प्रेमबंध - भाग ७ (अंतिम)

प्रस्तुत कथा मालिकेमध्ये मी विजय आणि किमया यांची संघर्षमय प्रेम कथा सादर केली आहे.

सांगळे सर पोलीस स्टेशनमध्ये येतात.

तेवढ्यात किमया येते.

"सांगळे सर ,तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी विसरले."

" काय ?"

"अहो ज्या माणसाने मला किडनॅप केले होते, त्याच्या उजव्या हातावर त्रिशूल गोंदलेले आहे."

 "काय? असं होय. बर. पण एक मिनिट .मी माझ्या अवतीभवती असेच एक त्रिशूल कुठेतरी बघितले आहे."

तेवढ्यात सांगळे सरांच्या समोर इन्स्पेक्टर पाटील फोनवर बोलत असतात. नेमके त्यांच्या उजव्याच हातावर त्रिशूल गोंदलेले असते.

ते किमयाला हळूच इशारा करून असेच त्रिशूल पाहिलेस का असे विचारतात.

किमयादेखील मान डोलवून हो म्हणते.

आता किमया आणि इन्स्पेक्टर सांगळे यांना या केसमधील सर्वात मोठा क्ल्यू सापडतो.

इन्स्पेक्टर सांगळे , पाटील यांना आत बोलवतात.

" काय पाटील? काय काम केले तुम्ही आज?"

" सांगळे साहेब त्या दोन भुरट्या चोरांना पकडले आज. अहो सारखे बस स्टँडवर लोकांच्या वस्तू चोरतात.अरे किमया मॅडम तुम्ही? लागला का काही तपास?"

" त्यांच्या केसच्या तपासाच मी बघतोच आहे .पण का हो ,यांना धमकीचा फोन तुम्हीच केला होता का?"

"अहो सांगळे सर काय बोलताय तुम्ही? माझा यात काहीच संबंध नाही."

" मग काल सकाळी बारा वाजता तुम्ही कुठे होतात?"

" मी काल बारा वाजता घरी गेलो होतो जेवायला."

"तुमच्या घरी कोण कोण असतं?"

" मी आणि माझी आई."

" असं का? बर.. तुमच्या आईला फोन लावा बरं जरा."

" अहो सांगळे सर मी सांगतोय ना मी जेवायला गेलो होतो घरी. माझ्या आईला फोन ऑपरेट करता येत नाही." 

" ठीक आहे. मग मी त्यांना इथे बोलावून घेतो."

"शिपाई, इन्स्पेक्टर पाटील यांच्या घरी जा आणि त्यांच्या आईला बोलवले म्हणून सांगा."

" हो सांगळे सर ,आत्ताच जातो मी आणि बोलवून आणतो यांच्या आईला!"

इन्स्पेक्टर पाटील यांची आई येते आणि म्हणते, 

" सांगळे साहेब बोलावलं आहे का मला? काय झालय?"

" इन्स्पेक्टर पाटील काल बारा वाजता घरी जेवायला आले होते का?"

" तो तर दुपारी कधीच जेवायला घरी येत नाही. सकाळीच जेवण करून निघतो. काय हो साहेब काय झालं?"

" अहो पाटील म्हणतायेत कि ते काल बारा वाजता घरी गेले होते जेवायला!"

" हा काल बारा वाजता घरी आलाच नाही. मग कुठे गेला होता हा? काय रे कुठे गेला होता तू?"

" इन्स्पेक्टर पाटील तुमचे बिंग आता फुटले आहे. पटकन जे खर आहे ते सांगा."

" हो सांगळे सर मी काल बारा वाजता घरी गेलो 

नव्हतो  जेवायला!"

इन्स्पेक्टर पाटील ची आई विचारते,

" मग कुठे गेला होतास तू? सांग खरं खरं!"

इन्स्पेक्टर सांगळे म्हणतात,

" अहो आई मी सांगतो तुम्हाला. इन्स्पेक्टर पाटील या किमया ताईंना किडनॅप करायला गेले होते काल बारा वाजता."

"काय? तरी मी याला सांगत होते की त्या मोठ्या लोकांच्या नादी लागू नकोस. पण नाही त्या मोठ्या लोकांनी याला पैशासाठी फितवलं आणि हा पोलीस असून सुद्धा गुन्हे करत फिरतोय."

आता इन्स्पेक्टर पाटील पुरते खजील होतात. त्यांना कोठडीत टाकले जाते. त्यांची त्वरित कस्टडी सुरू होते. किमया देखील चिंताग्रस्त होते.

