Login

प्रेम

Love

ओंजळभर प्रेम मागितलं
तू हात मागे लपवलेस

तुझ्या ओठातली साखर मागितली
तू ओठ मुडपून घेतलेस

तुझ्या डोळ्यांत पाहत होतो
तू डोळे मिटून घेतलेस

तुझा नकार समजून निघालो
तू मागे वळून पाहिलेस

मीही वळलो नेमका तेव्हाच
तू जीभ दातांनी चावलीस

मी माझे हात विस्तारता
अलगद मिठीत सामावलीस

--सौ.गीता गजानन गरुड.