प्रेम-निस्वार्थ की स्वार्थी

Love Selfless Or Selfish

भाग - ४

निशा , तर खेळ असा आहे की ,
आपण दोघेही एकमेकांना प्रश्न विचारणार..
एकापाठोपाठ एक ...आणि जो खर उत्तर देणार तो डाव हरणार पण जो खोटं उत्तर देणार तो जिंकणार ..
पण जिंकल्या नंतर मात्र बक्षीस हवे बर का! .... समीर.
हो हो आला मोठा शहाणा! खेळ तर मीच जिंकणार. चल सुरू कर ...... निशा
समीर - तुझा नाव काय आहे?
निशा - सरिता.
समीर - वाह...
निशा - तू कुठे राहतोस?
समीर - अमेरिका .
निशा - हो मग तू काय मला एवढं साधं समजलास ...हळू हळू बघ काय होतं.
समीर - बर बघु चल. बर प्रश्न किती झाले ?
निशा - दोन.
समीर - आता खर बोललीस की! तू तर डाव हारलीस.
निशा - ए नाही ..असा नाही परत एकदा परत एकदा . पहिला डाव देवाचा समझुन सोडून दे ..ना समीर.
समीर - बर बर चल पण आता हारलीस तर हारली बर का!
निशा - हो हो ...
समीर - निशा तू कुठे काम करतेस?
निशा - मी हॉस्पिटल मध्ये.
निशा - समीर तू एक उद्योगपती आहेस ना!
समीर - नाही ...नाही निशा मी एक गेंगस्टर आहे.
निशा - अरेच्चा! मी तर पोलीस आहे मग!
समीर - निशा किती प्रश्न झाले ?
निशा - २०
समीर - तुला मी आवडतो का?
निशा - नाही .
निशा - तुझी कोणी प्रेयसी आहे?
समीर - हो... मग .
समीर - मग तुला आतापर्यंत कोणी आवडले का ?
निशा - हो .
निशा - मग मी आवडते की नाही ?
समीर - नाही .
समीर - निशा तू माझ्यावर प्रेम करतेस का?
निशा - नाही .
निशा - समीर तुला कधी प्रेम झाल कोणावर ?
समीर - नाही.
समीर - निशा तुझा पूर्ण नाव काय ग?
निशा - निशा पाटील.
समीर - येस...निशा तू हारलीस आणि मी जिंकलो आता माझा बक्षीस.
निशा - यार...बोल काय हवंय तुला?
समीर - निशा , हा खेळ तर चालूच राहील . पण आता मला तुला एक सांगायचं आहे . पण मला तुझे मन जाणून घेणे जास्त गरजेचे आहे .मी बोलू का?
निशा - हो .. बोल ना समीर .
समीर - निशा , मला तू आवडतेस पण मी अजून वाट नाही बघु शकत तूला सुद्धा माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तू मला सांगावे अशी माझी इच्छा आहे किंवा माझा बक्षीस समझुन घे.
निशा - समीर, मला पण तू आवडतोस मी पण तुझ्यावर प्रेम करते. फक्त एक मागणं करते माझा विश्वासघात कधी करू नकोस .
समीर - अग निशा ...मी तुझ्यावर प्रेम करतो ग.तुझा विश्वासघात करायचा विचार मी स्वप्नात सुद्धा नाही करू शकत.
निशा - ठीक आहे . समीर मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला जपण मात्र तुझ्या हातात आहे.
समीर - नक्कीच निशा , मी नक्कीच जपणार. चल याच आनंदात तुला माझ्यासोबत एक डान्स करायला आवडेल का?
निशा - हो नक्कीच. पण गाणे माझ्या आवडीचे असणार . मंजूर?
समीर - मंजूर...मॅडम.
आणि दोघेही हसत हसत डान्स करू लागले .
नृत्य...कदाचित दोन लोकांमधले अंतर कमी करण्याचा एक उत्तम पर्याय...
दोघेही नृत्यामध्ये इतके गुंग झाले की वेळेचे काय पण कशाचेच भान त्यांना राहिले नाही....
हळू हळू दोघांमधले अंतर कमी होऊ लागले..
आणि निशाचे ते मोकळे केस...
तिची ती व्याकूळ नजर ...
तिचे ते दीर्घ श्वास..
तिचे ते गुलाबी ओठ...
आणि त्यात तिने परिधान केलेला तो ड्रेस....
समीरने निशाला इतके जवळून कधीच पाहिले नव्हते.
आणि आता तो तिला जितका जवळून बघत होता तित्तकाच तो तिच्याकडे आकर्षित होत होता..
मनाचा बाण त्याने खूप वेळ रोखून धरला पण तो एक क्षण ..
ज्यावेळी निशा तोल जाऊन त्याच्या हातांमध्ये अडकली होती.
हाच तो क्षण आणि समीरच्या भावनांचा बाण सुटला आणि त्याने अलगद तिला जवळ घेऊन मिठी मारत चुंबन घेतले...
एवढ्यात निशाने त्याला दूर केले.
तिचे असे वागणे समीरला समजले नाही पण कदाचित आपण तिला दुखावले आहे हे त्याला समजले...
समीर, हे काय केलेस तू ? मी फक्त हो बोलली होती . आणि तू लगेच असे वागलास ..नाही समीर मला हे आवडले नाही .
निशा अगदी कावरीबावरी होऊन उत्तरली.
निशा, मला माफ कर ! पण मी काही चुकीचं करू इच्छित नव्हतो.पण काय करू तू पहिल्यांदा एवढी जवळ आलीस आणि मी स्वतःला आवरू नाही शकलो ग! मला माफ कर निशा.
ऐक मी तुला घरी सोडून देतो ..आपण यावर उद्या बोलू.
समीर बाजू सावरत बोलला.
नाही , समीर...नको मी जाते ...आणि निशा निघून गेली.
समीर तिच्या मागोमाग गेला पण निशा एवढी घाईमध्ये निघाली की समीरला तिच्या जवळ पोहचणे थोडे अवघड झाले अखेरीस ती घराकडे निघून गेली...आणि समीर सुद्धा रूम मध्ये परतला.

🎭 Series Post

View all