Love U Zindagi 6

God Always Planned Better Life For Us

Love U Zindagi


भाग 6


पूर्वार्ध :


विवेक इवा फॅशन हाउसमध्ये ट्रेनिंगसाठी जातो. तो खूप मेहनत घेत असतो. इवा विवेकला बघून इंप्रेस होते. पण त्याला प्रभातीची आठवण येत असते. शेवटी त्याला सुट्टी मिळते आणि तो प्रभातीला भेटायला जातो. तिला भेटून येतो पण मनातील गोष्ट मात्र मनातच ठेवतो. 


आता पुढे: 


" And the last top five finalist is Mr. Vivek Patil." अँकर. 


        एक मोठ्या भव्य हॉलमध्ये , लाइट्सच्या झगमगाटात ' Iva's Best Model Of The Year ' शो सुरू होता. आणि त्यात टॉप पाच फायानालिस्ट निवडले गेले होते , त्यात एक विवेक सुद्धा होता. टाळ्यांच्या जोशामध्ये निवडलेले पाचही प्रतियोगी थोडे पुढे येऊन उभे राहिले . बाकी उरलेले सगळे प्रतियोगी मागच्या मागून आतमध्ये निघून गेले. आता प्रतियोगी आणि जज यांच्यामध्ये वन टू वन प्रश्न उत्तरांचा राऊंड होणार होता. सगळ्यांना प्रश्न विचारून झाले होते, आता विवेकचा नंबर आला होता . तसा अँकरने विवेकच्या हातामध्ये माईक आणून दिला. 



" Good Evening Mr Vivek. " एक जज म्हणाले. 


" Good evening Sir!" विवेक नम्रपणे म्हणाला. 


" A very simple question for you , ' What is life? ' " जज.


        जजच्या 'simple question ' या शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. आयुष्याला इतके जवळून कोणी बघितले असणार, मरणातून परतला होता तो. 



" ' तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!' Good Evening precious people here!" विवेकने सगळ्यांना हसत जोडत आणि आत्मविश्वासाने अभिवादन केले. एकदा सगळे जज आणि समोर बसलेल्या सगळ्या लोकांकडे बघून एक स्मायल केले आणि जजने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली. 


" Life is beautiful, but not always. It has lots of problems you have to face everyday. Don't worry though! All these problems make you strong, it gives you courage to stand alone in future. Life is full of moments of joy, pleasure, success and comfort punctuated by misery, defeat, failures and problems. There is no human being on Earth, strong, powerful, wise or rich, who has not experienced, struggle, suffering or failure. You have to work hard to reach to the highest position. Life is full of paths, you just have to choose the right one. Life is interesting and amazing like the stars up in the skies.


With no doubt, Life is beautiful and full of celebrations. However you should always be ready to face adversity and challenges. There are difficult situations in life as well.Be careful! 

At the end ....


Life is journey between birth and death , if you live it passionately , then their is a life for your name after death also . Love you Zindagi . 


Thank you!!" विवेकने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिलें . 





( मराठी अनुवाद विवेकच्या उत्तराचे :: जीवन सुंदर आहे, परंतु नेहमीच नाही. यात दररोज आपल्याला बरीच समस्या भेडसावत असतात. तरी काळजी करू नका! या सर्व समस्या आपल्याला मजबूत बनवतात, हे आपल्याला भविष्यात एकटे उभे राहण्याचे धैर्य देते. आयुष्य दुःख, पराभव, अपयश आणि समस्यांद्वारे विरामित आनंद, आनंद, यश आणि सोईच्या क्षणांनी परिपूर्ण आहे. पृथ्वीवर असा कोणताही मनुष्य नाही जो सामर्थ्यवान, शहाणा किंवा श्रीमंत आहे, ज्याने संघर्ष, दु: ख किंवा अपयश अनुभवलेला नाही. सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. जीवनात आपल्याला भरपूर संधी मिळतील, भरपूर मार्ग आपल्यासाठी ओपन होतील, आपल्याला फक्त योग्य मार्ग निवडावा लागेल. आकाशाच्या तारेांसारखे आयुष्य हे खूप सुंदर, मनोरंजक आणि प्रत्येक वेळी आपल्याला सरप्राइज देणारे आहे.


        निःसंशयपणे, जीवन सुंदर आणि उत्सवांनी भरलेले आहे. तथापि आपण संकट आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. जीवनात अनेक कठीण परिस्थिती देखील आहेत. सावधगिरी बाळगा!

शेवटी ....


      जीवन हा जन्म आणि मृत्यू दरम्यानचा प्रवास आहे, जर तुम्ही ते उत्कटतेने जगले तर ते तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नावातही जीवन आहे. लव्ह यू जिंदगी.) 





      थोड्या वेळसाठी खूप शांतता पसरली होती . विवेक भेदरल्या नजरेने सगळ्यांना बघत होता. आणि थोड्या वेळात समोरचा जज उठून उभा राहत टाळ्या वाजवायला लागला. त्यानंतर पूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणले होते. 


******


" प्रभाती ssssss......

प्रभाती ssss........ " जोराने आवाज देत विवेक पुलावर पोहचला होता. बऱ्याच वेळ तो तिथे प्रभातीची वाट बघत उभा होता.  



" अरे हो हो , आलेच, जरा दम धर ......" प्रभाती रस्त्याच्या एका साईडने टाळ्या वाजवत येत होती . 


"तर तुला कळले आहे तर......" विवेक.


" हम सब खबर रखते है बाबू और तुम्हारी जित का जशन हमने अपनी आँखोसे देखा हैं.." प्रभाती. 


" हा हा ....हो विसरलोच मी. पण तरीही मला दमच तर नव्हता धरवत, कधी कधी तुला सांगतोय असे झाले होते." विवेक. 


" आई आणि तुझी बहिण काय म्हणतेय?" प्रभाती. 


"त्या दोघी खूप खुश आहेत .दोघीही पूर्ण चाळीभर आनंदाने सांगत फिरत आहेत , न्यूज दाखवत आहेत. त्या दोघी भयंकर खुश आहेत . आईच्या अंगात तर जशी काही एक वेगळीच एनर्जी आलिये, तिचं दुःख , तब्बेतीचा त्रास कुठल्या कुठे पळाला. आणि हो त्यांनी तुला ' धन्यवाद ' केले आहे हा. " विवेक भरभरून बोलत होता. आनंदाने त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. 


" काय मग , आता तरी खुश आहेस ना?" प्रभाती. 


" हो , खूप .... I am very happy . आता मी माझ्या आईची ट्रीटमेंट सुरू करू शकणार आहे, बहिणीला शाळेत पाठवू शकणार आहे . Life suddenly change in a good way and it's all because of you . Thank you my dear friend , thanks a lot!" बोलतांना l, त्याच्या भावना सांगताना आता विवेकचे डोळे पाणावले होते. 



" अरे रडतोस काय पगलू , जिंकला आहेस तू . This is the time of celebration." प्रभाती.



" हो ग , असेच ग, आतापर्यंत आयुष्यात इतके वाईट गोष्टी घडल्या आहेत ना की, आपोआपच डोळ्यात पाणी आले. आम्ही खूप वाईट आणि वेदनादायी काळ बघितला. माझे वडील मी पाचवीत असतानाच गेले . आई फार काही शिकलेली नव्हती. लोकांच्या घरची धुणीभांडी करत तिने मला शिकवले. मी शिकलो , मन लावून शिकलो, पण नोकरीच मिळाली नाही . नोकरी लागण्यासाठी सगळं करून बघितले, ज्याने जे सांगितले तसे सगळे. पण, ना तर नशीब फळत होते, नाही देवाला दया आली. खूप खचलो होतो ग . अचानक तू आलीस आणि काही महिन्यात आयुष्याच पालटले . आनंदाचे अश्रू आहेत ग हे, रडत नाही आहो. " विवेक आपले डोळे पुसत बोलत होता. 


" God always having some better than best plans for us , just trust on him! जीवनात वेगवेगळी वळणं येतात , खूप संयम ठेऊन वाट बघावी लागते. सगळं आरामात हातात मिळाले की किंमत नसते रे. कष्ट तर हवेच, तेव्हाच आयुष्य कसे आहे हे खरोखर कळेल. जेवढे जास्त कष्ट , जास्त मेहनत, जीत भी उतनीही शानदार होती हैं मेरे दोस्त! बरं आणखी काय काय झाले ते सांग ना? इवा मॅडम काय म्हणतात?" प्रभाती. 



" हो .... पहिला आलोय शोमध्ये, इवा मॅडम खूप खुश झाल्या. माझे खूप कौतुक करत होत्या. त्यांच्या तोंडून आपले कौतुक ऐकून खूप भारी वाटले , कारण त्या सहजासहजी कोणाचे कौतुक करत नाही असे ऐकले आहे. एक वर्षाचा बाँड साईन केला आहे, बारा लाख मिळतील . त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स, ऍड वैगरे असतील ते करायचे आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे." विवेक चेहरा पाडत म्हणाला. 


*****


क्रमशः 




🎭 Series Post

View all