मितवा part six

Love story of a young couple

मितवा भाग सहा

मागील भागात आपण पाहिले की मेघना आणि आर्यनमध्ये आता मैत्री होते आणि थोडेफार बोलणे पण होते. मात्र मेघनाला अजून माहित नाहीये की आर्यनला आवडणारी मुलगी तीच आहे.. आता पुढे....


दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे मेघना कॉलेजला येते. नेहमी तिच्यानंतर उशीरा येणारा आर्यन आज लवकर येऊन वर्गात बसलेला असतो. मेघनाकडे बघून तो स्माईल करतो.. मेघना सुद्धा स्माईल करून आपल्या जागी जाऊन बसते. ती तिच्या बेंचवरून बघते आर्यन काहीतरी लिहीत असतो. इतकं मन लावून हा मुलगा काय लिहितोय मेघनाला प्रश्न पडतो. जाऊन बघावं का काय चालू आहे याचं असा ती विचार करते आणि त्याच्या बेंचजवळ जाऊन उभी राहते.

"हाय... काय करतोयस?? इतकं मन लावून अभ्यास करतोयस का??? "मेघना विचारते.

"ओह.. हाय.. नो नो.. एक गाना लीख रहा हू.. "आर्यन बोलतो.

"तू कविता वगैरे करतोस का?? वाटत नाही तुझ्याकडे बघून... "मेघना हसून बोलते.

"नाही कविता नाही.. मला एक मराठी गाणं खूप आवडतं.. ते लिहितोय.. "

"खरंच??? मराठी गाणं??? वा क्या बात है!!!"

"हो.. आय लव्ह थिस सॉंग.. 'कधी तू'...क्या अमेझिंग मिनिंग है गाने का... "

"नॉट बॅड आर्यन... तुम्हारी ये साइड पता नही थी मुझे..."

"कसं माहित असणारे तुला..  आत्ता तर फक्त ओळख झाली आहे आपली.. "
आर्यनने मेघनाचे वाक्य तिला सुनावले..

"हम्म.. पण तू का लिहितोय हे?? "मेघनाने विचारले.

"मला असं वाटतं हे गाणं म्हणजे माझे फीलिंग्स आहेत..  मला त्या मुलीसाठी काय वाटतंय ते म्हणजे हे गाणं आहे.. जब कभी उसे दिल की बात बोलुंगा ना तो ये  उसे दिखाऊंगा.... "आर्यन बोलला.

मेघनाला वाटलं किती रोमँटिक आहे हा मुलगा.. खूप लकी आहे ती मुलगी.. मेघनाचा चेहरा पडला.

"सो... व्हाट्स युअर सॉंग??? "आर्यनने विचारले.

"माय सॉंग??? म्हणजे??? "मेघना गोंधळून म्हणाली.

"असं गाणं जे तुला खूप आवडतं... वो गाना जो तुम्हारी फीलिंग्स है... "आर्यन म्हणाला.

"ओह.. मला ना ते मितवा गाणं फार आवडतं..
मितवा कहे धडकेने तुझसे क्या...
मितवा ये खुदसे तो ना तू छुपा.... " मेघनाने सांगितलं.

"मग???? "आर्यन म्हणाला.

"काय??? म्हणजे??? मला नाही समजलं "मेघनाला आर्यन काय बोलला ते समजलं नाही.

आर्यन काहीसा हसला आणि म्हणाला, "हे गाणं ना एकदा नीट शांतपणे ऐक.. म्हणजे कळेल मला काय म्हणायचं आहे.. " तेवढ्यात प्रोफेसर वर्गात आले आणि मेघना आपल्या जागेवर जाऊन बसली.

आज तिचं वर्गात लक्ष नव्हतं. डोक्यात आर्यन काय बोलत होता हा विचार चालू होता आणि मितवा गाणं आठवत होती. तिने विचार करता करता ते गाणं आपल्या वहीत लिहिलं..
"मेरे मन ये बता दे तू.. किस और चला है तू..
क्या पाया नही तुने.. क्या धुंड रहा है तू..
मितवा कहे धडकने तुजसे क्या..
मितवा ये खुद से तो ना तू छुपा.... "
वारंवार ती या ओळी वाचू लागली.. ते वाचून तिला वाटलं,
"खरंच आपण जगाशी खोटं बोलू शकतो.. पण स्वतःसोबत नाही.. मला आर्यन आवडायला लागला आहे..याचा मी जगासमोर स्वीकार नाही केला तरी स्वतःशी मी नाही खोटं बोलू शकत... "

सगळे लेक्चर संपले, आर्यन वर्गाबाहेर पडतच होता  तितक्यात मेघनाने त्याला आवाज दिला.
"आर्यन... वेट... "
आर्यन थांबला.. मेघना आणि सिया आर्यनकडे गेल्या.

"क्या हुआ..??? "आर्यनने विचारले.

"मुझे तुमसे बात करनी है... वो...."मेघना जरा बिचकत बोलत होती.

"बोल ना.. क्या बोलना है.. "आर्यन म्हणाला.

"हा मेघना बोल ना..असं अडखळत का बोलतीयेस?? " सियाने सुद्धा विचारले.

