Login

Love U Zindagi 5

स्त्री सगळ्यात सुंदर तिच्या युनिफॉर्म मध्ये दिसते.

Love U Zindagi


भाग 5


पूर्वार्ध :

विवेक एक महिन्यासाठी ट्रेनिंग साठी इवा फॅशन डिझानिंग हाऊसमध्ये राहायला गेला होता. त्याचे तिथे काही चांगले मित्र झाले होते. त्यांच्यातील एक त्याचा रूम पार्टनर रितेश त्याचा खूप छान मित्र झाला होता. आता काही दिवस झाले होते, विवेकला प्रभातीची आठवण येऊ लागली होती. तो स्वतःतच हरवला असत. तो प्रेमात पडला आहे हे रितेशने अचूक ओळखले होते. दोघांनी प्रभातीला फेसबुकवर शोधले, आणि त्यांना तिची प्रोफाइल सापडली सुद्धा. 



आता पुढे : 


      ट्रेनिंग देण्यासाठी फॅशन इंडस्ट्री मधले काही फेमस लोकं येऊ लागली. कोणी बोलायचं कसे, कुठे कुठे attitude दाखवणे गरजेचे असते..शब्दांचे उच्चार, तर चालण्यामध्ये कसा मर्दनीपणा हवा, चेहऱ्यावर कसे भाव हवे असे शिकवत. कोणी सेल्फ केअर सांगत तर कोणी केसांबद्दल माहिती देत.. या प्रोफेशनमध्ये आपल्या बॉडीचे आणि चेहऱ्याचे किती महत्व आहे ते पटवून देत. त्यासाठी हिल्धी डाएट, exercises हे सगळं शिकवत होते..तर कोणी कपड्यांबद्दल, फॅशन बद्दल सांगत. 


       रोज सतत कोणी ना कोणी येत. कधी ब्युटी ट्रीटमेंट, कधी त्यांचे माप घ्यायला येत..पूर्ण दिवस व्यस्त जात होता. 

      

          ट्रेनिंगचे आता पाच दिवस उरले होते, त्यामुळे रोजच्या वेळ पेक्षा दुप्पटीने प्रॅक्टिस सुरू होती. बहुतेकांना दमायला झाले होते , थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता , पण काही स्पर्धक उत्साहाने आणि जोशाने प्रॅक्टिस करत होते. त्यातच एक विवेक सुद्धा होता. जरी तो थकला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता होती. 



     अधून मधून इवा सुद्धा तिथे येऊन सगळं पर्सनल लेव्हलला चेक करत होती. ती कुठलीही कमतरता राहू देत नव्हती. काही प्रश्नोत्तराचे सेशन सुरू होते. कोणाला डिस्टर्ब न करता इवा तिथे येऊन बसली. 


"ओके! नेक्स्ट क्वेस्शन.. तर मला सांगा मुलगी सगळ्यात सुंदर कुठल्या कपड्यांमध्ये दिसते?" एक्स्पर्टने सर्वांना एक प्रश्न विचारला. 


"साडी.. साडीमध्ये मुलगी खूप सुंदर, सालस आणि सेक्सी दिसते. बहुतेक पुरुषांना मुलगी साडी मध्येच आवडते. " एकाने उत्तर दिले. 


"बिकनी.." दुसरा. ते ऐकून सगळे हसू लागले. 


" Quite!" एक्स्पर्ट म्हणाला तसे सगळे शांत झाले. 


"हा नेक्सट.." एक्स्पर्टने दुसऱ्या मुलाकडे इशारा केला. 


"जीन्स टीशर्ट .. मॉडर्न पण दिसते आणि खूप कंफर्टेबल सुद्धा.." तिसरा. 


"सलवार सूट.. मला वाटते त्यात मुली जास्त कंफर्टेबल राहतात, काही काम असेल तर धावपळ करायला सोपी पडते आणि सगळ्यात महत्वाचे सगळं सांभाळून आपली सभ्यता पण जपली जाते." चौथा म्हणाला. 


असेच सगळे त्यांना आवडेल तसे उत्तर देत होते. आता वेळ विवेकची आली..तो बोलू लागला. 


"कुठली पण मुलगी सगळ्यात सुंदर युनिफॉर्ममध्ये दिसते. मग तो युनिफॉर्म पोलीस, डॉक्टर, नर्स, वकील, मिलिटरी, टीचर, सायंटिस्ट, शेफ, सफाई कामगार.. मग तो कुठला पण असू देत, मुली सगळ्यात सुंदर, स्मार्ट, कंफर्टेबल तर दिसतातच सोबतच आपल्या सभ्यतेचा मान ठेवत त्या सर्वांसाठी आदर्श सुद्धा असतात.." 


