बहरली प्रीत भाग १

प्रेम बहरते
बहरली प्रीत


सीमा पंधरा सोळा ची कोवळी मुलगी. तारूण्य सुलभ भावना हळूहळू तिच्याही जागृत व्हायला लागल्या होत्या. पण तिला नीटसे काही कळत नव्हते. तो समोर दिसला की सीमाला काहितरी व्हायला लागायचे. सारख अडून अडून त्याच्याकडेच बघत बसावे वाटे. सीमाला तिच्या भागातून काॅलेजला जाण्यासाठी कुणी मैत्रिणी नव्हत्या. तो तिच्याच बरोबर बसमध्ये चढायचा तो पण एकटाच असायचा, पण तो कुठे जातो, काय करतो, त्याचे नाव काय तिला काहीच माहिती नव्हते.

एकदा त्याचा मित्र बसमध्ये आला तिला नुसते नाव कळाले, अभी. ते पण अर्धवट. पण तिच्या मनात मात्र त्याचा नामजप सुरू झाला. तसा तोही हळूच हिच्याकडे बघत असे. त्यादिवशी कुणाचा तरी छक्का लागून हिची सॅक खाली पडली. दोघेही एकदमच सॅक उचलायला खाली वाकले आणि एकमेकांशी नजरानजर झाली. स्मित हास्याची देवाणघेवाण झाली. दुसऱ्या दिवशी पासून दोघेही रोज न चुकता एकमेकांना स्माईल देऊ लागले. एक दिवस त्याच्या शेजारची जागा रिकामी होती. मग ही त्याच्याजवळ जाऊन बसली. मग रोजच तो तिची जागा धरू लागला. दोघांची ओळख वाढू लागली. एकमेकांच्या माहितीची एकमेकांशी बोलणी झाली. तो तिच्या काॅलेज़जवळ काॅमप्यूटर क्लास करत होता. ही अकरावी सायन्सला होती. तो बारावी नंतर दोन वर्षाचा कोर्स करत होता.

एकदा दोघे काॅफी प्यायला गेले. टेबलवर समोरासमोर बसलेले. त्याने हळूच तिच्या हाताला हात लावला. तिच्या अंगातून वीज चमकून गेली. अभी म्हणाला " सीमा, खूप दिवसापासून तुला सांगायचे आहे. तू खूप सुंदर दिसतेस. मला तू खूप आवडतेस. I love you. Do you love me? "
सीमाने लाजतच ऊत्तर दिले. " हो, मी सुद्धा. " आणि तिने स्वतःचा चेहरा झाकून घेतला. नंतर परत त्याने तिच्या हातावर हात ठेवला. आणि म्हणाला, " मी खरचं तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. पण आपण हे इतक्यात कुणाला सांगायचे नाही. आपण आपल्या शिक्षणावर लक्ष देऊ. मग पुढचे. " तिच्या मनाला तो आणखीन भावला.

तिच्या मैत्रिणीकडे जाते सांगून ती घरातून बाहेर जाऊन त्याला भेटत असे. नेहमी ते काॅफी शाॅपमधे भेटत पण एकदा बागेत गेले आडोसा पाहून बसले. तो हळूवारपणे तिचा हात हातात घेऊन न्याहाळत होता. तितक्याच हळूवारपणे त्याने आपले ओठ तिच्या हातावर टेकवले. तिच्या हातावर कोणी मोरपीस फिरवत आहे असा भास तिला झाला. तिनेही हलकेच त्याच्या हातांवर ओठ टेकवले. " वेड लावलं तू अभी मला. मी सतत तुझाच विचार करत असते. आणि आता आईला मैत्रिणीकडे जाते सांगून बाहेर पडणे ही अवघड होते आहे. ".

" तीन वर्षे झाली आपण एकमेकांना भेटतोय. आता घरी सांगायला हवे. " सीमा.
" हं. आता ह्या महिन्यात माझे प्रमोशन होईल. पगार ही वाढेल मग सांगू. पण तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू. आता एकच वर्ष राहिले आहे. " अभि.

"हं. आणि मी नोकरी पण करणार आहे. आईला माझ्या शिवाय कोणी नाही. मी तिला बघणार लग्नानंतरही. तिने मला कसे मोठ केलयं हे फक्त तिला आणि मलाच माहिती. " सीमा.

" हो ग मानू. तुला माहिती आहे ना, तुझ्या आईलाही मी माझ्या आई सारखेच मानतो. " अभि.
त्याने तिच्या हातावर हलकेच थोपटले.

सीमेची शेवटच्या वर्षाची परिक्षा झाली. तिला तिच्या आईच्या ओळखीने जाॅबही लागला. आता दोघांनी घरी सांगितले. सीमाच्या आईची मान्यता होती पण अभि च्या आईवडिलांनी स्पष्ट नकार दिला.

आता पुढे काय होईल?

पाहू पुढच्या भागात.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all