प्रेमबंध - भाग ४

प्रस्तुत कथेमध्ये मी विजय आणि किमया यांची संघर्षमय प्रेम कथा मांडलेली आहे.

" ते काम आमचं. हे बघा तुम्ही आम्हाला काम कसे करायचे हे शिकवू नका.किती खोलात जायचं ,किती नाही हे आम्हाला चांगलच माहित आहे."

" नाही मला तुम्हाला उपदेश करायचा हेतू नव्हता,पण लवकरात लवकर तपास लागला तर बरे होईल. सद्ध्या विजय हॉस्पिटल मध्ये आहे .मी तर तुम्हाला आधीच सांगितले की त्याच्या जीवाला धोका आहे."

" हो हो समजलं मला.हे बघा मी तुमची केस सांगळे यांच्याकडे सुपूर्त करतो कारण अशा प्रकारच्या केसेस मध्ये त्यांचा हातखंडा आहे."

" हो का! ग्रेट! मी आता भेटू शकते का त्यांना?"

" ते सद्ध्या तर नाही. पण उद्या तुम्ही १० वाजता आलात तर उत्तमच!"

किमया हॉस्पिटल मध्ये विजयकडे येते.

"काय ग किमया काय म्हटले इन्स्पेक्टर?"

"आई मला त्यांनी उद्या सकाळी दहा वाजता इन्स्पेक्टर सांगळे यांना भेटण्यास सांगितले आहे"

"बर.. किमया खरच खूप हिंमतवान आहेस ग बाई तू! सर्व एकटीनेच हाताळते आहेस. "

" हे तुमच्या आशीर्वादाचे बळ आहे आई !!तुम्ही जा आता घरी. मी आहे विजय जवळ."

"ठीक आहे काळजी घे.."


विजयची आई घरी जाते..


" विजय तू काही काळजी करू नकोस.मी आहे ना.मी तुला काही होऊ देणार नाही.तू फक्त मी जे बोलते ते समजले असे इशाऱ्याने सांग ह प्लीज.हे बघ तुला माझ्यासाठी ,आपल्या प्रेमासाठी नीट व्हावेच लागणार आहे.प्लीज धीर धर. आपल्या या अतूट प्रेमबंधांसाठी मला तुझी खुप गरज आहे. तुझ्या आशादायी प्रोत्साहनामुळे मला खूप ताकद येणार आहे. तेव्हा तू मला काहीतरी इशारा देत जा. प्लीज विजय माझं ऐकतोयस ना तू!"

    तेवढ्यात विजय अगदी किंचित हालचाल करून जणू काही तो या अतूट प्रेमबंधांच्या संघर्षमय लढाईत किमया सोबत आहे असाच इशारा देतो. किमयाला खूप आनंद होतो. 

"थँक्यू विजय. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू माझ्यासोबत आहेस ही भावनाच मला खूप बळ देणारी आहे. आता तुझ्या साथीने मी ही संघर्षाची लढाई नक्कीच जिंकणार आहे, नव्हे ,ती मी जिंकून दाखवणारच! आपल्या दोघांसाठी! आपल्या प्रेमबंधांसाठी.."

   किमया हळूच विजयच्या कपाळाचे चुंबन घेते.तिला हर्षाने उल्हासित,आशादायी झालेले पाहून विजयच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते.त्याचे शरीर जरी त्याची साथ देण्यास सद्ध्या असमर्थ होते,तरीही ही डोळ्यांची चमक किमयावरील त्याच्या प्रेमाची ग्वाही देण्यात यशस्वी झाली होती.कारण आत्म्याने दोघेही केव्हाच एक झाले होते,शेवटी खरं प्रेम हेच तर असतं.म्हणूनच संवाद नसूनही दोघे या संघर्षात एकमेकांसोबत होते.

किमया दुसऱ्या दिवशी १० वाजता इन्स्पेक्टर सांगळे यांना भेटण्यासाठी जाते.

"आपण इन्स्पेक्टर सांगळे का?"

"हो.. आपण?"

"मी किमया जाधव."

" हो हो मला तुमच्या केसबद्दल काल सांगितलं कॉन्स्टेबल यांनी."

