Login

लव ट्रँगल भाग ८

एवढ्या उशीर मोबाईल मध्ये डोकं खुपसून...
  ....."अर्रर्र...मला वाटलं मिशन 'अंधश्रद्धा निर्मूलन'....हाऽ हाऽऽ हाऽऽ"...ऋतूच्या या वाक्यावर सगळेच हसायला लागतात....
------------------------------------------------------
पुढे.....

             एवढ्या उशीर मोबाईल मधे डोके खुपसून बसलेल्या नमूचे लक्ष मात्र सगळ्यांच्या बोलण्याकडेच होते. काय मॅटर चालू आहे याची तिला थोडीफार कल्पना आलीच होती. एव्हाना नवरीला नवरदेवाला हळद लागली होती. पाटील दाम्पत्य पूजाविधीच्या कार्यक्रमात मग्न होते. अर्थातच सरतापे कुटुंबही मदत करत होते, शेजारधर्म जपत होते. पाहुण्यांची गर्दी आणि त्यात ही आपली गँग.  अशाच वातावरणात नील आणि आशूच्या हृदयात फुलणार प्रेम...एकमेकांकडे पाहणार्‍या चोरट्या नजरा...आणि त्याला संगीताची सुमधूर साथ.
------------------------------------------------------
                
               इकडे नववधूची हळद झाली रे..झाली की सगळ्यांचा एकच गलका उडाला. कुणी कुणाला चोरून, लपून हळद लावतोय...तर कुणी कुणाला समोर दिसताच हळदीने भरवतोय.पण गंमत अशी की नील आणि आशू समोरासमोर असूनही हातात असलेल्या हळदीचे हात तसेच आखडून एकमेकांकडे पाहात उभे होते. जणू त्यांना अबोल भावनेने एकमेकांना सांगायचे होते की, तुला पहिल्यांदा मीच हळद लावेन.
          "नील..., अरे किती वेळ असा पहात राहशील. तिला राहूदे हळद लावायची चल आमच्यासोबत तरी खेळ ना." राजा उगाच डिवचायच म्हणून नीलच्या कानात येवून हळूच फुसफुसतो.
          "ताई...अग ए ताई...अशी का पुतळ्यासारखी उभी आहेस...हळद नाही खेळायची काय? कोणाची वाट बघतेय?" नमू ओरडतच येते.
         "अं...काय नाही. ते मी...ह..आलेच चल" अस म्हणून आशू नमूच्या पाठीमागे जायला निघतेच की, नील चा आवाज येतो.
            "एस्क्यूज मी! आशू...मी तुला हळद लावू शकतो?.. आय मीन तुझी काही हरकत नसेल तर?.." नील आशू जवळ जात विचारतो. तो पहिल्यांदाच तिला बोलत असतो त्यामुळे जरा भीत भीतच, की ती काय रिऍक्ट करेल.
          " हो.. हो..का नाही..जरूर.  खरतर मी पण हेच विचारणार होते तुम्हाला." आशू जाता जाता थांबून म्हणते. ती आपल्याशी बोलतेय हे पाहून नील च्या मनात आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या. फायनली दोघांनीही एकमेकांना हळद लावली. आशू चा त्याच्या गाला पर्यंत पोहोचलेला हात...तिचा हळुवार स्पर्श... तिच्या डोळ्यात पाहताना अस वाटत होत की जणू त्यात असंख्य भावना दडल्या आहेत...काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत.
------------------------------------------------------
                 
                     तुला पाहिल की मला एक वेगळाच फील येतोय. अस वाटत की आपल जन्मोजन्मीच नात असाव. पहिल्यांदाच मी हे अनुभवतोय. काय म्हणाव याला?...प्रेमच ना?...  आणि जर का याला प्रेम म्हणावं तर मी तुझ्यावर खुप खुप, अफाट प्रेम करतोय...करत राहीन...मला तुला हे सांगायचंय. मग तुझी प्रतिक्रिया काही असो...अंथरुणावर पडल्या पडल्या नील विचाराच्या सागरात बुडला होता. रात्री उशिरा कधी डोळा लागतो त्यालाही समजत नाही.
               

                आवडतोस तू मला. तुझं बोलणं, तुझा वक्तशीरपणा, तुझं व्यक्तिमत्त्व आणि तुझं भुरळ घालणारं रूप...खरंच प्रेमात पडलेय मी तुझ्या. माझा होकार आहेच, पण आपण एकमेकांना भेटू? मला नाही वाटत. कारण माझा तुझ्यावर जितका जीव जडलाय तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त माझ्या आई बाबांवर माझ प्रेम आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर मी नाही. तरीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन...तुझ्यासाठी मी हे करेन...इकडे आशूचेही विचारचक्र जोरात फिरत होते.
------------------------------------------------------


                 लग्नाचा दिवस उजाडला. नीलच्या एका नव्या निश्चयाने. आजच तो तिला म्हणजे आशूला प्रपोज करणार होता. त्याच्या मनात, डोक्यात भावनांच, विचारांच द्वंद्व चालू होत. एक मन म्हणत होत बोलून टाक...तुझ्या मनात जे काही आहे ते सांगून टाक...नाहीतर पुन्हा उशीर होईल...पश्चाताप होईल. पण दुसर मन म्हणत होत, विचार करून बघ...हे खूपच अति घाईत होतय... तू काय म्हणून तिच्यापुढे तुझं प्रपोजल ठेवणार आहेस...अजुन शिक्षण पूर्ण नाही...तू स्वतः स्वावलंबी नाहीस की धड घरदार नीट नाही...ती काय म्हणून तुला होकार देईल?... त्याला दुसर्‍या मनाच बोलणं पटतही होत पण पाहिल मन धीर धरत नव्हत. अखेर पहिल्या मनानेच त्याच्या भावनांवर ताबा मिळवला होता. त्यान आज प्रपोज करायचा ठरवलच होत. आणि तो त्याच्या निश्चयावर ठाम होता.
------------------------------------------------------
                      
               "आजही स्वारी खूपच खुश दिसतेय. क्या बात है...जरा हमे भी बता दो..." श्वेता नीलच्या हातात पोह्याची प्लेट देत विचारते.
          "ओ...मॅडम आधी ती प्लेट खाली ठेवा, मग बोला. आणि काय ग तुला किती वेळा सांगितल की मी नेहमीच खुश असतो म्हणून मग सारखं सारखं तेच का विचारतेस उगाच नजर लागायची मला." नील पोह्याची प्लेट हातात घेत बोलतो.
         "दादा...तू आमच्यापासून काय लपवतोयस हे आम्हाला चांगलच माहीत आहे म्हणून जास्त नखरे नको करू हा.. ते मला माहितीय तुझं नी आशू..."पुढे काय बोलणार की नील लगेच तिच्या तोंडावर हात ठेवतो. " श्शऽऽ हळू...हळू बोल.आई-बाबा ऐकतील. क...काय माहीत आहे तुला." नील पाण्याचा घोट गिळत श्वेताला विचारतो.
       " मलाच नाही,सगळ्यानाच माहित आहे की तुझं आशू वर प्रेम आहे म्हणून आणि आई बाबांना का घाबरतोय एक ना एक दिवस सांगावच लागेल ना..." श्वेता नीलला म्हणते.
       " सगळ्यांना...कुणाला माहित आहे??" नील जवळ जवळ ओरडतोच...
------------------------------------------------------


                                    क्रमशः..................       


🎭 Series Post

View all