मितवा part five

Love story of a young couple

मितवा भाग पाच

मागील भागात आपण पाहिलं की आर्यन आणि मेघना दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं पण कोणाची हिंमत होत नाही.. शेवटी आर्यन पावसात मेघनाच्या सामोर जाऊन उभा राहतो.. आता पुढे..

     असं अचानक आर्यनला आपल्या समोर उभं राहिलेलं पाहून मेघनाला काही कळत नाही.. पण पावसात भिजल्यामुळे तो काय दिसत होता.. एकदम कमाल.. त्यामुळे मेघना त्याच्याकडे बघतच बसली. सिया सुद्धा आश्चर्यचकित होऊन बघत बसली की आर्यन आता काय करणारे.. तो मात्र शांतपणे येऊन मेघनासमोर उभा राहिला आणि म्हणाला..

"हाय.. मी आर्यन.. आपण एकाच क्लास मध्ये आहोत पण आपली ओळख नाही.. म्हणून मी आज तुझ्याशी बोलायला आलोय.. माझ्याशी मैत्री करशील?? "
आर्यनचं इतकं चांगलं मराठी ऐकून दोघींना पण आश्चर्याचा धक्का बसला.. मेघना तर काही बोलायच्या पलीकडे गेली होती. ती एकटक फक्त त्याच्याकडे बघत बसली..

"हाय.. ठीक आहेस ना?? मी काहीतरी विचारतोय.. "
आर्यन म्हणाला...
मेघनाने मानेनं होकार दिला.. त्यानं फ्रेंडशिप साठी त्याचा हात पुढे केला.. मेघनाने पुन्हा काही न बोलता त्याच्या हातात हात मिळवला..आर्यनच्या जीवात जीव आला..त्याने छान स्माईल केलं तिच्याकडे बघून..

"कॉफी पिणार?? असं पण पाऊस पडतोय.. " त्यानं विचारलं..
मेघना आता कुठं भानावर आली.. आपण वेड्यासारखं इतका वेळ त्याला बघतच बसलो होतो या मुळे ती जरा बावरली..

"आज नको.. मला घरी जायचंय.. असं पण खूप उशीर झालाय... "मेघना म्हणाली.

"अगं चल ना.. अर्ध्या तासात परत येऊ.. " सिया म्हणाली.

"येस.. ज्यादा दूर नही जायेंगे.. यहा पास मे ही कॉफी शॉप है.. "आर्यन बोलला.

"पण नको.. आज कॉफी प्यायचा मूड नाहीये.. सिया चल.. तुला ड्रॉप करते.. "म्हणत मेघना तिथून निघाली.

"अरे..ओके.. नो प्रॉब्लेम.. किसी और दिन.. जाता जाता नंबर तर देऊन जा.. इफ यु डोन्ट माईंड... "आर्यनने जरा बिचकतचं विचारलं..

"नंबर??? आत्ता तर ओळख झालीये आपली.. बाय.. "म्हणून मेघना तिथून निघाली.
   आर्यन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथे बराच उभा राहिला.

"शीट यार... नंबर की बात मैने क्यू छेडी..?? काय विचार करेल ती माझ्याबद्दल..?? इतकी काल पासून प्रॅक्टिस केली होती काय बोलायचं याची.. और आज कुछ और बोल दिया मैने... " आर्यनचं स्वगतचं चालू होतं.. थोड्या वेळानं तो पण घरी गेला.
      
     इथे कारमध्ये सिया मेघनाला उगाच चिडवत होती.
"मॅडम.. काय अगदी काल मला म्हणत होता तुम्ही.. मला त्या आर्यन सोबत फ्रेंडशिप करण्यात काही इंटरेस्ट नाहीये.. आणि आज तो समोर आला तर तुझी बोलती बंद झाली.. कसं काय हो म्हणाली तू त्याला?? "

"अगं तो समोरून आला माझ्याशी बोलायला.. मला तर काही सुचलं नाही.. म्हणून मी आपली मान डोलवली.. " मेघना म्हणाली.

"आणि काय गं.. गेलो असतो ना कॉफी प्यायला..  आणि किती भाव खातेस गं.. नंबर पण दिला नाहीस त्याला.. "सियाने विचारलं.

"अगं असं लगेच कोणी जातं का कॉफी प्यायला?? आणि माझा नंबर घेऊन हा काय करणारे?? त्याला आवडणाऱ्या मुलीचा नंबर घे म्हणावं.. "मेघनाला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.. मात्र सियाला ती काही तसं दाखवत नव्हती..

"अगं ती मुलगी म्हणजे... "सिया बोलता बोलता एकदम शांत झाली.. "डोन्ट वरी मेघना.. मिळेल आर्यनला त्या मुलीचा नंबर नक्कीच.. "असं म्हणाली आणि तिचं घर आलं म्हणून गाडीतून उतरली.
        
