खरं प्रेम.. लघुकथा लेखन स्पर्धा

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या पेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यासोबत रहावं.

ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्नं होणं हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं गं. तू खूप नशीबवान आहेस की तुझ लग्नं तुझ्या प्रेमाशीच झालं.

मधु तिची मैत्रिण प्रियाला म्हणतं होती. त्यादिवशी दोघी मैत्रिणी भेटल्या त्याचं एक खास कारण होतं. मधुच लग्नं ठरलं होतं आणि त्यासाठीच दोघी भेटणार होत्या.

प्रिया मधुची बेस्ट फ्रेंड होती, त्यामुळे तिच्याशी बोलून मन मोकळं करावसं मधुला वाटतं होतं. प्रियाला पण तिची संतवणा करून नवीन आयुष्यजगण्यासाठी प्रेरित करायचं होतं.

मधु पुढे बोलू लागली, कुठं चुकलं गं माझं? जीवापाड प्रेम केलं त्याच्यावर, तुला माहित आहे ना कॉलेज मध्ये असताना पासून प्रेम करायचे मी त्याच्यावर, त्यानी सुद्धा कबुली दिली होतीच की प्रेमाची. तरी असं का वागला? मला सोडून दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला? मग माझ्यावर प्रेमचं नाही का केलं त्याने? फक्त टाईम पास केला का?

प्रिया तिचं बोलणं एकत होती, तिच्या खांद्यावर हात ठेऊन धीर देत होती, पण तिच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं प्रियाकडे नव्हती. तिला मनातुन त्याचा राग येत होता, कारण तो तिचा भाऊ होता, कसा काय वागला असा हा प्रश्न तिला पण होताच.

प्रियाने मधुला, खूप समजावलं त्याचा विचार नको करुस तो तुझ्या प्रेमाच्या योग्यच नव्हता, त्याला कळलच नाही की त्यांनी काय गमावलं आहे. पण तू आता पुढें बघ नवीन आयुष्य सुरू कर. प्रियाने मधु कडून वचन घेतलं की आता ती भूतकाळाचा विचार करणार नाही आणि पुढेच बघेल.

काही दिवसांनी मधुचं लग्नं झालं, ती लग्नंहून सासरी गेली, नवरा आय टी कंपनी मध्ये कामाला होता, त्यामुळे लवकरच त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली, लग्ना नंतर महिनाभरातच मधु अमेरिकेत गेली आणि तिथून सुरू झाला त्यांचा संसार.

महेश म्हणजे मधूचा नवरा, खूपच बोलका होता, त्यानी तिच्याशी मैत्रीचं नातं बनवलं, तो खूप समजदार होता, काळजी करणारा होता, कामावरून घरी आल्यावर तिला घर कामात सुद्धा मदत करायचा. हळू हळू तिला त्याचा स्वभाव आवडू लागला. त्याचा प्रेमळ स्पर्श तिला हवा हवासा वाटे, त्याच्या मिठीत शिरताना तिला जगाच भानच नव्हतं. टीव्ही बघणं, फिरायला जाणं, गाणी म्हणणं, आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या घरच्यांना सुद्धा तो आपलं म्हणत असे.

त्यांच्यातल नातं घट्टा झालं होतं, ते एकमेकांच्या प्रेमात पडले होतें, आणि तिला आता तिच्या भूतकाळाची आठवण सुद्धा येत नव्हती. त्याच्या प्रेमात ती पूर्ण विरघळली होती.

एकदा मधु आणि महेश फिरायला निघाले होते. नवीन असल्यामुळे तेव्हा त्यांच्याकडे कार नव्हती, ते मेट्रो ने फिरतं असतं, त्या दिवशी पण असच फिरायला निघाले, जेवणाची वेळ होत आली होती आणि फिरून भूक पण लागली होती, दोघे मेट्रो स्टेशन समोर आले, महेश म्हणाला आपण इथून फूड पॅक करून घेऊ आणि जवळच्या पार्क मध्ये बसून खाऊ. तू इथेच थांब entrance मध्ये मी येतोच समोरच्या food corner मधून parcel घेऊन. ती हो म्हणाली आणि मेट्रो स्टेशनच्या entrance मध्ये थांबली. साधारण १५-२० मिनटने महेश परत आला, पण मधु तिथे नव्हती.

त्यांनी थोडं आजूबाजूला बघितले पण ती दिसली नाही. मग मात्र त्याच्या मनात भिती निर्माण झाली, तो वेड्यासारखा तिला शोधत होता. फोन करत होता पण ती फोन पण उचलत नव्हती, त्यामुळे तो अजूनच अस्वस्थ झाला. कावराबावरा होत सगळीकडे तिला बघत होता. 5 मिनटात त्यांनी आजूबाजूचा परिसर पालथा घातला. त्याला आता रडूच येत होतं, मनात स्वतः ला कोसत होता. का सोडलं तिला एकटीला, एकतर नवीन ठिकाण काही बरा वाईट झालं नसेल ना... नाही नाही अस नाही होणार.. मग गेली कुठे, फोन पण नाही उचलत. आता कुठे शोधू तिला? असे असंख्य प्रश्न एकाचवेळी डोक्यात पिंगा घालत होते.

तितक्यात त्याच्या पाठीवर हळूच एक थाप पडली, त्यानी वळून बघितलं, ती मधु होती, तिला बघताच त्यानी तिला घट्ट मिठी मारली. तिला कळत नव्हते काय झाले ते. त्याच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या. तिला मिठीतुन बाजूला करत तो म्हणाला, कुठे होतीस किती कॉल केले तुला, सगळी कडे बघितले कुठेच दिसत नव्हतीस.

मधुने त्याचे डोळे पुसले, अरे मी इथेच होते, समोरच्या गिफ्ट शोप मध्ये हा couple चा globe दिसला , तुझी वाट बघितली पण तुला यायला वेळ लागेल असं वाटलं म्हणून मीच गेले घ्यायला. तो ग्लोब पुढे करत ती म्हणाली. त्यांनी तो globe हातात घेतला, छान आहे म्हणाला. पण मग फोन तर उचलायचास त्यानी परत प्रश्न केला.. मधु म्हणाली अरे विसरलास का मी सकाळी फोन आणायचं विसरले होते, तुला सांगितलं होतं की फोन घरीच राहिला गडबडीत.

त्यानी परत तिला मिठी मारली, आणि म्हणाला.. अस नको जात जाऊस न सांगता, माझा जीव आहे तुझ्यात, तुला काही झालं तर मी जगूच शकणार नाही.

मधुने त्याला वचन दिलं की परत अस नाही घडणार. त्यादिवशी तिला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळला. मनात स्वतः ला नशीबवान म्हणाली.

घरी गेल्यावर त्याने तो globe त्यांच्या बेडरूम मध्ये ठेवला. त्याच्याजवळ एक छान मंद लाईट लावला. त्यात तो globe अजूनच छान दिसतं होता.

त्यानंतर...

एक दिवस तिने प्रियाला फोन केला, तिला सगळं सांगितलं आणि म्हणाली, जे प्रेम मला हवं होतं ते मला मिळालं. खूप खुश आहे मी. तू काळजी करू नकोस. मला माझा खरं प्रेम मिळालं आहे, प्रेम करणारा व्यक्ती मिळाला आहे. प्रेम करणं आणि ते निभावणं हे महेशकडून शिकावं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या पेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यासोबत रहावं.


धन्यवाद....