मितवा भाग सोळा
मागील भागात आपण पाहिलं कि मेघना पप्पांसोबत बोलण्यासाठी कोल्हापूरला जाते. ती पप्पांकडे आर्यनचा विषय काढते मात्र तिचे पप्पा देखील विरोध करतात. मेघना तिथून निघून जात असताना ते जमिनीवर कोसळतात. आता पाहू पुढे...
मेघना कसला आवाज झाला म्हणून मागे वळून बघते तर अप्पा पाटील जमिनीवर कोसळलेले असतात. ती पप्पा पप्पा करत धावत त्यांच्याकडे जाते. अक्का आणि घरातील नोकर चाकर सगळे जमा होतात. अप्पा पाटील छातीला हात लावून कळवळत असतात, त्यांना घाम फुटलेला असतो. मेघना सगळ्यांच्या मदतीने त्यांना गाडीत बसवते आणि अक्कांसोबत हॉस्पिटलला जाते.त्यांच्या मागून गार्डस आणि इतर मंडळी येतच असतात.
हॉस्पिटल मध्ये डॉक्टर लगेच पाटलांना ऍडमिट करतात आणि त्यांच्यावर उपचार सुरु करतात. पाटलांना मुलीच्या वागण्याचा प्रचंड धक्का बसल्याने त्यांना हृदय विकाराचा झटका आलेला असतो. मेघनाचं तर रडणं थांबतच नसतं. अक्का तिच्याजवळ जाऊन तिला आधार देतात. मेघना त्यांच्या कुशीत जाऊन एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडते.
मेघना : अक्का बघ ना.. माझ्यामुळे पप्पांना काय झालं ते.. मी खूप वाईट आहे.. मी कधीच स्वतःला माफ करणार नाही.
अक्का : मेघू बेबी.. शांत व्हा आधी.. रडू नका अशा.. तुम्ही खूप गुणी बाळ आहात.. तुमच्यामुळे काही झालं नाही साहेबांना.. डोळे पुसा आधी.. चला..
तितक्यात तिथे नर्स येऊन मेघनाला डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलावते. मेघना अक्का सोबत तिथे जाते.
डॉक्टर : या.. मिस पाटील बसा..
मेघना : डॉक्टर.. हाऊ इज पप्पा ??
डॉक्टर : ही इज ऑल फाईन नॉव.. त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता.. तुम्ही वेळेत आणलं म्हणून बरं झालं.. पण आता काळजीचं कारण नाही..
मेघना : थँक गॉड.. पण असं अचानक काय झालं पप्पांना? ते अगदी व्यवस्थित होते संध्याकाळपर्यंत...
डॉक्टर : होऊ शकत असं.. वाढतं वय.. कामाचा लोड.. मानसिक तणाव कशामुळे पण होऊ शकत.. पण आता पुढचे काही दिवस त्यांना कामाचा स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस अजिबात द्यायचा नाही.. एवढी मात्र काळजी घ्या..
मेघना: हो डॉक्टर.. मी त्यांची काळजी घेईन.. ते खाली मीडियावाले उभे आहेत.. आपल्याला त्यांना सगळं सांगितलं पाहिजे...
डॉक्टर : शुअर.. मी सांगतो मीडियाला.. डोन्ट वरी..
तो पर्यंत बाहेर पाटलांच्या पार्टीतील बरेच सहकारी बाहेर येऊन उभे असतात. सगळे जण मेघनाला येऊन भेटत असतात मात्र मेघना फारशी कोणाला ओळखत नसते. तितक्यात समोरून देशमुख काका येतात. पाटलांचा अगदी घनिष्ट मित्र आणि राजकारणातील सहकारी सुद्धा. मेघना देशमुख काकांना लहानपणापासून ओळखत असते. त्यांना समोर बघून तिला बरं वाटतं.
मेघना : काका बरं झालं तुम्ही आलात.. मला कोणाशी काय बोलू समजतच नव्हतं..
देशमुख : काळजी करू नका बेटा.. अप्पा लवकर बरा होइल.. तुम्ही जा बसा तिथे.. आम्ही इथे सगळं सांभाळतो..
मेघनाला जरा हायस वाटतं आता. ती मोबाईल हातात घेते आणि बघते तर आर्यनचे खूप मिस्ड कॉल्स असतात.. बरेचसे मेसेज पण असतात. ती त्याला फोन करायला जाते तेवढ्यात पप्पांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो. ती या सगळ्याला स्वतःला जबाबदार मानत असते. "माझ्या मुळे पप्पा आज हॉस्पिटलमध्ये आहेत.. मी आर्यन सोबत बोललेलं चांगलं नाही वाटणार.. सध्या जरा शांत राहावं.. आर्यनचा काही विषय काढायला नको.. काही दिवसांनी बघू.. पण आर्यनला कळवलं पाहिजे.. तो बिचारा तिथे पुण्यात माझ्या काळजीने वेडा होइल.. त्याला काय घडलंय ते सांगितलं पाहिजे.. फोन नको करायला.. त्याला मेसेज करते.. " असं स्वतःशी म्हणत मेघना घडल्या प्रकाराबद्दल त्याला मेसेज करते आणि काही दिवस बोलायला नको असं सुद्धा सांगते.
इथे आर्यन बेचैन झालेला असतो. तो संध्याकाळपासून मेघनाला फोन करत असतो. त्यात बातम्यांमधे मेघनाच्या पप्पांबद्दल त्याला समजत. त्याला फक्त एकदा मेघनाचा आवाज ऐकायचा असतो. तेवढ्यात मेघनाचा त्याला मेसेज येतो. मेसेज वाचून त्याला कोल्हापूरला काय घडलं असेल याची पूर्ण कल्पना येते. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मेघना तिथे एकटीच लढा देतीये या विचाराने तो रडायला लागतो.
