Login

मितवा part fourteen

Love story of a young couple

मितवा भाग चौदा
मागील भागात आपण पाहिले कि आर्यन मेघनाच्या  घरातून चिडून निघून जातो.. आज त्याने मेघनाला त्याच्या घरी बोलवलेलं आहे..आता पाहू पुढे..

       मेघना प्रभात रोडवरील त्या 'मल्होत्राज' नावाच्या बंगल्यात जाते. दारात खूप सुंदर बाग असते.. त्याच्या पुढे चार पाच मोठ्या आलिशान गाड्या लावलेल्या असतात.. त्याच्या पुढे मोठं असं घराचं दार असतं.. मेघनाला बंगल्याचं फार काही अप्रूप नसतं कारण ती लहानाची मोठी अशाच बंगल्यात झालेली असते पण तिला हे घर बघून जणू काही आपण या आधी वारंवार येथे येऊन गेलो आहोत असं वाटत असते. जेव्हा कधी तिने त्या स्वप्नातील हिरोचा विचार केला होता तेव्हा तिच्यापुढे असं काहीसं घर उभं राहिलं होतं.. मेघना आर्यनच्या परिवाराला भेटायला फारच उत्सुक असते.
"पण आर्यनचे आई वडील तरी तयार होतील का?? त्यांनी आक्षेप घेतला तर?? " असा तिच्या मनात विचार येतो मात्र आता नकारात्मक विचार नको करायला असं म्हणून ती दारावरची बेल वाजवते. आर्यन स्वतः दार उघडतो. आर्यनला बघून मेघनाला सुद्धा आनंद होतो. त्याचा तो प्रफुल्लित चेहरा बघून तिला बरं वाटतं.

आर्यन तर चक्क चक्क मेघनाला बघून दारातच तिला मिठी मारतो. मेघनाला अचानक मिठी मारल्याने काही समजत नाही.
"आर्यन आपण तुझ्या घरी आहोत... " ती हळूच त्याच्या कानात पुटपुटते... आनंदाच्या भरात मिठी मारल्याने आर्यन तिच्या बोलण्याने सावध होतो.
"सो गुड टू सी यू.. कम इन.. एव्हरी वन इज वेटिंग फॉर यू... " आर्यन बोलतो आणि तिचा हात धरून तिला घरात घेऊन जातो.

आर्यनच घर खूप छान डेकोरेट केलेलं असतं. मेघनाला घर तर फारच आवडत. मेघना हॉल मध्ये येऊन बसते.. तिच्या समोर आर्यनची आई, त्याचे वडील आणि दादी म्हणजेच आजी बसलेली असते. ते तिघे पण मेघनाकडे बघून स्मित करतात. त्या तिघांना समोर बघून मेघनाला तर दडपणच येतं.

"आओ बेटा.. बैठो.. " आर्यनची आई बोलते.
आर्यनच्या आईकडे बघून मेघनाचं दडपण कमी होतं. कोणाला त्यांच्याकडे बघून वाटेल कि त्यांना इतका मोठा मुलगा आहे. सुंदर निळ्या रंगाची साडी नेसलेल्या त्या अगदी फॅशन डिझायनर शोभत होत्या. मेघना सोफ्यावर बसते. तसं आर्यनचे वडील बोलतात, "बाळा किती घाबरली आहेस.. आम्ही तुला काही करणार नाहीये.. रिलॅक्स बस.. "

"हो हो अंकल.. " मेघना बोलते. आर्यनचे वडील सुद्धा ब्लेझर घालून बसलेले असतात. एक यशस्वी बिझनेसमन आहेत हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं. आर्यन दिसायला त्यांच्यावरच पडला होता. अगदी तसाच चेहरा होता.

"हाय.. कितनी सोनी कुडी है.. चाँद का तुकडा.. " आर्यनची दादी बोलते... तसं मेघना काहीशी लाजते.

