या मनावर शतदा प्रेम करावे.. डॉ. अनिल कुलकर्णी

Love Yourself..


या मनांवर शतदा प्रेम करावे...
डॉ.अनिल कुलकर्णी.
मनाचा खेळ कधी कुणाला समजलेंत. स्वतःच्या मनाचे खेळ सुद्धा स्वतःला समजत नाहीत. आत्महत्या करणाऱ्यांच्या हातांतच असतो मनाचे खेळ थांबवण्याचा लगाम. कधी कधी परिस्थिती प्रवृत्त करते, कधी कधी मनंच मनांला प्रवृत्त करतं.
कॅनव्हास वर मनसोक्त रंगाची उधळण करत सुंदर चित्र काढता येतं. सुंदर क्षणांची उधळण करुन वेगळे वेगळे क्षण सभोवताली गोळा करता येतात. क्षणांची रांगोळी काढून, मनासारखे रंग भरता यायला हवेंत. चित्र पुसता येतें, रांगोळी ही पुसता येतें. क्षणांना पुसलं कीआयुष्य संपतं.
सुखाचा इंद्रधनू पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, बघायचा असतो, तो ओरबडायचां नसतो. सुख हे अनेकरंगी असतं. प्रत्येक रंग माणसाला ओरबाडून हवां आहे. सत्ता, कीर्ती, पैसा वासना, प्रेम,समाधान, यश
हे सगळं यशाच्या इंद्रधनूंत असतं. एका वेळेस एकच मिळेल व ते भोगावं.
आत्महत्या करणारे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी असतांतच. यशानंतर दोन रस्ते असतात,समाधान व हीनैराश्य.
नैराश्याच्या रस्त्यावर आत्महत्या भेटतें.
यशोशिखरावर असणारे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा खरंच समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.
मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होई पर्यंत मनाचं ऐकत राहतात.
मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच उत्तम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. मन आवाक्यात नसलें की मनात अनेक समस्या घर करतात. मनाला कळणं आणि वळणं याचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. कुणाचं मन कुणावर जडेल याचे काही ठोकताळे नाहीत.प्रत्येक क्षण विविध रंगात न्हाऊन निघालेला असतों आणि तोच मनाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. \"दुखी मन मेरे
जहा नही चैना वहा नही रहेना\" असं म्हणलंच आहे. क्षणांना जिंकलं की आयुष्य आपलंच असतं.क्षणांना जिंकता यायला हवं. तुमचा अखेरचा श्वास ठरवतो क्षणंच.
मनातल्या तरंगावर आपलं नियंत्रण नसतं. तरंग आपले नसले तरीही अंतरंग आपलंच असतं.आपल्या अंतरंगात आपण कधी डोकावतंच नाही, आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळतें तुमच्या मनाची राख करतें. सारखंआरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तुत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.मनाचा थांगपत्ता लागू न देण्यात माणसा सारखा माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही.चेहरे व मुखवट यांचे नियोजन कधीच एकमेकांना पूरक नसतं. मुखवट्याची ब्लु प्रिंट चेहरा कधीही बदलू शकतो.
चेहऱ्याचा नियोजन मुखवट्या शिवाय अंमलात येऊच शकत नाही.
खरा चेहरा उघडकीला येऊ नये म्हणून मुखवटे तारे वरची कसरत करतात.
माणसं सगळं उघड़ करतील, पण मन उघड करण्याची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडत नाहीत. मृत्यूनंतरही माणसाच्या मनातलं कळत नाही. शरीराने जवळ येणारे मनाने रत होतांतच असं नाही. मन खुंटीला टांगलं की माणसं मनां सारखं वागायला लागतात. मनाला विसावण्यासाठी आश्वासक खांद्याची गरज असतें. पाय धरणारे व्यक्तिमत्व व विश्वासाने विसावणारे खांदे आज दुर्मिळ झाले आहेत. मानवी संबंधाचा सगळा इतिहास मनातलं ओठावर न आल्यामुळे झाला आहे. मनानें ठरवलं तर काहीही होऊ शकतं.
आपल्याच मनाचं विश्लेषण आपल्याला करता येत नाही. आपण दुसऱ्याच्या मनातलें विश्लेषण करू शकतों कां?माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारतच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत. नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चिकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, मालिकेतल्या पात्रांची चिंता पण घरातल्यांची व स्वतःच्या मनाची चिंता नाही.आई कुठे काय करते ऐवजी स्वतः आपण काय करतो, स्वतःसाठी, मित्रांसाठी हे मनात डोकावून पाहणे गरजेचे आहे. जगायला माणसांना वेळ नाहीच. कुटुंबासाठी ते नाही नाही ते करतील, नको नको त्या गोष्टी घरात आणून ठेवतील. भौतिक समृद्धता आणण्यासाठी स्वतःच्या मनाचा कोंडमारा करतील.घरच्या माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतय. मुलांना खेळणी घेऊन देणारें पालक मुलांच्या मनाशी व मुलांशी किती खेळतात?
बायकोला फ्लॅट घेण्याच्या नादात स्वतः फ्लॅट होतात. बायकोला हवा असतो फक्त गजरा व संवाद. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतांत. मन प्रसन्न करां हे ठिक आहे, पण सभोवताली तसां निसर्ग हवां, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवां व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत रहा, मनाचे काहीच प्रश्न राहणार नाहीत.
कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जातें
जळणं स्वतःला संपवतं
ईतरा वर जळण्यांत स्वतःच्या मनाची स्मशानभूमी कधी होते हे माणसाच्या लक्षातंच येत नाही. मन पतंगासारखं भर कटतं, त्याला नियंत्रणात ठेवणें महत्त्वाचं असत. मनासारखे खांदे मिळणं हेच आयुष्याच संचित.शेवटचे चार खांदे तरी आपल्या कुठें हातातअसतात?्र््र्््र््र््र््र््र्र्र््र्््र््र््र््र््र्