भाग २
अविनाश तिला घरी सोडून स्वतःच्या फ्लॅट वर जातो ..दुसऱ्या दिवशी त्याला थोडं अस्वस्थ पणा जाणवतो .खुप दिवसांपासूनची त्याची दगदग ,रात्रीची पार्टी असं सगळं
गाठून आल्या मुळे कदाचित त्याला कामावर जायची इच्छा नसते ,तो घरीच असतो ..मीनल च आणि त्याचा फोन होतो ..मीनल अर्ध्या दिवसाची राजा टाकून त्याच्या फ्लॅट वर जाते आणि त्याला सरप्राइज देते .तिला पाहून तो खूप खुश होता .
आजही ती कालच्या प्रमाणे खूप छान दिसत असते ..
हलका पिवळा कलरचा ड्रेस त्यावर काळेभोर डोळे ,लांब केस उंच बांधलेले .तो तिच्याकडे बघत असतो ,आणि ती स्वतः च घर समजून सगळं आवरून नीट लावते ...तो हि तिच्या मागे बेडरूम मध्ये जातो ...आणि तिला मिठीत घेतो ..
मीनल ला हि मिठी नेहमीपेक्षा वेगळी जाणवते .ती त्याला दुर लोटते ,
"हे काय करतोस तू ?"-मीनल
"तुला माहित नाही ...तू खूप छान दिसतेस मीना .. काल तर एकदम नजर बाजूला होत नव्हती तुझ्यावरून ..."-अविनाश तिला परत जवळ घेत तिच्या कानात बोलतो ..
"हे बघ अविनाश आपल्या लग्नाला अजून काही दिवस आहे ..आपण थोडं थांबूया .."-मीनल
"मीनल मी तुला काही मागितलं नाही आजपर्यंत ,आणि लग्न तर होणारच आहे ...एकदा फक्त ..नाही म्हणू नको ....मीनल ऐका ना ..."-अविनाश तिला ओढतो ...आणि
एका क्षणासाठी ती सुद्धा भान हरपते ...तो एक क्षण खूप सुंदर ,नाजूक आणि प्रेमाची साक्ष देणारा असतो ..मीनल
त्याला आपलं सर्वस्व अर्पण करते ......जेव्हा ति ह्यातून बाहेर येते तेव्हा तिला काहीतरी चुकीचं झालं असं
वाटायला लागते ..ती स्वतःला दोष देत असते ....
अविनाश तिला समजावतो ......आणि म्हणतो ,
"मिनू यार ,काय करतेस ? प्रेमाचे क्षण आहेत आपले ..
पहिल्या प्रेमाचे ..तू त्याला वेगळा अर्थ काढून गुन्हा केल्यासारखा फील नको करून देऊ न ...आपण नेहमी सोबत असू ....विश्वास ठेव .."-
अविनाश ...
मीनल विश्वास ठेवते ....घरी जाते पण त्या दिवसानंतर
तिच्यात काहीतरी बदलत ..तिला सारखी कशातरी भीती वाटत असते ...बरेचदा अविनाश चा फोन लागत नसतो,
त्यावेलेस ति अस्वस्थ व्हायला लागते ....त्याचा कामाचा
लोड वाढलेला असतो आणि अशातच त्याला देशाबाहेर जाण्याची संधी आलेली असते ....
खाडकन दारावरची बेल वाजते आणि मीनल कालच्या आठवणीतून आजच्या जगात परत येते ....
मीनल हळूच डोळे पुसते आणि दार उघडते .
"अरे समीर तू ,ये ना ..बैस "-मीनल
"काही नाही ग ,आज सुट्टी होती तर इकडे त्या मॉल मध्ये आलो होतो .. म्हंटल तुला थोडं डिस्टर्ब करावं .."-समीर हसतच म्हणाला ..
"अरे डिस्टर्ब कसलं .उलट बरच वाटलं ... बैस मी कॉफी आणते".मीनल
" नको, जास्त कॉफी ने त्रास होईल.."समीर
"कॉफी पिऊन का आलास?.. इथे सोबतच घेतली असती "मीनल बसली सोफ्यावर
"मी तुझ्यासाठी म्हणतोय..तु आताच पिली न?"समीर
ने डोळ्यांनीच तीचा खिडकीत ला कप दाखवला.. तीला ही आश्चर्य वाटलं त्याचे निरीक्षणाच..