आर्यन : सो.. ये है मेघना.. माय गर्लफ्रेंड..और हम दोनो एक दुसरे से प्यार करते है..
आर्यनने  किती आत्मविश्वासाने सांगितले कि तो प्रेम करतो हे पाहून मेघना आश्चर्यचकित होते.. तिच्यात अजिबात हिंमत नसते इतक्या सहज तिच्या पप्पांशी बोलायची...

आर्यनची आई : अरे बेटा.. मेघना को दो मिनिट बैठने तो दो.. उसको साँस तो लेने दो..

आर्यनचे वडील : हा बेटा...आप आरामसे बैठो.. रिलॅक्स करो.. तो आप कोल्हापूरसे हो क्या??  आर्यन बोल रहा था..

मेघना : जी अंकल.. बॉर्न अँड ब्रॉट उप देअर.. स्टडीज के लिये अभी पुणे में हू..

आर्यनची आई : मेघना तू खूप सुंदर आहेस दिसायला.. माझ्या मुलाची चॉईस खूप छान आहे..

मेघना : (काहीशी लाजून ) थँक यू आंटी..

दादी : तू मराठीच बोल.. आम्ही मराठीत बोलत असतो..
बास माझी एक अट आहे लग्नासाठी..

तसं मेघना आणि आर्यन गंभीर होतात.

दादी : अरे घाबरू नका.. बास मेघनाने पुरणपोळी शिकून यायचं.. आम्हाला सगळ्यांना फार आवडते पोळी...

मेघना : हो नक्की दादी.. नक्की शिकेन मी.. तसं मला काही येत नाही बनवता.. पण काल छोटासा प्रयत्न केला होता पंजाबी डिश बनवायचा..

आर्यन :(मेघनाचं वाक्य मधेच तोडून) कल का पुरा प्लॅन अक्काने फ्लॉप किया..

आर्यनचे वडील : बेटा.. ऐसे नही बोलते.. मेघना काय वाटतय तुला.. तुझ्या घरी परवानगी मिळणार नाही का?? तुझ्या पप्पांबद्दल खूप ऐकलं आहे..पार्टीमुळे बरेच चर्चेत असतात ते...

मेघना : हो अंकल.. अक्कांना असं वाटतं कि त्यांच्या पोलिटिकल बॅकग्राऊंड मुळे ते पंजाबी फॅमिली साठी तयार नाही होणार..

आर्यनची आई : आर्यनने कल सब कुछ बता दिया..  पण मग तुला काय वाटतं?? पप्पा काय म्हणतील??

मेघना: मला वाटतं कि असं काही होणार नाही.. त्यांना काही प्रॉब्लेम नसावा.. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे..

आर्यनचे वडील : तो आपने उनसे बात कि क्या??

मेघना : अजून नाही... काल फोन केला होता पण ते बीझी  होते.. पण आज मी नक्की बोलेन..

आर्यनचे वडील : हम बात करते है आपके पापा से.. हमे नंबर दिजीये..

मेघना : नको नको.. मी बोलेन.. काही प्रॉब्लेम आला तर आहातच तुम्ही..

दादी : अरे इतनी चाँद जैसे बच्ची को कोई क्यू नाराज करे भला?? कुछ नही होगा.. आपके पापा हा बोलेंगे..

आर्यन : लव्ह यू दादी.  हमे आपके सपोर्ट कि जरुरत है..

आर्यनची आई : मेघना आम्हाला तू खूप आवडली आहेस.. आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये...

आर्यनचे वडील : हो.. बघा आज बोलून पप्पांसोबत.. सांगा आम्हाला काय होतय..आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये...

    मेघना आणि आर्यन जाम खुश होतात..
आर्यन : थँक यू.. आप सबका सपोर्ट बहोत इम्पॉर्टन्ट है..
मेघना चल.. लेट्स सेलिब्रेट...

आर्यनची आई : अरे तिला घर दाखव.. कुछ खाने तो दे..

आर्यन : नही नही.. वो सब बाद में.. अभी हम बाहर जाते है.. मेघना चल..

मेघना : अरे कुठे..?  असं अचानक..

आर्यन : तू चल ना.. आज आपला दिवस आहे...

