Oct 30, 2020
स्पर्धा

पसंत आहे मुलगा भाग 5

Read Later
पसंत आहे मुलगा भाग 5

 

भाग 5

 

हॅलो सिमा.. सापडला का गं तो मुलगा एफबीवर...?" आशूने हळू आवाजात तिच्या मैत्रीणीला विचारले..

 

अगं नाही... एकाच नावाची खूप मुलं सापडली, पण तो सिध्दार्थ नाहीए.., आणि एक अकाउंट सापडलं.. त्याचे डिटेल्स सेम तु दिलेल्या माहितीप्रमाणे आहेत., बट तो तोच सिध्दार्थ आहे की नाही, काही समजत नाहीए..

कॉलेजचं नाव समजत आहे का...?” आशूने विचारले..

हो कॉलेज दिसत आहे...

मग एक काम कर ना कॉलेज मध्ये जाऊन पाहतेस का..? पुण्यातलंच कॉलेज असेल..?

हो हो.. पुण्यातलंच आहे... ठिके मग.. मी जाऊनच पाहते.., तो लास्ट इअरला आहे ना...?”  सीमाने विचारले.

हो.. लास्ट इअरला सर्वात जुना विद्यार्थी जो असेल ना तोच हा असेल... आशू तोंड वाकडं करत म्हणाली..

ठिक आहे.. आजच जाऊन पाहते.. आख्खं कॉलेज पालथं पाडते आणि शोधतेच त्याला... यू डोन्ट वरी... बाकी घरात काय चालू आहे..?, लग्नाची तयारी सुरू झाली असेल ना..?” सीमाने विचारले..

हो ना गं.., आज बस्ता बांधायला जायचं आहे पुण्यात., मला त्या मुलाशी लवकरात लवकर बोलून घेतलं पाहिजे सीमा... नाहीतर खूप अवघड होऊन बसेल गं... आशू टेन्शनमध्ये बोलली..

तू बिनधास्त रहा.., आजच कसंही करून त्याचा नंबर मिळवते., मग तर बास...? बट तू पण काहीतरी ट्राय कर.. आईशी बोलून वगैरे त्याचा नंबर मिळवायचा किंवा त्याला भेटता येईल असं काहीतरी बघ...

नॉट पॉसिबल.. आज आजी, काका-काकी, सगळेच घरातले पाहुणे पण आलेत घरी.. त्यात आई सारखी माझ्या पुढे- मागे करतीय.. दादा पण सारखाच लक्ष ठेवून आहे... अगं सीमा यांनी बस्ता पण सोबत नाही बांधायचा असं ठरवलंय.. मला लग्न झाल्याशिवाय त्याच्याशी बोलताच येणार नाही अशी जबरदस्त योजना करून ठेवलीय बाबा आणि दादानी... ती निराशतेने बोलली..

डोन्ट वरी.. तो जमाना गेला.. डायरेक्ट लग्न झाल्यावरच नवऱ्याचं तोंड पहायचं.. आपण एकविसाव्या शतकात आहोत.. तू नको टेन्शन घेऊस.. उद्यापर्यंत त्या मुलाशी तू बोलून पण घेशील.. शब्द आहे माझा...

थॅक्यू सीमा.., आय लव्ह यू.. रिअली थॅक्स...आशू सीमाचे आभार मानत म्हणाली.

अश्विनी.. दार उघड... अश्विनी... डॅनी जोरजोरात दार ठोठावू लागला..

चल बाय ठेवते मी फोन, दादा आलाय... असं म्हणत आशूने फोन ठेवला आणि दार उघडले..

तो तिच्याकडे संशयी नजरेने पाहू लागला...

मोबाईल दे... डॅनी म्हणाला..

का..?” आशूने रागाने विचारले..

पप्पांनी मागितलाय... तो म्हणाला..

का पण..?”

पप्पांनी मागितलाय.. सांगितलं ना एकदा.. गपचूप दे.. डॅनी अजून ओरडून म्हणाला...

सीमाशी बोलत होते... आशू घाबरत म्हणाली..

फोन दे.. काही गरज नाही कुणाशी बोलायची.. लग्नाचे आमंत्रण आम्ही देऊ तुझ्या मैत्रीणीला.. दे मोबाईल..असं बोलत त्याने चक्क तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि निघून गेला..,

आशूच्या डोळ्यात पाणी तरळले आणि तेवढ्यात तिची आई तिथे आली..

अगं आशू.. तू अजून तयार झाली नाहीस का... चल लवकर.. सगळे आम्ही खाली वाट पाहतोय... आई अगदी आनंदी चेहऱ्याने बोलली..

ती तशीच रागाने आत येऊन बेडवर बसली..

अगं.. मी काय म्हणतीये.. आणि तू काय अशी बसलीय.. चल पटकन.. बस्ता बांधायला चाललोय आपण आज.. चल लवकर.. जास्त वेळ लावला तर बाबा तिथंही येऊ दायचे नाहीत तुला.. आई पुढे म्हणाली..

जा ना.. मग तुम्हीच.., का मला विचारताय..? मी काय कठपुतळी आहे का ..? तुम्ही म्हणाल तसंच वागायला... जा तुम्ही, मला या लग्नातच मूड नाही तर येऊन तरी काय फायदा... जा तू.. एन्जॉय कर.. जा..... तुम्हा सर्वांना मला इथून घालवायची घाई लागलीय.. पण कुणालाही माझ्या आयुष्याची काही पडली नाहीए.. म्हणूनच एका बारावी पास मुलाशी माझं लग्नं लावून देताय ज्याला माझ्याबद्दल काहीच माहित नाहीए..आता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते..

