मितवा भाग एकोणीस

Love story of a young couple..

मितवा भाग एकोणीस

मागील भागात आपण पाहिले कि राज सोबत मेघनाचे लग्न ठरते.. याबद्दल ती तिच्या पप्पांकडे विरोध दर्शवते मात्र अप्पा पाटील मेघनाचा फोन, लॅपटॉप सगळं काढून घेतात. तिला एकटीला बाहेर जायला मनाई करतात.तारा आक्काना मेघनाचं दुःख बघवत नाही. त्या तिला मायेने जवळ घेतात.आता पाहू पुढे...


तारा अक्का मेघनाला तिच्या रुममध्ये घेऊन जातात. मेघनाचं रडणं काही थांबतच नसतं.
तारा अक्का : मेघू बेबी बास.. किती रडत आहात तुम्ही.. आम्हाला बघवत नाहीये.. रडून रडून काय हालत केलीये तुम्ही... नका रडू.. शांत व्हा..

मेघना :अक्का... अक्का.. मला माफ कर... मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले.. तुझं ऐकायला पाहिजे होतं मी.. पप्पांवर उगाच विश्वास ठेवला मी.. तू मला सांगत होतीस काही नको बोलूस आर्यन बद्दल पप्पांसमोर.. पण मी.. तुझं काहीच ऐकले नाही... माफ कर मला...

तारा अक्का : अहो माफी काय मागत आहात.. आमची लेक आहात तुम्ही.. मला स्पष्ट सांगा काय झालं देशमुखांच्या वाड्यावर? साहेब इतके का चिडले तुमच्यावर?

मेघना :अक्का अगं,मला न विचारता माझं देशमुखांच्या मुलासोबत लग्न ठरवलं.. मला काहीच माहित नव्हतं.. पण तिथे सगळ्यांना माहित होतं.. आता मी विरोध दर्शवला तर माझा मोबाईल, लॅपटॉप सगळं काढून घेतलं.. पुण्याला सुद्धा जाता येणार नाही.. तीन आठवडयांनी लग्न आहे अक्का... (आणि मेघना पुन्हा रडायला लागली )

तारा अक्का :काय??? मला माहित होतं साहेब तुमचं प्रेम प्रकरण मान्य करणार नाहीत.. पण हे असं अचानक तुमचं लग्न लावून देतील हे डोक्यात सुद्धा आलं नाही आमच्या... बेबी आता काय करायचं??

मेघना : अक्का.. बघ ना.. काय करू मी? मला राज नाही आवडत.. मला ते देशमुखांचं घराणं पण अजिबात आवडत नाही.. मला नाही करायचं हे लग्न.. आणि आर्यन... त्याला काय सांगू मी? कसं सांगू हे सगळं?? माझ्याकडे फोन सुद्धा नाहीये.. पप्पा आजारी पडल्यापासून मी त्याच्याशी बोलले सुद्धा नाहीये.. काय वाटेल त्याला?? मला भेटायचं आहे त्याला.. त्याच्या सोबतच राहायचं आहे... नको हे लग्न मला...

तारा अक्का : खरं सांगू बेबी.. आम्हाला पण आर्यनराव तुमच्या साठी योग्य वाटले होते.. तुम्ही अगदी लहानपणापासून ज्या राजकुमाराची स्वप्न बघता ना अगदी तसेच आहेत ते.. पण आम्हाला साहेबांचा स्वभाव माहित होता म्हणून केवळ आम्ही विरोध केला.. मेघू बेबी जा पळून तुम्ही.. जा पुण्याला.. देशमुखांचं घर म्हणजे कैदखाना आहे.. बायकांवर सगळे नीतिनियम लागू आहेत तिथे..तुमच्यासाठी योग्य नाही ते घर... तुम्ही जा पळून.. आम्ही मदत करतो तुम्हाला...