"काही ही... बरं बोल.. काय म्हणतोस अजून? काय काय केल आज?"मीनल
"काही नाही असच आलो.. बरं वाटतं कधी कधी तुझ्याशी बोलताना, तस नेहमीचं चांगलं वाटतं.."समीर
"हमम्.. बाकी ऑफिस मधे सध्या तुझीच चर्चा आहे..."मिनल थोडंसं हसतच
"का?काही खास?"समीर
"अरे एवढं मोठा प्रोजेक्ट मिळवला तु.. मॅनेजर खुशच एकदम "मिनल
"ते होय.. तुला माहित आहे मिनल मला माझं काम खुप आवडत.. खुप लोकांना भेटण्याचा, ओळखण्याचा अनुभव मिळतो ह्यातून..."समीर
समीर आणि मिनल च्या गप्पा सुरू होत्या. समीर आणि मिनल एकाच कंपनीत होते. समिर ल ह्या ऑफिस मधे येऊन ५ महीने झाले होते.
आज कुठेतरी भरुन आलेल आभाळ,न बरसतच पूढे सरकत होते... तब्बल तीन महिन्यांनी मिनल थोडी मोकळी बोलतं होती... मिनल आणि समीर खर तर खुप आधीपासून चांगले मित्र झाले होते..
समीरही मिनल आणि अविनाश च्या लग्नासाठी खुश होता.
मिनल ने अजुन कोणालाच काही सांगितले नव्हत.. अवी आल्यावर बघू असच ती म्हणत असे..
तिच्या घरी ही तिने हेच सांगितले होते.. पण समीर ला बहूतेक कुठेतरी पाणी मुरते हे लक्षात येतं होत..
दुसऱ्या दिवशीही नेहमीप्रमाणे कामे सुरू होती.आज समीर बाहेर कामासाठी जाणार होता म्हणून ऑफिस मध्ये तो नव्हता आणि मिनल ला अजूनच कंटाळा येऊ लागला होता. अविनाशला जाऊन ही ५ महिने होउन गेले होते.. सुरवातीला त्याचा फोन येत होता पण आता नाही.. मिनल ने आशा सोडली होती. पण पुढे काय हा प्रश्न खुप मोठ्ठा होता.
तीने खुप विचार करून अविनाश शी एकदा पुन्हा बोलून बघावं अस विचार केला आणि सगळी कामे संपवून तू संध्याकाळी घरी आली. आज मन लागतच नव्ह्ते.. असंख्य प्रश्न सूरू होते...
"तो बोलेल का? काय म्हणेल?कधी येइल परत?
तो नाहीच बोलला तर? फोन करू की नको?असेल नाही बरेच प्रश्न तीला पडले होते.
खुप विचारांती तिने फोन करायला घेतला.
तीची रात्र म्हणजे त्यांची सकाळ.. तीने कॉल केला पण त्याने नेहमीप्रमाणे उचलला नाही.ती हिरमुसली.. पुन्हा डोळ्यात आसवं जमा झाली..
उशीवर डोकं ठेवून रडू लागली..
"का.?. का?का अविनाश का? तु असा का वागतोय ते तरी सांग एकदा... काय चुकलं माझं? तुला जे हवं ते दिलं मी.. प्रेमात पुर्ण समर्पण.. पण तु मात्र अंत बघतोस माझा..."मिनल खुप रडू लागली... त्यातच तीला झोप लागली..
सकाळी उशिरा जाग आली.. पटकन उठून फ्रेश झाली.. आजची सकाळ काहीशी उदासच होती. पण काय करणार, विचार करून काहीही बदलणार नव्हतं...
तीने स्वतचं आवरलं आणि ऑफिस ल निघून गेली..ऑफिस मध्ये खूप काम होत ,ती फक्त एका मशीन सारखं काम करत होती ,लंच ब्रेक झाला आणि त्रिशा बोलवायला आली ..
क्रमश:

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा