Love : Sky is not the limit 3

समिरादण्या

भाग 3 

चला निघायचं ......सगळेजण...... पटापट...... रिसेप्शन काऊंटरवर पैशांच्या दोन बंडल ठेवत आज्ञा एका बोटाने बाहेर निघा ॲक्शन करत बोलली...... आणि हो बाहेर काही कळता कामा नये लक्षात ठेवायचं....... निघ आता

तेला आणि तिच्या सोबत आलेल्या बॉडीगार्ड ला बघून  सगळे  बाहेर पडले......

तरीसुद्धा एक मुलगा तिथे एक्सरसाईज करत बसला होता.......

ये हिरो तुला वेगळं सांगावं लागेल का..... चला निघायचा पटकन इथून....... आज्ञा

हे बघा मॅडम माझ्याकडे मेंबरशिप कार्ड आहे मी माझं एक्झरसाइज पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही .....तो मुलगा बोलला

ओ हड्डी पैलवान........ आधी जाऊन काहीतरी खावा.... मग या एक्झरसाइज करायला, एका दिवसात काय तुमचे सिक्स पॅक्स बनणार नाहीयेत....... आज्ञा तिच्या बॉडीगार्ड ला इशारा करत बोलली

बॉडीगार्ड ने समोर येऊन त्याला उचलून बाहेर नेले......

जीमचे डोअर लोक झालं....

समीर जिमच्या सगळ्यात लास्ट कॉर्नरला पुशप करत होता त्याचं तिकडे काय चाललं लक्ष नव्हतं.......

अज्ञाताच्या साईडला जाऊन ..... आपले दोन्ही हात फोल्ड करून   भिंतीला टेकून उभी राहिली.....

wow ...... वरकाऊट करताना काय भारी दिसता राव तुम्ही..... काय ते मसल्स... काय ते बायसेप.... त्यातल्या त्यात या ब्लॅक स्यांडो अँड ग्रे ट्रॅक पॅन्ट..... रोज अशी सकाळ झाली तर आपणा तो दिन बन जायेगा...... आज्ञा सिटी मारत समीर कडे बघत होती.....

तिच्या आवाजाने तो पुशप मारायचा थांबला..... आणि उठून उभा राहिला.....

व्हॉट डू यु मिन...?...... समीर नॅपकिन त्याचा घाम पुसत बोलला नी इकडे तिकडे बघायला लागला तर त्याला यांचे मध्ये कोणीच दिसले नाही......

अहो सोप्या शब्दात बोलले समजलं नाही तुम्हाला........ खुप हॉट दिसत आहात म्हणत होते....

एस्क्युज मी....... त्याचं ग्रे जॅकेट घालत बॅग उचलत तो जायला निघाला......

रॉकी हे काय कोणीच कसं काही नाही इथे...... तो रिसेप्शन जवळ जात बोलत होता..... बघतो तर काय तिथे पण कोणीच नव्हतं......

रॉकी नाही येथे.... फिरायला गेलाय तो .......ती त्याच्या जवळ येत बोलली

तो तीच काही ना ऐकता बाहेर जाऊ लागला...... तिथे एका चेअरवर बसून त्याची हालचाल बघत होती.......

व्हॉट द हेल........ डोर लॉक कोणी केलं..... तो डोअर ल्याच वर-खाली उघडण्याचा प्रयत्न करत बोलला.....

दार उघडण्याचे कष्ट नका घेऊ ..ते आता हे एक तास तरी उघडणार नाही............ आज्ञा

ओह गॉड..........आता त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला होता....... त्याने डोक्यावर हात मारून घेतला

काय भेटते तुम्हाला हे सगळं करून ......... समीर डोक्यावर आट्या पाडतच बोलला

तुम्ही भेटताना........ आज्ञा मिश्किलपणे हसत बोलली...

किती दिवस झाले तुम्ही दिसला नाहीत..... तुम्हाला बघता नाही आलं............ कितीही प्रयत्न केला बोलायचा तरी सुद्धा तुम्ही बोलत नाही......... काय करणार राव तुमच्यासाठी हे सगळं करावे लागते....... आज्ञा

तो काहीच बोलला नाही आणि पलीकडे एका चेअरवर जाऊन बसला....... त्याने बॅग मध्ये फोन चेक केला..... त्याच्या लक्षात आले आज तो फोन घरीच विसरला होता.......

चला डॉक्टर समीर..... बसा येथेच एकटाच काहीच सोलुशन नाही आपल्याजवळ....... त्याने तिथला एक मॅगझिन घेतलं आणि तो वाचत बसला.......

आज्ञा त्याच्यासमोरच सिटी मारत बसली होती....

हम तुम एक कमरे में बंद हो
और चाबी खो जाए
तेरे नैनो की भूल भुलैया मे
आज्ञा खोजाये...... हम तुम एक कमरे में बंद हो...... आज्ञा

त्याने मॅक्झिन मधून एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि दुर्लक्ष केले......

मी काय म्हणते डॉक्टर तसे तुम्ही एक्झरसाइज करतच होता तर ती अर्धवट सोडण्यापेक्षा पूर्ण करून घ्या....... तेवढेच मला आई टॉनिक भेटेल...आपल्या पेशंट कडे लक्ष द्यायला हवे तुम्ही........ आज्ञा मिश्कीलपणे चिडवत बोलली..

