Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

हरवलेला संवाद ( गोष्ट छोटी डोंगराएवढी )

Read Later
हरवलेला संवाद ( गोष्ट छोटी डोंगराएवढी )


गोष्ट छोटी डोंगराएवढी – हरवत चाललेला संवाद

हरवलेला संवाद

कथेची नायिका- आसावरी
कथेचा नायक – अभिजित.......


"आसावरी ते फक्त माझे आईवडील नाही राहिलेत आता. ते आता तुझेही सासू - सासरे होणार आहेत. मी तुला या आधीही सांगिलेले आहे आणि आजही सांगतो. मी वेगळे राहणार नाही. ज्यांनी मला वाढवले त्यांना त्यांच्या म्हातारपणी असे एकटे सोडणे मला पटत नाही आणि पटणारही नाही. माझ्याशिवाय त्यांना कोणीही नाही."
"मग माझ्याही आईवडिलांना माझ्याशिवाय कोणीही नाहीयेय. मी का म्हणून माझे घर सोडून तुझ्यासोबत यायचे?" आसावरी म्हणाली........( आसावरी – अभिजित मधला संवाद )

अभिजित च्या मित्राची मैत्रीण ही आसावरी...... अभिजित ला आसावरी आवडायला लागली.. अभिजित ने आसावरी चा मोबाईल नंबर मिळवला, ओळख झाली. बोलणं वाढलं. सवय झाली. एकमेकांशिवाय राहणं कठीण झालं. मनातल्या विचारांना दोघांनी मिळून \"प्रेम\" असे नाव देऊन टाकलं. 4 वर्षाच्या नात्याला घरच्यांनी हॊ नाही करत परवानगी दिली आणि लग्नाची तारीखही ठरवली. आणि साखरपुडा झाला,

आसावरी तुला भेटायचं आहे मला तुला आज.भेटशील? रोजच्याच जागेवर. गार्डन मध्ये दुपारी भेटू. येशील ना?" अभिजित म्हणाला
"चालेल. येईन मी वेळेवर.- आसावरी म्हणाली.

दुपारची वेळ. आसावरी - अभिजित गार्डन मध्ये बसले होते.
लग्न होतंय. खरंच नाही वाटतं आहे ना . मी खूप खुश आहे. बोल ना तू का शांत बसलायस?"आसावरी म्हणाली..
"मीही खूप खुश आहे. पण, खूप खुश असलो ना की काय, कसं, किती आणि कुठवर बोलायचं ते कळत नाही. तसं झालंय माझं. शांत बसून सगळं फील करतोय मी. अभिजीत म्हणाला.

आसावरी सुख कधी मोजताच येत नाही ना? खूप मोठं असतं ते.

"अभिजीत आपलं मस्त टुमदार घर हवं. फक्त आपल्या दोघांचं. तू ऑफिसला जाशील. जाताना मी दारावरून तुला बाय करेन. . मी घरी संध्याकाळ होण्याची वाट पाहीन. संध्याकाळी दाराशी उभी राहीन. तूही येशील घरी घाईघाईने. आल्यावर घर कसं एकदम उजळून निघेल. सगळं कसं मस्त मस्त असेल ना?"आसावरी म्हणाली.
आपण लग्नानंतर तुझ्या आईवडिलांसोबत रहायचेय का? मी तुला आधीच सांगितले होते की आपले वेगळे घर हवे." आसावरी म्हणाली.

आसावरी अस कधीच होणार नाही आहे समजल तुला......अभिजित संतापून बोलला...


"तू मुलगी आहेस आसावरी . आपली मुलगी लग्न करून परक्याच्या घरी नांदायला जाणार आहे याची जाणीव आधीच असते आईवडिलांना. मी मुलगी आणि मुलगा यांच्यात तुलना करत नाहीयेय. पण काही गोष्टी आहे तश्याच्या तश्या स्वीकाराव्याच लागतात. विरोध करणं सगळीकडेच कामाला येत नाही. मी असे म्हणत नाही की, तू तुझ्या आईवडिलांची काळजी करणे सोडून दे. मीही घेईन त्यांची काळजी. मदत करेन त्यांना"

"मदत फक्त पैश्यांचीच असते का रे? मानसिक आधार पण हवा असतो माणसाला. वेळ काही सांगून येत नाही. उद्या काही कमी जास्त झाले तर कोण असेल त्यांना मदत करायला?" आसावरी म्हणाली..
"पटतंय मला तुझं. पण तूही मला समजून घे. तू तुझ्या आईवडिलांना सोडून येणार आहेस म्हणून मीही माझ्या आईवडिलांना सोडून वेगळे रहावे हे योग्य आहे का? अभिजित म्हणाला..

आसावरी मी समजू शकतो तुला राजाराणीचा संसार हवाय. तुझ्यासोबतचा एकांत मलाही हवा आहे पण, जबाबदारी टाळून मिळालेल्या सुखाच्या मागे एक जखम असते. ही जखम कधी ना कधी उघडी पडतेच.
.
आसावरी मला माहितीय की, तुला राग येत असेल माझा. दोन क्षण शांत गेले. शांतता...भयाणच वाटते जेव्हा समोर बोलकी व्यक्ती शांत बसलेली असते.

आसावरी \"कुणीतरी आहे आपलं ज्याला आपल्या असण्या नसण्याने फरक पडतो\" ही भावना नेहमीच सुख देते.
आसावरी फक्त अभिजित चे बोलणे ऐकत होती.

आसावरी म्हणूनच वाटतं की, एका माणसाने दुसऱ्या माणसावर एक ठराविक हद्दीपर्यंत विश्वास ठेवावा. कारण समोरच्या व्यक्तीचे निर्णय शेवटच्या क्षणी अस्तित्वाच्या भांडणामुळे बदलले तरी त्याला दोष देण्याचा हक्क नसतो. \"त्याच्या जागी आपण असतो तर आपले निर्णय बदललेच नसते याची शाश्वती आपण देऊ शकतो का?\" हा प्रश्न स्वत:ला विचारावा. उत्तर मिळायला जितका उशीर लागेल ना तितकं महत्व असतं स्वत:च्या श्वासाला."
आसावरी ला ते ऐकून वाईट वाटत होते. पण सगळे पटतही होते.

"\"तू रागावू नकोस आसावरी "

"रागवत नाहीयेय रे. तू बोललास ते पटतंय मला. तू म्हणालास ना की, समोरच्याच्या जागी स्वत:ला ठेवले की समोरचा चुकीचा वागला असे कधी वाटतच नाही.

गरज वेळेनुसार बदलत असते..
पण मनाच्या अस्तित्वात मान-अपमान,आपल्यांची साथ,स्वप्न,इच्छा यांचं अढळ स्थान असतं. हे अभिजित ने आज आसावरी ला पटवून दिले आणि त्यामुळे च तिने सर्व घरातल्याना सांभाळून घेऊन एकत्र राहण्याची तयारी दाखवली.. आणि भविष्यात ती बखुबी निभावली ही...आज दोघ हि सुखाने संसार करतायत...

नमस्कार - सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे... ( देवरुख - रत्नागिरी )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology

//