Login

लव ट्रँगल भाग १०

आणि अनावधपने आपणं काय बोलून गेलो...
  ....."आणि मला अहोजाहो बोलायचेच असेल तर..."आशू च्या या हट्टी वाक्यावर मात्र सगळेच डोळे विस्फारून तिच्याकडे पहात राहतात .....
------------------------------------------------------
  पुढे.............

                आणि अनावधपणे आपण काय बोलून गेलो हे तिच्या चटकन लक्षात येते. तशी जीभ दाताखाली चाऊन ती गर्रकन मागे फिरते व तशीच आईजवळ जाऊन बसते. ती गेली त्या दिशेने सगळे पहात असतात तर ईकडे नीलच्या मनात डिंगऽ डॉंगऽ डिंगऽ चालू असत.

           लग्न व्यवस्थित पार पडत. पूजाची पाठवणी   करताना सोयराबाईचा आणि जमलेल्या सर्वांचाच ऊर भरून आला होता. सुशीलाबाई म्हणजे नीलची आईही पूजाच्या गळ्यात पडून रडत होती. पूजा त्यांना त्यांच्या मुलीसारखीच होती. त्यांना पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात आसव आली होती. मुलीचं जास्त भावूक झाल्या होत्या. कारण त्यांच्याही नशिबी कधीनाकधी हा दिवस अनुभवावा लागणार होता. हळूहळू पाहुण्यांची गर्दी ही पांगली होती.
               "चला...खूप दिवस झाले...लग्न खूप छान झाल समीर. आता आम्ही पण निघाव म्हणतोय.." राजा समीरला म्हणाला.
         "हो आम्ही उद्याच निघू... घरचे वाट पहात असतील" राधा म्हणाली तसं ऋतूनेही तिला दुजोरा दिला.
         "तुमचाही थोडाफार मदतीचा हात होता, सिंहाचा नाही पण खारीचा तरी वाटा होता.. तेही आमच्यासाठी कमी नव्हत .म्हणूनच लग्न छान पार पडल मित्रांनो...थँक्स ऑल ऑफ यू..."समीर सगळ्यांकडे पाहात म्हणाला.
          "हे बघ समीर तू आमचा मित्र नाही भाऊ आहेस तुझा आनंद तो आमचा आनंद आणि तुझं दुःख ते आमच, म्हणून अस थँक्स म्हणून आम्हाला शरमिंदा करू नकोस." नील समीरला म्हणाला तसं समीर नील च्या गळ्यात पडून रडू लागला.
           "ओह! कमऑन समीर...आधी ते रडन बंद कर बघू. किती विचित्र दिसतोस रे रडताना. ऑ ..."ऋतू अस म्हणताच समीरला हसू फुटत आणि तिला मारण्यासाठी तो तिच्या पाठी पळू लागतो.
----------------------------------‐--------‐----–----

              संध्याकाळची वेळ...सगळेच म्हणजे आपला ग्रुप समीरच्या घराच्या गच्चीवर निवांत गप्पा मारत बसला होता.  गच्ची म्हणजे हवेशीर जागा...वरती प्लास्टिक पत्र्याचे सुंदर नक्षीकाम असलेल छत...चारी कोपर्‍यात लाइटचे बल्ब आणि बरोबर छताच्या मध्यभागी आकर्षक असा कलरफुल बल्ब.
               सगळेच थकलेले होते. दिवसभर धावपळ झाली होती. त्यामुळे कुणी पडून होत तर कुणी बसुन गप्पा मारत होत. फक्त आशू मात्र तिथे दिसत नव्हती. कारण आम्ही वरती आहोत हे तिला कुणी सांगितलंच नव्हत. सगळे गुपचूप वरती निघून आले होते. कारणही तसंच होतं, नीलला तिला सरप्राईझ द्यायच होत. म्हणून प्लॅनिंग करुनच सगळे वरती जमले होते.
             "आत्या...सगळेजण कुठे आहेत ग?..केव्हाची शोधतेय मी."आशू सोयराबाईकडे येत विचारते.
              "अग मला तरी काय माहीत...असतील बाहेर नाहीतर, बसले असतील वरती गच्चीवर गप्पा मारत." सोयराबाई अस म्हणताच आशूच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती लगोलग गच्चीच्या पायर्‍या चढून वर जाते. पण गच्चीचा दरवाजा बंद होता म्हणून ती सर्वांना आवाज देऊ लागली. " कुणी आहे का वरती  किती वेळ झालं शोधतेय तुम्हाला..आणि हा दरवाजा का बंद आहे?.."—आशू .
             " शूऽऽ श ऽऽ ती आली आहे..माहित आहे ना काय करायच ते.." नील सर्वांकडे बघून हळू आवाजात बोलतो तस सगळेजण डोळ्यानेच हो म्हणून सांगतात. आशूच्या हाकेला कोणाचाच प्रतिसाद मिळत नाही. तेव्हाच दाराची कडी सरकण्याचा आवाज तिला येतो.
         'ह्म्म..तर नक्कीच आहेत हे ईथे..पण दरवाजा का बंद करावा?..' आशू विचार करत असतेच की दरवाजा उघडला जातो पण काय तिथ तिला कुणीही दिसत नाही. सगळीकडे अंधारच अंधार असतो. तरीही ती पुढे येवून आवाज देवू लागते. " नमे...कुठ आहेस? आणि बाकी सगळे?" तरीही कुणाच उ ना चू.. शेवटी वैतागून तीच माघारी जायला वळते तेव्हाच लाइटचा एक बल्ब चालू होतो आणि त्या ठिकाणी ऋतू, राधा हातात गुलाबाचं फुल घेऊन उभ्या असतात...आशू त्यांना काही बोलणार ईतक्याच दुसर्‍या कोपऱ्यातील बल्ब चालू होतो आणि तिथे समीर आणि राजा गुलाबाचं फुल हातात घेऊन उभे असतात. त्या उजेडात बाजूच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या नमू आणि श्वेता ही आशूला दिसून येतात त्याच्याही हातात तशाच गुलाबाचं फुल होत. क्षणातच तिथला ही बल्ब चालू होतो. पण त्या सगळ्या बल्बचा प्रकाश ठराविक अंतरापर्यंतच मर्यादीत होता. त्यामुळे गच्चीच्या मध्यभागी उभ्या असलेल्या आशू पर्यंत तो प्रकाश पोहोचू शकत नव्हता. कारण तेथील बल्ब ऑफ होता.
                नेमक काय चालू आहे हे तिच्या लक्षातच येईना. त्यांना सर्वांना पाहून तीला हायसं वाटलं पण तीच मन फक्त नीलला शोधत होत. 'हे सगळेजण ईथे मग नील कुठे आहे? गेला असेल घरी कदाचित, तो मला थोडीच सांगणार आहे..पण असा श्वेताला ईथेच सोडून एकटा निघून जाणं शक्य नाही.' मनात नानाविध विचार येत होते.
                    
                क्षणातच मध्यभागी असलेला बल्ब चालू होतो आणि आशूच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
-----------------------------------------------------
 


                                                   क्रमशः..........


🎭 Series Post

View all