मितवा भाग सत्तावीस
मागील भागात आपण पाहिले कि मेघनाने परिस्थितीचा स्वीकार केला आहे.. आर्यनला खूप जड जात आहे मेघनाला विसरायला आणि राजला जोरजबरदस्तीने मेघनाशी लग्न करायचं नाहीये. एकंदरीत तिघे हतबल झाले आहेत आणि अजिबात खुश नाहीयेत. आता पाहू पुढे....
********काही दिवसांनंतर *********
मेघना आणि राजचे लग्न हा सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. मीडिया तर या लग्नाचे प्रत्येक विधी लोकांपर्यंत पोहचवत आहे. राज आणि मेघनाचं लग्न महाबळेश्वरमधल्या एका पंचांतारांकित हॉटेल मध्ये पार पडणार आहे. दोन दिवसाच्या मोठ्या लग्न सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी मोठे मोठे राजकारणी मंडळी, सिनेस्टार, उद्योगपती यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.आदल्या दिवशी राज आणि मेघनाचा साखरपुडा होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी हळद आणि लग्नाचे विधी होणार असून संध्याकाळी मोठी रिसेपन्शन पार्टी आहे.
मेघनासाठी तर तिच्या पप्पांनी डिझायनर साड्या, दागिने, मोठे मोठे नावाजलेले मेकअप आर्टिस्ट सगळ्यांची सोय केली होती.मेघनाची खोली तर नाना प्रकारचे कपडे आणि दागिने यांनी भरून गेली होती.आज संध्याकाळी नुकताच मेहंदी आणि चुडा भरायचा कार्यक्रम पार पडला होता. दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी साखरपुडा आणि लग्न यासाठी महाबळेश्वरला निघणार होती.बरीच रात्र झाली होती, तरी मात्र मेघनाला झोप काही येत नव्हती. ती हातावर काढलेली मेहंदी आणि हिरवागार भरलेला चुडा याकडे एकटक बघत बसली होती.त्या चुड्यात भरलेल्या देशमुखांच्या काही खानदानी पाटल्या होत्या. मेघनाला तर त्या जणू हातातील बेड्यांप्रमाणे भासत होत्या. तिचं लक्ष मेहंदीत काढलेल्या 'R'या अक्षराकडे गेलं. मेघनाची इच्छा नसतानाही त्या मेहंदी आर्टिस्टने मागे लागून तो 'R' तिच्या हातावर काढला होता.मेहंदीत काढलेला 'R' काही दिवसांनी निघून जाईल पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या राजला आता मी रोखू शकत नाही असं तिला वाटलं. तिचे डोळे भरून आले. तिने चटकन मोबाईल हातात घेतला आणि आर्यन आणि तिचे फोटो बघू लागली... फोटो बघताना तिला भरून आलं..
"आर्यन... आपण किती खुश होतो ना एकमेकांसोबत.. काय झालं हे आपल्यासोबत?? तू न्युज मध्ये माझ्या आणि राजच्या लग्नाच्या बातम्या बघत असशील.. तुला किती वाईट वाटत असेल ना?? बहुतेक म्हणूनच तू मला फोन केला नाही.. घेऊन जाणार होतास ना मला इथून?? बघ.. उद्या साखरपुडा आहे माझा.. किती महिने झाले तुला भेटले नाही.. तुला पहिलं नाही.. आणि कदाचित आता परत कधी तुला पुन्हा भेटू शकणार नाही... आर्यन तू खूप खुश रहा.. आयुष्यात पुढे जा.. तू नाही माझा मितवा बनू शकला..
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर राज म्हटला तसं माझं तुझ्यावरचं प्रेम जिंकत आहे... कारण तुझा जीव वाचवण्यासाठी, तुझ्या फॅमिली साठी मी हे लग्न करतीये... तुझ्यावर खूप प्रेम करतीये म्हणूनच मी हे पाऊल उचललं आर्यन... आणि बरं झालं तू मला फोन नाही केलास किंवा मला घ्यायला नाही आलास.. तुला पाहून मी कमजोर पडले असते... आर्यन मी खूप खूप प्रेम करते तुझ्यावर.. तुझं फेव्हरेट गाणं अजूनही माझ्या ओठांवर आहे...
