Login

मितवा part twenty four

Love story of a young couple

मितवा भाग चोवीस

मागील भागात आपण पाहिले कि मेघनाला काही सुचत नसते कि पुढे काय करावे... आर्यन सुद्धा फोन उचलत नाही.. शेवटी ती राजला फोन करून सांगते कि हे लग्न पुढे ढकलूया हे त्याने सर्वांना सांगावे.. पण राज मात्र या गोष्टीला तयार होत नाही... आता पाहू पुढे..


मेघना सोबत बोलून झाल्यावर राजला खूप वाईट वाटतं... त्याला मेघनाशिवाय काही सुचत नसतं. एखाद्यावर प्रेम करून जेव्हा ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही हे मेघनाचं दुःख तो समजू शकत होता.. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले..स्वतःला तो कसतरी सावरू शकत होता मात्र त्याला चिंता त्याच्या घरच्यांची होती. माई फारच खुश होत्या... त्यांना लग्न मोडण्याची बातमी समजताच त्या निराश होतील.. तो हताश होऊन विचार करत होता...
"का देव माझ्यासोबत असं वागतोय?? मी वेडा झालो त्या मेघनाच्या प्रेमात.. आणि त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला का मिळणार?? माई, वाहिनी, पप्पा.. यांना काय सांगू मी... का हे लग्न मोडतोय मी?? का मेघना बोलत आहेत तसं लग्न पुढे ढकलू??? नाही.. नाही.. खूप झालं.. मेघनासाठी खूप केलं आम्ही... आमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या पुढ्यात ठेवलं आम्ही .. पण त्यांना किंमत नाहीये... त्यांना तर वेड लागलय.. काय तर म्हणे पळून जाणारे.. त्यांना माहित नाहीये अप्पा पाटील काय आहेत... त्या आर्यनच्या जीवाला धोका.. पण त्यांना किती समजावून सांगितलं आम्ही.. त्यांना कळतच नाही... त्या परिस्थितीचा स्वीकार करायला तयारच नाहीत.. त्यांना वाटत आहे कि आम्हाला फक्त त्यांच्याशी लग्न करण्यात रुची आहे... पण तसं नाहीये.. हे लग्न काही आमच्यासाठी पण सोपं नाहीये.. आम्हाला माहितीये त्या कधीच आमच्यावर प्रेम करणार नाहीत... पण आता बास.. खूप केलं आम्ही... त्याच्या बदल्यात आम्हाला नेहमी अपमान सहन करावा लागतोय.. आम्ही लग्न पुढे ढकलणार नाही. या सगळ्यात आमच्या घरच्यांना आम्ही त्रास होऊ देणार नाही.... आता जे होईल ते होईल... आम्ही हे लग्न मोडणार.. आम्हाला या सगळ्याचा फार त्रास होतोय आता..उद्या फोनवर नाही तर पाटलांच्या घरीच जाऊन लग्न मोडून येतो... " राजने हे लग्न मोडण्याचा निर्धार केला.

इथे मेघना आता वारंवार राजला फोन करत होती. तिला आता भीती वाटत होती कि खरचं राजने हे लग्न मोडलं तर पप्पांना तिच्यावरच संशय येईल आणि मग तिचं काही खरं नाही...
"आर्यन फोन उचलत नाहीये.. इथे हा राज फोन उचलत नाहीये.. काय करू मी आता??? आणि या राजला इतकं चिडायला काय झालंय?? लग्न पुढे ढकलायला याला काय प्रॉब्लेम आहे??उगाच बढाया मारत होता तुमची इच्छा असेल तेच होईल... आणि काय मैत्रीचं नातं निभावू... असं असतं का मैत्रीचं नातं? पण खरंच त्याने उद्या पप्पांना नकार कळवला तर मी काय करू??"मेघनाचा मनोमन विचार चालू असताना तिथे तारा अक्का येतात..

तारा अक्का : मेघू बेबी.. काय झालं? काय ठरवलं तुम्ही?? राज राव काय बोलले? आर्यनरावंशी काही बोलणं झालं का??

मेघना : तारा अक्का अगं खूप कंटाळले आहे.. सगळ्यांची मनं नाही सांभाळू शकत.. आर्यन पण फोन उचलत नाहीये.. आणि राज लग्न पुढे नाही ढकलणार त्या उलट तो स्पष्ट नकार कळवणार आहे..