किती निर्लज्जपणा करता तुम्ही...... हे शोभते का तुम्हाला.... समीर

पहिले तर तुम्ही मला हे तुम्हाला आम्हाला बोलणं बंद करा...... खूप म्हातारा झाल्यासारखं फिलिंग येते......... आप को देखा तो हम जवान हुये है ........दिलं का धडकाना क्या होता है अभी तो समझने लागे है हम......दिलं के डॉक्टर...... आज्ञा

आणि निर्लज्जपणाचा बोलाल तर आम्ही खूप संस्कारी आहोत तुमच्या शिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलाला डोळे वर करून पण बघत नाही....... तुम्ही समोर दिसले की आम्ही आमची सगळी लाजलज्जा विसरून जातो.......
हाय रे हे मोहब्बत....... आज्ञा

तुमचं वय काय ......आहे तुम्ही बोलताय काय..... तुमच्यासारखी मुलगी मी आज पर्यंत बघितली नाही.... समीर

आणि कधी बघणार ही नाही......मी माझ्या सारखी एकटीच एक....... आज्ञा डोळा मारत बोलली

आता हे फ्लर्ट करन बंद कराल का.... समीर

तुम्ही हो बोला.................. तुम्ही जे बोलाल ते करेल मग...... किती दिवस झाले तुमच्या मागे मागे. ..करते आहे .......तुम्ही साधा डोळे वर करून सुद्धा बघत नाही मला........ तुमचं heart आहे की मेल्ट होतच नाही....... दील का डॉक्टर किसने बनाया आपको..... आज्ञा

मला तुमच्या सारख्या मुलीमध्ये काहीही एक इंटरेस्ट नाही आहे...... मुळात मला या फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे......... समीर

असं नका बोलू डॉक्टर किती हार्ट ब्रेक करता माझे..... तुम्ही इंटरेस्ट घ्याल हो .....प्रॉमिस आहे माझे..... मी माझे प्रयत्न सोडणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ........आज्ञा हसत बोलली

माझ्यामागे येना बंद कर आणि हो तुमचे ते चमचे सुद्धा माझ्या मागे पाठवू नका....... समीर

डॉक्टर तुम्ही बिझनेस मध्ये खूप दुश्मन ओढावून ठेवले आहात....... काळजी घ्या.... आज्ञा

तू माझ्या लाइफ मध्ये इंटरफियर  करू नकोस...... माणिक बद्दल मला सगळं कळलं...... माझं मी हँडल करू शकतो, तुला यात लक्ष घालायचे काहीही एक गरज नाही आहे..... समीर

काय हो डॉक्टर किती राग येतो तुम्हाला .........थोडं.. तरी प्रेमाने बोलून बघा बरं वाटेल तुम्हाला........ आज्ञा

समीर घाम पुसत बसला होता......

गरम होत आहे नाही......... तुम्ही जॅकेट काढून बसू शकता....... मी तुम्हाला काहीही करणार नाही......... आपकी मर्जी के सिवा हम आपको कुछ नही करेंगे प्रॉमिस है हमारा आपको............. फक्त बघेल...... आज्ञा नाटकी सुरात डायलॉग मारत बोलली...

इम्पॉसिबल..... तिच्याशी बोलून काही फायदा नाही.......
मनातच.... मान हलवत त्याने मॅगझिन वाचना कंटिन्यू केले......

विश्वास ठेवा हो........ ना हम कुछ करेंगे और ना किसी और को कुछ करने देंगे........ ये वादा है हमारा आपसे........ आज्ञा

मिस....... प्लिज तुमच्या त्या कोणाला कॉल करून सांगा आणि दार उघडायला लावा उशीर होतोय मला हॉस्पिटलमध्ये जायचं.... समीर

आपका हुकूम सर आखो पर डॉक्टर........ तुम्हाला प्लीज म्हणायची गरज नाहीये........ हातात फोन घेऊन ती काही बोलली..........तेवढ्यात रॉकीने दार उघडलं आणि तो आत मध्ये आला.....

समीर ने आपली बॅग उचलली आणि तो दारातून बाहेर जायला निघाला...

नाईस टू मीट यू डॉक्टर........ परत लवकरच भेटू ...........त्याच्यामागे जात आज्ञा बोलली.....

तेवढ्यात त्याला भिंतीला काही आपटण्याचा आवाज आला त्याने मागे वळुन बघीतले...... तर एक मुलगी भिंतीवर आपटली होती आणि ती आपल्या डोकं चोळत होती....... ही ticच मुलगी होती जी एकटक त्याला बघत येत होती आणि  त्याला बाहेर पडताना धक्का लागला होता...... जो त्या मुलीने मुद्दाम त्याला धक्का दिला होता...... समीर तिला सॉरी बोलून पुढे गेला होता

आज्ञाने पाय अडकून तिला भिंतीवर पाडले होते.......

समीर ने मागे वळून बघताच आज्ञा नेत्याला एक डोळा मारला आणि हसली....

डॉक्टर नेक्स्ट टाईम व्हाइट संडो t-shirt घालाल हो.......फारच हँडसम दिसत होत व्हाईट मध्ये.......... हेल्मेट घालत.....तिची रॉयल एनफिल्ड घेऊन पळाली....

हिचं काहीतरी करावं लागेल........... डोक्यात जायला लागली आता ही...त्याने डोक्यावर हात मारला आणि तो गाडीत जाऊन बसला.......

********

क्रमशः

🎭 Series Post

View all