इन्स्पेक्टर पाटील आणि इन्स्पेक्टर सांगळे यांच्यात संवाद सुरू होतो.

" हे बघा इन्स्पेक्टर पाटील आता तुम्ही काहीच खोटं बोलू शकत नाही. किमयाने तुमचे उजव्या हातावरील त्रिशूल काल त्यांना किडनॅप केल्यानंतर बघितले होते. त्यामुळे त्यांना किडनॅप तुम्हीच केले होते हे उघड आहे. आता मला लवकरात लवकर तुमच्या वर कोण खरा सूत्रधार आहे हे सांगा. नाहीतर तुमची नोकरी जाईलच शिवाय बदनामी चा डाग सुद्धा तुमच्या वर्दीला लागणार आहे."

" हो साहेब माझं खरंच चुकलं. लोकांची सेवा करण्यासाठी पोलीस असतो पण मी पैशांच्या मोहापाई त्यादिवशी यांचा अपघात घडवून आणला. 20 ऑगस्ट ला अशोका मार्ग वरील बंडू दादाला मीच एक ट्रक तयार ठेवायला सांगितले होते. निर्जन स्थळ होते म्हणूनच हा ट्रक मीच बंडू दादाला यांच्या कार ला अपघात होण्यासाठी पाठवा म्हणून सांगितले होते."

" तुम्ही असे कोणाच्या सांगण्यावरून केले? लवकर सांगा नाहीतर तुम्हाला माहीतच आहे पोलीस कस्टडीत काय केले जाते ते!"

" हो सर मी सगळं सांगतो तुम्हाला. विजयच्या ऑफिसमध्ये महेश सोनवणे म्हणून एक मुलगा आहे. खरं तर तो श्रीमंत आहे पण त्याला मुलगी मिळत नाहीये. म्हणून तो नेहमी उदास असतो. पण जेव्हा विजय आणि किमया यांच्या लग्नाची बातमी त्यांच्या ऑफिसमध्ये समजली तेव्हा महेश खूप निराश झाला. तसे पाहिले तर महेश आणि विजय यांचा रोजचाच संबंध होता. पण विजयला नोकरी मिळताच चांगली मुलगी देखील लग्नासाठी मिळाली ही गोष्ट महेशला विशेष रुचली नव्हती, म्हणून इर्ष्येपोटी महेश ने मला विजय आणि किमयाला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी बरेच पैसे देखील देण्याचे कबूल केले होते. पण अपघात होऊन सुद्धा हे दोघेही त्या दिवशी वाचले."

" वाह पाटील! तुम्हाला शोभलं का असं वागणं? तुमची नोकरी आता गेली आणि तुम्हाला आता तुरुंगात डांबले जाणार आहे."

   इन्स्पेक्टर सांगळे विजयच्या ऑफिसमध्ये जातात. तिथे महेश सोनवणेला एका रूम मध्ये बोलवतात. त्याला या प्रकरणाची माहिती विचारली असता तो देखील उडवाउडवी ची उत्तरे देतो. पण जेव्हा इन्स्पेक्टर पाटील यांना महेश समोर सादर केले जाते तेव्हा महेश पुरता घाबरतो आणि आपला गुन्हा कबूल करतो. इन्स्पेक्टर सांगळे हे महेश सोनवणे तसेच इन्स्पेक्टर पाटील यांना कोर्टासमोर सादर करून तुरुंगात टाकतात आणि या खटल्याचा निकाल लागताच, त्यांना अपघाताचा प्रयत्न केल्याने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होते.

        अशा रीतीने इन्स्पेक्टर सांगळे यांच्या मदतीने किमया आपल्या प्रेमबंधांसाठीची  ही संघर्षमय  लढाई जिंकते. थोड्याच दिवसांत विजय सुद्धा कोमातून बाहेर येतो आणि डॉक्टरांच्या योग्य थेरपी मुळे बरा होतो. शेवटी किमया आणि विजय लग्नाच्या प्रेमबंधांमध्ये कायमचे गुंफले जातात आणि त्यांचा सुखी संसार सुरू होतो.

      वाचक हो माझ्याकडून झालेला हा पहिलाच कथा मालिकेचा प्रयत्न तुम्ही खऱ्या अर्थाने सफल केलात. वेळोवेळी माझ्या कथा मालिकेच्या प्रत्येक भागाला तुम्ही दाद दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद. तुम्हाला ही कथा मालिका कशी वाटली हे नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला खूप प्रेरित करतात म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

कॅटेगिरी - कथा मालिका

सब कॅटेगिरी- प्रेम कथा

जिल्हा नाशिक.


🎭 Series Post

View all