तारा अक्का : अरे बापरे.. म्हणजे साहेब परत चिडणार..

मेघना : अक्का.. मी आत्ताच इथून पळून जाऊ का?? मला काही सुचत नाहीये..

तारा अक्का : आत्ता?? इतक्या रात्री??? नाही नाही बेबी.. आम्ही नाही सोडणार तुम्हाला..

मेघना : अक्का अगं मी काय करू?? मला हे सगळं असह्य झालं आहे..

तारा अक्का : तुम्ही आर्यनरावांना इथे बोलवा.. आणि त्यांच्या सोबत जा.. एकट्या कुठे जाऊ नका... आम्ही मदत करू.. पण त्यांना आधी इथे बोलवा...

मेघना : एकदा त्याला परत फोन करते..
असं म्हणून मेघना पुन्हा आर्यनला फोन करते.. मेघनाने सारखे फोन केल्याने आर्यन आता फोन उचलतो...

आर्यन : हॅलो... मेघना.. कैसी हो?

मेघना : थँक गॉड.. तुमने फोन पिक किया.. कहा थे तुम?? कितनी बार फोन किया मैने.. तुम ठीक हो ना??

आर्यन : येस.. बोलो ना मेघना..

मेघना : आर्यन क्या तुम मुझे यहा लेने आ सकते हो क्या?? अरे.. राजला मी लग्न पुढे ढकलायला सांगितलं पण तो उद्या स्पष्ट नकार कळवणार आहे.. आणि मग पप्पांना सगळं कळेल कि हे का घडलं.. मला आता इथे नाही राहायचं.. तू ये ना.. मला इथून घेऊन जायला...

आर्यन : मेघना अब क्या बताऊं तुम्हे.. डॅडने ईस शादी से मना किया.. तुम्हारे पापा कि वाजह से फॅक्टरी में प्रॉब्लेम चल रही है और मॉम का बुटीक बंद पडा.. सो डॅड के लिये मेरी सेफ्टी ज्यादा इम्पॉर्टन्ट है... इसलिये उन्होने शादी के लिये मना किया...

मेघना : आता हेच ऐकायचं बाकी होतं.. मी समजू शकते तुझ्या डॅडची मनस्थिती.. पप्पांच्या वतीने मी माफी मागते..

आर्यन : मेघना.. आय स्टील लव्ह यू.. तुम्हे माफी मांगने कि जरुरत नही.. में आता हू तुम्हे लेने.. डोन्ट वरी.. बस मुझे थोडा टाइम दो.. अभी डॅड बहोत अपसेट है...

मेघना : ठीक आहे आर्यन.. मी तुझी वाट बघेन.. माझ्या लग्नाला तीन आठवडे आहेत.. आणि त्यात उद्या नकार कळवल्यावर काय होईल माहित नाही... पण मी वाट बघेन तुझी...

आर्यन : आय लव्ह यू.. में हू तुम्हारे साथ... डोन्ट वरी.. जल्दी वहा आऊंगा..

मेघना : वेटिंग फॉर यू... बाय...

    मेघना फोन ठेवते.. आर्यनसोबत बोलून तिला बळ मिळालं होतं.. उद्या होणाऱ्या गोष्टींचा सामना करायला ती तयार होते.

तारा अक्का : बेबी काय झालं?

मेघना : आर्यन येईल.. नक्की येईल.. त्या वेळेस मी तुला सांगेन.. मला इथून जायला तू मदत कर....

तारा अक्का : हो बेबी.. तुमच्या सुखासाठी काही पण करू आम्ही...
      आणि तारा अक्का रूम मधून जातात... मेघना आता उद्या येणाऱ्या संकटाचा सामना करायला सज्ज झालेली असते... आर्यन तिला घेऊन जाणार हे तिच्या मनात पक्क बसलेलं असतं.. ती शांत झोपी जाते.
    
     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच राज पाटलांच्या घरी पोहोचतो. इतक्या सकाळी राजला घरात बघून पाटील आश्चर्यचकित होतात.

अप्पा पाटील : या या बसा.. राजराव. आज सकाळी सकाळी आलात.. मेघनाला भेटायचं आहे का?

