मितवा part eleven

Love story of a young couple

मितवा भाग अकरा

मागील भागात आपण पाहिले कि तारा अक्का मेघनाला आर्यनसोबत बघतात. मेघना आपल्याशी खोटं बोलली याचं त्यांना वाईट वाटत असतं. मेघना घरी आल्यावर त्या तिला विचारतात.. आता पुढे..

साहेबांच्या कानावर घालायला लागेल हे अक्कांचे वाक्य ऐकून मेघना जागीच थबकते.

मेघना : तारा अक्का प्रत्येक वेळेस तू मला पप्पांचा काय गं धाक देतेस??  काय चुकीचं वागलीये मी??  कॉलेजला जाणारी माझ्या वयाची मुलगी जे करत असेल तेच करतीये मी...

तारा अक्का : चुकीचं नाही वागला बेबी.. मग माझ्यासोबत खोटं का बोलला तुम्ही???कोणत्या  मुलासोबत फिरत होता?

मेघना : अक्का मला पर्सनल लाइफ आहे कि नाही??  तुला नाही मी सगळं सांगू शकत..

तारा अक्का : हे बघा बेबी.. माझ्यावर तुमची जबाबदारी आहे.. काही कमी जास्त झालं तर लोकं मला जाब विचारतील.. आणि तुम्ही जा मुलांसोबत.. पण हे असं बाईकवर???  कोणी पाहिलं तर?? उद्या कोणत्या वृत्तपत्रात अगर वाहिनीवर तुमचा असा फोटो वगैरे आला तर साहेब काय म्हणतील???

मेघना : हाच तर प्रॉब्लेम आहे अक्का.. तू मला जबाबदारी समजतेस.. मुलगी नाही.. अगं या वयात आई तिच्या मुलीची चांगली मैत्रीण बनते.. तिला समजून घेते.. पण चुकलेच मी.. तू माझी आई नाहीयेस.. तू फक्त मला सांभाळण्याचा जॉब करतेस.. तुला माझ्या भावनांबद्दल घेणं देणं नाहीये.. आणि जगात लोकांना काय कामं नाहीयेत का??  सगळे जण फक्त मेघना काय करतीये.. कोणासोबत फिरतीये एवढंच बघतात का??

तारा अक्का :.मेघू बेबी.. हो माहितीये मी तुमची आई नाहीये.. अवघ्या दहा दिवसाच्या होता तुम्ही तेव्हा मालकीणबाई माझ्या हाती तुम्हाला देऊन बोलल्या होत्या, "माझ्या बाळाची जबाबदारी तुझ्यावर सोपवतीये.. तिला आईची कमी जाणवू देऊ नकोस.. "
तेव्हा पासून मनात बसलंय जबाबदारी आहात तुम्ही.. नाही बनू शकले तुमची मैत्रीण कारण तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे.. तुम्ही राजघराण्यातील.. आम्ही सामान्य माणूस.. पण खरं सांगते फक्त तुमच्यासाठी आयुष्यभर झटलीये.. माझ्या आयुष्याचा कधी विचार नाही केला.. तुमच्या काळजीपोटी लग्न सुद्धा नाही केलं.. माफ करा नाही बनू शकले तुमची आई..
       तारा अक्का डोळे पुसत म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून आपण खूप काही चुकीचं बोललो आहोत याची मेघनाला जाणीव झाली. ती त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे डोळे पुसत म्हणाली..

मेघना : सॉरी अक्का.. मी खूप बोलून गेले.. पण अगं कधीतरी वाटत मला समजून घेणारं कोणी नाहीये.. बघायला गेलं तर सगळं आहे माझ्याकडे पण मी एका पिंजऱ्यात अडकलीये असं वाटतं मला.. माझ्या मर्जीने मी काहीच करू शकत नाही.. आणि अशात तू मला समजून घेणार नाही तर मग कोण घेणार???

तारा अक्का : मेघू बेबी आम्ही तुम्हाला समजून घेतोय..  तुमच्या भल्यासाठी बोलतोय.. आम्हाला माहित आहे साहेबांना प्रेम प्रकरण पटणार नाही.. त्यांना समजलं ना तर तुमचं बाहेर येणं जाणं बंद होईल...

मेघना : तुला कसं समजलं मी प्रेमात पडलीये ते??

तारा अक्का : अहो तुमच्या चेहऱ्यावरची ख़ुशी बघा.. कशा गुलाबी झाल्या आहात.. तुम्ही आम्हाला आई नका मानू..पण तुमच्यातला छोटासा बदल पण आम्ही झटकन हेरतो..

मेघना : (काहीशी लाजून )काय हे अक्का.. तुला ना सगळंच समजत.. हो मी प्रेमात पडलीये.. आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो अक्का.. आणि तुला माहितीये तो एखाद्या हिरो सारखा दिसतो.. अगदी मला हवा होता तसा..

तारा अक्का : मेघू बेबी.. पण साहेब..??

मेघना : पप्पांना का घाबरतीये तू??? त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर.. मला किती जपतात ते.. माझ्या आनंदात ते पण खुश.. आणि तो घरंदाज आहे.. अगदी आपल्या तोडीचा.. मग पप्पांना का आक्षेप असेल???

तारा अक्का : आता एवढं कौतुक करत आहात तर नाव तरी सांगा..