"ये सब क्यू हो रहा है हमारे साथ?? क्या गल्ती है हमारी?? बस हम दोनो एक दुसरेसे प्यार करते है और जिंदगीभर साथ रहना चाहते है.. कितने प्रॉब्लेम आ रहे है? और मेघना वहा बिलकुल अकेली है.. में वहा जा नही सकता.. क्या करू अब?? और उसने कहा बात भी नही कर सकते कुछ दिन.. कैसे रहू में?? " आर्यन स्वतःशीच बोलत मेघनाचा फोटो बघून रडायला लागतो. मात्र थोडे दिवसांचा प्रश्न आहे.. मेघनाचे पप्पा बरे झाले कि ती येईल पुण्याला असा विचार करून शांत होतो.
*****काही दिवसांनंतर ********
काही दिवसांनी अप्पा पाटील बरे होऊन घरी येतात. मेघना या सगळ्याला स्वतःला जबाबदार मानत असल्याने ती अजून आर्यनशी बोलतच नसते. एक दिवस मेघना तिच्या पप्पांच्या रूम मध्ये जाते.
मेघना : पप्पा.. मला तुमच्याशी बोलायचं आहे..
अप्पा पाटील : बोला ना बेटा.. काय झालं?
मेघना : पप्पा मला माफ करा.. या सगळ्याला मी जबाबदार आहे.. मी खूप वाईट मुलगी आहे पप्पा.. तुम्ही माझ्यासाठी किती काय करता.. पण मी तुमच्याशी कसं वागले बोलले.. मलाच माझी लाज वाटतीये.. प्लीज पप्पा मला माफ करा.. (मेघना रडायला लागते )
अप्पा पाटील :बेटा इथे या आधी.. अजिबात रडू नका.. तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये म्हणून हा अप्पा आयुष्यभर झटला आहे.. आणि तुम्ही रडताय?? तुम्ही जबाबदार नाही या सगळ्याला.. आमचं कामच असं आहे कि स्ट्रेस येतो.. त्यामुळे झालं हे सगळं.. नका रडू.. चला या पप्पांकडे..
असं म्हणतं पाटील आपल्या लेकीला मिठी मारतात. तिचे डोळे पुसतात. आता मेघनाला सुद्धा बरं वाटतं. इतके दिवस दडपणाखाली जगत असल्याने ती आज खुलून हसते.
मेघना आता तिच्या पप्पांना काय हवं, काय नको ते जातीने बघत असते. मेघनातील हा बदल अक्का आणि पाटलांच्या लक्षात येतो. त्या दोघांना सुद्धा मेघनाचं हे रूप बघून बरं वाटतं. आता बरेच दिवस झालेले असतात मेघना कोल्हापूरला राहून. ती आता कॉलेजसाठी पुण्याला निघायच्या तयारीत असते.
"पप्पा मी विचार करतीये उद्या निघावं आता.. खूप दिवस झाले कॉलेजला गेले नाहीये.. परीक्षा पण जवळ आलीये.. "मेघना पाटलांना बोलते.
"काय बेटा कॉलेजचं घेऊन बसला आहात.. आम्ही बोलतो कॉलेज मध्ये.. आता जरा रहा बापासोबत." पाटील बोलतात.
"पप्पा परीक्षा जवळ आलीये.. मला जावंच लागेल.. परीक्षा झाली कि लगेच येइन.. "मेघना बोलते.
"उद्या तर तुम्ही जाऊच शकत नाही.. देशमुखाने आपल्याला घरी बोलावलं आहे त्याच्या.. "पाटील सांगतात.
"देशमुख काकांनी?? का बरं?? काय झालं?? "मेघना विचारते.
"अगं आम्ही बरे झालो ना.. म्हणून जेवणाचा घाट घातलाय त्यानं.. उद्या तुला सुद्धा यावं लागेल.. "पाटील बोलतात.
"अच्छा.. बरं.. मग उद्या जाऊ आपण.. मी त्या नंतर निघेन पुण्याला.. "असं म्हणत मेघना तिच्या रूम मध्ये जाते.
अप्पा पाटील समोरच उभ्या असणाऱ्या अक्कांना बोलतात,
"अक्का तुम्ही पुण्यात राहून काय केलं?? माझ्या पोरीची वाट लागली.. लक्ष कुठे होतं तुमचं?? "
अक्का : साहेब... आम्ही मेघू बेबीला खूप समजावलं होतं.. पण त्या ऐकल्या नाहीत..
अप्पा पाटील : म्हणजे तुम्हाला हे प्रकरण माहित होतं.. तुम्ही आमच्याशी खोटं बोलला??
अक्का : माफ करा साहेब.. मेघू बेबीच्या प्रेमापोटी बोललो आम्ही..
अप्पा पाटील : तुमचं आमच्या लेकीवर प्रेम आहे म्हणून तर शांत बसलो आम्ही.. यापुढे आम्ही काही मेघनाला पुण्याला सोडत नसतो...
असं म्हणत पाटील तिथून निघून जातात. अक्का वादळा पूर्वीच्या या शांततेला ओळखतात. त्यांना मेघनाची खूप काळजी वाटू लागते.
क्रमश :
आता पुढे काय होईल? मेघना परत कधीच पुण्याला जाऊ शकणार नाही? ती आर्यनशी बोलेल कि नाही? आर्यन आता काय करेल? अप्पा पाटलांच्या मनात नक्की काय चालू आहे?? पाहूया पुढच्या भागात...
वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा.. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे.. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा.. धन्यवाद..
सिद्धी भुरके ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा