प्रेम कथा ( दहशतवादिंचा हल्ला - मनोज आणि मोनिका )

Love Life

श्रेणी - प्रेमकथा


आज मनोज गडबडीत होता , कारण  त्याचा आज वाढदिवस आहे, तो थोडा कामावरुन आज लवकरच आला आहे त्यांच्या रोजच्या ठिकाणी . रोज मोनिका - मनोज ला CST वर भेटते आणि मग तेथुन ते दोघे मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसत असतं.


 मोनिका एका ऑफिस मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते संध्याकाळी सात अशी असे आणि मनोज इंजिनियर असल्याने तो ही याच वेळेत रीकामा होत असे त्यामुळे दोघ  नेहमी भेटत असतं. मनोज आणि मोनिका कॉलेजमध्ये एकत्रच होते . तेव्हापासुन त्यांची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मनोज CST वर आला आहे रेल्वे अशी समोर येऊन थांबली, आज मोनिका ला प्रपोझ करायचं हे आधीच ठरवलं होतं त्याने ,आणि रेल्वेतुन उतरताना मनोज ने मोनिका ला पाहीलं आज तिला पाहताच जीव खालवर होत होता त्याचा भीतीने, मोनिका ने एक फुलांचा गुच्छा आणला होता, ती मनोज कडे गेली आणि तो गुच्छ त्याला देत म्हणाली Many many happy Returns of the day मनोज.

मनोज  : . मला तुला काही विचाराचंय.
मोनिका : हो मग विचार ना...
मनोज : पण मला पहिले तु वचन दे की काही झालं तरी तु माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तु जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील. 

मोनिका : अरे आज तु असं का बोलतोयस....
मनोज : ते कळेल तुला पण पहिले मला वचन दे....
मोनिका : बरं दिलं वचन.. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला
मनोज : ठीक आहे, हा गुच्छ तुझ्या हातात धर,

मनोज ने गुच्छ तिच्या हातात दिला आणि,  तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला, आणि तो दोन्ही हातात धरुन मनोज ने तो पुढे केला आणि म्हणाला , मोनिका तू मला कॉलेजमध्ये असल्यापासुनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगु शकलो पण आता सांगतोय, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तु माझं प्रेम स्वीकारशील का ? मनोज बोलून थांबला. आणि थोड्याच वेळात खूप  मोठा  आवाज झाला.

3  वर्षानंतर.................

एके दिवशी एक अलगद हात मनोज च्या खांद्यावर येऊन पडला, अरे मनोज हे फुल घेऊन तु इथे काय करतोयस...? त्याचा कॉलेज मधला एक क्लासमेट अवधूत तिथे आला होता, कदाचित तो खुप वेळ मनोज कडे बघत असावा, मनोज म्हणाला मी तर इथे मोनिका ला ....  मनोज जिकडे बघत होता तिथे कोणीही नव्हतं....... अरे इथेच होती मोनिका कुठे गेली. माहित नाही रे.. अवधूत म्हणाला OK ठीक आहे. शांत हो बस इथे...

मनोज  : का..?
अवधूत : सांगितलं ना एकदा मी बस म्हणुन आलोच मी,, ( अवधूत थोडा वेळ कुठेतरी गेला, मनोज ची नजर  मोनिका ला च शोधत होती, ती कुठे दिसत नव्हती, अवधूत नंतर तिथे आला आणि मनोज ला चल म्हणाला मनोज काहीही न विचारता त्याच्या मागे गेला.

अवधूत ने मनोज ला CST च्या एका कोपऱ्याला नेलं, आणि अवधूत म्हणाला, मनोज हे समोर जे लिहीलंय ते एकदा वाच, तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांची लिस्ट होती, आणि त्यामध्ये मोनिका च ही नाव होतं ते वाचुन मनोज चे डोळे पाणावले, मनोज स्वतः शी च बोलु लागला, आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता, मनोज अवधूत च्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागला, अवधूत ने मनोज ला सावरलं आणि तो बोलु लागला. अवधूत म्हणाला मी सायक्रॅटिस्ट  आहे मनोज , आणि मघाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघुन मला तु मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणुनच तर तुला मी तिथे बसवुन, इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं कि तो वेडा आहे, आणि रोज इथे येत असतो. त्या बाजुच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं कि तीन वर्षापूर्वी तु जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास, तेव्हा अचानक एका मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटुन, भिंतीत घुसली, त्यातुन रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरुन कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटुन न जाता त्या मुलीच्या हृदयातुन आरपार गेली होती, तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता, दहशतवाद्यांनी CST वर केलेल्या हल्यात तुझ्या समोर, तुझ्या मिठीत मोनिका ने डोळे मिटले.. याचा तुला मोठा धक्का बसला, आणि तेव्हापासुनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय....

 अवधूत  ने सांगितलेल्या या सत्याने मनोज च्या मनावर आघात झाला आणि तो बेशुद्ध पडला . जेव्हा मनोज ला जाग आली, तेव्हा तो एका अनोळखी घरात होता , अवधूत तिथे आला आणि त्याने मनोज ला बेड टी देऊन मॉर्निंग विष केलं आणि तो म्हणाला आजपासुन तु वर्षभर इथेच राहुन माझी ट्रिटमेँट घेशील, पुर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथुन जाऊ देणार नाही मित्रा.. मनोज ने होकारार्थी मान हलवली, कारण मनोज ला अवधूत ने सांगितलं की  तो एक मानसिक रोगी आहे आणि अवधूत त्याला या रोगातुन बरं करु शकतो....

आज एका वर्षानंतर मनोज त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तेच गुलाबाचं फुल घेऊन. नाही तसं काही नाहीये तो पुर्ण बरा झालाय .. मनोज ला माहिती आहे मोनिका आज येणार नाही. आज मोनिका चा स्मृतीदिन आहे, हे फुल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी मनोज ने आणलंय एक आठवण म्हणुन......

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे (देवरुख - रत्नागिरी )...