Login

लव ट्रँगल भाग ९

मला, समीरला, ऋतूला, राधाला....
......"सगळ्यांना.... कुणाला माहित आहे??..." नील जवळ जवळ ओरडतोच...
------------------------------------------------------
पुढे......

              "मला,समीरला,ऋतूला,राधाला,नमूला आणि राजाला आम्हा सर्वांना तर माहित झालं आहे. आता फक्त मोठ्या माणसांना माहित व्हायचं आहे आणि मला वाटतं ते ही लवकरच होईल. दादा तुला भीती वाटत असेल तर मी आई बाबांना सांगू?" श्वेता नीलला विचारते.
           "चूप...काही एक शहाणपणा करू नकोस...अग अजुन कशातच काही नाही. मी अजुन तिला बोललो सुद्धा नाही की लागली तू लगेच आई बाबांना सांगायला. वेळ आली की मी नक्की सांगेन" नील श्वेतावर रागावून बोलतो.
        "पण दादा आई बाबा काय बोलतील रे...तुला तर माहीतच आहे ना मुकुंद मामा आणि भावना मामीची हिस्ट्री... त्यामुळे आई बाबा कदाचित नकारही देतील..." श्वेता.
         "बस्स श्वेता....पुढे काय होईल ते बघून घेऊ त्यासाठी मला माझा आजचा दिवस खराब नाही करायचा. सो प्लीज अजुन काही बोलू नकोस...प्लीज" नील खालच्या स्वरात श्वेताकडे न पाहताच बोलतो.  श्वेतालाही कळून चुकत की खरोखरच आपल्या बोलण्याचा त्याला त्रास झाला आहे. म्हणून ती काही न बोलता तिथून निघून जाते. पण...पण सत्य नाकारता येत नव्हत. (पुढे समजेलच काय ते) नील अजूनही श्वेताच्या बोलण्याचा विचार करत होता. त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. पण लगेच त्याने तो विचार मनातून झटकून टाकला व लग्नाच्या तयारीला लागला.
---------------------------‐--------------------------

                 " ताई... खरच तुला नील आवडतो का ग" नमू आवराआवर करत आशूला विचारते.
       "अग आवडतो म्हणजे काय?  हे काय विचारण झालं...खरच आवडतो... खूप..." आशू लाजरा चेहरा करत बोलते.
       " ते ठीक आहे ग...पण बाबांना हे समजल तर" नमू अस बोलताच आशूचा चेहराच उतरतो. आणि हे नमूच्या लगेच लक्षात येत.
          "तसं तर मलाही तो आवडतंच होता...पण आता तुम्ही चान्स मारला म्हंटल्यावर आम्ही बिचार्‍या लोकांनी काय करायचं...मग काय आता जिजूच म्हणाव लागेल."विषय बदलण्यासाठी नमू बोलते. तस आशूच्या चेहर्‍यावर हळूच स्माईल येते.
           " गप्प...आगाऊ कुठली...अजुन कशातच काही नाही तर तुझ आपल जिजू...." आशू हळूच नमू च्या डोक्यात टपली मारून बोलते.
        " बर बघु पुढे काय होत. आता तयारीला लागा... लग्नाची वेळ होत आलीय." नमू आशूला म्हणते आणि दोघीही आवराआवर करायला लागतात.
------------------------------------------------------

                राधा, ऋतूचीही तीच चर्चा चालू होती. आणि समीर, राजा ही त्याला अपवाद नव्हते. सगळे मांडवात जमले होते. मंगलाष्टके ही चालू झाली होती. घरातील पहिले लग्न असल्याने कन्यादान म्हणून लग्न दारातच आयोजित केले होते. प्रशस्त अश्या लग्न मांडव पाहुण्यांनी भरून गेला होता. पूजा ज्या कंपनीत कामाला जायची त्याच कंपनीत कार्यरत असलेल्या एका उच्च शिक्षित मुलासोबत म्हणजेच 'मनोज कदम' सोबत तीच लग्न ठरलं होतं. मनोज ने पूजा च्या घरी येवून रीतसर मागणी घातली होती अर्थातच मुलगा उच्चशिक्षित, कष्टाळू, एकुलता एक, देखणा शिवाय स्व जातीतील असल्याने विश्वासराव पाटील व कुटुंबियांची ही ना नव्हती. असो.....
 -----------------------------------------------------
      
