Love: sky is not the limit ४

समीर आज्ञा

भाग ४
 

हॅलो...... समीरने रिंग होत असणारा मोबाईल उचलला

डॉक्टर डॉक्टर दील के डॉक्टर अवेलेबल आहेत का..... आज्ञा

तुम्ही.....?......... समीर फोन कट करणार तेवढ्यात

डॉक्टर फोन नाही कट करायचा हा...... नाहीतर मी तिथे येईल....... और हम जो बोलते है वो करते है..... हे तुम्हाला पण माहिती आहे......आज्ञा

तुम्ही असे किती नवीन नंबर ने मला कॉल करणार आहात....?...समीर

काय डॉक्टर तुम्ही पण ना....... तुम्ही किती असे माझे नंबर ब्लॉक करणार आहात.......... मी तुम्हाला सांगते तुम्ही माझा नंबर ब्लॉक करून थकाल आहात..... पण मी नवीन नंबर नाही तुम्हाला फोन करायला मात्र नाही थकानार..... कशाला उगाच तुमच्या हातांना त्रास देता माझा नंबर ब्लॉक करायला......आज्ञा

बोला काय  हवंय ......?हताशपणे समीर उत्तरला

तुम्ही.......? मिळेल का....... आज्ञा मस्करीत बोलले

मी काय वास्तु आहे काय तुम्हाला मिळायला.....समीर

बरं मग भेटाल का......आज्ञा

मुद्द्याचे काय ते बोला.....समीर

अहो मुद्द्याचा तर तुम्हाला कळतच नाही.....आज्ञा

कशासाठी कॉल केला होता.....समीर

कधी फ्री आहात...? आज्ञा

सध्या नाही......समीर

अहो डॉक्टर असे काय करता .....किती दिवस झाले जवळून बघितलं नाही तुम्हाला....... डेट साठी इन्व्हाईट करायचा माझा विचार होता.....आज्ञा

आणि मला नसेल यायचं तर........ मला अशा फालतू गोष्टींपेक्षा पण भरपूर महत्वाचे काम आहेत.......समीर

असे नाराज होऊन नका बोलू डॉक्टर....... मी कधी तुम्हाला कशाची जबरदस्ती केली आहे काय....... थोडा हसून बोलत जावा....... क्युट दिसाल..... हॉट आणि हँडसम लूक तर बघितलंच आहे तुमचं...... थोड क्युट लूक पण बघू द्या..... तसा तुम्ही आपल्याला सगळ्याच लूकमध्ये भारी आवडता हा डॉक्टर.....आज्ञा

तुमच महत्त्वाचं बोलून झालं असेल तर फोन ठेवू का मला बरीच काम आहेत......समीर

हो हो नक्की........ डॉक्टर आज लाईट ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही फारच डॅश डॅश डॅश दिसत आहात.... आज्ञा मस्करी करत बोलली

हिला कसं माहित आज मी लाईट ब्लू घातलाय..... इकडे तिकडे बघत तो चेक करत होता.......

इकडेतिकडे काय बघताय डॉक्टर..... थोडा साहेब रूदयात झाकून बघा की हो......आज्ञा

ठेवतो........... समीर ने फोन कट केला..

*******

समीर तु ही केस घेऊन चूक तर नाही करत आहेस ना........ एक प्रख्यात गुंड आहे तो...... डॉक्टर जोशी

नाही डॉक्टर.... माझ्यासाठी वाईट चांगलं काही नाहीये माझ्यासाठी तो फक्त एक पेशंट आहे आणि मी त्याचा डॉक्टर......समीर

याज  यु विष यंग मेन..... डॉक्टर जोशी

आज रविवार होता पण एक इमर्जन्सी केस आल्यामुळे समीरने एक हार्ट सर्जरी प्लान केले होते....

समीर हात धून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला आणि नर्सेस ला काही इन्स्ट्रक्शन सांगून तो त्याच्या केबिनमध्ये चालला गेला....

हॅलो राज बोल..... वाजणारा फोन उचलत समीर बोलला

कशी झाली सर्जरी ......राज

हा ठीक झाली ...शुद्ध आल्यावर कळेल डिटेल.....समीर

ओके गुड.......राज

बरं ऐक फ्री आहेस का...... जाम थकलो यार...... तू फ्री असशील तर बाहेर डिनरला जायचं का..... तेवढ्यात थोडा चेंज....समीर

हो चालेल जाऊया मला पण तसच बोर होतय... संध्याकाळी रेडी रहा मी तुला पिकप करेल...
..राज
 

ओके डन.... समीर

*****

फाईव्ह स्टार हॉटेल तथास्तु मध्ये समीर आणि राज दोघं डिनर साठी आले होते ..... तिथे मोकळ्या हवेत ओपन गार्डन रेस्टॉरंटमध्ये एका कॉर्नर ला बसले होते... त्यांच्या नॉर्मल गप्पा सुरू होत्या.

wow.... ब्युटीफूल......गॉर्जेस ..... वेरी प्रेटी...... असे शब्द त्यांच्या कानावर पडले...... राज आणि समीर ने entrance दिशेने बघितले...... आणि समीरने डोक्यावर हात मारून घेतला....

समोर आज्ञा उभी होती...... कुंकू रेड कलरचा... त्यावर फ्लावर्स डिझाईन असलेला knee length वन पीस कम फ्रॉक...... फ्रील स्लीवस..... केस हाय कर्ली करून मोकळे सोडलेले होते..... डोळ्यात सिम्पल चेन.... कानात वन डायमंड..... ओठांवर न्यूड कलर लिपस्टिक..... डोळ्यांवर डार्क आय लाइनर.... पायात हिल्स...... ती खुपच क्युट डॉल सारखी दिसत होती...... सगळा रेस्टोरेंट तिच्याकडे वळून बघत होता....... पण समीर मात्र तिला बघून डोक्यावर आठ्या पाडत मेनू कार्ड मध्ये चेहरा लपवत बसला होता.....

विश्वामित्र......... यार तुझी मेनका आली...... बघ यार कसली सुंदर दिसते ....... राज आज्ञा कडे बघत बोलला...

अरे ये बघतोस काय तिच्याकडे ......फेस लपव आपला..... नाहीतर येईल इकडेच........समीर

त्याच्या बोलण्याने राजला हसू आले......
पूर्ण रेस्टॉरंट मधले लोक तिच्याकडे बघताय आणि तू काय चेहरा लपवत बसलाय..... एवढी क्युट गर्ल ज्याच्या टेबलवर बसेल ......काय लकी असेल तो...... राज समीरची मस्करी करत बोलला

हो ना.... एवढी आवडली आहे तर घेऊन जा तिला दुसऱ्या टेबलावर...... मला खूप इरिटेट करते ती.....समीर

मी तर कधीच रेडी आहो...... पण ती आहे की तिच्या विश्व मित्राला सोडून दुसरीकडे कुठे बघतच नाही....... हाय रे ये किस्मत..... बघ ना यार तुझ्यापेक्षा स्मार्ट... हँडसम ....गुड लुकिंग... आहो मी..... पण मॅडम च काही लक्ष आमच्याकडे जातच नाही.....

तू आता मला इरिटेट करू नकोस........ कुठे रिलॅक्स व्हायला मी इथे आलो...... तर या मिस इथे येऊन टपकल्या..... माझ बॅड लक सुद्धा खराब आहे..... तिच्या चमच्यांना मी एखादवेळी  चांगला चोपून काढणार आहोत...... समीर वैतागत बोलत होता... राजला मात्र त्याचा खूप हसू येत होतं

किती घाबरतोस तु तिला......... कुणाला न घाबरणारा तू या एका मुलीला हँडल करू शकत नाही........राज

घाबरायचा प्रश्न नाही पण मला या कुठल्याच भानगडीत पडायचे नाही........ नॉर्मल मुलगी सारखी तरी वाटते का ती...... किती भयंकर आहे.... दोघा चौघांना मारल्याशिवाय तर तिचं जेवण नसेल पचत...... नॉर्मल लाईफ जगायची आहे मला..... रोज कोणते नवीन एडवेंचर्स करायचे नाही.............. दोघेही मेनूकार्ड आपल्या चेहरा समोर पकडत गप्पा करत होते....

हॅलो डॉक्टर्स......... व्हॉट a प्लीजअंट सरप्राईस.....आज्ञा त्या दोघांच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली...

ओ.... हाय मिस.... आम्ही पण सरप्राईज झालो...... कोणी बोलत नाही आहे बघून राज आपल्या चेहरा समोरचं मेनू कार्ड खाली ठेवत बोलला.....

may I ........thank you ......म्हणत आज्ञा समीरच्या समोरची चेअर ओढून बसली.....अजूनही समीर ने मेनू कार्ड त्याच्या फेस समोर धरून ठेवले होते...

