Sep 29, 2020
प्रेम

मितवा भाग एक

Read Later
मितवा भाग एक

मितवा  भाग -एक 
      एस. एम. कॉलेजच्या आवारात मोठी आलिशान गाडी येऊन थांबली. तसं त्या कॉलेजमधे अशी आलिशान गाडी येणं काही नवीन नव्हतं. पुण्यातील एक नंबरचं कॉलेज आणि बरीच मोठ्या घराण्यातील आणि श्रीमंत मुलं तिथे शिकायला यायची. आज त्या गाडीतून एक सुंदर, सोनेरी केसांची, उंच, सडपातळ मुलगी बाहेर पडली. सगळे अगदी तिला वळून वळून बघत होते. होतीच मेघना एखाद्या राजकन्येसारखी सुंदर... कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकारणात मोठे नाव असणारे अप्पा पाटील यांची एकुलती एक कन्या मेघना पाटील.. मेघना घाई घाईतच फर्स्ट इयरच्या वर्गात गेली. कॉलेजचा पहिलाच दिवस आणि तिला उशीर झाला होता.वर्गात ती प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पहिल्याच दिवशी मेघनाच्या दोन तीन मैत्रिणी झाल्या.. आणि मेघनाची कॉलेजची घडी बसली. बरीच मुलं तिच्याशी बोलायचा आणि मैत्री करायचा प्रयत्न करत पण मेघना कधी कोणाशी स्वतःहून बोलायला जायची नाही. 
       लहानपणापासून अतिशय लाडात वाढलेली मेघना जरा अति फिल्मी होती.. लहानपणापासून यश राज आणि करण जोहरच्या सिनेमांची तर तिने पारायणे केली होती. एका वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली असायची. तिचे आयुष्याच्या जोडीदाराबाबत असेलेले फंडे जरा वेगळेच होते.. तिला कोणीतरी पंजाबी गोरा, उंच मुलगा हवा होता, जो तिला अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज करेल एकदम सिनेमात दाखवतात ना तसंच.. आणि मग ती त्याच्या साठी करवा चौथ व्रत करेल.. वगैरे वगैरे अशा भन्नाट अपेक्षा बाळगून होती मेघना. तिला अगदी त्या करण जोहरच्या सिनेमातल्या हिरोची तिचा जोडीदार म्हणून अपेक्षा होती. 
            बघता बघता कॉलेज सुरु होऊन एक महिना झाला सुद्धा. आज वर्गात सगळ्या मुलींची एकच चर्चा चालू होती.. मेघनाच्या मैत्रिणीची पण कुजबुज चालू होती. 
"अगं काय झालंय.. आज वर्गात कोणाबद्दल एवढी चर्चा चालूये?? "मेघनाने सियाला विचारले. 
"अगं आपल्या वर्गात आज एक लेट ऍडमिशन न्यू कमर येणारे.." सिया म्हणाली. 
"मग काय..? इतकी का चर्चा होतीये? कोणी फिल्मस्टार  येणारे का? " मेघना म्हणाली. 
"अगं काही जणींनी त्याला कॉलेजच्या ऑफिसमध्ये पाहिलं आणि तो खरचं एखाद्या फिल्मस्टार सारखा आहे दिसायला.. "सिया बोलली.
      आणि तितक्यात वर्गात आर्यन मल्होत्राने पाऊल टाकले. सगळ्या मुलींच्या काळजाचे ठोके चुकले.. खरचं  आर्यन दिसायला अगदी करण जोहरच्या सिनेमातला हिरोच होता. मेघनाही त्याला बघत बसली. तो मेघनाच्या समोरून गेला आणि एका बेंचवर जाऊन बसला. पहिला मुलगा होता हा आर्यन ज्याने मेघनाकडे वळूनही पाहिलं नव्हतं, त्याने चक्क चक्क तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मेघनाला त्याचा जरा रागच आला. पण पहिल्यांदाच तिला पण कोणत्यातरी मुलाकडे बघतच रहावे असं वाटत होतं. तेवढ्यात प्रोफेसर वर्गात आले आणि सगळे जण आपापल्या बेंचवर जाऊन बसले. मेघना स्वतःला आर्यनकडे बघण्यापासून रोखू शकत नव्हती.तिचं वर्गात आज अजिबात लक्ष नव्हतं.  बघता बघता सगळी लेक्चर संपली.. वर्ग सुटला...आणि आर्यन आपल्या नवीन झालेल्या मित्रांसोबत गप्पा मारत पुन्हा एकदा मेघनाला न बघता निघून गेला..  
       मेघनाने ठरवले,  "बास आता.. इतका काय हा भाव खातोय.. आपण उगाच याच्याकडे वेड्यासारखं बघत बसलोय.. आपणही त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही.." 

 क्रमश:
 
आर्यन मेघनाकडे बघेल? त्यांच्यात मैत्री होईल? का मेघना मनात राग धरून त्याच्याशी कधी बोलणारच नाही?? मेघनाच्या मनातून आर्यनचा विचार जाईल??? 
काय होईल ते पुढच्या भागात नक्की बघूया... 

सिद्धी भुरके ©®

Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..