     इथे आर्यन फार बेचैन झाला होता.. आपण उगाच नंबर मागायची घाई केली असं त्याला वाटत होतं.. पण आपण आज मेघना सोबत मैत्री केली या गोष्टी मुळे तो खुश पण होता. राहून राहून त्याच्या डोळ्यापुढे मेघनाचा चेहरा येत होता. तिचं ते आश्चर्याने बघणं.. मानेनं होकार देणं.. आणि नंतर भाव खाऊन निघून जाणं.. आर्यन तिच्या एकन एक गोष्टीवर फिदा झाला होता. इतके दिवस तिचा आवाज ऐकायला तरसणाऱ्या कानांनी तिचा गोड आवाज ऐकला होता. तिला सतत बघत राहावं असंच आर्यनला वाटत होतं म्हणून तो फेसबुक उघडून तिची प्रोफाइल बघू लागला..
       
     आज मेघनाला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. आपल्याला जो मुलगा आवडतो तो स्वतःहून बोलायला आल्याने ती भलतीच खुश होती. आर्यनला कोणीतरी भलती मुलगी आवडतीये याचं आज तिला वाईट वाटत नव्हतं.
       
   पावसात भिजून आर्यन किती भारी दिसत होता असा मेघना विचार करत होती. आपण किती भाव खाल्ला त्याच्या समोर याचं तिला हसू पण येत होतं. तेवढ्यात तिच्या मोबाईल वर नोटिफिकेशन येते..  बघते तर आर्यनने तिला फ्रेंड रीक्वेस्ट पाठवलेली असते. मेघना जरा विचारात पडते..

  "काय करू? लगेच रिप्लाय देऊ का नको?? नको.. जास्त ताणायला नको.. उगाच त्याला राग आला तर थोडी फार मैत्री झालीये ती पण राहणार नाही.. "
म्हणून ती त्याची रीक्वेस्ट स्वीकारते.बरेच दिवसांनी मेघनाला खूप छान वाटत असतं.. कधी उद्याचा दिवस उजाडतोय आणि कॉलेजला जाऊन आपण आर्यनला भेटतोय असं तिला वाटत असतं.ती आता छान झोपायच्या तयारीत असते तोच तिला आर्यनचा मेसेंजरवर "हाय..  आर यु देअर? "असा मेसेज येतो.. 
मेसेज वाचते ती.. आणि क्षणाचा विलंब न करता त्याला रिप्लाय करते.. 
मेघना : हाय.. 

आर्यन : मला वाटलं झोपली असशील..

मेघना : झोपायला चालले होते पण तुझा मेसेज पाहिला.. बोल.. 

आर्यन : ओह्ह..  मेरी निंद तो कब की चली गयी है.. 

मेघना : आय नो.. सिया बोल रही थी तुझे कोई लडकी पसंद है.. 
(मेघनाने मुद्दाम त्या मुलीचा विषय  काढला )

आर्यन : हा यार..  पर उसे पता नही है अब तक..  क्या करू?? कैसे बात करू?? कोई आयडिया  है तो दे.. 

मेघना : माझ्याकडे काय आयडिया असणारे? माझा या बाबतीत काही एक्सपेरियन्स नाही..  मी सिंगल आहे.. 
(आर्यनला हेच उत्तर अपेक्षित होतं..  त्याला मेघनाला दुसरं कोणी आवडतं का नाही बघायचं होतं )

आर्यन : रिअली?? क्यू?? तुम्हे कोई पसंद नही है क्या?? 

मेघना: नो..  मेरे टाइप के लडके आज कल नही मिलते... 

आर्यन : व्हाट्स युवर टाइप??
 
मेघना : करण जोहरच्या मुव्ही मधला हिरो..  एकदम रोमँटिक आणि फिल्मी.. 
(आर्यन मनातून एकदम खुश होतो.. मेघना पुन्हा त्या मुलीच्या विषयामध्ये हात घालते )

मेघना : माझं राहू दे.. तुझ्या त्या मुलीवर लक्ष दे.. 

आर्यन : दिवसरात्र तिच्यावर तर लक्ष आहे...  मला खूप आवडते ती.. 
(मेघनाला चिडवायला आर्यन मुद्दाम असं बोलतो )

मेघना: (काहीशी चिडून ) बरं.. कर विचार तिचा.. मी झोपते..  गुड नाईट.. 
 
आर्यनला आता मेघनाला असा त्रास द्यायला मजा येत असते.. आणि तो सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा मेघनाला भेटण्याच्या विचारात झोपून जातो... 

क्रमश :

मेघनाला कसं समजेल की आर्यनला तीच आवडते?? दोघांची मैत्री प्रेमात बदलेल का?? पाहूया पुढच्या भागात... 

वाचकहो तुम्हाला कथा कशी वाटतीये ते मला नक्की सांगा.. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे.. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा.. तुमच्या कंमेंट्स मला चांगलं लिहायला प्रेरीत करतात.. धन्यवाद.. 
सिद्धी भुरके ©️®️
          

🎭 Series Post

View all