हे hotty..... तुम्ही मेनू कार्ड खाली ठेवू शकता...... मी तुम्हाला तुमच्या सुगंधा वरूनच ओळखते तुम्ही कुठे आहात ते...... आज्ञा मस्करी करत बोलली

तिचं बोलणं ऐकून  राज गालात हसायला लागला...

काय कसे आहेत आमचे डॉक्टर... आज्ञा समीर कडे एकदा कटाक्ष टाकून .....राजकडे बघून बोलली.....

तुम्हीच विचारा...... समोरच आहेत ....राज

ते उत्तर देणार नाही.... हाय गॅरेंटेड ते मेनूकार्ड च्या मागे सुद्धा गाल फुगवून बसले असतील.... आज्ञा हसत बोलली.

करा हो ते खाली ....दिसू द्या तुमचा चार्मिंग फेस आम्हाला सुद्धा..... त्याच्या हातातला मेनू कार्ड काढत आज्ञा बोलली..

तुम्ही आज इथे कशी काय..... राज

ते मी आज डेटवर आले आहे.... आज्ञा

मग तुम्ही इथे काय करत आहे.... वाट बघत बघत असेल ना तुमची डेट..... राज

मी राईट प्लेस वरच बसले आहे..... आज्ञा समीर कडे बघत डोळा मारत बोलली

तुमची देट होती आज....? राज डोळे मोठे करत समीर कडे बघू लागला...

ना...नाही....मी अस काही कमिटमेंट नव्हती दिली कोणाला...मी कोणाला नव्हते बोलावले....समीर

जहा पिया वहा मै....मीच दिले होते स्वतहाला आमंत्रण...आज्ञा

काय डॉक्टर तुम्ही किती रिस्क घेता.... किती मोठा गुंड आहे तो ज्याची आज तुम्ही सर्जरी केली..... उगाच आपले दुश्मन वाढवून घेत आहात...आज्ञा

मी डॉक्टर आहे आणि मी एक डॉक्टर असण्याचा काम करत होतो ... समीर

तुम्हारई इसी अदा पर तो फिदा हम है......म्हणत ती त्याच्या जवळ जाऊन त्याला नमस्कार करायला वाकायची अक्टिंग करायला गेली..... आणि राजकडे बघून तिने डोळा मारला

ओ मिस... हे काय करताय तुम्ही समीर बसल्या जागेवरून उठून उभा राहिला..... तिच्या हरकत कडे आजूबाजूचे बघायला लागले..... समीरला खूप ओकवार्ड फील व्हायला लागल.....

तुम्ही माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हता...मग  काय करणार.....आता सगळे बघायला लागले....ती त्याची खोडी काढत बोलली..

तिने आजूबाजूला बघितलं....

अहो काय बघताय..... थँक यु म्हणते मी त्यांना... माझ्या हार्ट चे डॉक्टर आहेत ते..... जीवनदान दिलं त्यांनी मला..... नाहीतर हे हार्ट बंद पडणार होतं.... तर धन्यवाद करायला नको..... ती आजूबाजूला बघत बोलते.... सगळे मान हलवत आपल्या टेबल कडे वळले....ती परत आपल्या जागेवर जाऊन बसली ..

Sunday.... वरून इतकं रोमँटिक वातावरण इथे...काय मस्त हवा सुटलिये...आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत इथे....काय गडबड दिसतंय....की तुम्हाला पण मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाहीये ....डॉक्टर प्रमाणे ....आज्ञा राज ची मस्करी करत बोलली...पण मी डॉक्टरांसोबत कोणी दुसऱ्याला खपाऊन घेणार नाही हा ....

अहो मीस हे काय बोलताय... मी असा तसा नाही आहो....तुमच्या डॉक्टरांचं बघा काय ते ...राज

बरं तुम्ही द्या एकमेकांना कंपनी...मी बघतो माझ्यासाठी दुसरी कंपनी...म्हणत राज उठत होता....तर समीर ने त्याचा हाथ धरून त्याला परत बसवले...आपला प्लॅन आधी ठरलेला...बस इथेच..नाही तर सोबत जाऊया...समीर

येह डॉ राज तुम्ही बसा इथेच....मला काही फरक पडत नाही....माझा एकावरच Focus आहे....you don't worry....आज्ञा

तेवढयात वेटर ऑर्डर घ्यायला आला....