मेघना : अक्का अगं पळून जाणे हा पर्याय नाहीये माझ्यापुढे.. मी काही सामान्य घरातली मुलगी नाहीये.. एका पॉलीटीशनची मुलगी पळून गेली तर न्युज मध्ये किती चर्चा होईल.. आणि आर्यनचं घराणं पण मोठं आहे.. त्यांचं पण नाव आहे.. त्यांनी तरी मग किती जणांना उत्तरं द्यायची? पळून जाणे शक्य नाही.. कमीत कमी मला आर्यन सोबत बोलता आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं.. त्याने काहीतरी सुचवलं असतं गं....

तारा अक्का : थांबा मेघू बेबी.. आमच्याकडे आर्यन रावांचा नंबर आहे.. आम्ही एकदा फोन केला होता त्यांना... हे घ्या माझा फोन.. आणि लावा त्यांना फोन...

मेघना :अक्का खरच...?? दे मला फोन.. लगेच बोलते त्याच्या सोबत...
मेघनाने अक्काकडून फोन घेऊन आर्यनला फोन लावला. तारा अक्कांनी सुद्धा पटकन जाऊन रूमच्या दाराला कडी लावली. इतक्या रात्री अक्कांचा फोन पाहून आर्यनला सुद्धा आश्चर्य वाटले. त्याने जरा बिचकतच फोन उचलला...
आर्यन :हॅलो... अक्का बोला..

मेघना :(मेघनाचा आता बांध सुटला..एवढ्या दिवसांनी आर्यनचा आवाज ऐकून ती अजूनच रडायला लागली..)
आर्यन.... आर्यन (हुंदके देत )

आर्यन :मेघना.. मेघना.. कहा है यार तू... कितने दिन बाद फोन किया... मेघना कैसी हो तुम?? और रो क्यू रही हो..?? मेघना आय मिस्ड यू अ लॉट...

मेघना :(रडतच )आर्यन आय मिस्ड यू टू... मी खूप मोठी चूक केली इथे येऊन... मी तुझ्यासोबत तिथे खूप खुश होते.. आपण अक्काचं ऐकायला पाहिजे होतं... अक्का वॉज राइट.. पप्पांनी माझ्या आयुष्याचं राजकारण केलं...

आर्यन :मेघना प्लीज रडणं आधी थांबव.. आणि मला नीट सांग काय झालं आहे?? काय केलं तुझ्या पप्पांनी?

मेघना : आर्यन पप्पांनी माझं लग्न ठरवलं.. त्यांच्या मित्राच्या मुलासोबत... याने त्यांच्या पार्टीला खूप फायदा होणार आहे... माझा काहीच विचार नाही केला त्यांनी.. आत्ता तीन आठवड्यात लग्न आहे माझं.. मला नाही करायचे हे लग्न.. प्लीज काहीतरी कर ना आर्यन.. आय लव्ह यू.. मला तुझ्यासोबत राहायचं आहे.. (पुन्हा रडायला लागते )

आर्यन : व्हॉट?? असं कसं लग्न ठरवलं?? तुझ्या परमिशन शिवाय?? त्यांना सांग तू हे लग्न नाही करायच तुला.. थांब मीच येतो तिथे आणि तुला घेऊन जातो..

मेघना : हे लग्न खूप आधी ठरलं होतं.. मला आत्ता समजलं.. त्यांनी माझा फोन, लॅपटॉप सगळं काढून घेतलंय.. मला घराबाहेर पडता येणार नाहीये.. आणि कुठे गेलेच तर सिक्यूरिटी असणार माझ्यासोबत.. म्हणून तर अक्काच्या फोन वरून तुला कॉल केला मी.. तू नको येऊस इथे.. हे राजकारण खूप घाणेरडं आहे.. तुझ्या जीवाला धोका आहे..

आर्यन :ओह गॉड... ये सब क्या हो रहा है?? मुझे विश्वास नही हो रहा आज के जमाने में भी ये सब हो सकता है...मला सांग कोणासोबत लग्न ठरलं आहे?

मेघना : राज देशमुख... धनंजय देशमुखांचा दुसरा मुलगा.. खरं तर ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत.. लहानपणापासून ओळखते मी त्याला.. पण मैत्रीच्या पलीकडे काहीच नव्हतं आमच्यात...

आर्यन :वो देशमुख.. उसकी फॅमिली टीव्ही पे देखी है मैने... कैसे अड्जस्ट करोगी वहा?? पापा इतना भी सोच नही सकते?

मेघना : त्यांना राजकारणापुढे आता काहीच दिसत नाहीये... माझ्या इच्छा, आकांक्षा याचं काहीच मोल नाहीये... आर्यन आता काय करायचं आपण???

आर्यन :तो तुझा फ्रेंड आहे ना?? कसा आहे?? आय मिन तो तुझं कितपत ऐकेल??

मेघना :तो आहे रे चांगला.. त्याला मी आवडते सुद्धा...

आर्यन : ग्रेट.. माझ्याकडे एक आयडिया आहे.. तुला पप्पा कुठे बाहेर सोडत नाहीयेत.. पण राजला भेटायला तर सोडतील ना.. मग उद्या तू त्याला भेट.. त्याला पटवून दे हे लग्न तू नाही करू शकत.. आणि काही कारण सांगून त्यालाच या लग्नाला नकार द्यायला सांग..

मेघना :राजला आपल्या बद्दल माहित आहे.. तरी सुद्धा तो हे लग्न करतोय.. त्याला मी आवडते.. तो का लग्न मोडेल?? आणि तो मला बोलला होता कि मी नाहीतर दुसरं कोणी.. पण पप्पा आर्यन सोबत तुझं लग्न लावून देणार नाहीत...

आर्यन : हे बघ त्याला तू आवडते याच गोष्टीचा तुला फायदा घ्यायचा आहे.. त्याला इमोशनल वाक्य टाकून कन्व्हिन्स कर तू.. आणि सध्या हे लग्न मोडणं महत्वाचे आहे.. दुसरा कोणी यायच्या आत तू माझ्या सोबत असशील..

मेघना : मला त्याला भेटायची अजिबात इच्छा नाहीये.. पण तू म्हणतोयस तो प्लॅन मला योग्य वाटतोय..भेटते मी उद्या... आर्यन आय लव्ह यू... लव्ह यू सो मच.. मला तुझ्याकडे यायचं आहे...

आर्यन : आय लव्ह यू टू मेघना.. मी येतो उद्या.. तू त्याला कुठे भेटणार आहेस सांग.. मी येइन...

मेघना :नको नको.... आर्यन तू येऊ नकोस.. सेफ नाहीये इथे.. मी उद्या करते सगळं ठीक...

आर्यन :मेघना प्लीज रडू नकोस... मी आहे तुझ्या सोबत.. काळजी करू नकोस...

मेघना : हो.. मी तुला फोन करेन उद्या... अक्काच्या फोनवरून.. तू पण काळजी घे.. बाय..

आर्यन : बाय.. गुड नाईट...

आर्यनशी बोलून मेघनाला जरा बरं वाटतं.
"बेबी.. झोपा आता.. काळजी करू नका.. अंबा बाई सगळं ठीक करेल... मी येते "असं म्हणून अक्कासुद्धा झोपायला निघून जातात. मेघना आता सकाळ होण्याची वाट बघत असते. तिला सकाळी लगेच पप्पांना विचारून राजला भेटायला जायचं असतं.
सकाळ होताच मेघना लवकर आवरून खाली येते. अप्पा पाटील सोफ्यावर पेपर वाचत बसलेले असतात.
मेघना :पप्पा मला तुमच्याशी बोलायचं आहे...

अप्पा पाटील : हे बघा बेटा मला तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकायचं नाहीये.. तुम्हाला तुमचा फोन लग्नानंतरच मिळेल...

मेघना : नाही पप्पा.. मी स्वीकारलं आहे राजच आता माझा होणारा नवरा आहे.. रात्रभर मी खूप विचार केला.. देशमुख काकांच्या फॅमिलीमध्ये मी खूप खुश राहीन.. माई सुद्धा आहेत माझी काळजी घ्यायला.. आणि तुम्ही सुद्धा आहात इथेच...