मेघना : हो.. सांगते कि.. आर्यन.. आर्यन मल्होत्रा...

तारा अक्का : काय???  मल्होत्रा??? म्हणजे आपल्यातला नाही?? अहो महाराष्ट्रीयन पण नाही???

मेघना : हो.. मग काय झालं??  पंजाबी आहे तो.. एकदम करण जोहरच्या मुव्हीमधली फॅमिली आहे त्याची.. मला हवी तशी..

तारा अक्का : बरं बरं.. आम्हाला कधी भेटवणार??

मेघना : उद्या?? चालेल??

तारा अक्का : हो.. घरीच बोलवा..

मेघना :(अतिशय खुश होऊन ) मला माहित होतं तू मला कधी नाही बोलणार नाहीस...आय लव्ह यू अक्का..
   
      मेघना अगदी खुशीत तिच्या रूममध्ये निघून जाते. गेल्या गेल्या पहिल्यांदा आर्यनला फोन करते...

मेघना : हॅलो.. हॅलो आर्यन आज में बहोत खुश हू..

आर्यन : वा.. अब तो हमे रोज लोणावळा जाना चाहिये..
चलो कल फिर चलते है.. वैसे भी तुम्हारे किस को मिस कर रहा हू..

मेघना : ए.. काय रे.. किस च काय घेऊन बसला आहेस.. इथे किस्सा झाला यार..

आर्यन : किस्सा..??  मतलब??

मेघना : मॅटर.. राडा... अरे तारा अक्कांना आपल्या बद्दल समजलं..

आर्यन : व्हॉट??कैसे..??

मेघना : अरे त्यांनी आपल्याला पाहिलं.. आणि मग मी त्यांना सगळं सांगितलं आपल्याबद्दल.. आणि त्यांना तुला भेटायचं आहे.. उद्या.. किती भारी ना..

आर्यन : एक मिनिट.. तारा अक्का क्यू मिलना चाहती है??  मतलब यू आर ग्रोन अप.. अपने डिसिजन खुद ले सकती हो.. और हमारे रेलशनशिप को अक्का के परमिशन क्यू जरुरत है??

मेघना : अरे त्या मला आईसारख्या आहेत.. मग त्यांना सांगायला नको का??  आणि त्यांनी परमिशन दिली कि पप्पा पण आपोआप तयार होतील..

आर्यन : तुला नाही वाटत अक्का तुला कंट्रोल करतात असं?? पप्पांची परमिशन पाहिजे तर मी त्यांना भेटेन..  व्हाय अक्का??

मेघना : हे बघ आर्यन त्यांनी मला लहानाचं मोठ केलंय..
मला त्यांचं बोलणं काही चुकीचं नाही वाटत.. त्यांना एवढा मान मी देऊ शकते.. आणि तुला वाटत आहे ना इतकं सोपं नाहीये माझ्या पप्पांशी बोलणं..

आर्यन : ओके बाबा.. भेटेन उद्या.. तुझ्यासाठी काही पण.. ठीके.. कधी येऊ उद्या बोल..

मेघना : दुपारी ये.. लंच करायला ये...

आर्यन : ओके.. डन.. आय लव्ह यू..

मेघना : लव्ह यू टू.. बाय.. सी यू..
    
      इथे तारा अक्कांना काय करावं ते सुचत नसतं. त्या अप्पा पाटलांना चांगलंच ओळखून असतात. ते कधीही पंजाबी मुलासोबत लग्नाची परवानगी देणार नाहीत मेघनाला हे अक्कांना माहित असतं. अक्कांना मेघनासाठी फार वाईट वाटत असतं..
"बिचारी माझी पोर.. काय चुकलं तिचं.. प्रेम करतीये कोणावर तरी.. किती निष्पाप, निरागस आहे माझी लेक.. त्या सिनेमातल्या हिरोला शोधत असायची.. आणि आज तो हिरो भेटला सुद्धा.. पण पंजाबी?? लेकीच्या स्वप्नांवर पाणी फिरणारे.. मेघू बेबीचा प्रेमभंग होणारे.. बिचारी बेबी.. प्रेम कधी पूर्ण होऊ शकणार नाहीये.. साहेब तर हे सगळं कळता क्षणी माझ्या पोरीचं सगळं बंद करून घरी बसवतील..मेघू बेबी या प्रकरणात अजून पुढे जायच्या आत मलाच काहीतरी केलं पाहिजे... त्यांना रोखलं पाहिजे...
       देवा का रे माझ्या लेकराच्या जीवनात इतका त्रास लिहिलास.. काय वाईट केलंय माझ्या पोरीनं कोणाचं जे तिला आता या सगळ्याचा सामना करावा लागणारे..??"
तारा अक्का मेघनाबद्दल वाईट वाटून रडत होत्या. त्यांनी आर्यनला भेटायला तर बोलावलं होतं पण नातं जोडायला नाही तर तोडायला....

क्रमश :

तारा अक्का आता काय करतील?? मेघना आणि आर्यनच नातं तोडायचा प्रयत्न करतील?? आर्यन काय बोलेल?? पाहूया पुढच्या भागात..

वाचकहो हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुमचा अभिप्राय अमूल्य आहे. तुमच्या चांगल्या कंमेंट्स मला चांगलं लिहायला प्रेरित करतात. हा भाग आवडला  तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®









 

🎭 Series Post

View all