राज : नाही तुमच्याकडेच काम आहे..

अप्पा पाटील : बसा ना.. चहा पीत पीत बोलू..

राज : नाही.. बसायला नको आणि चहा पण नको...

अप्पा पाटील : काही घडलंय का??मेघना काही बोलली का तुम्हाला?? आज तुम्ही बसायला सुद्धा तयार नाही..

राज : हो...आम्ही यापुढे या घरात येणार नाही.. कारण आम्ही हे लग्न मोडत आहोत...

अप्पा पाटील : काय??? काय झालं?? असं अचानक हा निर्णय?? काही चुकलं का आमचं?? माफ करा आम्हाला.. पण हे लग्न मोडू नका..

राज : पप्पा तुम्ही कशाला माफी मागताय? काय झालं याचं उत्तर तुम्हाला मेघना देईल...येतो आम्ही..

अप्पा पाटील : राजराव.. अहो थांबा.. आमच्यासाठी थांबा...
( पाटील चिडून मेघनाला आवाज देतात..)
मेघना.... मेघना.. खाली या पटकन.. मेघना...

पप्पांचा चिडलेला स्वर ऐकून मेघना लगबगीने खाली येते. खाली येऊन बघते तर समोर राज आणि पप्पा उभे होते...

मेघना : काय झालं पप्पा??

अप्पा पाटील : काय केलं तुम्ही?? काय बोलला तुम्ही राजरावांना?? ते हे लग्न मोडायला आलेत.. आणि कारण तुम्हाला विचारा असं बोलत आहेत..

मेघना : हो पप्पा.. मीच त्याला हे लग्न मोडायला लावलं आहे..

अप्पा पाटील : काय???? का??

मेघना : कारण मी आर्यनवर प्रेम करते... त्याला नाही विसरू शकत.. मला राज आवडत नाही...

अप्पा पाटील : (जोरात ओरडून ) मेघना... काय वाटेल ते बोलू नका.. तुमच्या डोक्यातून ते खुळ गेलं नाही का??? निर्लज्जसारखं बोलू नका... समोर तुमचा बाप आणि होणारा नवरा उभा आहे ..

मेघना  : माझा होणारा नवरा फक्त आर्यन आहे..

अप्पा पाटलांना आता राग अनावर झाला. त्यांनी जोरात मेघना असं बोलून मेघनावर हात उगारला.. तितक्यात राज त्यांच्या मध्ये आला..

राज : पप्पा अहो.. सांभाळा स्वतःला.. काय करत आहात हे??

अप्पा पाटील : बास आता..आता या तरी जगातील नाहीतर आम्ही तरी.. आम्हीच विष घेऊन मरतो.. जिवंतपणी ही मुलगी आमच्या तोंडाला काळं फासतीये. त्यापेक्षा मेलेलं बरं..

राज : पप्पा अहो राहू दे.. त्यांचं प्रेम आहे त्या मुलावर.. करू दे ना त्यांना लग्न...

अप्पा पाटील : पंजाबी मुलासोबत??? या जन्मात ते शक्य नाही.. तुमच्या वडलांना आम्ही वचन दिलं आहे...
मेघनाचं तुमच्याशीच लग्न होणार..

राज : आम्हाला नाही करायचं हे लग्न...

मेघना : हो मला पण हे लग्न मान्य नाही..

अप्पा पाटील : मेघना... तोंडातून शब्द काढू नका... थांबा... त्या मुलाला बघतोच आम्ही... आता काही खरं नाही त्याचं...

मेघना :पप्पा तुम्ही आर्यनला काही करणार नाहीये... पप्पा... प्लीज ..

राज : अहो पप्पा... जाऊ दे ना..

अप्पा पाटील : तो मुलगा जिवंत राहावा अशी इच्छा असेल तर गप गुमानं राजरावांसोबत लग्न करा...

क्रमश :
आता काय होईल पुढे? मेघना तिचं प्रेम विसरून जाईल?आर्यन तिला घ्यायला येईल? अप्पा पाटील आर्यनच्या जीवाचं काही बरं वाईट करतील? पाहूया पुढच्या भागात ...

वाचकहो हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा... आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®


 

🎭 Series Post

View all