मीनल चल किती काम करशील?"-त्रिशा "तू पुढे हो ,मला आज भूक नाही .काम पण खूप आहे ."मीनल
"तेवढ्यात समीर तिथे येतो ,"हेय गर्ल्स काय चाललंय ,चला भूक लागली आहे खूप .."-समीर
"हो ना चल तिला भूक नाही आपण तरी जेवू या "त्रिशा
"का ?काय झालं ?आज माझा मस्तपैकी जेवायचा मूड आहे .. चल मीनल लवकर "समीर
"नको रे जा तू , मला नाही जेवायचं .."-मीनल
समीर तिला खूप मनवतो शेवटी कस बस ती तयार होते ..
"हुश्श चल बाई लवकर .. टाईम संपत आला ."-समीर आणि ती दोघे कँटीन मध्ये येतात ..समीर ऑर्डर घेऊन येतो ..त्यात तो मिसळ घेऊन येतो ..
"चल घे ,थोडं खाऊन मग बोलू आपण .."समीर आणि मीनल खाऊ लागले .समीर ने मीनल ला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि तिला कळलं हि नाही कि तिने चक्क त्याची मिसळ फस्त केली ..तो तर तिला बोलण्यात अडकवून खाऊ घालत होता ...
"अरे हे काय मी खाल्ले सगळे ,तू तर तसाच राहिला .."मीनल
"पण पोट भरलय माझं .."-समीर तिच्याकडे बघत गालात हसत होता .त्याच्या चेहऱयावर समाधान होते .
असेच दिवसामागून दिवस सरत होते.
समीर नेहमीच मीनल ल हसविण्याचा, खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असे.
कधी कधी मीनल ला विचार येत असे," की हा असा का करतो?का नेहमी माझी काळजी करतो? त्याच्या मनात माझ्या बद्दल काही असेल का?
नाही नाही हे बरोबर नाही.. माझ्या सोबत राहून त्याला काही मिळणार नाही.. वेळीच आपण हे थांबवायला हवं.."
मीनल स्वतः शीच विचार करत होती. दुसऱ्या दिवशी तिने त्याला बऱ्याचदा टाळलं...अस एक दोन दिवस झालं. समीर ल जरा लक्षात आल होत की ती टाळते आहे पण का हे काही त्याला कळत नव्हतं.
आज मात्र समीर ने विचारायचं ठरवलं होत, "मीनल चल ना कॉफी घेऊ.. मला बोलायचं आहे तुझ्याशी.."समीर
मीनल च्या हृदयाची धडधड वाढली.. ह्याला माझ्याशी काय बोलायच असेल?..जे नको तेच होतंय.. मीनल विचारात गढून गेली होती..समीर फक्तं निरीक्षण करत होता.. त्याने तीला तांद्रितून बाहेर काढले.
"मीनल बरी आहेस ना?काय झालं? "समीर
"नाही, काही नाही अरे त्या नव्या प्रोजेक्ट च विचार सूरू होता "मीनल ने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
"ह्ममबरं चल कॉफी पिऊन येऊ.. कधीतरी विचार बाजुला ठेवावे "समीर
"समीर ऐक ना,"मीनल
"बोल ना, ऐकण्यासाठी तर जातोय आपण.."समीर
"काय?"मीनल ल काहीच कळले नाही..
"काही नाहि..मी म्हणालो नेहमी मीच ऐकतो आज तु ऐक ना.."समीर काही ऐकण्याच्या मुड मध्ये नव्हताच..
"समीर खरच मला थोडंसं काम आहे..आपण नंतर जाऊ या का?"मीनल
समीर ला कल्पना होतीच अस काही होईल.. त्याचा हिरमोड झाला,"मीनल,हे बघ नसेल यायचं तर नाही किँवा नको म्हणायला शिक.. तुझी चॉईस.. पण एक सांगतो. गोष्टी मनात साचवून ठेवल्या ना तर त्या कुजतात.. आणि गैरसमज निर्माण होतात... तुला जेव्हा बोलावं वाटेल तेव्हाच बोलू आता आपण.... त्यासाठि तुला रोज बहाणे करायची गरज नाही.."समीर एवढं बोलुन निघुन गेला..ती मात्र अवाक होऊन बघत राहिली..
असेच एक दोन दिवस निघून गेले.. समीर तिच्या समोरही आला नाही..तीला ही मनातून वाईट वाटत होत... पण तीला पुन्हा नात्यात अडकायच नव्हतं.. समीर ची सवय तीला ही झाली होती पण त्याच आयुष्य खराब होऊ नये असच तीला ही वाटतं होत.. समीर कामानिमित्त १० दिवस बाहेर गावी होता,
पण मीनल ला हे महित नव्ह्ते ..
१९ दिवस समिर तीला दिसलाच नाही.. पुन्हा तीच उदास संध्याकाळ.. अवि ची आठवण.तो तर केव्हाच तीला विसरला होता. तीला ही आता अवि बद्दल काही वाटायचं कमी झालं होतं.. घरी तिने कल्पना दिली तस सगळेच धक्क्यात होते पण कुठेतरी सगळ्यांना आस होती..
आज मीनल ला समीरशी बोलावं वाटतं होत.. आपण त्याच्याशी वाईट वागलो ह्यासाठी तीच मन तीला खात होत..आज पुन्हा आभाळ भरलं होत पण ते बरसणार कूठे हे माहीत नव्हतं..
तिला मनापासून समीरची आठवण येत होती.

क्रमशः
#जलद कथा लेखन
अनुराधा पुष्कर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा