Login

लव ट्रँगल भाग ११

नील तिच्यासमोर दोन ...
......क्षणातच मध्यभागी असलेला बल्ब चालू होतो आणि आशूच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही.....
------------------------------------------------------
पुढे.........
        
              नील तिच्यासमोर दोन गुडघे जमिनीवर टेकलेल्या अवस्थेत चक्क हातात गुलाबाच फुल घेऊन बसलेला असतो. 'हे काय मी स्वप्न तर पहात नाही ना?'असा प्रश्न मनात येऊन ती आपले डोळे चोळून पुन्हा पाहते तर तेच...
            "तु स्वप्न नाही पहात आहेस आशू..हे सत्य आहे." नील आशूची झालेली अवस्था पाहून म्हणतो. आतातर आशूला खात्रीच होते की हे खरच घडत आहे. आता नील काय बोलतो याकडेच तीच लक्ष लागल होत. त्या घाबरलेल्या अवस्थेतही ती नीलच्या बोलण्याची वाट पहात होती.
               "आशू हे एक सरप्राईज आहे. फक्त सरप्राईजच नाही तर हे एक सत्य आहे. जे मी तुला आज बोलून दाखवणार आहे. हे बघ...माझ बोलण शांतपणे ऐकून घे आणि नंतर तुझी काय प्रतिक्रिया असेल ती सांग. आधी फक्त माझ ऐकून घे.प्लीज.. आशू तुला जेव्हापासून मी पाहिलय तेव्हापासून मला एक वेगळच फील होत आहे अस वाटत आपल जन्मोजन्मीच नात असाव... तुझ्या माझ्याबद्दल काय फिलिंग असतील मला माहीत नाही पण आयुष्यात पहिल्यांदाच मला हे जाणवतेय... नक्की याला प्रेमच म्हणाव ना?...पण प्रेमाची परिभाषा काय असते हे मला खरच माहीत नाही कारण मी हे पहिल्यांदाच अनुभवतोय.  तू मला आवडतेस...तुझ्यावर मी खुप प्रेम करतोय. आयुष्यभरासाठी तुझी साथ हवी आहे मला ...देशील?...मला माहित आहे हे तुझ्यासाठी इतक सोप्प नाही... तुझं ही आयुष्य आहे..तुलाही भावना आहेत..निर्णय आहेत ,त्यामुळे घाई नको...तुझाच निर्णय पुढे अटळ राहील... परिस्थितीने जरी गरीब असलो तरी मनाने मुळीच नाही. आजची परिस्थिती उद्या बदलून जाईल पण तू, तुझं प्रेम मला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. म्हणून माझ्या परिस्थिती कडे लक्ष देऊ नको. मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि नेहमी करत राहीन. आता माझ्या प्रेमाला बहर द्यायचा की नाही हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे." इतक बोलून नील शांत होतो.
               सगळे त्या दोघांकडेच पहात असतात. आशू तर अगदी पुतळ्यासारखी उभी होती. काय बोलाव हे तिला सुचतच नव्हत. आज पहिल्यांदाच ती पहात होती, ऐकत होती नीलला. इतक्या नाजुक विषयावर किती सविस्तरपणे तो बोलत होता. त्याच्या बोलण्याची जणू तिला भुरळच पडली होती. थोडीशी भीती आणि थोडासा आनंद यांच मिश्रण तिच्या मनामध्ये निर्माण झाल होत. आता ती काय उत्तर देते याकडेच सर्वांच लक्ष लागल होत.
               आशू  थरथरत्या हाताने नीलच्या हातातील गुलाबाचं फुल घेते. " नील माझही तुमच्यावर प्रेम आहे आणि नेहमीच राहील. बाकी माझ काय मत आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेनच, मला फक्त थोडा वेळ द्या."आशू  अस म्हणताच नील आनंदाने उडीचं मारतो. तिचा एक होकार त्याच्यासाठी सर्वकाही होत. पुढे काय?...हे ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हताच ईतका त्याला आनंद झाला होता. त्याचा हा बालिशपणा पाहून आशू  ला हसूच फुटल.
             " थँक्यू....थँक्यू सो... मच आशू...." नील तिच्याकडे प्रेमाने पहात म्हणाला.  आशूच्या मनात मात्र सारखी घालमेल चालू होती. 'आपण होकार तर दिला पण पुढे काय होईल ?..' पण चेहर्‍यावर तसे भाव न दाखवता ती ही आनंदी होती. एकूणच सर्वांना आनंद झाला होता.
------------------------------------------------------
    
                "ताई... निघतो आम्ही. आणि हो मुलींवर लक्ष असुदे...सुट्ट्या संपल्या की मी परत येईन न्यायला. नमू, आशू नीट रहा...माझा कॉल रोज येतच राहील." मुकुंदराव- भावना, सोयराबाई व विश्वासरावांना नमस्कार करून मुंबईला परत जायला निघतात. जाता जाता त्यांची तिखट नजर केवळ नील वरच टिकून होती. आशूच्या नजरेतून हे सुटत नाही. आणि तिच्या मनात विचार येवून जातो. 'बाबांना तर हे कळल नसेल?....'
                    एव्हाना ऋतू, राधा आणि राजाही निघायच्या तयारीत असतात.
        "चला मित्रांनो...निघतो आम्ही. निकालाच्या दिवशी भेटूच. काळजी घेत जा...आणि कॉल करत जा..गरज पडलीच तर तुमच्या या मित्राला हाक द्या, तुमचा मित्र हजर राहील." राजा भरल्या डोळ्यानी सर्वांचा निरोप घेत होता. ऋतू आणि राधाच्याही डोळ्यात आसव जमा झाली होती.  आशू नमूलाही दुःख झालं होत. थोड्या दिवसातच त्यांची चांगली मैत्री जमली होती. सगळे एकमेकांची गळाभेट घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले.
              "थांब राजा"अस म्हणून नील राजाच्या गळ्यात येवून पडतो आणि त्याच्याही आसवांना बांध फुटतो. समीरही दोघांजवळ येवून त्यांना छातीशी कवटाळतो. बराच वेळ तिघेही तसेच रडत असतात. त्यांच हे मित्रप्रेम पाहून सगळ्यांनाच गहिवरून येत.
          "रडू नको मित्रा...भेटत जाऊ..आणि ए .... दुःख तर मला खूप झालंय, कारण तुझी रासलीला आम्हाला बघायला नाही मिळणार."—राजा.
राजा काय बोलतोय हे चटकन लक्षात न येवून नील म्हणतो " म्हणजे?.."
  "बर जाऊदे निघतो आम्ही आता... उशीर झालाय" अस म्हणून ऋतू ,आशू आणि राजा निघुन जातात.
------------------------------------------------------

                                                         क्रमशः......
              


🎭 Series Post

View all