अप्पा पाटील : अरे वा... आम्हाला माहित होतं आमची बेटी आमच्या विरोधात जाणार नाही.. छान छान..

मेघना : पप्पा फक्त मी एकदा राजला भेटू शकते का? लग्नाआधी थोडी ओळख झाली असती.. म्हणजे आम्ही आहोत फ्रेंड्स... पण नवरा म्हणून थोडं वेगळं पडतं ना.. म्हणून फक्त.. एकदा राजला भेटता आलं असतं तर...

अप्पा पाटील : हे राज राज काय लावलंय तुम्ही? तुमचा होणारा नवरा आहेत ते.. अहो म्हणा त्यांना.. एकेरी काय बोलता तुम्ही? तुमचं म्हणणं पण बरोबर आहे.. काल फार काही तुम्हा दोघांना बोलता आलं नसेल... ठीक आहे.. आम्ही सांगतो त्यांना.. भेटा आज.. पण याद राखा.. त्याला पंजाबी मुलाबद्दल काही सांगितलं ना तर त्या मुलाचं काही खरं नाही...

मेघना : नाही पप्पा.. तो भूतकाळ होता माझा.. असं काही होणार नाही..

अप्पा पाटील राजला फोन लावतात...
राज : हॅलो.. हा पप्पा बोला ना.. गुड मॉर्निंग.. आज सकाळी सकाळी आठवण काढली आमची..

अप्पा पाटील : हो.. अहो ते मेघनाला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. हे घ्या तिच्याशीच बोला..

अप्पा पाटील मेघनाकडे फोन देतात.
मेघना :हॅलो राज मला तुम्हाला भेटायचं आहे.. भेटून बोलायचं आहे... आज भेटू शकाल का?

राज : अरे वा मेघना.. एका रात्रीत अशी काय जादू झाली जे तुम्ही इतक्या सन्मानानी आमच्याशी बोलत आहात..भेटू भेटू.. तुम्हाला पिक करू का आम्ही?

मेघना : नको.. कशाला उगाच तुम्हाला त्रास.. मीच येइन.. मला फक्त जागा सांगा.. जिथे आपण शांतपणे बोलू शकतो..

राज :शांतपणे बोलू शकतो... उम्म्म... बरं एक काम करा.. रंकाळ्यावर या.. तिथून बघू कुठे जायचं ते..

मेघना : बरं ठीक आहे.. मी दहा वाजेपर्यंत येते.. बाय..

   मेघना फोन तिच्या पप्पांना देते...
अप्पा पाटील : राजराव तुम्हाला ठीक नसेल वाटत असं भेटणं तर सांगा.. आम्ही नाही पाठवणार मेघनाला..

राज : अहो पप्पा.. असं काय बोलत आहात.. आम्हाला तर रोज भेटायला सुद्धा आवडेल त्यांना... आमची होणारी बायको आहेत.. त्यांच्या इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे...

अप्पा पाटील : तुमच्यासारखा जावई भेटणं म्हणजे नशीबच आहे आमचं... चला ठीक आहे.. भेटा तुम्ही.. मेघनाकडे फोन नसेल त्यामुळे वेळेतच भेटा तुम्ही..

राज : बरं पप्पा.. चला ठेवतो.. आणि आवरतो.. बाय..

    मेघना सुद्धा आवरून राजला भेटायला निघते...

क्रमश :

आता काय होईल? राजला मेघनाचं म्हणणं पटेल का? तो स्वतःहून हे लग्न मोडायला तयार होईल का? आर्यन आणि मेघना पुन्हा भेटू शकतील का? पाहूया पुढच्या भागात...

वाचकहो दिवाळीमुळे कथेचा भाग प्रकाशित करायला वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व. हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला तर like आणि कंमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®




 

🎭 Series Post

View all