Aug 18, 2022
प्रेम

स्वप्नातील गुलाब पुष्प

Read Later
स्वप्नातील गुलाब पुष्प

रेखाटलेले गुलाब पुष्प पाहताच मला सहजच आठवले

ते दिवस स्वप्नांमधील

मला प्रत्यक्षात तू कधीही न दिलेले ते गुलाब पुष्प

नकळतच स्वप्नात दिसले तुला आठवण्याकरीता

ते दिवस मनात साठवायचे आठवणींच्या रूपात

कधी तरी कोठेतरी उमटतात त्या आठवणींचे पडसाद

कधी स्वप्नात तर कधी प्रत्यक्षात

स्वप्न तर असतात डोळे मिटल्यावर बघण्यासाठी 

मात्र प्रत्यक्षात कधीही डोळे मिटून जगता येत नाही

कारण पापण्या मला तुला फक्त स्वप्नातच पाहण्याची परवानगी देत नाही

तू न दिलेले पुष्प फक्त स्वप्नातच का दिसावे म्हणून हाताने ही

पापण्यांची साथ दिली 

 रेखाटलेल्या सुंदर पुष्पांनी

तुला व मला जीवन जगण्याची खरी आस दिली

जीवन जगण्याची खरी आस दिली ??ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ojaswi Group