कधी तू कळले तरी ना कळणारे..
दिसले तरी ना दिसणारे..
विरणारे मृगजळ एक क्षणात...
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात....
कधी तू.... कधी तू.....
आर्यन खरंच तू मृगजळासारखा माझ्या आयुष्यात आलास.. कधीच तुझ्यापर्यंत मी पोहोचू नाही शकले.. आणि हो तू मिटलेल्या पापण्यातच भेटतोस मला.. कारण डोळे उघडले कि हे विदारक सत्य माझ्या समोर उभं राहतं... आर्यन मी तुला कधीच विसरू नाही शकणार.. जेवढे महिने आपण एकत्र होतो ना त्या आठवणीच्या आधारे मी आयुष्य काढणार आहे माझं.."
मेघना आर्यनचा विचार करत रडत रडतच झोपी गेली.
इथे आर्यन रात्र होण्याचीच वाट बघत होता. संध्याकाळीच त्याने कारची दुसरी चावी डॅडच्या रूममधून आणली होती. आता फक्त सगळे झोपले कि तो कार काढून थेट कोल्हापूर गाठणार होता.आज नेमके त्याचे डॅड रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करत बसले होते. आर्यन ते कधी झोपत आहेत याची वाट बघत होता. रात्रीचे दोन वाजले, त्याचे डॅड झोपायला स्टडी मधून त्यांच्या रूम मध्ये गेले आणि आर्यनचा जीव भांड्यात पडला. थोड्या वेळाने आपण कोल्हापूरसाठी रवाना होऊया असं त्याने ठरवलं.गेल्या काही दिवसात आर्यनने मेघनाला कॉल, मेसेज काही सुद्धा केलं नव्हतं.
आर्यनच्या वागण्यातून त्याच्या डॅडला वाटलं कि तो मेघनाला विसरला आहे. मेघनाने सुद्धा लग्नाला होकार दिल्याने अप्पा पाटलांनी आर्यनच्या परिवाराला देत असणारा त्रास थांबवला होता. पाटील लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.. या गोष्टीचा फायदा घेऊन आर्यन मेघनाकडे निघाला होता.. आणि पहाटे तो कोल्हापूरसाठी रवाना झाला.
सकाळी सात वाजता मेघनाचा फोन वाजला. रात्री उशीरा झोपल्याने मेघना अजून साखर झोपेतच होती. अर्धवट डोळे उघडून तिने मोबाईलचा स्क्रीन पाहिला तर त्यावर आर्यन कॉल्लिंग असं पाहून ती ताडकन उठली. क्षणभर तिला आनंद झाला.. तिने पटकन फोन उचलला..
मेघना : आर्यन.....
आर्यन : तेरी निगाहें
पा गयी रहे पर तू यह सोचे जाऊ ना जाऊ
यह ज़िंदगी जो है नाचती तो
क्यों बेड़ियों में है तेरे पाँव
प्रीत कि धून पर नाचले पागल...
उडता अगर है, उडने दे आंचल..
मितवा... कहे धडकने तुझसे क्या...
चलो... मितवा.. दस मिनिट मै तयार होके नीचे आ जाओ..में वेट कर रहा हू...
मेघना : (अतिशय खुश होऊन ) हो हो... लगेच येते.. थांब... (आणि तितक्यात तिचं लक्ष मेहंदी आणि चुड्याकडे जातं आणि ती भानावर येते )
आर्यन... तू कुठे आहेस??
आर्यन : मी तुझ्या घराजवळ आलोय.. तुला घ्यायला आलोय.. लवकर ये..
मेघना : तू का आलास?? स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे कि नाही??
आर्यन : माझा जीव तुझ्यात अडकला आहे.. प्लीज लवकर ये..
मेघना : थांब.. मला पाहू दे.. कुठे आहेस तू..