             आपल्या ग्रुप मुळे लग्नाला चार चांद लागले होते. सगळेजण पूजाला आपली बहीणच मानत होते. त्यामुळे परकेपनाचा काहीच विषय नव्हता. नील च्या मनात आशूला पाहून एक वेगळीच ट्यून वाजत होती. आज तिने चॉकलेटी आणि गोल्डन रंगाचा हेवी वर्क घागरा घातला होता.... त्यावर मॅचिंग डायमंड ज्वेलरी घातली होती.... केसाची सुंदर केशरचना करून त्यावर आर्टिफिशियल चॉकलेटी रोज लावले होते.... तिच्या दाट पापण्या आज आणखीच गर्द दिसत होत्या....दोन कोरीव भुवयाच्या मधोमध टिकली लावली होती.... डोळ्यातल काजळ आज थोड जास्तच होत....थोडासा ब्लश केला होता.... ओठांवर डार्क चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावली होती...तीच रूप आज जास्तच मोहक दिसत होत. नवरीपेक्षाही आशू आज सुंदर दिसत होती अस म्हंटल तरी हरकत नाही.
                आणि योगायोग काय तर नीलनेही आज चॉकलेटी रंगाचा कॉटन कुर्ता आणि त्यावर गोल्डन रंगाची सलवार घातली होती. नील आशूला पाहून भारावून गेला होता. 'काहीतरी जादू आहे तिच्यात त्यामुळेच जेव्हा मी तिला पाहतो प्रत्येक वेळी मला एक वेगळच आकर्षण जाणवतेय. आतातरी अस वाटतय की मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही.' नील मनाशीच बोलत होता.
       'कस शक्य आहे??...सेम कलर...तेही प्रत्येकवेळी...हाऊ????...' आशूच्या मनात विचार डोकावून गेला.
          "आम्हाला फसवता काय रे...दोघेही. तुमच आपल गुपचूप ठरलेल असत कोणता ड्रेस, कोणता कलर घालायचा म्हणून".... समीर दोघांकडे बघत बोलतो.
       "ए...तस काही नाही हा... उगाच मिसअंडरस्टँडींग करून घेवू नका." नील सगळ्यांना म्हणतो.
      "हो हो...नील म्हणत आहेत ते खर आहे...तुमची काहीतरी चुकीची समजूत झालेय." आशूही नीलला दुजोरा देत म्हणाली.
       "अरे वाह! क्या बात है...आतापासूनच अहोजाहो बोलायला सुरवात केली काय...राधा हसून आशूला म्हणते. तस आशू हळूच लाजते.
         'लाजते आहे ती...म्हणजे नकळत होकार...' नील चा आपला मनाशीच संवाद.
      "काय विचार चालू आहे हीरो..." राजा नीलला म्हणतो तसं नील स्वप्नजगातून बाहेर येतो.
      " कुठे काय...ते मला आशूला सांगायच होत की मला अहोजाहो नको बोलू...तसं दोन तीन वर्षांच तर अंतर आहे आपल्यात सो.. तू मला नील म्हणू शकतेस." नील आशू कडे पहात बोलतो.
       " आणि मला अहोजाहो बोलायचेच असेल तर...." आशूच्या या हट्टी वाक्यावर मात्र सगळेच डोळे विस्फारून तिच्याकडे पहात राहतात.
------------------------------------------------------

                                          
                                             क्रमशः.................


🎭 Series Post

View all