मिस तुम्ही द्या ऑर्डर....आजचे तुम्हीच आमचे स्पेशल गेस्ट....राज

बटर चिकन......आज्ञा ऑर्डर देत होतीच की ....

समीर वेजिटरियन आहे......राज

काय....हे घासपुस वाले आहात.....बापरे...कठीण जाईल  वेजिटरियन बनायला..पण काही हरकत नाही बनेल मी..... घासपुसवली.....आज्ञा डोळे मोठे करत बोलली..

मिस तुम्ही ऑर्डर करू शकता....मी देईल तुम्हाला कंपनी....राज

नाही नको.....मला फक्त एकाचीच कंपनी आवडते....ूसके लिये ये घासापुस क्या चीज है.... सारी दुनिया छोड सकते हम.........तुम्ही द्या ऑर्डर....आज्ञा

अगर तुम मिल जाओ....जमाना छोड देंगे हम
बिना तेरे कोई दिलकश नज़ारा हम ना देखेंगे
बिना तेरे कोई दिलकश नज़ारा हम ना देखेंगे
तुम्हें ना हो पसंद उसको दोबारा हम ना देखेंगे
तेरी सूरत ना हो जिस मेंतेरी सूरत ना हो जिस में
वो शिशा तोड़ देंगे हम.....अगर तुम मिल जाओ.....

आज्ञा समीर ला एकटक बघत गान गुणगुणत होती..
समीर मात्र टिश्यू पेपर वर काही ड्रॉइंग काढत बसला होता...

राज ने डोक्यावर हात मारून घेतला....यांचं काही होऊ शकत नाही.......त्याने जेवण ऑर्डर केले...

ह्यांना खरंच दिलं का डॉक्टर कोणी बनवलं हो डॉ राज.........आज्ञा

हा हा हा.... he likes to ट्रीट hearts....raj

seriously......... मग माझ्या ❤️ ची ट्रिटमेंट का करत नाहीत हे...anyways.....but he is so charming yaaar........ आज्ञा समीर सोबत flirt करत जेवत होती

तिघांनी जेवण केले....जेवण करतांना मात्र आज्ञा फक्त समीर ला बघत होती....आणि तिच्या अस एकटक बघण्याने  समीर ला मात्र जेवण घशाखाली जात नव्हते...कसेबसे पाणी पीत त्याने जेवण संपवले.....

जेवण आटोपून तिघेही हॉटेल चा बाहेर आले ......

थॅन्क्स फॉर द ट्रीट डॉक्टर राज ...आज्ञा

My pleasure... मिस... त्याने हांदशेक साठी हाथ पुढे केला..

आज्ञा .....call me आज्ञा ....म्हणत तिने राज ला हांडशेक केले...

समीर  त्याचे हाथ पँटच्या pocket मध्ये घालून उभा होता.......

तुम्ही का हे असा वागता आहात....का तुमचा वेळ वाया घालवत आहात.....समीर

तुमच्यासाठी......मला हे इथे जागा हवी आहे...त्याचा हृदयाकडे बोट दाखवत ती बोलली...

इम्पॉसिबल आहे ही ...समीर स्वतःशीच मान हलवत बोलला.....समीर

मिस आज्ञा तो खर बोलतोय....का तुम्ही त्याचा मागे तुमचा वेळ वाया घालवत आहात....तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही....मी ओळखतो त्याला...राज

कोणीतरी म्हटले आहे....
अगर तुम किसिको पुरे शिद्दत्से पाने की कोशिश करो तो
पुरी कायानात तुम्हे ऊसे मिलाने की कोशिश करती है...

मी एक पण चान्स सोडणार नाही.....ही मेनका या विश्वामित्र ची तपस्या नक्कीच भंग करेल.....

जाना...... गूड नाईट.... टेक केअर.....म्हणत फ्लाईंग किस करत ती कार मध्ये जाऊन बसली नी कर सुसाट वेगाने पळवली....

समीर ती गेली त्या दिशेने हताशपणे बघत उभा होता...

ती बरोबर बोलली तुला दिलं का डॉक्टर कोणी बनवले रे ....राज हसत होता...

seriously..... समीर एक भूवयी उंचावत बोलला

सगळच कठीण आहे डॉक्टर समीर......चला घरी....म्हणत राज कार घेऊन आला....
 

********

क्रमशः

🎭 Series Post

View all