        त्याचं बोलणं थांबलं तसे एक्स्पर्ट टीचरन उभे राहून टाळ्या वाजवू लागला. त्याला बघून मग तिथे जमलेले सगळे टाळ्या वाजवत होते. 

      


" Who is that guy?" विवेककडे बघत इवा ट्रेनरला विचारत होती. 


"Impressive!" इवा एकसारखी त्याच्याकडे बघत त्याच्या नखापासून वर पर्यंत त्याचे निरीक्षण करत होती.  


"He is Vivek Patil , a very hard worker amongst all." ट्रेनर.



" Good " इवा परत एकदा विवेककडे बघत, सगळीकडे नजर फिरवून आपल्या कॅबिनमध्ये निघून आली. 

          तिचे केबिन पूर्ण काचांच्या भिंतींनी बनलेले होते. लॅपटॉपमध्ये काम करत असताना वारंवार तिचं लक्ष विवेककडे जात होते. 


"Why is he distracting me? I never behave like this before? मुलं माझ्या मागे येतात, मी मुलांच्या मागे जात नाही. पण हा मुलगा काहीतरी वेगळा दिसतोय. Iva concentrate on your work." इवा स्वतःसोबत बोलत परत कामामध्ये लक्ष घालत होती . 


       आता मात्र इवाचे तिथे येणे वाढले होते. ती रोजच तिथे येऊ लागली होती. तासन् तास आपल्या केबिनमध्ये बसून राहत होती. सतत या ना त्या कारणाने विवेकला बघत होती. त्याचे नम्रपणे, आदरपूर्वक वागणे, त्याची ती मेहनत सगळं तिला भुरळ पाडू लागले होते. आता तिलाच कळत नव्हते ती अशी का वागते आहे.. पण तिला त्याला बघणं आवडू लागले होते. 


      इकडे विवेक मात्र प्रभतीच्या आठवणीत व्याकूळ होत होता.



     शेवटी कार्यक्रमाच्या आधी एक दिवस त्यांना सुट्टी मिळालीच. आईला भेटून त्याने आधी सरळ नदीचा पुल गाठला. 


"प्रभाती ssssss……" त्याने मोठ्याने आवाज दिला.


"अरे हो हो, इथेच आहे. एवढयाने का ओरडतोय? आजूबाजूचे बघत आहेत..कोण बावळट आलंय म्हणून.." प्रभाती त्याचा जवळ येत हसत म्हणाली. 


      त्याने आजूबाजूला बघितले तर खरंच लोकं त्याच्याकडे अजब नजरेने बघत होती. त्याने हसतच आपल्या केसांतून हात फिरवत त्यांना काही नाही म्हणून इशारा केला तसे लोकं परत गेले. 



"किती ओरडत होता.. पागल आहेस.. आणखी थोडा ओरडला असता ना, या लोकांनी तुला पागलखाण्यात पोहचवले असते. " प्रभाती त्याची मस्करी करत म्हणाली. 


ते ऐकून त्याला हसू आले. 


"हो.. सॉरी.. पण काय करू? एकतर इतक्या दिवसांनी तुला भेटतोय, काय करू, किती बोलू असे झाले आहे." विवेक. 


"ओह.. आनंदी दिसत आहेस.. आवडले वाटते फॅशन वर्ल्ड?" प्रभाती. 


"हो, सगळं सांगतो, पण चल तिकडे तुझ्या आवडत्या बकुळीच्या झाडाखाली बसुयात. तुला माहिती आता मला पण बकुळीचे झाड आवडू लागले आहे. आणि आपली ती जागा पण छान आहे, कोणी डिस्टर्ब करत नाही." विवेक.


"हा हा.. बरं चल.." प्रभाती. 


दोघंही पुलावरून खाली उतरत झाडाखाली येऊन बसले. 


"मग कसं चाललंय ट्रेनिंग? आवडते आहे का?" प्रभाती..


"ट्रेनिंग खूप छान सुरू आहे. पूर्ण दिवस काही ना काही सुरू असते. सतत कोणी ना कोणी गेस्ट येत असतात. सेमिनार, लेक्चर घेत असतात. खूप काही काही शिकवत असतात. अग ही वेगळीच दुनिया आहे. वर्ष दोन वर्षात कुणीतरी स्टार होतो.. आणि लगेच नाव धुळीला सुद्धा मिळते." विवेक.


"हो ते तर आहे, आपला फोकस घसरला की मग सगळं संपलं. आणि हे इथेच नाही रे.. सगळीकडे आहे. जिंकायचं असेल, टिकून राहायचं असेल तर सतत मेहनत तर करावीच लागेल." प्रभाती.


"हो ते आहेच. पण काही काही लोकांची करीअर, पर्सनल लाईफ बद्दल वाचलं, खूप गुंतागुंतीचे आहे ग.. आणि अगदी लहान लहान चुकांनी त्यांचं करिअर बर्बाद झाले आहे." विवेक. 


"हो.. तू आतापासून जास्त टेन्शन नको घेऊ. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर. बाकी अजून काय म्हणतो? इवा कशी आहे?" प्रभाती. 


"इवा मॅडम? यार कसल्या ड्याशिंग आहेत.. त्याचं चालणं, बोलणं अगदी कसे परफेक्ट. कडक आहेत..त्यांना बघितले की मला तुझीच आठवण येत होती." विवेक.


"हम्म.." प्रभाती शांतपणे म्हणाली. 


       इवाचे नाव काढले तर प्रभातीचा चेहरा पडला हे बघून त्याने विषय बदलला. 


"तुला माहिती सगळ्यात जास्त मजा कधी येते?" विवेक. 


"कधी?" 


"ते रॅम्प वॉकची प्रॅक्टिस करतांना.. सुरुवातीला तर मला खूप हसू येत. हे असे तोंडचं चंबू करून ठेवायचं पूर्ण वेळ…हसायचं सुद्धा नाही.. असं एकदम सिरीयसवाले चंबू.." म्हणत तो अगदी अँक्शन करत चालून दाखवत होता. 


      त्याला बघून प्रभातीला खूप हसू आले. त्याला सुद्धा तिला हसतांना बघून खूप छान वाटत होते. 



"भारीच एक्स्पर्ट झाला.. मस्त. तू एन्जॉय करतोय ना, ते बघून मी खूप खूष आहे. आपलं काम आपण एन्जॉय केले ना की जींकतोच बघ माणूस.." प्रभाती. 


"हम्म.. पण बोलतांना, उत्तर देताना थोडे टेन्शन येते..समोर खूप लोकं असले की अडखळायला होते." 


"हे बघ, काही चुकलं तर कोणी काय तुला जेलमध्ये नाही टाकणार. हा तू सेलिब्रिटी झाला तर मग टाकू शकतात.." ती त्याची मस्करी करत म्हणाली. ते ऐकून त्याला हसू आले. 


"बिनधास्त बोल रे…जे मनात येते ते बोल. फक्त अपशब्द बोलायचं नाही, चुकून सुद्धा बोलण्यात येऊ द्यायचे नाही. भांडायचे असले तरी अगदी रिस्पेक्टफुल शब्द वापरूनच….फिर देखो दुनिया आपके कदम चुमेगी.." प्रभाती. 


"कोणकोणत्या महाराजांचे प्रवचन बघते ग तू? नाही म्हणजे अंगात लगेच प्रभाती देवी संचार होते.." तो हसला. 


"हा हा हा..दिवसभर आस्था, संस्कार चॅनल्स बघायचे ना म्हणून…" तिला खूप हसू येत होते. 


"तरीच.." 


"बरं निघुया?" प्रभाती.


"हो. बरं ऐक ना, परवा शो आहे. तू येणार आहेस. माझ्याकडे तीन कूपन आहेत. तब्बेतीमुळे आईला येणं शक्य नाही. पण बहिण येणारे. तू पण ये. हे घे.." तो तिला कूपन देत म्हणाला.


"मला नाही जमणार रे.." 


"मला माहिती तुला कामं आहेत. पण प्लीज प्रयत्न कर. तुझ्यामुळे ही नवीन सुरुवात होतेय..तू तर हवीच ना.." तो विनंतीच्या सुरात म्हणाला. 


"बरं, बघते. हे कूपन तू दुसरं कोणाला दे. माझ्याकडे ऑलरेडी आहे." प्रभाती.


"ओके…" 


"चल, आता निघायला हवे. तुला आरामाची गरज आहे.. मस्त झोप काढ आज..म्हणजे ग्लो वाढेल.." 


त्याने हसत होकार दिला.


"आजकाल झोपच तर येत नाही..माझं आयुष्यच प्रभातीमय झाले आहे.." तो मनातच म्हणाला. 


"ठीक आहे. बाय.." म्हणत प्रभाती तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. नेहमप्रमाणे ती दिसेनाशी होईपर्यन्त तो तिथेच तिला पाठमोरी बघत उभा होता. ती गेली तसा तो पण आपल्या घराकडे यायला निघाला. 


******


क्रमशः 






🎭 Series Post

View all