मितवा part three

Love story of a young couple

मितवा.. भाग तीन 

काही तांत्रिक अडचणीमुळे मला मितवाचे भाग पुन्हा पोस्ट करावे लागत आहेत. वाचकांचा अधिसारखाच प्रतिसाद अपेक्षित आहे. धन्यवाद. 

मागील भागात आपण पाहिले की नकळत मेघनाला आर्यन आवडू लागतो, पण अजूनही तो तिच्याशी बोलायला आलेला नसतो, आता मात्र मेघना स्वतःहून त्याच्याशी बोलायला जाणार तोच तिला समजतं की त्याला कुणीतरी आवडतं आणि तिला अश्रू अनावर होतात... आता पाहूया पुढे... 


   मेघना आज फार रडते..  तिला फार वाईट वाटत असतं.  इतके दिवस आपण ज्याच्या विचारात मग्न होतो त्याच्या  मनात कुणीतरी भलतीच मुलगी आहे हे ऐकून तिला फार वाईट वाटत होतं. अतिशय फिल्मी असणाऱ्या मेघनाला आज कुछ कुछ होता है मधली काजोल झाल्यासारखं वाटत होतं. मन हलकं करण्यासाठी शेवटी  ती तो सिनेमा बघत बसते. पण त्यातलं 'प्यार दोस्ती है ' हे वाक्य ऐकून तिला पुन्हा आर्यनची आठवण येते. 
"आर्यन आणि माझ्यात साधी मैत्री सुद्धा झाली नाही..  मी कधीच असा विचार केला नव्हता की मला एखादा मुलगा आवडेल तर त्याच्याशी एक शब्द बोलायचा पण योग येणार नाही.. कदाचित यालाच आयुष्य म्हणतात.. 
आपण उगाच फिल्मी दुनियेत सफर करत असतो... प्रत्येक स्टोरीचा दी एन्ड चांगला नसतो..आज मला हे चांगलंच समजलं.. बास उद्यापासून नो आर्यन.. त्याचा विचार बंद.. इथे मी शिकायला आलीये.. आता शिक्षणाकडे लक्ष देऊ.. " असं तिने ठरवलं... आणि नेहमीप्रमाणे ती दुसऱ्यादिवशी कॉलेजला गेली. 

            नेहमी आनंदी आणि उत्साही असणारी मेघना आज फार शांत होती. हा बदल तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आला.. त्यांनी तिला विचारलं पण तिने अभ्यासाचं टेन्शन म्हणत विषय टाळला. मेघना आता खूप गप्प राहायची, वेळ मिळाला की लायब्ररीमध्ये जाऊन बसायची. तिने मैत्रिणींसोबत फिरणं पण बंद केलं होतं. पण सिया मात्र तिच्या सोबत नेहमी असायची. सिया तिच्यासोबत असायची खरं पण तिच्या तोंडात नेहमी आर्यनचं नाव असायचं. तिची आणि आर्यनची चांगली मैत्री झाली होती. बऱ्याचदा सिया आर्यनच्या ग्रुपसोबत फिरायला पण जायची. मेघनाला सतत आर्यनचं नाव ऐकून त्रास व्हायचा पण मग अशावेळी ती पुस्तकात डोकं घालून बसून राहायची. 
एक दिवस सहजच सियाने तिला विचारलं.. 
"ए मेघना तुला आर्यन कसा वाटतो गं??? "

मेघना एकदम कावरीबावरी झाली.. "कसा वाटतो म्हणजे?? काय प्रश्न आहे हा?? " मेघना म्हणाली. 

"अगं म्हणजे बघ ना कॉलेजमधल्या कितीतरी मुलींना तो आवडतो.. आणि का नाही आवडणार.. तो आहेच तसा..  एकदम भारी दिसायला.. सगळ्यांना त्याच्याशी बोलावंसं वाटतं.. तसं तुला कधी वाटलं नाही का?? "
सियाने विचारलं. 

"मला एक सांग तू त्याची बेस्ट फ्रेंड आहेस का माझी??  किती कौतुक चाललंय तुझं त्या आर्यन बद्दल.. आणि मला का बोलावंसं वाटेल.. फक्त तो चांगला दिसायला आहे म्हणून?? मग मी नाहीये का चांगली दिसायला?? 
आणि असं पण चेहऱ्यावरून तर त्याच्यात अति अटीट्युड आहे असं वाटतं.. मला अशी मुलं आवडत नाहीत.. तुला माहितीये ना मी किती फिल्मी आहे.. मला एखादा चॉकलेट बॉय आवडेल... आर्यन तर माझ्या टाईपचा नाहीये..."मेघना स्वतःच्या भावना लपवण्यासाठी खोटं बोलली. 

"अगं तुला काय लग्नासाठी स्थळ नाही आणलंय त्याचं..  इथे फक्त मैत्रीचा विषय चालूये.. आणि मी बोलते ना त्याच्याशी तर मला अजिबात त्याच्यात अटीट्युड आहे असं वाटत नाही... तो खूप फ्रेंडली आहे.. "सिया म्हणाली. 

"असू दे फ्रेंडली.. मी काय करू? बरं मला एक सांग..  तुम्ही सगळे फिरायला जाता तेव्हा त्याची गर्लफ्रेंड असते  का गं?? "मेघनाने हिंमत करून विचारलं.

"गर्लफ्रेंड अजून झाली नाहीये गं.. त्याला फक्त ती आवडते... "सिया म्हणाली. 

"म्हणजे?? तुझा एवढा हिरोसारखा दिसणारा मित्र.. त्याला नाही म्हणाली का ती मुलगी..? " मेघना आता जरा खोदून खोदून विचारत होती. 

"अगं नाही कशाला म्हणतीये... तिला माहित पण नाहीये आर्यनला ती आवडते म्हणून.. इथे तर सगळा प्रॉब्लेम आहे ना... "सिया बोलत होती पण तेवढ्यात तिला आर्यनचा फोन आला.. 

"हॅलो.. हा बोल ना...अभी??? कौनसा मुव्ही???..  अच्छा.. ठीके.. आती हू मै.. हम लोग यहा क्लासमे है.. आ ना तू इधर.. "म्हणत तिने फोन ठेवला आणि मेघनाला म्हणाली.. "मेघना
मुव्हीचा प्लॅन बनतोय.. तू पण चल.. "

"कोण कोण आहे? "मेघनाने विचारले.

"आर्यनचा ग्रुप.. तू आणि मी.. चल तुझी ओळख पण करून देते सगळ्यांशी... "सिया म्हणाली. 

"ह्या.. मी काही येणार नाही...  मला काही इंटरेस्ट नाहीये  त्या आर्यनसोबत मैत्री करण्यात.. त्याला म्हणावं जा त्या मुलीशी ओळख कर आधी... चल बाय.. निघते मी.. " म्हणत मेघना वर्गाच्या बाहेर जायला निघाली तोच तिच्या मागे उभा असणाऱ्या आर्यनला धडकली. 
    
     'ओह सॉरी' म्हणायला गेली तर बघते आर्यनला धडकलो आपण गडबडीत... आज पहिल्यांदा दोघांची नजरेला नजर भिडते.. मेघनाला आर्यनच्या डोळ्यात एकदम शांत भाव दिसतात.. तो ही तिच्या डोळ्यात बघतो.. पण  खूप चिडके भाव असतात तिच्या डोळ्यात.. 
      
     तो मेघनाला इट्स ओके म्हणतं स्मित करतो.. पण चिडलेली मेघना त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाते. 
अशी अचानक चिडून निघून गेलेल्या मेघनाकडे आर्यन आणि सिया बघतच राहतात. 

"अरे यार क्या तेरी दोस्त.. मुझसे बात भी नही करती."आर्यन सियाला म्हणतो. 

"अरे बघ ना.. ऐकतच नाही.. किती बोलले तिला चल आमच्यासोबत.. तुझी ओळख करून देते.. पण ती तुझं नाव ऐकून चिडते.. "सिया म्हणाली. 

"ओह गॉड.. कैसे करू फ्रेंडशिप तू बोल अभी..  ती बघतच नाही माझ्याकडे... कैसे बोलू उसको दॅट आय लाईक हर व्हेरी मच.. "आर्यन म्हणाला. 

"अरे मी किती प्रयत्न केले.. तिला तुझ्याबद्दल किती काय चांगलं सांगितलं.. पण ती का चिडते तुझं नाव ऐकून माहित नाही " सिया हताश होऊन म्हणाली. 

"आज फर्स्ट टाइम मैने उसको इतनी करीब से देखा.. शी इज  सो ब्युटीफुल.. आणि तिचे डोळे..  जस्ट अमेझिंग.. पर शायद वो मुझे पसंद नही करती.. क्या करू.. भूल जाऊ  क्या उसे? "आर्यन म्हणाला. 

"ओय रोमिओ.. विसरून कशाला जातोय.. त्या पेक्षा हिंमत करून एकदा बोल ना तिच्याशी.. काहीतरी कर.. बघून स्माईल दे." सिया आर्यनला काही पर्याय सुचवत होती.. 

"आत्ता बोललो ना.. इट्स ओके बोललॊ आणि स्माईल पण केलं.. पण तुझी फ्रेंड..देखा भी नही यार उसने.. निघून गेली.. क्या करू.. बोल.. "आर्यनला काही सुचेनासं झालं होतं.. 
"आर यू शुअर उसे कोई और पसंद नही है.. नाहीतर ती असं का वागतीये..मी काय केलंय यार.. इतकी का चिडते माझ्यावर..? फर्स्ट डे पासून बघतोय.. बघतच नाही माझ्याकडे.. एकदा पार्किंग मध्ये होतो.. उसने देखा भी नही मुझे..  ऐसे ही गाडी निकालके चली गयी.. " आर्यन बोलला. 

"थोडी आहे ती तशीच.. नाही बोलत मुलांशी जास्त.. पण काही पर्याय नाहीये.. आता तुलाच स्वतःहून बोलावं लागणार आहे.. आता कसं आणि काय याचा जरा विचार करावा लागेल.. "सिया बोलली आणि दोघे जण कसं मेघनाशी बोलायचं याचा विचार करत बसले.. 

क्रमश:

आर्यन आणि मेघनामधील गैरसमज दूर होतील?  मेघनाला समजेल की आर्यनला तिच आवडते? 
बघूया पुढच्या भागात... 

वाचकहो कथा कशी वाटतीये ते मला नक्की सांगा.. 
तुमच्या प्रतिक्रिया अमूल्य आहेत.. 
धन्यवाद. 
सिद्धी भुरके ©️®️

🎭 Series Post

View all