    तसं मेघना सगळ्यांच्या पाया पडते.. आणि सगळ्यांचा निरोप घेते.. मेघना आणि आर्यन त्याच्या कार मधून निघतात.

"कुठे निघालो आहोत आपण?? आता तरी सांगशील का?? " मेघना विचारते.

"कॉलेजला... जिथे तू पहिल्यांदा भेटलीस मला.. " आर्यन बोलतो.

"अरे पण मला घर बघायचं होतं तुझं.. अजून सगळ्यांशी बोलायचं होतं.. " मेघना बोलते.

"अरे आयुष्य काढायचं आहे तिथे... निवांत बघ नंतर.. आता हा क्षण साजरा करूया ना.. "आर्यन बोलतो.

    दोघेही कॉलेजमधे येतात. पार्किंगमध्ये थांबतात.
"मेघना यहा पे फर्स्ट टाइम देखा था तुम्हे.. एक वो दिन था.. और एक आज.. घरपे सबने परमिशन दि.. " आर्यन बोलतो.

मेघना : हो ना खरंच.. किती छान आहे तुझी फॅमिली..  किती ओपन माईंडेड आहेत.. त्यांना तू किती सहज सांगितलंस आपल्या बद्दल..

आर्यन : बघ.. मी डायरेक्ट माझ्या पेरेंट्सशी बोललो.. आणि तू बसली अक्का अक्का करत.. जाऊन बोल आता पप्पांशी..

मेघना : मला वाटतं मी कोल्हापूरला जाऊन येते.. तिथेच जाऊन पप्पांशी बोलते.. फोनवर बोलण्यापेक्षा ते बेटर आहे..

आर्यन : हम्म.. मुझे भी ऐसे ही लग रहा है.  वैसे भी वीकेंड है.. तो बात करके दो दिन में आ जाओ..

मेघना : असंच करते.. मग आजच निघते.. म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचेन..

आर्यन : अभी जाओगी क्या??

मेघना : हो..घरी जाऊन आवरून निघेपर्यंत वेळ होईलच..

आर्यन : ठीक है.. एक लक्षात ठेव.. काहीपण झालं तरी मी आहे.. तुला सोडून कुठेच जाणार नाहीये मी.. अगदी वेळ आलीच तर सांग..मी येईन कोल्हापूरला.. आय लव्ह यू.. टेक केअर..

मेघना : असं काही होणार नाहीये.. पप्पा एकदम कूल आहेत रे.. चल बाय.. आय लव्ह यू टू..

     मेघना आर्यनला घट्ट मिठी मारते आणि तिच्या घरी जाते. अक्का नेहमीप्रमाणे तिची वाट बघतच असतात.
"अक्का आवर.. कोल्हापूरला जायचं आहे.. "मेघना बोलते.

"आत्ता??  काय झालं?? साहेब काही बोलले का?? " अक्का विचारतात.

"मला बाकी काही विचारू नकोस.. दोन दिवसात परत यायचं आहे.. आवर "मेघना बोलते आणि तिच्या रूममध्ये आवरायला जाते.

     आता अक्कांना फार भीती वाटत असते.. कोल्हापूरला कशासाठी जायचं आहे हे त्यांच्या लक्षात येतं पण मेघना आता त्यांचं काही ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते. त्या निमूटपणे मेघना सोबत कोल्हापूरला जायला निघतात.

    अडीच तीन तासात दोघी कोल्हापुरात पोहोचतात. असं अचानक मेघनाला घरी आलेलं पाहून अप्पा पाटील पण आश्चर्यचकित होतात.

क्रमश :

कोल्हापुरात काय घडेल??  मेघना पप्पांशी बोलेल??  ते होकार देतील??  आता अक्का काय करतील?? पाहूया पुढच्या भागात...

वाचकहो.. हा भाग जरा उशीरा पोस्ट झाला. माझ्या डोळ्यांना इन्फेकशन झालं आहे त्यामुळे स्क्रीन टाइम खूप कमी झाला आहे.. त्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला. पण हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. धन्यवाद..

सिद्धी भुरके ©®

 

🎭 Series Post

View all