सांग ना...

सांग ना
पहाटेच्या प्रहरी
कुरवाळणार्या त्या धुक्याच्या गर्दीत
हातात हात घेऊन
एक वचन देशील...??!
तू नेहमी माझाच राहशील ना...??!!
अगदी काहीही झालं तरी
आपलं नातं नेहमी जपशील ना...??!!!
नजरेच्या भाषेला
शब्दांचा आधार देशील ना...??!!!!
अडखळलेल्या वाटेवरती
हाता हात घेऊन सोबत चालशील ना...??!!!!!
माझ्या स्वप्नांना
तू ही जीवापाड जपशील ना...??!!!!!!
हिरमूसलेल्या माझ्या मनाला पुन्हा
आनंदाने जगणं शिकवशील ना...??!!!!!!!
माझा वेडेपणा,राग,माझ्यातला बालीशपणा
न कंटाळता समजुन घेशील ना...??!!!!!!!
माझ्यातल्या “ मला ”
कधी अंतर नाही देणार ना...??!!!!!!!!
अंगणात उभी राहून तुझी वाट बघतांना
येताच क्षणी मला एक
घट्ट मिठी देशील ना...??!!!!!!!!!
रोज माझ्या केसांत माळण्यासाठी एक गजरा आणशील ना...??❗❗❗❗❗❗❗❗❗❗
© एकज वर्णिक
( शिवानी )