Love U Zindagi mission @no more sucide ..

Love you zindagi ...


Love U Zindagi 
Mission @no more sucide ......

नमस्कार मित्रांनो ,  एक छोटीशी रहस्यकथा आहे . रहस्यकथा असली तरी ही एक प्रेमकथा आहे....आयुष्यावर प्रेम करणे शिकवणारी ......भरभरून जगायला शिकवणारी .... आत्महत्येचे साईड इफेक्ट्स दर्शवणारी. 

*******
भाग 1

" आत्महत्या करणे हा  कुठल्याच संकटावरचा उपाय नाही, आत्महत्या करणारा कायर असतो  , शूरवीर नाही  "  ...

मागून आवाज आला तसे एका नदीवरचा पुलावर उभा असलेल्या  विवेकने मागे वळून बघितले, तर एक एकवीस बावीस वर्षाच्या   आसपासची मुलगी त्याच्याकडे चालत येत होती. 


" हरलास आयुष्याला ??? " .....ती

" मग काय करू??? जगून तरी काय उपयोग ?? " ....विवेक 

" आयुष्य खूप सुंदर आहे , एकदाच आयुष्यात घडलेल्या आनंदी गोष्टी आठऊन बघ, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आठऊन बघ   " ...ती 


" त्याने काय होणार आहे ??? माझे प्रश्न सुटतील??" ....विवेक 

" नाही, जगण्यासाठी बळ मिळेल " .....ती 


" माझ्या प्रेमाच्या लोकांसाठीच तर मी काही करू शकत नाही आहे. आपल्या आईला वाचऊ शकत नाही आहे . खूप गिल्टी वाटत आहे. माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नाही आहे . " 


" काय झाले?? प्रॉब्लेम सांगशील ?" ...ती 


" आईला कॅन्सर झाला आहे .  खूप त्रास होतो आहे तिला.  तिची ट्रीटमेंट सुद्धा करू शकत नाही .  लहान बहीण आहे , तिचे शिक्षण करू शकत नाही आहे . घरात दोन वेळ नीट पोटभर जेवण सुद्धा नाही देऊ शकत आहो .  डिग्री मिळाली  आहे फर्स्ट क्लास मध्ये  , पण कुठेच नोकरी मिळत नाही आहे. ज्याने ज्याने जिथे जिथे जाऊन बघायला सांगितले आहे , तिथे तिथे जाऊन आलोय , पण काहीच फायदा झाला नाहीये. काही लोकं नोकरी लावून देतो म्हणताय पण त्यासाठी त्यांना पाच सात  लाख हवे आहेत, कुठे कुठे तर खुलेआम लाच सुद्धा मागतात आहे. इथे दोन वेळचे जेवायाला नाही आहे, नोकरीसाठी पैसे कुठून देऊ.    जेमतेम एका छोट्या दुकानात नोकरी मिळाली आहे , पण तीन हजारात काय होणार आहे??? हरलोय मी , आई बहिणीचे हाल नाही बघवत आता मला. " .....विवेक 


" तुझ्या मरणाने हे सगळे प्रश्न सुटणार आहेत  काय ?? " ...ती 

" नाही, पण माझ्या डोळ्यांपुढे तर नसेल हे काही , या वेदना आता मला असह्य होत आहे ." ... विवेक 

" आणि तू गेल्यावर काय होईल , याचा विचार कधी केला आहेस ? तुझी आई जी आता काही कदाचित चार पाच वर्ष जगणार असेल ती तुझ्या आत्महत्येची बातमी ऐकून कदाचित सहन नाही करू शकणार, तिची तब्बेत आणखी खराब होईल ,  लवकरच मरेल सुद्धा . तुझी लहान बहीण एकटी पडेल. तुला माहिती आहे ना ही  दुनिया मुलींसाठी किती खराब आहे . एकटी मुलगी दिसली की समाजातली जनावरं तुटून  पडतील तिच्यावर . कोण करेल तिचे रक्षण??? दर रक्षाबंधनाला राखी बांधून घेतो ना तिच्याकडून ??? आयुष्यभर तिचं रक्षण करायचे वचन दिले आहेस ना??? मग ते कोण पूर्ण करेल? तुझ्या आईबहिनी सोबत काही वाईट जर घडले तर तू  स्वतः ला माफ तरी करू शकशिल काय???? मेल्यावर सुद्धा तुझा आत्मा तळमळत राहील, भटकत राहील .  तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही .  देव सुद्धा तुला माफ नाही करणार. तू पैशाने जरी तुझ्या परिवाराला मदत नाही करू शकत आहेस , तरी तू त्यांच्यासोबत असण्यानेच त्यांची खूप मदत होते आहे. तुला समोर बघूनच तुझ्या आईला सगळ्या वेदना सहन करण्याचे बळ मिळते आहे. तुझी बहिण समाजातल्या राक्षासंपासून सुरक्षित आहे.   " ....ती 

तो निःशब्द स्तब्ध उभा तिचे ऐकत होता. 


" अन् काय रे , समजा तू इथून कुदला, पण तुझा आत्महत्येचा प्लॅन फसला तर ???  तू मेला नाही तर??? " ...ती 

" इथून कोण वाचू शकते ??" ....विवेक 


" इथून कुदलेले सगळेच लोकं मरत नाही . काही काही वाचतात सुद्धा , तिकडे नदीच्या काठाला मिळतात , कुणाचा मनका तुटलेला असतो, कुणाचा हात, तर कुणाचा पाय तुटलेला असतो , कुणाचे डोळे फुटले असतात तर कधी डोकं फुटलेले असते. कुणी अपंग होतात  तर कुणी कोमात गेलेलं असते , पण जिवंत असतात . ती लोकं मेले तर नसतात , आणि मग हे असे अपंगत्व घेऊन जीवनाचा प्रवास अजूनच जास्ती  खडतर करून घेतात. मग ना नीट जगताही येत,  ना मरताही येत , परिवारावर ओझं बनून राहावे लागते .  " ....ती 


तिचे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी जमा झाले होते .  तो किती मोठी चूक करायला निघाला होता हे त्याला कळले होते. 


" Thank you mam , तुम्ही माझे डोळे उघडले . खूप मोठा गुन्हा करण्यापासून मला वाचवले. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही . " ..... विवेक  

" उपकार काय रे त्यात , आपण सारख्या समाजात राहतो , एकमेकांना सांभाळून घ्यायला नको ???  जर कोणी चूक करतांना दिसत आहे तर त्याला सांभाळून घ्यायला नको . ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण स्वतः, आपला परिवार, आपला समाज, आपलं गाव, आपला देश यांच्या सुरक्षतेची काळजी घ्यायला हवी . " ...ती 


" बापरे , तुम्हाला किती जीवनाचे वर्म माहिती आहे. दिसता लहान पण खूप मोठी गोष्ट सांगून गेलात ." ....विवेक 


" असे काही नाही रे , जी चूक मी केली होती, माझ्यामुळे माझ्या परिवाराला त्याची शिक्षा मिळाली , ती तू करायला नको म्हणून सांगत होते. " ...ती 


" म्हणजे???' ....विवेक 

" असू दे , तुझ्या कामाचे नाही. " ....ती 

" Okay , बरे मी जातो घरी, तुम्ही पण जावा आपल्या घरी, संध्याकाळ झाली आहे , आता लवकरच अंधार पडेल " .....विवेक 


" हो ...." ....ती 

दोघेही बोलून पाठमोरे होत आपापल्या दिशेनी जायला लागले. तेवढयात तिला काहीतरी आठवले आणि ती परत फिरली. 


" बरं ओ मिस्टर ....." ....तिने आवाज दिला. तिच्या आवाजाने परत तो थांबला आणि तिच्या जवळ आला. 