"मी त्याच संदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे."

"हो नक्कीच मी तुमची केस हँडल करेल. आता मला सर्वात आधी आत्तापर्यंतचा घडलेला घटनाक्रम व्यवस्थित सांगा."

किमया पूर्ण घटनाक्रम इन्स्पेक्टर सांगळे यांना सांगते.

"ओह! आय सी.. असं आहे तर.."

"सांगळे सर, माझ्या विजयला या वाईट परिस्थितीत पाहून मला खूप दुःख होते. म्हणूनच मला आमच्या सोबत घडलेल्या अपघाताबद्दल खोलवर जाऊन गुन्हेगाराला चांगलीच शिक्षा द्यायची आहे. विजयची अशी अवस्था मला अजिबात सहन होत नाही. मी ठरवलं आहे ही लढाई मला जिंकायचीच आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे."

"हे बघा किमया मॅडम ,मी तुमच्या भावना समजू शकतो. आपण लवकरात लवकर या अपघाताच्या घातपाताचा पर्दाफाश करू. माझ्यावर विश्वास ठेवा,तुमच्या विजयला मी नक्की न्याय मिळवून देईन."

" थँक्यू सांगळे सर.. थँक्यू व्हेरी मच!"

सांगळे त्वरित एक फोन लावतात, " त्या दिवशी म्हणजे २० ऑगस्ट ला अशोका मार्ग वरून गेलेल्या सर्व जड वाहनांचे डिटेल्स मला हवे आहेत.आता लगेच ताबडतोब!"

थोड्या वेळातच एक माणूस २०ऑगस्ट म्हणजे ज्या दिवशी किमया आणि विजय यांचा एक्सीडेंट झालेला असतो त्या दिवसाचे वाहनांचे डिटेल्स इन्स्पेक्टर सांगळे यांना आणून देतो .

" किमया मॅडम आता मला सांगा, ज्या ट्रकमुळे तुमचा कार अपघात झाला, ती ट्रक तुम्ही पहिली आहे का?"

" नाही सर,अंधार खूप होता आणि ट्रक खूप भरधाव वेगाने पुढे गेली. त्यामुळे सर्व अचानक खूप वेगानेच झाले.खर तर काय घडतय हे समजण्याच्या आधीच आम्ही दोघेही मंद बेशुद्धीत होतो.पण जेव्हा आम्ही दोघे थोडे भानावर आलो तेव्हा आम्ही मदती साठी थोडी आरडा ओरड सुरू केली."

" बर..म्हणजे या लिस्ट मध्ये बघा एकूण ४ ट्रक त्या मार्गावरून गेलेले आहेत, त्यातही रात्री हे २ ट्रक गेले होते.म्हणजे आता याच २ ट्रक चालकांची माहिती काढावी लागणार!"

" हो सर बरोबर ."

" पण मी असही ऐकलय की याच अशोका मार्ग वर अपघात सतत घडतात म्हणून."

" हो सर मीही ऐकलय असं."

" म्हणजे याचा अर्थ या मार्गाला ताब्यात म्हणजे नियंत्रणात ठेवणारा कोणीतरी भाई किंवा डॉन असला पाहिजे."

" ओके , असं आहे होय. मग तर शोध खूपच सोपा होईल सर."

" नाही मला वाटतं हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही."

" म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला?"

" वर करणी जरी हा अपघात याच डॉन ने घडवून आणला तरी सूत्रधार नक्कीच दुसरा आहे असे मला वाटते." 

भाग ४ समाप्त..

या अपघाताचा सूत्रधार नक्की कोण असेल?

इन्स्पेक्टर सांगळे या अपघाताच्या तपासणीसाठी योग्य दिशेने चालले आहेत का? किमया आणि विजय यांच्या प्रेमबंधनाचा आणि अपघाताचा काय संबंध? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच भेटतील पण पुढील भागात..

तोपर्यंत नमस्कार..


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

कॅटेगिरी - कथा मालिका

सब कॅटेगिरी - प्रेम कथा

जिल्हा नाशिक.






🎭 Series Post

View all