असं नको बोलू गं आशू.. तुझा तुझ्या आईवर विश्वास नाही का..?, अगं तो मुलगा खरंच खूप समजूतदार आहे.. सुसंस्कारी मुलगा आहे तो.. त्याच्या राहणीमानावर जाऊ नकोस तू... दिसतं तसं नसतं...

मी पण तेच म्हणतीय.. दिसतं तसं नसतं... तो आज तुला समजूतदार वाटतोय पण तोच मुलगा उद्या कोणत्याही थराला जाऊ शकतो... तिला पुढे खूप काही बोलायचे होते.. पण वेळ लक्षात घेता ती आईला शांतपणे बोलली, आई जा तू... बस्ता बांध, त्या मुलासाठी सोनं- नाणं खरेदी कर.. चार बायकांमध्ये बसून आनंदाने मिरव... तुम्हाला जे करायचं ते करा.. आणि मला जे करायचं ते मी करेल... बाय.. असं म्हणत तिने आईला रूमच्या बाहेर काढले आणि जोरात दार लावून घेतले..

अगं आशू असं नको करू गं.. आई बाहेरून ओरडत होती..

आई प्लीज जा... मी काय जीव वगैरे देणार नाहीए... जा तू... उगाच आरडा ओरडा केलास तर चर्चेला विषय होईल.. खाली पाहुणे आहेत सगळे... जा तू..

आशू असं बोलल्यावर आई निघून गेली...

आशू बेडवर पडली आणि जोराजोरात रडू लागली...

 

***

एक्स्युज मी... सीमाने घोळक्यातील एका मुलाला हाक मारली..

येस... तेज्या म्हणाला..

अं.. बीकॉम लास्ट इयरचा क्लास कुठे आहे...

वर आहे, पण तुम्हाला कुणाला भेटायचं आहे... अभि पुढे येत म्हणाला..

एक्चुअली, सिध्दार्थ म्हणून स्टुडंट आहे ना इथे..,??”

हो हो.. आहे ना.. आमच्याच क्लासमध्ये आहे... पण तुम्ही कोण...?”

आशू...??” संकेतने कुतुहलाने विचारले..

ए., वेड्या.. आशू किती साधी सिंपल होती.. ही मुलगी आशू नाहीए... रिया त्याच्या कानात म्हणाली..

नाही, मी सिमा..

अच्छा अच्छा... तुम्ही सिदच्या वहिनी का...

नाही...

सीमा असं बोलली आणि तेवढ्यात बेल वाजली...

अरे.. चला लवकर.. सर आलेत क्लास मध्ये..., पाच मिनिटे जरी लेट झाला तरी ते एन्ट्री देणार नाहीत क्लासमध्ये.. टिना लांबूनच ओरडून परत क्लासच्या दिशेने पळाली..

सॉरी वहिनी.. आम्ही लगेच येतो वायवा देऊन... प्लीज सॉरी... अभि म्हणाला आणि तो पळाला..

सॉरी वहिनी.. येतो लगेच... यावेळेस इंटरनल मध्ये तरी केटी नाही लावायची आम्हाला... संकेत पण असं म्हणून पळतच गेला आणि रियाही त्याच्या मागे गेली...

सीमा जरा विचारातच पडली, ही सगळीच मुलं अजून केटीच क्लिअर करत आहेत, असं ती मनाशीच बोलली.., कठिण आहे.., जो कुणी सिद आहे ना मला पाहिलंच पाहिजे..

रियाला पळता पळता तिने थांबवलं... सिद्धार्थ आलाच नाही का कॉलेजमध्ये..

 नाही त्याचा नंबर उद्या आहे.. आणि आज तो बस्ता बांधायला गेलाय ना.. त्याच्या लग्नाचा... असं फास्ट बोलत रिया पळाली..

सिमाला खूप आनंद झाला, कारण फायनली तिला ती शोधत असलेला सिध्दार्थ सापडला.. आज नाहीतर उद्या त्याच्याशी बोलता येणार अशा विचाराने तिने आशूला फोन लावला पण तिचा फोन स्वीच ऑफ आला.. तिने परत लावला... लगातार फोन स्वीच ऑफच आला..

ती जरा विचाराच पडली.. अर्धा तास तिने या सगळ्या मुलांची वाट पाहिली, पण उद्या भेटतीलच असा विचार करून काहीवेळाने घरी निघून गेली....

 

रात्री उशिरा पर्यंत दोघांच्या घरी लग्नाचा बस्ता बांधून झाला.. पण तरी आशू आणि सिध्दार्थ मात्र दुःखीच होते, त्यांना एकमेकांना भेटायचे होते.. सिदला आशूचे विचार, मत जाणून घ्यायचे होते.. आणि आशूलाही त्याला भेटून सगळं खरंखरं सांगायचं होतं.. पण नियती मात्र त्यांची भेट घडवून आणत नव्हती...

आता लग्नाला केवळ सहा दिवस राहिले होते.. आणि या सहा दिवसांमध्ये, मेहंदी, बांगड्या, हळद.. साखरपुडा हे सगळे कार्यक्रम होणार होते.. आता या कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकमेकांना भेटता येईल का.. त्यांची मत जाणून घेता येईल का..? आशूला तिची खरी खरी हकिकत सिदला सांगता येईल का...?

 

आता या सहा दिवसांवर अवलंबून होतं की त्यांचं लग्न होणार की नाही.....

 

क्रमशः

Bhartie “ शमिका