज में.. जाओ..
आर्यन : डॅड.. इनफ..में बच्चा नही हू.. मैने मेघना को वादा किया है कि में जल्द ही उसे लेने आऊंगा...
डॅड : आर्यन... आपका दिमाग खराब हो चुका है.. आपको कोई जरुरत नही है कोल्हापूर जाने कि.. मेघना कि शादी किसी और से हो रही है.. आप एक पॉलिटिशन कि बेटी को शादी से भगा के ले आओगे?? ये है आपकी सोच??
आर्यन : हा.. में उसे भगा के ले आऊंगा... और यहा नही.. हम कही दूर चले जायेंगे..
मॉम : आर्यन बेटा.. चूप हो जाओ... तमीज नाम कि कोई चीझ है भी या नही?? ये क्या तरिका है डॅड के साथ बात करनेका?? और कहा चले जाओगे आप?? बेटा सपनो कि दुनिया से बाहर चले आओ..
आर्यन : मै सपनो मै नही जी रहा मॉम.. हकीकत ये है कि में मेघना के बगैर नही जी सकता...
डॅड : आपके सब कार्ड्स मै ब्लॉक करने वाला हू.. कार कि चाबी भी लेने वाला हू.. बस हो गया...चूप चाप घर पे बैठके पढाई करो...
आर्यनला आता राग अनावर झाला. त्याला मेघनाला न भेटता आल्याने असह्य झालं..रागाच्या भरात त्याने टेबलवरचा काचेचा ग्लास फोडला आणि त्याच्या डॅडकडे देऊन तो बोलला...
आर्यन : ये लो डॅड..अब इससे मेरी जान ही लेलो आप.. मुझे कोई इंटरेस्ट नही है ऐसे मेघना के बगैर जिने में..
त्याचं हे कृत्य बघून त्याची मॉम पटकन त्याच्या जवळ येते.. तो अर्धवट फुटलेला ग्लास त्याचा हातातून घेऊन फेकून देते आणि आर्यनला चपराग देते..
मॉम : ईस लिये हमने आपको पाल पोसके बडा किया है?? क्या कर रहे हो आप?? बेटा बात को समझो.. हम आपके दुश्मन नही है.. आपके, हमारे परिवार के भले के लिये ये सब कर रहे है.. हम आपके प्यार के खिलाफ कभी नही थे.. पर मेघना के पापा ईस बात को समझते नही.. वो सब हमारे जान के पीछे पडे है.. समझो ईस बात को बेटा... ये पागलपन छोड दो...
आर्यनचा आता बांध सुटला आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो जमिनीवर बसून रडायला लागला.. त्याची ही अवस्था त्याच्या आईवडिलांना बघवत नाही. त्यांनी त्याला जवळ घेतलं.. त्याचे अश्रू पुसले.. आणि त्याचे डॅड आता समजावत म्हणू लागले..
डॅड : बेटा जिंदगी में हम जो चाहते है जरुरी नही है हमे वो मिले.. ये जिंदगी हमारे मर्जी के हिसाब से नही चलती.. कभी कभी कुछ बाते हमे पीछे छोडके आगे निकलना पडता है... हम आपका दर्द समझते है.. हमारे लिये आपकी जान से बढकर कुछ नही है बेटा.. चलो जाओ अपने कमरे में.. और अपना हुलिया ठीक करो.. और आजसे फ्रेश स्टार्ट करो.. बिती बातो को भूल जाओ...
आर्यनला कसं बसं समजावून त्याचे मॉम डॅड त्याला रूम मध्ये पाठवतात.. त्यांना मनोमन आपल्या मुलाबद्दल वाईट वाटत होतं. पण परिस्थितीपुढे ते सुद्धा हतबल झाले होते..
इथे राज सुद्धा घरी पोहोचतो. अचानक सकाळी कोणाला न सांगता राज घराबाहेर पडल्याने घरी सगळेच चिंतीत होते. त्याला घरी आलेलं पाहून त्याचे वडील म्हणजेच देशमुख त्याला विचारतात..
देशमुख : इतक्या सकाळी सकाळी चहा नाश्ता न करता कुठे गेला होता तुम्ही??
राज : सहज फिरायला गेलो होतो पप्पा..
देशमुख : लग्न ठरलं आहे तुमचं.. मनाला येईल तसं वागणं बंद करा आता..
राज : मनाला येईल तसं वागायला आमच्या मनाप्रमाणे घडतंय काय?
देशमुख : म्हणजे??? काय बोलत आहात तुम्ही??
राज : पप्पा हे लग्न म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही घातलेला घाट आहे ना??
माई : राज काय बोलत आहात तुम्ही?? तुम्ही विसरला का पप्पांसामोर उभे आहात ते??
राज : माई आज आम्हाला बोलू दया... पप्पा सांगा आम्हाला...
देशमुख : सकाळी सकाळी काय नशा करून आलात कि काय?? मेघनाशी लग्न करण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केलीत म्हणून आम्ही पाटलाकडे शब्द टाकला... यात काय आलंय राजकारण?
राज : हो पप्पा.. कारण गायकवाड घराण्यात मेघनाचं लग्न व्हावं ही आमची इच्छा नव्हती.. पण आम्हाला वाटतय मेघना खुश नाहीये.. आपण हे लग्न मोडूया का?
देशमुख : अशी फालतू बडबड पुन्हा आमच्या पुढ्यात केली ना तर याद राखा.. तुमचं मेघनाशीच लग्न होणार.. यात तुमची किंवा त्यांची इच्छा असो वा नसो...
माई : राज.. चला वर.. चला तुमच्या खोलीत... उगाच काहीतरी बरळू नका...
असं म्हणून माई राजला खोलीत घेऊन जातात.. आणि विचारतात..
माई : काय झालं? मेघना काही बोलल्या का तुम्हाला? काल रात्री पर्यंत तर खुश होता.. आत्ता अचानक काय झालं?? आणि डोळे का सुजले तुमचे? रडलात कि काय??
राज : काही नाही आई... आम्हाला सहज वाटलं आमच्या आयुष्याचं राजकारण होतंय म्हणून.. बाकी काही नाही.. आम्ही आहोत ठीक...
असं म्हणून राज माईंना खाली पाठवतो. राजची द्विधा मनस्थिती झालेली.. त्याला मेघना आवडत होती, लग्न सुद्धा करायचं आहे तिच्यासोबत.. पण जोरजबरदस्तीने नाही... आणि त्यात आज त्याच्यामुळे मेघनाला जे काही सहन करावं लागलं होतं त्याने अजून वाईट वाटत होतं.. तिचं पायापडून रडणं, आर्यनच्या जीवाची भीक मागणं सगळं पाहून त्याचं मन सुन्न झालं होतं.
क्रमश:
आर्यन कोल्हापूरला येऊ शकत नाही.. मेघनाने आर्यन आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लग्नाला होकार दिला आहे... राजला जबरदस्ती मेघनाशी लग्न करायचं नाहीये.. आता ही परिस्थिती या तिघांना कुठे नेऊन ठेवेल पाहूया पुढच्या भागात....
वाचकहो आजचा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा.. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा.
धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा