Love U Zindagi 10 (शेवट)

Love You Zindagi
Love U Zindagi

भाग 10


     टूर आणि प्रोजेक्ट आटोपून इवा, विवेक आणि बाकी पूर्ण टीम भारतात परत आले होते. 

" इवा तर खूप चांगली आहे , तिला प्रभाती बद्दल सांगू काय? प्रभाती पण तिला खूप मिस करते . बोलून बघुया? जर आपल्या बोलण्याने दोन दूर गेलेल्या मैत्रिणी जवळ येतील तर, चांगलच आहे ना." विवेक लॅपटॉप उघडून, त्यात प्रभातीचे फोटो बघत मनातच विचार करत होता.  

" हे विवी , काय चाललंय? काय बघतोय? " इवा त्याच्या जवळ येऊन बसली. 

     इवाला असे अचानक आलेले बघून तो प्रभातीचे फोटो तिला दिसावे नाही म्हणून लॅपटॉप बंद करणार होताच की इवाचे लक्ष त्याचा लॅपटॉपकडे गेले.


" वेट वेट..अरे ही तर प्रभाती आहे?" इवा. 

"हो.." विवेक. 

" तू तिला कसा ओळखतो?" इवा शॉक नजरेने त्याच्याकडे बघत होती. 


" ती माझी मैत्रीण आहे." विवेक.

"व्हॉट?" इवा.

"हो, आणि तिनेच मला इवा फॅशन हाऊस आणि फॅशन शो बद्दल सांगितले होते. इथे सुद्धा पार्टीसिपेट करायला सुद्धा तिनेच पाठवले होते." विवेक.

" What? How is it possible?" इवा.


" हो, मला माहिती तुम्ही खूप छान मैत्रिणी होत्या. पण काहीतरी प्रॉब्लेममुळे तुमच्यामध्ये वाद झाला आहे. तुम्ही तो वाद बोलून का मिटवत नाही? ती नेहमी तुमच्याबद्दल खूप सांगत असते. ती मनाने खूप चांगली आहे , तुमचे म्हणणे तिला लगेच समजेल." विवेक.


" Vivi, Are you mad? ती कशी बोलणार आहे?" इवा. 

"नका ना तिचा इतका करू, ती खूप गोड मुलगी आहे. प्लीज तुम्ही एकदा बोलून घ्या ना , मला तुमची आधी जशी घट्ट मैत्री होती तशीच बघायची आहे. " विवेक. 

      इवाला तर विवेक काय बोलतोय, काय सांगतोय काहीच समजत नव्हते..

" बोलायचे तर मला सुद्धा होते, पण आहे कुठे ती?" इवा.


" बोलाल तुम्ही? चला तुमची भेट घडवून देतो . मला पण तिला भेटायला जायचे आहे, नऊ दहा महिने झाले. चला जाऊ." विवेक.

" Vivi, are you out of your mind? " इवा.

" मॅडम प्लीज , एकदाच तिच्या सोबत बोला." तो विनवणीच्या सुरात बोलत होता. 

" चल.." इवा.

     इवा बोलायला तयार झाली बघून विवेकला खूप आनंद झाला. 

"प्रभातीला तिची जीवाभावाची मैत्रीण भेटणार आणि मला माझा जीव की प्राण, माझी लाईफ मिळणार.आता दोन्ही गोष्टी साध्य करू.." मनोमन विचार करून विवेक खूप आनंदी झाला होता. 

       दोघेही कारमध्ये बसले. विवेक स्वतःच्याच विचारत आनंदाने गाडी चालवत होता. इवा मात्र फक्त त्याच्याकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला समजायला उशीर लागला नाही की विवेक प्रभातीवर प्रेम करतोय. तिच्या काळजात धस्स झाले, हृदयातून एक जोरदार कळ गेली. वाईट वाटून घ्यावे की आनंदी व्हावे.. अशी तिची परिस्थिती झाली होती. 

        विवेकने नदीच्या पुला जवळ येत गाडी थांबवली. ती जागा बघून इवाला मोठा शॉक बसला . 

" इथे का?" इवा.

" इथेच नेहमी भेटते मला प्रभाती. पाच दहा मिनिटे थांबा, ते तिथे तिचे घर आहे. मी तिला इथे दिसलो की, ती येईलच." विवेक. 

" विवी , तू पागल झाला आहेस? कुठे आहे तिचे घर? तिथे काहीच नाही आहे." इवा, तो हात दाखवत होत्या त्या साइडला बघत बोलत होती . 


" अरे आहे ना तिथे तिचे घर." म्हणत तो बघायला गेला तर खरंच तिथे काही नव्हते. 

" इथेच तर होते तिचे घर, कुठे गेले?" विवेक घाबरघुबरा होत आजूबाजूला बघत होता. इकडे तिकडे पळत होता. 


" ती.......ती....तिथे असेल, चल जाऊ, तिथे तिचे आवडीचे बकुळीचे झाड आहे तिथे . तो तिला नदीच्या काठी खाली जिथे ते नेहमी प्रॅक्टिस करायचे तिथे घेऊन आला. 


" हे बघा, हे झाड, आम्ही रोज इथेच भेटत होतो , ती मला फॅशन शो साठी हवी असणारी सगळी माहिती द्यायची, सगळं सगळं शिकवायची. " विवेक.

" कुठे आहे झाड? इवा.

"बकुळीचे झाड तिचं खूप फेवरेट आहे.."विवेक.

"हो, तिला खूप आवडत बकुळीची फुलं. पण इथे फक्त झुडूपं आहेत, बकुळीचे झाड नाही. " इवा.

" आहे...इथेच होते, तोडले असेल.." तो आजूबाजूला कोणी दिसतेय काय ते बघत होता.... तेवढयात त्याला एक बघितल्या सारखा माणूस दिसला.

" ओ मामा, इथे बकुळीचे झाड होते ना? आणि तुम्ही मला इथे बघितले आहे ना एका मुलीसोबत?" विवेकने त्या माणसाला विचारले. 

" नाही, इथे कधीच असे झाड नव्हते जसे तुम्ही म्हणत आहात. हो पण मी तुम्हाला इथे बघितले आहे , तुम्ही इथे काय काय अजब गजब हातवारे करायचे. एकटेच बडबडायचे. एका माणसाने तुम्हाला सांगितले सुद्धा होते, इथ येऊ नका, तरी तुम्ही ऐकलं नाही, इथं येत होतात. " तो माणूस म्हणाला.  

"इथे होते झाड. इवा ट्रस्ट मी, इथे ते झाड होते, तिचे खूप आवडीचे." विवेक आता रडकुंडीला आला होता. 

" हे खरे आहे तिला बकुळीचे झाड आणि त्याची फुले खूप आवडायची . पण तो माणूस खरं बोलतोय, प्रभाती इथे नाही आहे ." इवा त्याला समजावत होती.

" असे नाही होऊ शकत, मी तिला आता प्रपोज सुद्धा करणार आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे..मी..मी खूप प्रेम करतो तिच्यावर, तिच्याशिवाय नाही जगू शकत. ती आहे ...इथेच कुठे असेल लपून बसली.... ती खूप मस्तीखोर आहे, माझी मस्करी करत असेल."

"प्रभातीsssss… प्रभातीsssss…" तो जोरजोराने आवाज देत आजूबाजूला सगळीकडे प्रभातीचा शोध घेत होता. 


" ती नाही आहे इथे विवी.. चल मी सांगते ती कुठे आहे..." इवा त्याचा हात पकडत त्याला कारमध्ये बसवत होती. 

" इवा, हात सोड , ती वाट बघते आहे माझी.... ती कधीपण येईल, मला इथेच थांबायला हवे." तो इवाच्या हातातून आपला हात सोडवून परत पळत नदीच्या पुलाजवळ आला. 

"विवि…" इवा थोड्या कडक आवाजात ओरडली.

"प्रभाती, अगं ये ना लवकर.. मला माहिती मी खूप उशीर केला इथे यायला.. मी थोडा स्वार्थी झालो.. खूप प्रोजेक्ट्स मिळत गेले तर ते घेत गेलो.. सहा महिने सांगून दहा महिने लावले मी परत यायला.. हे बघ मी सॉरी बोलतोय.. पण आता मस्करी पुरे झाली, प्लीज ये आता.. हे बघ इवा पण आल्या आहेत तुला भेटायला.. प्रभाती ये ना लवकर, आता वाट बघवल्या जात नाही.." त्याचा मानसिक तोल गेल्यासारखा बडबड करत होता. 

" Vivi, just shut up.... आपण चार तास घालवले आहे इथे, ती नाही आली ना? आता मी म्हणते आहे तिथे चल, मी तुला सांगते ती कुठे आहे ते." इवा. 

      इवाने त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवले , आणि एका छोट्या चाळीतल्या घरासमोर त्याला घेऊन आली. 

" इथे?" तो आजूबाजूला बघत म्हणाला. 

" तिचे घर आहे." इवा.

" असे कसे होऊ शकते, ती तिकडे....."बोलतच होता की इवा त्याला ओढत घेऊन जात एका घरात गेली. 

             समोरचे दृश्य बघून आतापर्यंत एकवटून ठेवलेला त्याचा धीर सुटला. आणि तो मटकन खाली बसला. 

       समोर एका भिंतीवर प्रभातीचा फोटो आणि त्यावर एक हार लटकलेला होता. 

" हे खरे नाही आहे...... ती आहे तिथे.. " तो रडत रडत बोलत होता. तिथे प्रभातीची आई, आणि तिचे भावंडं होती. ते सगळे त्याला बघत होती. प्रभातीची आई काही बोलणार तेवढयात इवाने त्यांना थांबवले. 

" हे खरे आहे विवी, ती आता या जगात नाही आहे. ती चार वर्षापूर्वीच हे जग सोडून गेली आहे. " ईवा. 


" हे कसे शक्य आहे, मी तिला रोज भेटत होतो. तिनेच मला आयुष्यात हार न मानता जगायला शिकवले. मी तिथे आत्महत्या करायला गेलो होतो, तिनेच मला आत्महत्या करण्यापासून रोखले. तीने तिथे आणखी दोन लोकांना वाचवले होते. ती तिथेच आहे , चला असेल.." तो.

" तिने तिथेच आत्महत्या केली होती , त्या पुलावरून उडी घेत त्या नदीत ती नेहमीसाठी हरवली होती." इवा. 

"नाही, असे नाही होऊ शकत. तिला आत्महत्या करणारे लोकं आवडत नाही. ती खूप चिडते. जे तिला पटतच नाही ते ती कसे करेल? नाही नाही, असे होऊच शकत नाही. " विवेक. 


" तिने सुसाईड केले आहे विवि, आणि हेच सत्य आहे. तिचे एका मुलासोबत अफेयर होते, तो मुलगा चांगला नव्हता. पण ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. वारंवार मी तिला त्या मुलाचे सत्य तिला सांगत होते, त्याच्यापासून दूर हो म्हणाले होते. पण एवढे सगळे सांगूनही तिने माझे ऐकले नव्हते. म्हणूनच आमचा वाद झाला होता आणि आमचा वाटा वेगळ्या झाल्या होत्या. ती प्रेमात एवढी वाहवत गेली की त्याच्या सोबत शारीरिक संबंध सुद्धा ठेवायला लागली होती. अजाण वय ते, शारिरीक संबंधाचे दुष्परिणाम होतात आणि ते फक्त मुलीला भोगावे लागतात, हे सुद्धा तिला कळत नव्हते. ती त्या शारीरक स्पर्शालाच प्रेम समजून बसली. त्यात प्रेग्नंट राहिली, आणि मग त्याने तिला नकार दिला. ती तो नकार पचवू शकली नाही , त्यात प्रेग्नंसी , समाजाची.. घरची.. भीती वाटली , आणि तिने आत्महत्या केली." इवा. 

     ते एक एक शब्द ऐकताना त्याच्या डोळ्यात अश्रू जमत होते. इवाचे ते शब्द त्याचा काळजावर धारदार तीर सारखे वार करत होते. 

" इवा खरं बोलते आहे बाळा, प्रभाती आता या जगात नाही. जी गोष्ट इतरांना कळली नसती, ते तिच्या आत्महत्येनं सगळ्यांना समजली. त्यामुळे आमची समाजात थू थू झाली, आणि ते सहन न होऊन तिच्या वडिलांनी गळफास घेतला . आता आम्हीच राहिलो आहे. मी धूने भांडी करते आणि घर चालवते." प्रभातीची आई. 

" प्रभाती ssss " ... त्याने जोराने हंबरडा फोडला. तिच्या फोटोकडे बघत त्याच्या डोळ्यातून पाणी आले होते, तो लहान मुलासारखा रडत होता. त्याला बघून सगळेच खूप भावूक झाले होते. त्यांना पण रडायला आले होते. इवा त्याला सांभाळत होती. त्याला रडतांना बघून तिला पण तिच्या हृदयात खूप दुखत होते. 

******
वर्तमान… 

        विवेकने प्रभातीला दिलेले वचन तोडले होते, इवाला प्रभातीबद्दल सांगितले होते म्हणून नंतर ती त्याला कधीच दिसली नव्हती. तिचे सगळे बोलणे त्याला आता आठवू लागले होते. तिची इच्छा होती म्हणून त्याने ते आश्रम 'प्रभाती@नवी पहाट, नवी सुरुवात ' सुरू केले होते. त्याने तिच्या आई आणि बहिण भावाची जबाबदारी घेतली होती . 

"विवी, चल सगळी तयारी झाली आहे, केक कट करूया, सगळे वाट बघत आहेत. " इवा आतमध्ये येत म्हणाली. हो आज प्रभातीचा वाढदिवस होता. दरवर्षी तो तिचा वादिवस एखाद्या सण असल्यासारखा साजरा करत होता. 

         केक कट झाला, सगळे खूप आनंदी होते. नाचत होते.  




" एकदाच दिस ना.." प्रभातीने दिलेले मोरपीस 
 हातात पकडत त्याने आकाशाकडे बघत मनापासून तिला हाक मारली. तशी प्रभातीची पुसटशी आकृती तिथे आकाशात उभी राहिली... ती त्याला थम्स अप दाखवत होती. त्याच्या पण चेहऱ्यावर हसू उमलले. तेवढे एक मोरपीस त्याचाजवळ होते.. कदाचित त्याचं खरंच मनापासून तिच्यावर प्रेम होते, म्हणून ते तेवढे त्याचाजवळ उरलें होते, जे त्याने त्याचा डायरीमध्ये जपून ठेवले होते. 



" I love you Vivi......." इवा स्पीकर मधून आपलं प्रेम कबूल करत होती. 


Love you zindagi.... पूर्ण आश्रमने या धून वर ताल धरला होता… आणि सगळे अगदी असेच जगत होते… " Love U Zindagi " म्हणत.. आपल्या आयुष्याला महत्त्व देत होते.. 

*****

समाप्त


कथा कशी वाटली नक्की कळवा. 
कथा वाचण्यासाठी, कॉमेंट्स, लाईक्स चा माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी Big Thank you 

🎭 Series Post

View all