" हा मॅडम ......??" ...विवेक 


" अहो जाहो करू नका, मी लहान आहे , मला तू च म्हणा" ....ती 


" तुम्ही..... सॉरी तू हे सांगायला आवाज दिला ???" ...तो प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता. 


" अरे नाही , मला तुझ्या जॉब साठी काहीतरी आठवले म्हणून आवाज दिला. " ... ती 


" अच्छा, काय ?" ....विवेक 


" तुला देवाने हातपाय दिले आहे की नीट . म्हणजे दिसायला सुद्धा हँडसम आहेस . जेव्हा बुद्धीचा उपयोग होत नाहीये, तेव्हा या शरीराचा उपयोग  करायचा की  " ....ती 


" ओ मॅडम , मी तसला मुलगा नाही आहो , जो स्वतः ला विकेल . " ...विवेक 


" मी तर म्हणते आत्महत्या करण्यापेक्षा स्वतःला विकणे बरे. आपण स्वतःला विकतोय , दुसऱ्याला नाही . बिचाऱ्या कितीतरी बायकांनी स्वतःचे घर सावरण्याकरिता हा रस्ता अंगिकारला आहे , पण बुजदिलपणा नाही केला, आयुष्यात हार नाही मानली. बरं तो वेगळा विषय आहे , तुझ्या शरीराचा वापर कर म्हणजे  तू असे मॉडेलिंग वैगरे करू शकतो असे म्हणायचे होते. चांगला हट्टा कट्टा , उंचपुर्ण , दिसायला रुबाबदार आहेस की , असा वेगळा प्रयत्न का करत नाही?" ...ती 


" ते तर अजूनच कठीण आहे , त्या लाईनमध्ये तर भयंकर मारामारी आहे . " ....विवेक 


" मी मदत करू शकते , जर इच्छा असेल करायची तर ?" ...ती 

" कशी?" ....विवेक 


" माझी एक मैत्रीण आहे , तिचे फेमस फॅशन डिझानिंग हाऊस आहे ' इवा फॅशन '   . तिच्या तिथे पंधरा दिवसांनी  एक मोठा फॅशन शो होणार आहे  , उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे .  बघ आवडत असेल तर प्रयत्न करून " .... ती तिच्या जीन्सच्या खिशातून एक विझिटिंग कार्ड त्याच्या पुढे धरत बोलली.   

" पण........?" .....विवेक

" मला कळते आहे तुला काय विचारायचे आहे ते ,  तिच्या तिथे वशिला चालत नाही , तुमचं टॅलेंट आणि तुम्ही कसे प्रदर्शन करत आहात ,  त्यावर सिलेक्शन अवलंबून असते. "....ती 


" ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर एक प्रयत्न करून बघतो . पण .....एक प्रॉब्लेम आहे ?" ....विवेक , तिच्या हातातले कार्ड घेत त्यावरची सगळी माहिती वाचत , आपल्या शर्टच्या खिशात ठेवून दिला. 


" काय???? " .....ती 


" मला ते फॅशनचे काहीच कळत नाही , आणि ते तसे चालता बोलता  वैगरे पण येत नाही. " ....विवेक 

" बस , येवढेच?? उद्या फॉर्म भरून झाला की ये इकडे  , मला थोडेफार येते , मी शिकवेल . मी काही बुक्स आणि मॅगझिनचे नाव सांगेल तेवढे घेऊन येशील  " .... ती 

" Okay, आतापर्यंतच्या आयुष्यात बरेच काही करून बघितले, आता हे सुद्धा करून बघुया . आयुष्याने कठीण परीक्षा घ्यायची ठरवलीच आहे तर ती सुद्धा देऊया. " ...विवेक

" That's the spirit ... All the best ????" .... ती 


" तुझ्यामुळेच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा अर्थ कळला. Thank you . उद्या फॉर्म भरून झाला तर येतो इथे .पण तुला काँटक्ट कसा करू ??  म्हणजे काही फोन वैगरे ??? " ...विवेक 


" माझ्याकडे फोन नाही आहे , मला नाही जमत ते .   मी ते बघ तिथे जवळच  राहते, मला दिसते तिथून सगळं , तू आला की मी येईल इथे." ...ती बोट दाखवत तिथेच थोडे दूर असलेल्या घराकडे इशारा करत बोलली.  

" ठीक आहे .... भेटू उद्या " ....बोलत तो त्याच्या घरी जायला वळला, आणि काहीतरी आठऊन परत फिरला. 


" तुझं नाव काय ?" .....विवेक

" प्रभाती  " .....ती 

" नवीन सकाळ, नवीन सुरुवात ....."...तो 

" हां .??" ....ती

" तुझ्या नावाचा अर्थ ग " ....तो

" ह्म , तुझे नाव काय??" ...ती

" विवेक ...." ...तो 

" Good Knowledge, सतबुद्धी ......" ... ती

" हो ना , तरी आपल्या नावासारखा नाही वागलो ना, आपल्या सतबुद्धीचा वापर नाही केला. " ....तो.

" ठीक आहे ना , आता पुढल्या पासून उपयोग कर . बरं एक महत्वाचे उद्या जाशील तिथे माझं नाव नको सांगशील .  " ....ती 


" तुझी मैत्रीण आहे ना ??" ....... तो

" हो , पण आमचं जरा थोडंसं बिनसलंय . त्यामुळे तिला अजिबात कळू देऊ नको तू प्रभातीला ओळखतो ते. तिला जर तू माझी ओळख सांगितली तर मग मी कधीच तुला भेटणार नाही. " ....ती 


" तुझी मैत्रीण आहे ना , मग इतके वैर ??? तू तर किती समजदार वाटते आहे , सोडवून टाक काय तो गुंता तुमच्यामधला . " ....तो 


"हो झाला होता थोडा मोठा इश्यू , माझं मी बघेल आहे.  चल बाय ." ....ती , त्याला बाय करून निघून गेली. तो पण स्वस्थ , फ्रेश मनाने, नवीन संकल्पनेने घरी परत गेला. 


तर हा चोवीस वर्षाचा विवेक , आयुष्याला कंटाळून नदीच्या पुलावर आत्महत्या करायला आला होता. बराच वेळ हिम्मत करून पुलावरून खाली नदीमध्ये उडी घेणार तेवढयात प्रभातीची नजर त्याच्यावर पडली , आणि तिने तिच्या समजदारीने त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले होते. 


******

" अरे काय शोधतोय ??? का एवढी उलथापालथ करून ठेवलीय???" ... विवेकची आई जर्जर आवाजात बोलली. 

" अग एक कार्ड होते , खूप महत्वाचे आहे,  ते शोधतोय . काल या शर्ट मध्येच ठेवले होते, पण दिसत नाही आहे . कुठे पडले आहे काय ते बघतोय . " .....तो 


विवेकला फॅशन शो साठी इवा हाऊसला जायचे होते, आजची शेवटची तारीख होती फार्म भरायची . काल प्रभातीने इवा फॅशन हाऊसचे दिलेले विजिटिंग कार्ड तो शोधत होता , पण त्याला ते कुठेच मिळत नव्हते. 


******
क्रमशः 

(सदर कथा ही पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कुठल्याच व्यक्ती, स्थळ अथवा घटनेशी काहीही संबंध नाही . काही समांतर गोष्टी आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या कथेतून समाजाला हानी पोहचवायचा उद्देश नाही. कथेतून काही प्रेरणा घ्यावी, काही शिकता यावे , हाच एक एकमेव प्रयत्न. ) 

कथा कशी वाटतेय , नक्की कळवा. 
धन्यवाद !!!!! 

🎭 Series Post

View all