"ते.. मला.. नंबर द्यायचा आहे.. म्हणजे नंबर घायचा पण आहे.. ते आर्यन काल विचारत होता ना.. "मेघना म्हणाली.

"कसला नंबर?? अगं ठीक आहेस ना??? "काय बोलतीयेस?? "सियाने विचारलं.

"अरे यार.. आर्यन काल तू माझा नंबर मागितला होता ना.. तर मला नंबर द्यायचा आहे तुला... "मेघना म्हणाली.

"ओह.. हा दे ना..  "आर्यन म्हणाला आणि दोघांनी नंबर एक्सचेंज केले.

मेघना घरी आली. तिने आज ठरवलं होतं की त्याला आपल्या मनात काय आहे ते सांगायचं.. भले मग त्याला कोणी पण आवडत असू दे.. म्हणूनच आज तिने स्वतःहून आर्यनला नंबर दिला होता. बराच वेळ झाला.मेघना आर्यनच्या फोनची किंवा मेसेजची वाट बघत होती. पण आर्यनने काही तिला फोन केला नाही.
सारखा फोन चेक करत होती ती.. काही कळत नव्हतं तिला की आर्यनने साधा मेसेजसुद्धा का केला नाही?
एवढा स्वतःहून नंबर दिला मी.. आता त्याने बोलायचं तरी माझ्याशी... जाऊ दे मी नाही आता त्याला स्वतःहून फोन करणार... असं चिडून मनाशी ठरवलं.

इथे आर्यनने ठरवलं होतं की "आज फार घाई नको करायला.. काल मी फार चुका केल्यात.. घाईत नंबर मागितला..आज लगेच नको बोलायला.. काल तिच्याशी मेसेंजरवर बोलायची पण घाई केली.. आज थांबू.. " म्हणून आर्यन तिला फोन वगैरे नाही करत.

दुसऱ्या दिवशी काहीशी चिडूनच मेघना कॉलेजला येते. आज पण आर्यन तिच्या आधीच वर्गात आलेला असतो. तसा खुश पण दिसत असतो. तो मेघनाकडे बघून स्माईल करतो. तेवढ्यात सिया मेघनाकडे येते आणि म्हणते..
"तुला माहितीये का.. आर्यनला 'त्या' मुलीचा नंबर मिळाला आहे... "
मेघनाला अजूनच राग येतो, तितक्यात आर्यन सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो,
"फायनली मुझे उसका नंबर मिला...  "

"मग काय रात्रभर तिच्याशी चॅटिंग करत होतास का?? "
मेघना चिडूनच बोलली.

आर्यन उगाच तिला चिडवायला म्हणतो, "हो.. मग काय..  रातभर हम लोग बात कर रहे थे.. "

आता मात्र मेघनाचा बांध सुटतो, तिच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.. आर्यन ते बघतो आणि विचारतो,
"मेघना आर यू ओके??? "

आणि मेघना काही न बोलता वर्गाच्या बाहेर पळत सुटते.
सिया सुद्धा तिला बऱ्याच हाका मारून थांबवायचा प्रयत्न करते.. पण मेघना काही थांबत नाही.
आर्यन तिच्या मागे धावत जातो आणि तिला आवाज देतो..

"मेघना.. मेघना.. रुक.. क्या हुआ... प्लीज स्टॉप.. "
पण ती रडतरडतच त्याला उत्तर देते,

"आर्यन प्लीज गो... मला नाही बोलायचं तुझ्याशी.. जा तू.. "

आर्यन पटकन तिचा हात पकडून तिला मागे खेचतो.
"मेघना.. स्टॉप..प्लीज.. "

"आर्यन सोड माझा हात... मला नाही बोलायचं तुझ्याशी.. जा ना तू.. बोल तुझ्या त्या गर्लफ्रेंडशी.. "
मेघना रडतरडत म्हणते.
आता आर्यन तिला स्वतःच्या जवळ खेचतो..आणि तिच्या नजरेत नजर घालून बोलतो..

"काय बोललीस..?? माझी गर्लफ्रेंड?? कोण आहे बरं ती?? "

मेघना त्याच्या नजरेचा सामना नाही करू शकत.. नजर फिरवून ती बोलते..

"तीच.. जिच्याशी रात्रभर बोलत होतास.. म्हणून माझ्याशी नाही बोललास ना.. मी एवढा काल तुला नंबर दिला.. तू साधा मेसेज पण केला नाहीस..काय प्रॉब्लेम आहे तुझा?? तू का मला नेहमी दुर्लक्ष करतोस?? मी काय केलंय तुला?? कोण आहे ती मुलगी जिच्यापुढे तुला माझं प्रेम दिसत नाही...??? "मेघना रागाच्या भरात तिचं प्रेम व्यक्त करून गेली....

क्रमश :

आता आर्यनची प्रतिक्रिया काय असेल??
आता तरी दोघे एकमेकांवर प्रेम आहे हे कबूल करतील का???
बघूया पुढच्या भागात...

वाचकहो तुम्हाला कथा कशी वाटतीये ते मला नक्की सांगा.. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे.. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा.. तुमच्या कंमेंट्स मला चांगलं लिहायला प्रेरीत करतात.. धन्यवाद..
सिद्धी भुरके©®



 

🎭 Series Post

View all