(मेघना तिच्या खोलीच्या बाल्कनीतून बघते.. तर घरापासून थोडंसं दूर थांबलेली आर्यनची कार तिला दिसते... पण मीडिया वॅन तिच्या घरखाली उभ्या असल्याने ती पटकन पुन्हा रूम मध्ये जाते )
आर्यन : मेघना.. सॉरी मुझे लेट हुआ.. पर इट्स ओके.. हम अभी भाग जाते है..
मेघना : तू मूर्ख आहेस का?? शक्य नाही ते.. तुझ्या जीवाला धोका आहे.. प्लीज गो...
आर्यन : नाही.. तुला घेतल्या शिवाय मी नाही जाणार...
मेघना : आर्यन तुला कळतंय का??उद्या माझं लग्न आहे... मी कशी पळून येऊ तुझ्यासोबत? खाली मीडिया वाले थांबले आहेत.. सगळी मोठ मोठी लोकं आज महाबळेश्वरला पोहोचतील.. आणि मी असं पळून जायचं तुझ्यासोबत? चांगलं दिसतं का ते?? लोकं काय म्हणतील?
आर्यन : मेघना तू लोकांचा विचार का करतीये?? लोकं चार दिवस बोलतील आणि गप्प राहतील... मेघना प्लीज ये ना...
मेघना : आर्यन फक्त आणि फक्त तुझ्या काळजीपोटी मी हे लग्न करतीये.. तुला वाटतंय हे तितकं सोपं नाहीये.. प्लीज तू जा.. तुला काही झालं ना तर मी आयुष्य भर स्वतःला माफ करू शकणार नाही...
आर्यन : मेघना.. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय... मी असाही मरून जाईन तुझ्याशिवाय..
मेघना :(रडारडत )चूप.. एकदम चूप.. तुझ्या जीवासाठी मी हे सगळं करतीये.. आणि तू मरणाच्या गोष्टी काय करतोयस??? ऐक माझं.. प्लीज जा.. मी नाही येऊ शकत...
आर्यन : मेघना.. आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा तू आत्ता स्वतःचा विचार कर आणि निघून ये.. नंतर काही करू शकणार नाही तू.. ऐक माझं..
मेघना : आर्यन तू माझं ऐक.. तुझ्या जीवाला धोका आहे.. प्लीज.. माझ्यासाठी तू निघून जा.. मला विसरून जा.. नको येऊस परत.. प्लीज...
आर्यन : जो पर्यंत तुझं लग्न होत नाही तो पर्यंत मी तुझी वाट बघणार.. महाबळेश्वरला सुद्धा असाच बाहेर थांबणार.. बघ तू.. तू कधीही येऊ शकतेस.. मी आहे तुझ्यासाठी...
मेघना : आर्यन.. नको ना रे मला त्रास देऊस.. मला तुझी काळजी वाटतीये..प्लीज जा इथून...
आर्यन : तू ये.. मगच मी जाईन..
मेघना : सॉरी.. ते शक्य नाहीये... मी नाही येणार... मी पळून नाही जाणार.. सॉरी...
असं म्हणून मेघनाने फोन ठेऊन दिला. आर्यन कोल्हापूरला आल्याने मेघनासाठी हे लग्न करणे आता अजूनच अवघड झाले होते. पाटलांच्या घरातील मंडळी साधारण दहा वाजता महाबळेश्वरला जायला निघाली. मेघनाची कार सुद्धा महाबळेश्वरसाठी रवाना झाली. मेघनाने बंगल्याच्या बाहेर पडताना पुन्हा मागे वळून पाहिले तर लांब आर्यनची कार तिथे थांबलेलीच होती.
क्रमश :
आता पुढे काय होईल? मेघना तिचा निर्णय बदलेल का? ती आर्यनसोबत पळून जाईल का?? अप्पा पाटलांना कळेल आर्यन कोल्हापूरला आला आहे ते?? पाहूया पुढच्या भागात..
वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे. हा भाग आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा