मितवा part four

Love story of a young couple

मितवा भाग चार
वाचकहो, काही तांत्रिक अडचणींमुळे मितवा कथेचे भाग पुन्हा पोस्ट करतीये. तुमचा आधीसारखाच प्रतिसाद अपेक्षित आहे. धन्यवाद.. 

मागील भागात आपण पाहिले की आर्यनला आवडणारी मुलगी मेघनाच असते, पण ही गोष्ट मेघनाला माहित नसते. आर्यनला दुसरी कोणतीतरी मुलगी आवडते हा समज करून तिला वाईट वाटतं असतं.. आता पुढे....


      आर्यन आणि सिया सुद्धा काही वेळाने घरी जातात. घरी जाऊन आर्यनला सुद्धा चैन पडत नाही. मेघना का असं वागतीये हा प्रश्न त्याला सतावत असतो. काय करू जेणेकरून मेघना माझ्याशी बोलेल या विचाराने तो बैचेन झालेला असतो.

"मेघना यार.. प्यार दोस्ती है.. तुमने कुछ कुछ होता है नही देखी क्या.. हमारे बीच बात भी नही हुई.. दोस्ती कब होगी.. और प्यार तो दूर की बात है... "आर्यन तिच्या विचारत बोलत असतो. तो आरशासमोर उभा राहतो..  दोन तीन वेळा स्वतःचा चेहरा निरखून बघतो.. आणि म्हणतो, "ठीक तर दिसतो मी.. का चिडते मेघना मला बघून...?? काय करू??..... 
आयडिया !!कल कॉलेजमे चॉकलेट बुके लेके जाता हू....  या फिर उसकी कार पे कोई लेटर रखू???  
नो वे.. कितना चीप लगेगा..  आज काल कोण करतं असं.. ? ती आधीच चिडलीये.. काय करू मग??? असे फालतू प्लॅन करण्यापेक्षा तिच्याशी सरळ जाऊन बोलतो.. जो होगा वो देखा जायेगा.. लेट्स  सी... " आणि तो सियाला फोन लावतो..

"हॅलो सिया.. तू बरोबर आहेस.. मी उद्या डायरेक्ट मेघनासोबत बोलतो.. काय होईल ते होईल.. "आर्यन म्हणतो.

"हम..  मला पण तेच योग्य वाटतंय.. मेघनाचं काही कळत नाहीये.. नक्की काय आहे मनात... काही नाही तर कमीतकमी मैत्री होईल तुमच्यात.. "सिया बोलते आणि फोन ठेवते.
       
       आर्यन पुन्हा मेघनाच्या विचारात मग्न होतो. ती आज वर्गात त्याला धडकली होती तो क्षण वारंवार आठवतो. तिचे सोनेरी केस, तिचा गोड चेहरा, नाजूक ओठ.. आणि तिच्या डोळ्यातील तो राग.. आज इतकं जवळून मेघनाला पाहिल्याने आर्यनला तिच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती. कधी आपण तिच्याशी बोलू.. तिचा आवाज ऐकू असं वाटत होतं. त्याला असं वाटलं की उद्या आपण तिच्याशी बोलायला गेलो आणि पाऊस पडायला लागला तर काय भारी वाटेल ना.. आणि तो नकळत त्याचं आवडतं मराठी गाणं गुणगुणू लागला..
"कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात..
कधी तू.. चमचम करणारी चांदण्यात... "
     आर्यन पंजाबी असला तरी त्याची तिसरी पिढी पुण्यात रहात होती. घरात सगळे बऱ्यापैकी मराठीत बोलायचे. आर्यनला सुद्धा खूप चांगलं मराठी बोलता यायचं आणि 'मुंबई पुणे मुंबई 'हा सिनेमा त्याला फार आवडत असे.

     " हमारे लव्ह स्टोरीका टायटल तो 'पुणे -कोल्हापूर - पुणे ' होना चाहिये... मी इतका फिल्मी आहे.. पण मेघना असेल का?? मुझे नही लगता.. कितना भाव खाती है.. बास.. आता निगेटिव्ह विचार करायचा नाही..  उद्या कळेल मेघना कशी आहे ते.. "असं म्हणत आर्यन मेघनाचा विचार करत झोपून गेला.
            
       इथे मेघनाची हालत पण आर्यन पेक्षा काही वेगळी नव्हती. मेघना सुद्धा ती आर्यनला धडकली होती त्या क्षणाचा विचार करत होती आणि आपण का बोललो नाही त्याचाशी असा विचार करून स्वतःला कोसत होती.

"शी यार.. तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल..  तो इट्स ओके म्हणाला.. आणि हसला सुद्धा.. आणि मी मूर्ख.. काही न बोलता तिथून रागात निघून काय आले??  पण काय करू?? त्या सियाने सारखं आर्यन -आर्यन म्हणून माझं डोकं फिरवलं होतं.. आणि त्याला त्या आवडणाऱ्या मुलीबद्दल ऐकून तर मला अजूनच राग आला.. आणि मला कळलंच नाही मी काय वागतीये ते.. "मेघना डोक्याला हात लावून बसली होती...  पुन्हा तिचं विचारचक्र सुरु झालं.. 
 
"सिया म्हणते तसं करू का मी तिच्याशी फ्रेंडशिप?? त्याला कोणी दुसरी आवडते म्हणून काय झालं?? कमीतकमी आमची ओळख तरी होईल.. पण काय यार मी आज चुकीचं वागले आणि बोलले सुद्धा.. सियाला अगदी मोठया तोंडाने सांगून आलीये नाही बोलायचं त्या आर्यन सोबत... आता कसं बोलू मी?? चांगली संधी आली होती आणि मी वेड्यासारखं वागले.. "म्हणत मेघनासुद्धा आर्यनचा विचार करत झोपून गेली.
            
     दुसऱ्यादिवशी दोघे नेहमीप्रमाणे कॉलेजला गेले. एकमेकांना हळूच बघत होते पण काल जे काही घडलं त्यामुळे मेघनाची हिंमत झाली नाही आर्यनसोबत बोलायची आणि आर्यनने ठरवलं होतं बोलायचं पण काही केल्या त्याची सुद्धा हिंमत होत नव्हती मेघनाशी बोलायची. सगळी लेक्चर संपली. आर्यन हताश होऊन आपल्या ग्रुपसोबत बाहेर पडला. सिया आणि मेघना शेवटी दोघीचं वर्गात राहिल्या. मेघनाला राहून राहून वाटत होतं सियाला म्हणावं 'दे ओळख करून '...पण ती काही शेवटपर्यंत बोलली नाही... आणि काल मेघनाचा राग पाहून आज सियाने सुद्धा आर्यनचा काही विषय काढला नाही.

          थोड्या वेळाने दोघी वर्गाच्या बाहेर पडल्या. बाहेर  जोरात पाऊस पडत होता. दोघींकडे छत्री नसल्याने पार्किंगपर्यंत भिजत नको जायला म्हणून दोघी एका बाजूला उभ्या राहिल्या. तेवढ्यात मेघनाचं पलीकडे उभ्या असणाऱ्या आर्यनकडे लक्ष गेलं. तो सुद्धा एका कडेला उभा होता.. हेडफोन लावून गाणी ऐकण्यात मग्न होता.. कोणाच्यातरी आठवणीत मस्त पावसात रोमँटिक गाणी ऐकत असेल तो असं मेघनाला वाटलं...
          
       तेवढ्यात पलीकडे उभ्या असणाऱ्या मेघनाकडे आर्यनचं लक्ष गेलं.. तिला पावसात भिजायला ओढून घ्यावं असं त्याला वाटलं.. तो नेहमीप्रमाणे त्याचं आवडतं  "कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात.."हे गाणं ऐकत होता.. आणि एका क्षणात त्याच्या अंगात काय संचारलं काय माहित.. पण तो तसाच पावसात भिजत मेघनाच्या दिशेनं चालत यायला लागला. मेघनाला काही समजलंच नाही.तिने आसपास पाहिलं तर ती आणि सिया यांच्या व्यतिरिक्त तिथं कोणी नव्हतं.. आणि तो आता फक्त आणि फक्त मेघनाकडे बघत येत होता.. हिच्या हृदयाची धडधड वाढली.. आणि पुढच्या क्षणात तो तिच्या सामोर येऊन उभा राहिला.. मेघना आश्चर्याने त्याच्याकडे बघतच बसली.... 

क्रमश :
काय होईल पुढे?.. आर्यन मेघनाशी काय बोलेल? त्यांच्यात मैत्री होईल का?? का पुन्हा मेघना निघून जाईल?? पाहूया पुढच्या भागात..... 

  वाचकहो कथा कशी वाटतीये ते मला नक्की सांगा..  तुमचा अभिप्राय अमूल्य आहे.. आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा.. तुमच्या कंमेंट्स मला चांगलं लिहायला प्रेरित करतात ... धन्यवाद.
सिद्धी भुरके ©️®️

🎭 Series Post

View all